जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Грузинская Советская Социалистическая Республика; जॉर्जियन: საქართველოს საბჭოთა სოციალისტური რესპუბლიკა) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.
|
||||
|
||||
राजधानी | त्बिलिसी | |||
शासनप्रकार | सोव्हिएत संघाचे गणराज्य | |||
अधिकृत भाषा | जॉर्जियन, रशियन, अबखाझ, ओसेटिक | |||
क्षेत्रफळ | ६९,७०० चौरस किमी | |||
लोकसंख्या | ५४,००,८४१ | |||
–घनता | ७७.५ प्रती चौरस किमी |
१९१७ सालच्या रशियन क्रांतीनंतर रशियन साम्राज्याचा अस्त झाला व जॉर्जियाने जॉर्जियाचे लोकशाही प्रजासत्ताक नावाच्या स्वतंत्र देशाची घोषणा केली. परंतु १९२० साली रशियाने केलेल्या यशस्वी आक्रमणानंतर हे राष्ट्र पुन्हा रशियाच्या अधिपत्याखाली आले व सोव्हिएत संघाचे गणराज्य बनवण्यात आले. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत जॉर्जियाचे पुन्हा स्वतंत्र जॉर्जिया देशामध्ये रूपांतर झाले.