ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (इंग्लिश: Louis Francis Albert Victor Nicholas Mountbatten, 1st Earl Mountbatten of Burma; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.