इंटरपोल
इंटरपोल (इंग्लिश: International Criminal Police Organization – INTERPOL; आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरातील १८८ देश इंटरपोलचे सदस्य आहेत व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समधील ल्योन शहरात असून इतर १८७ कार्यालये जगभरात आहेत.
इंटरपोलचा लोगो | |
इंटरपोलच्या सदस्य देशांचा नकाशा | |
स्थापना | १९२३ |
---|---|
मुख्यालय | ल्योन, फ्रान्स |
अधिकृत भाषा | अरबी, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश |
अध्यक्ष | खू बून हुई |
कर्मचारी | ५८८ |
अर्थसंकल्प | ५.९ कोटी अमेरिकन डॉलर |
संकेतस्थळ | http://www.interpol.int/ |
हि संगठना प्रामुख्याने लोक सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता विरोधी गुन्हे, पर्यावरणीय गुन्हे, युद्ध गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानवी तस्करी, अमली पदार्थ तस्करी, संगणक गुन्हे यावर काम करते.
सदस्य देश व उपशाखा
संपादनSub-bureaus shown in italics.
सदस्य नसलेले देश
संपादन पलाउ
सॉलोमन द्वीपसमूह
किरिबाटी
मायक्रोनेशियाची संघीय राज्ये
तुवालू
व्हानुआतू
उत्तर कोरिया
तैवान
ग्रीनलँड