त्बिलिसी

(त्ब्लिसी या पानावरून पुनर्निर्देशित)


त्बिलिसी (जॉर्जियन: თბილისი) ही जॉर्जिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जॉर्जियाच्या दक्षिण भागात कुरा नदीच्या काठावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे १५ लाख होती.

त्बिलिसी
თბილისი
जॉर्जिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
त्बिलिसी is located in जॉर्जिया
त्बिलिसी
त्बिलिसी
त्बिलिसीचे जॉर्जियामधील स्थान

गुणक: 41°43′N 44°47′E / 41.717°N 44.783°E / 41.717; 44.783

देश जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
स्थापना वर्ष इ.स. ४७९
क्षेत्रफळ ७२६ चौ. किमी (२८० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,५२६ फूट (७७० मी)
लोकसंख्या  
  - शहर १४,७३,५५१
  - घनता २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००
tbilisi.gov.ge

इ.स.च्या पाचव्या शतकात स्थापन झालेले त्बिलिसी गेल्या १००० वर्षांहून अधिक काळापासून जॉर्जियाचे राजधानीचे शहर राहिले आहे. रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना १८०१ ते १९१७ दरम्यान त्बिलिसी संपूर्ण कॉकेशस प्रदेशाची तर १९२० ते १९९१ दरम्यान जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.

सध्या त्बिलिसी हे जॉर्जियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून येथील लोकवस्ती बहुवर्णीय आहे.

जुळी शहरे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: