सदाशिव आठवले
सदाशिव आठवले (जन्म : सातघर-अलिबाग, २३ मार्च १९२३[१]; - ८ डिसेंबर २००१) हे मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. सदाशिव आठवले यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत.
सदाशिव आठवले | |
---|---|
जन्म नाव | सदाशिव आठवले |
जन्म | ३ मार्च १९२३ |
मृत्यू | ८ डिसेंबर २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहाससंशोधन, इतिहासलेखन, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहाससंशोधन, साहित्य |
विषय | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, इतिहासाचे तत्त्वज्ञान, रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे |
जन्म, शिक्षण व अध्यापन
संपादनसदाशिव आठवले ह्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील अलीबागपासून ८ मैलांवर असलेल्या सातघर ह्या लहान खेडेगावात झाला. त्यांनी पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून[२] १९४६ ह्या वर्षी इतिहास व राज्यशास्त्र ह्या विषयातील मुंबई विद्यापीठाची एम. ए. ही पदवी मिळवली[१].
१९४६ ते १९६२ ह्या काळात त्यांनी प्रथम सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथे इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले[३]. नंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय (१९५०-१९५८) आणि मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालय[१] (१९५८-१९६२)[२] येथेही त्यांनी इतिहास ह्या विषयाचे अध्यापन केले[४]. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाना फडणवीस ह्या विषयावर पीएचडी ह्या पदवीसाठी अभ्यास केला[५]. परंतु त्यांना ती पदवी मिळू शकली नाही[६].
१९६२ ते १९७० ह्या कालावधीत मराठी विश्वकोशात वरिष्ठ संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले[१]. संपादनाचे काम त्यांनी केले. परंतु प्रमुख संपादकांशी कार्यपद्धतीबद्दल मतभेद झाल्याने त्यांनी ते काम सोडले.[७]
नंतरच्या काळात ते कुर्डुवाडी येथील महाविद्यालयाचे (१९७०-१९७४) तसेच अहमदनगरच्या सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
प्रकाशित साहित्य
संपादनआठवले ह्यांची इतिहासविषयक, तसेच कथा, लघुकादंबरी, नाटक कविता अशा विविध साहित्यप्रकारांतील अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांपैकी काही पुस्तकांच्या एकाहून अधिक आवृत्त्याही निघाल्या आहेत.
इतिहासविषयक
संपादन- अर्वाचीन युरोप (१९७५)
- आधुनिक जग (१९७४)
- इतिहासाचे तत्त्वज्ञान (१९६७, १९८६)
- जगद्गुरू इब्राहिम आदिलशहा (१९९७)
- उमाजी राजे - मुक्काम डोंगर (१९९१)
- विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१९९९)
- केमाल पाशा (१९९४)
- चार्वाक इतिहास व तत्त्वज्ञान (१९५८, १९८०, १९९७)
- बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल
- जॉर्ज वाॅशिंग्टन (१९९६)
- तुळशीबागवाले दप्तर (१९९८)
- नाना फडणीस व इंग्रज (१९८०)
- प्राचीन भारताचा राजकीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - हेमचंद्र रायचौधुरी. सहअनुवादक - डॉ. मधुसूदन बोपर्डीकर)
- सरदार बापू गोखले (१९९०)
- मराठी सत्तेचा विकास आणि ऱ्हास (सहलेखक - प्र.ल. सासवडकर)
- रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे (१९८८)
- शहाजादा दारा शुको (१९९२)
- शिंदेशाही इतिहासाची साधने खंड १० व १२ (संपादन) (१९९५)
- शिवाजी व शिवयुग (१९७१, १९७४, १९८२, १९९२)
- हिंगणे दप्तर खंड ३ (संपादन) (१९८६)
कथासंग्रह
संपादन- असे पुरुष अशा बायका (१९६५)
- कसे जगावे कसे मरावे (१९६८)
- खरंखोटं (१९६०)
- तुझी लीला अगाध आहे (१९६५)
- तू नाही, तुझा बाप! (१९७५)
- नानाराव आणि मंडळी
- नीट बोल राधे (१९६६)
- परीपरीचे प्रियकर; तऱ्हेतऱ्हेच्या प्रिया (१९६३)
- पांढरा बाजार (१९५१)
- पिशाच्चसुंदरी (१९७५)
- बिझिनेस् इज् बिझिनेस् (१९८१)
- स्त्रियश्चरित्रम् आणि इतर वर्मकथा (१९५६)
लघुकादंबऱ्या
संपादन- अर्धपुतळा (१९५५)
- ऐक माणसा तुझी कहाणी (१९५५)
- रामायण : एक माणसांची कथा (१९९७)
- महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी (१९९८)
नाटके
संपादन- हा व्यवहार आहे (१९५३) (सहलेखिका: विजया आपटे)
कवितासंग्रह
संपादन- कागदी पुंग्या (१९५०)
नियतकालिकांतील लेखन
संपादनआठवले ह्यांनी दै. केसरी, चित्रमयजगत, नवभारत, भालचंद्र, युगवाणी, ललित, समाजप्रबोधनपत्रिका, सोबत, इत्यादी मराठी नियतकालिकांतून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत.
- सरोजिनी वैद्य यांनी संपादित केलेल्या आणि कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- आठवले, सदाशिव. "त्या गुरूला नमस्कार असो". In वैद्य, सरोजिनी (संपा.) (ed.). त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३). कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन. pp. १५३-१५८.
- देशपांडे, स. ह. (२०००). "इतिहासकार सदाशिव आठवले". अंतर्नाद. पुणे (ऑगस्ट, २०००): पृ. २३-३५.
- बोपर्डीकर, मधुकर (1981–82). "सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर". शारदा (पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर ह्यांचे वार्षिक). अहमदनगर (१९८१-१९८२): गौरवविभाग पृ. ३-९.CS1 maint: date format (link)