जुलै २०
दिनांक
(२० जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०१ वा किंवा लीप वर्षात २०२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन
सहावे शतक संपादन
- ५१४ - हॉर्मिस्दस पोपपदी.
पंधरावे शतक संपादन
- १४०२ - तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
अठरावे शतक संपादन
- १७३८ - पिएर गॉतिये दि व्हारेने एत दिला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.
एकोणिसावे शतक संपादन
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - पीचट्री क्रीकची लढाई.
- १८७१ - ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
- १८८१ - अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटिंग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.
विसावे शतक संपादन
- १९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
- १९०७ - अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
- १९१५ - वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
- १९२१ - टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
- १९२१ - न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
- १९२२ - लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलॅंड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
- १९२४ - ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
- १९२६ - मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
- १९२७ - मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.
- १९२९ - सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.
- १९३२ - जर्मनीने प्रशियात लश्करी अंमल लागू केला.
- १९३३ - लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यास ५,००,००० लोकांची रॅली.
- १९३३ - जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात २०० ज्यू व्यापाऱ्यांना अटक करून धिंड काढली गेली.
- १९३५ - रॉयल डच एरलाइन्सचे विमान स्वित्झर्लंडमध्ये कोसळले. १३ ठार.
- १९३५ - लाहोरमध्ये मुस्लिम व शिख धर्मियांमध्ये मारामारी. ११ ठार.
- १९३७ - फ्लोरिडातील टॅलाहासीशहराच्या तुरुंगात असलेल्या दोन श्यामवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.
- १९४० - डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - ऍडोल्फ हिटलरवर असफल खूनी हल्ला.
- १९४४ - मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केले.
- १९४७ - म्यानमारमध्ये ऑॅंग सानच्या खुना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
- १९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
- १९४८ - सिंगमन ऱ्ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४९ - इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
- १९४९ - व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- १९५० - बेल्जियमच्या संसदेने राजा लिओपोल्ड तिसऱ्याला अज्ञातवासातून परत बोलावले.
- १९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाची तात्पुरती राजधानी तैजोन वर हल्ला चढवला.
- १९५१ - जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिल्याची हत्या.
- १९५२ - फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे पंधरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९५४ - व्हियेतनाम युद्ध - जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.
- १९५५ - चीनने तैवानच्या क्वेमॉय व मात्सु बेटांवर तोफा डागल्या.
- १९५८ - युगोस्लाव्हियातील कोकिन ब्रेगच्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
- १९५९ - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी फ्रांसमध्ये.
- १९६० - सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख.
- १९६० - साएब सालेम लेबेनॉनच्या पंतप्रधानपदी.
- १९६१ - कुवैतला अरब संघचे सदस्यत्व.
- १९६२ - कोलंबियात भूकंप. ४० ठार.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - व्हियेतकॉॅंगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.
- १९६५ - एलियास त्सिरिमोकोस ग्रीसच्या पंतप्रधानपदी.
- १९६९ - अपोलो ११ चंद्रावर उतरले.
- १९६९ - होन्डुरास व एल साल्वाडोरमध्ये शस्त्रसंधी.
- १९७१ - सिरिया व जॉर्डनच्या सैन्यांमध्ये चकमक.
- १९७२ - नेदरलँड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
- १९७३ - केन्याच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने जाहीर केले की देशातील एशियन लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
- १९७३ - पेलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी जपान एरलाइन्सचे विमान पळवून दुबईला नेले.
- १९७४ - तुर्कस्तानने सायप्रसमध्ये आपले सैनिक उतरवले.
- १९७५ - सरकारी सेंसरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
- १९७६ - व्हायकिंग १ हे अंतराळयान मंगळावर उतरले.
- १९७६ - व्हियेतनाम युद्ध - अमेरेकेने थायलंडमधून आपले सैनिक काढून घेतले.
- १९७७ - पेनसिल्व्हेनियातील जॉन्सटाउन शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
- १९७९ - डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.
- १९८२ - आयरिश मुक्ती सेनेने लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ८ सैनिक ठार, ४७ जखमी.
- १९८३ - इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.
- १९८५ - अरूबाने नेदरलँड्स ॲंटिल्सपासुन विभक्त होण्याचे ठरवले.
- १९८९ - म्यानमारच्या सरकारने ऑॅंग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
- १९९२ - वाक्लाव हावेलने चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.
- १९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.
- १९९७ - बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९९८ - तालिबानच्या हुकुमावरून २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.
- १९९९ - चीनने फालुन गॉॅंग या संघटनेस दुष्ट संघटना ठरवले व त्यावर बंदी टाकली.
एकविसावे शतक संपादन
- २००२ - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
- २००३ - केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
- २००५ - चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
- २०१२ - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.
जन्म संपादन
- ८१० - इमाम बुखारी, हदीथचा संपादक.
- १८९० - जॉर्ज दुसरा, ग्रीसचा राजा.
- १९०० - मॉरिस लेलेंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
- १९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.
- १९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.
- १९७१ - एड गिडिन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू संपादन
- ९८५ - पोप बॉनिफेस सातवा.
- १०३१ - रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.
- ११५६ - टोबा, जपानी सम्राट.
- १३२० - ओशिन, आर्मेनियाचा राजा.
- १४५४ - जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.
- १९०३ - पोप लिओ तेरावा.
- १९२२ - आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.
- १९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
- १९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
- १९३७ - गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५१ - अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.
- १९५३ - डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन संपादन
- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.
- स्वातंत्र्य दिन - कोलंबिया.
- शांती व स्वतंत्रता दिन - उत्तर सायप्रस.
- मैत्री दिन - आर्जेन्टिना, ब्राझिल.
बाह्य दुवे संपादन
- बीबीसी न्यूजवर जुलै २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै महिना