लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम

लिओपोल्ड तिसरा (३ नोव्हेंबर १९०१ - २५ जुलै १९८३) हा १९३४ ते १९५१ दरम्यान बेल्जियम देशाचा राजा होता. वडील आल्बर्ट पहिला ह्याच्या मृत्यूनंतर १९३४ साली तिसरा लिओपोल्ड राज्यपदावर आला. दुसऱ्या महायुद्धामध्ये लिओपोल्डने लढाई चालू असताना आपल्या मंत्र्यांचा सल्ला न जुमानता अचानक नाझी जर्मनीपुढे शरणागती पत्कारली. ह्या त्याच्या निर्णयासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तसेच त्याच्या वर्तणुकीमिळे बेल्जियममध्ये प्रक्षोभ उसळला व त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले. १९४४ साली हिमलरने लिओपोल्डला जर्मनीमध्ये स्थलांतर करण्याची सक्ती केली. मे १९४५ मध्ये नाझी जर्मनी पराभूत झाल्यानंतर लिओपोल्डने बेल्जियमला परतणे टाळले व पुढील पाच वर्षे जिनिव्हामध्ये व्यतीत केली. अखेर २२ जुलै १९५० रोजी बेल्जियममध्ये परतून लिओपोल्डने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर लगेचच त्याला सत्ता सोडावी लागली.

लिओपोल्ड तिसरा
Leopold III
लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम


कार्यकाळ
२३ फेब्रुवारी १९३४ – १६ जुलै १९५१
मागील आल्बर्ट पहिला
पुढील बूदूं

जन्म ३ नोव्हेंबर १९०१ (1901-11-03)
ब्रसेल्स, बेल्जियम
मृत्यू २५ जुलै, १९८३ (वय ८१)
ब्रसेल्स, बेल्जियम
पत्नी ॲस्ट्रिड
अपत्ये बूदूं
आल्बर्ट दुसरा

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: