फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

ফিল্মফেয়ার শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice dans un second rôle (fr); ફિલ્મફેર સર્વશ્રેષ્ઠ સહાયક અભિનેત્રી પુરસ્કાર (gu); Filmfare Award за лучшую женскую роль второго плана (ru); फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Nebendarstellerin (de); فلمفير جايزه د ښه مرستندويي لوبګري لپاره (ps); 印度電影觀眾獎最佳女配角 (zh); Филмферова награда за најбољу споредну глумицу (sr); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (pnb); فلم فیئر اعزاز برائے بہترین معاون اداکارہ (ur); フィルムフェア賞 助演女優賞 (ja); Penghargaan Filmfare untuk Aktris Pendukung Terbaik (id); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki Drugoplanowej (pl); פרס פילמפייר לשחקנית המשנה הטובה ביותר (he); Filmfare for bedste kvindelige birolle (da); Filmfarepris för bästa kvinnliga biroll (sv); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार (hi); Premi Filmfare a la millor actriu de repartiment (ca); Anugerah Filmfare untuk Pelakon Pembantu Wanita Terbaik (ms); Filmfare Award for Best Supporting Actress (en); جائزة فيلم فير لأفضل ممثلة في دور ثانوي (ar); Gwobr Filmfare am yr Actores Gefnogol Orau (cy); جایزه فیلم‌فیر بهترین بازیگر نقش مکمل زن (fa) award (en); শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); award (en); પુરસ્કાર (gu) Filmfare за лучшую женскую роль второго плана (ru); フィルムフェア賞 最優秀助演女優賞 (ja); Filmfare Award du meilleur second rôle féminin (fr)

फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. जरी फिल्मफेअर पुरस्कार १९५४ मध्ये सुरू झाले असले तरी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीची श्रेणी पुढील वर्षी १९५५ मध्ये सुरू झाली.

फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार 
award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचित्रपट पुरस्कार श्रेणी,
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार,
फिल्मफेर पुरस्कार
स्थान भारत
विजेता
स्थापना
  • इ.स. १९५५
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अभिनेत्री उषाकिरण यांना फनी मजुमदार दिग्दर्शीत बादबान चित्रपटातील मच्छीमार मुलगी मोहनीयाच्या भुमिकेसाठी पहिला पुरस्कार देण्यात आला. ह्या वर्षी दुसरे कोणतेही नामांकन नव्हते.[] रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये शबाना आझमी यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. आझमींना या आधी २०१७ मध्ये देखील हा पुरस्कार मिळाला होता.[] देवदास कादंबरीतील चंद्रमुखीच्या भुमिकेसाठी तीन वेळा हा पुरस्कार देण्यात आला आहे: वैजयंतीमाला (१९५७), माधुरी दीक्षित (२००३) आणि कल्की केकला (२०१०).

१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. अजून २०२४ पर्यंत हा पुरस्कार कधीही विभागून दिला गेला नाही. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.

विजेते आणि नामांकन

संपादन
निरूपा रॉय, फरीदा जलाल, जया बच्चन, सुप्रिया पाठक व राणी मुखर्जी ह्यांनी प्रत्येकी ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
 
अरुणा इराणीला सर्वात जास्त वेळा (१०) नामांकन मिळाले आहे.
वर्ष विजेत्याचे चित्र अभिनेत्री भूमिका चित्रपट
१९५५   उषाकिरण मोहनीया बादबान
अन्य नामांकन नाही
१९५६   निरूपा रॉय मालती बिरज बहू
गीता बाली बसंती कवी
सूर्यकुमारी राज रानी उडन खटोला
१९५७ वैजयंतीमाला चंद्रमुखी देवदास
अन्य नामांकन नाही
१९५८   श्यामा चंचल शारदा
नंदा लता भाभी
१९५९   नलिनी जयवंत किशोरी काला पानी
ललिता पवार रुक्मीणी सिंह पर्वरीश
लीला चिटणीस मोहनची आई साधना
१९६०   ललिता पवार सौ. लि'देसा अनाडी
अनिता गुहा रामकली गुंज उठी शहनाई
शशिकला रमा चौधरी सुजाता
१९६१   नंदा चंदा आंचल
दुर्गा खोटे महाराणी जोधाबाई मुघल-ए-आझम
कुमकुम राजलक्ष्मी मरियम उझ-झमानी कोहिनूर
ललिता पवार रामूची आई आंचल
१९६२   निरूपा रॉय मनोरमा छाया
शुभा खोटे रागिणी घराना
शुभा खोटे सीता ससुराल
१९६३ शशिकला जसवंती आरती
ललिता पवार सीतादेवी वर्मा प्रोफेसर
वहिदा रेहमान जबा साहिब बीबी और गुलाम
१९६४ शशिकला लिला गुमराह
अमीता नसीम मेरे मेहबूब
निम्मी नजमा
१९६५   निरूपा रॉय शोभा शहनाई
ललिता पवार दाई माँ कोहरा
शशिकला रूपा आई मिलन की बेला
१९६६   पद्मिनी भानू काजल
हेलन मिस किट्टी गुमनाम
शशिकला डॉ. नीता वर्मा हिमालय की गोद में
१९६७   सिमी गरेवाल डॉ. अंजली दो बदन
शशिकला अनिता बक्षी (ॲनी) अनुपमा
रिता फुल और पत्थर
१९६८   जमुना गौरी मिलन
मुमताज शांता राम और श्याम
तनुजा अंजली (अंजू) नाथ ज्वेलथीफ
१९६९   सिमी गरेवाल रजनी साथी
हेलन वीरा शिकार
शशिकला चंचल नील कमल
१९७०   तनुजा धन्नो पैसा या प्यार
बिंदू रेणू इत्तेफाक
फरीदा जलाल रेणू आराधना
१९७१   चांद उस्मानी चंपा पेहचान
बिंदू नीला आलोपी प्रसाद दो रास्ते
मुमताज रिटा आदमी और इंसान
१९७२   फरीदा जलाल बेला सिंह पारस
अरुणा इराणी निशा कारवां
हेलन लिली एलान
१९७३   झीनत अमान जस्बीर जैस्वाल / जैनीस हरे रामा हरे कृष्णा
बिंदू माला दास्तान
नाझिमा मीना बे-इमान
१९७४   राखी चांदनी दाग
अरुणा इराणी नीमा बॉबी
बिंदू चित्र अभिमान
नूतन अनु राय अनुराग
महजुभी सौदागर
१९७५   दुर्गा खोटे पार्वती बिदाई
बिंदू कामिनी सिंह हवस
रिटा इम्तिहान
जयश्री तळपदे डान्सर रेशम की डोरी
मौसमी चॅटर्जी तुलसी रोटी कपडा और मकान
१९७६   नादिरा मार्गरेट जुली
अरुणा इराणी रेखा दो झूट
फरीदा जलाल रेणू खन्ना मजबूर
निरुपा रॉय सुमित्रा देवी दीवार
प्रेमा नारायण धनो अमानुष
१९७७ - कजरी चंद्रा बालिका बधू
आशा पारेख शांता उधर का सिंदूर
बिंदू सरला शुक्ल अर्जुन पंडित
दीना पाठक गंगू रानी मौसम
वहिदा रेहमान अंजली मल्होत्रा कभी कभी
१९७८   आशा सचदेव रेणू प्रियतमा
अरुणा इराणी शांतिमोहन शर्मा / शांती "शन्नो" देवी खून पसीना
फरीदा जलाल श्रीमती सुब्रह्मण्यम शॅक
नाझनीन पार्वती दिलदार
राखी गुलजार निशा दूसरा आदमी
१९७९   रीना रॉय कामिनी अग्रवाल अपनापन
आशा पारेख तुलसी चौहान मैं तुलसी तेरे आंगन की
नूतन संजुक्ता चौहान
रणजीता निर्मला देशपांडे पती पत्नी और वो
रेखा जोहरा बेगम मुकद्दर का सिकंदर
१९८०   हेलन सूझी लहू के दो रंग
दीना पाठक श्रीमती कमला श्रीवास्तव गोल माल
फरीदा जलाल लैला जुर्माना
जेनिफर केंडल श्रीमती मरियम लबादूर जुनून
नीतू सिंग चन्नो काला पत्थर
१९८१   पद्मिनी कोल्हापुरे नीतू सक्सेना इन्साफ का तराजू
आशालता वाबगांवकर सिद्धेश्वरी आपने पराये
दीना पाठक निर्मला गुप्ता खुबसूरत
सिमी गरेवाल कामिनी वर्मा कर्ज
तल्लुरी रामेश्वरी माला आशा
१९८२   सुप्रिया पाठक सुभद्रा कलयुग
अरुणा इराणी कॅथी डिसूझा रॉकी
माधवी सपना एक दुजे के लिए
नंदा संगीता आहिस्ता आहिस्ता
सारिका अनिता कोहली शारदा
१९८३ सुप्रिया पाठक शबनम बझार
किरण वैराळे चिंकी नमकीन
वहिदा रेहमान ज्योती
नंदा छोटी माँ प्रेम रोग
रंजिता कौर शांती तेरी कसम
१९८४   रोहिणी हट्टंगडी बाई अर्थ
पद्मिनी कोल्हापुरे राधा सौतन
रेखा शकुंतला मुझे इंसाफ चाहिये
स्मिता पाटील कविता सन्याल अर्थ
झीनत मंडी
१९८५   अरुणा इराणी जानकी पेट प्यार और पाप
शर्मिला टागोर सितारा सनी
रोहिणी हट्टंगडी शोभा भावना
रेहाना सुलतान कल्याणी शर्मा हम रहे ना हम
सोनी राजदान सुजाता सुमन सरांश
१९८६   नूतन आरती मेरी जंग
अनिता कंवर नलिनी जनम
मधुर जाफरी कमला देवी सागर
राखी गुलजार सुजाता शर्मा साहेब
सुषमा सेठ अमिना बाई तवायफ
तन्वी आझमी सीता प्यारी बहना
१९८७ पुरस्कार नाही
१९८८ पुरस्कार नाही
१९८९   सोनू वालिया नंदिनी खून भरी मांग
अनुराधा पटेल माया इजाजत
पल्लवी जोशी सरोज अंधा युद्ध
१९९०   राखी शारदा प्रताप सिंह राम लखन
अनिता कंवर रेखा गोलूब सलाम बॉम्बे
रीमा लागू कौशल्या चौधरी मैने प्यार किया
सुजाता मेहता चंचल यादव यतीम
वहिदा रेहमान लता खन्ना चांदनी
१९९१   रोहिणी हट्टंगडी सुहासिनी चौहान अग्नीपथ
राधिका लक्ष्मी आज का अर्जुन
रीमा लागू श्रीमती विक्रम रॉय आशिकी
संगीता बिजलानी गीता साराभाई जुर्म
१९९२   फरीदा जलाल बिबी गूल हीना
दीपा साही आरती मल्होत्रा हम
रमा विज अधीक्षक प्रभावती प्रेम कैदी
वहिदा रेहमान दाईजान लम्हे
१९९३   अरुणा इराणी लक्ष्मी चौटाला बेटा
पूजा बेदी देविका जो जीता वही सिकंदर
शिल्पा शिरोडकर इन्स्पे. मेंदी रणवीर सेठी खुदा गवाह
१९९४   अमृता सिंग रोमा माथूर आईना
अनु अग्रवाल किरण/अनुराधा आर. बक्षी खलनायका
डिंपल कपाडिया शांती गर्दीश
राखी गुलजार सावित्री अनाडी
शिल्पा शेट्टी सीमा चोप्रा बाजीगर
१९९५   डिंपल कापडिया मेघा दिक्षीत क्रांतिवीर
अरुणा इराणी आशा शर्मा सुहाग
रवीना टंडन काजल बन्सल लाडला
रीमा लागू मधुकला चौधरी हम आपके हैं कौन..!
रेणुका शहाणे पूजा चौधरी
१९९६   फरीदा जलाल लाजवंती सिंह दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
अरुणा इराणी गायत्रीदेवी सिंह कार्तव्य
राखी गुलजार दुर्गा सिंह करण अर्जुन
रिता भादुरी सुमित्रा गरेवाल राजा
तन्वी आझमी फरीदा अकेले हम अकेले तुम
१९९७   रेखा मॅडम माया खिलाडियों का खिलाडी
अर्चना पूरण सिंग शालिनी 'शालू' सहगल राजा हिंदुस्तानी
हेलन मारिया ब्रागांझा खामोशी: द म्युझिकल
सीमा बिस्वास फ्लेव्ही ब्रागांझा
तब्बू तुळशीबाई जीत
१९९८   करिश्मा कपूर निशा दिल तो पागल है
अरुणा इराणी भाग्यलक्ष्मी दीक्षित गुलाम-ए-मुस्तफा
पूजा बत्रा अनिता विरासत
राखी गुलजार सौ.सुजाता सिंग सीमा
उर्मिला मातोंडकर जान्हवी साहनी जुदाई
१९९९   राणी मुखर्जी टिना मल्होत्रा कुछ कुछ होता है
प्रीती झिंटा प्रीती नायर दिल से..
राखी गुलजार गीता मल्होत्रा सैनिक
शेफाली शहा प्यारी म्हात्रे सत्या
तन्वी आझमी सौ. पौर्णिमा सहगल दुश्मन
२०००   सुश्मिता सेन रुपाली वालिया बिवी नं. १
सुष्मिता सेन नेहा सिर्फ तुम
महिमा चौधरी कविता किशोर दिल क्या करे
रीमा लागू शांता शिवलखर वास्तव
सुहासिनी मुळे मालती बर्वे हु तू तू
२००१   जया बच्चन निशातबी इकरामुल्ला फिझा
ऐश्वर्या राय मेघा शंकर मोहब्बतें
महिमा चौधरी शीतल वर्मा धडकन
राणी मुखर्जी पूजा ओबेरॉय हर दिल जो प्यार करेगा
सोनाली कुलकर्णी नीलिमा खान मिशन कश्मीर
२००२ जया बच्चन नंदिनी रायचंद कभी खुशी कभी गम
करीना कपूर पूजा 'पू' शर्मा कभी खुशी कभी गम
माधुरी दीक्षित जानकी लज्जा
प्रीती झिंटा मधुबाला चोरी चोरी चुपके चुपके
रेखा रामदुलारी लज्जा
२००३   माधुरी दीक्षित चंद्रमुखी देवदास
अंतरा माळी कन्नू कंपनी
किरण खेर सुमित्रा चक्रवर्ती देवदास
शिल्पा शेट्टी वैजंती रिश्ते
सुष्मिता सेन सिया शेठ फिलहाल...
२००४   जया बच्चन जेनीफर कपूर कल होना हो
प्रियांका चोप्रा जिया सिंघानिया अंदाज
रेखा सोनिया मेहरा कोई... मिल गया
शबाना आझमी रुखसाना जमाल तहजीब
शेनाझ ट्रेझरीवाला अलीशा सहाय इश्क विश्क
२००५   राणी मुखर्जी शशी सिंह युवा
अमृता राव संजना बक्षी मैं हूँ ना
दिव्या दत्ता शबाना 'शब्बो' इब्राहिम वीर-झारा
राणी मुखर्जी सामिया सिद्दीकी
प्रियांका चोप्रा सोनिया रॉय ऐतराज
२००६   आयेशा कपूर मिशेल मॅकनॅली ब्लॅक
बिपाशा बासू बॉबी नो एन्ट्री
संध्या मृदुल पर्ल सिक्वेरा पेज ३
शेफाली शाह सुमित्रा ठाकूर वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम
श्वेता प्रसाद खदिजा इक्बाल
२००७   कोंकणा सेन शर्मा इंदू त्यागी ओंकारा
किरण खेर मित्रो रंग दे बसंती
कमलजीत "कमल" सरन कभी अलविदा ना कहना
प्रिती झिंटा रिया सरन
रेखा सोनिया मेहरा क्रिश
सोहा अली खान सोनिया/दुर्गावती देवी वोहरा रंग दे बसंती
२००८ कोंकणा सेन शर्मा श्रुती घोष लाइफ इन अ... मेट्रो
कोंकणा सेन शर्मा शुभवरी 'चुटकी' सहाय लागा चुनरी में दाग
राणी मुखर्जी गुलाबजी सावरिया
शिल्पा शुक्ला बिंद्या नाईक चक दे! इंडिया
टिस्का चोप्रा माया अवस्थी तारे जमीन पर
२००९   कंगना राणावत शोनाली गुजराल फॅशन
बिपाशा बसू राधिका/श्रेया राठोड बचना ए हसीनो
जिया खान सुनीता कलंत्री गजनी
किरण खेर सौ. आचार्य दोस्ताना
रत्ना पाठक शाह सावित्री राठौर जाने तू... या जाने ना
शहाना गोस्वामी डेबी मस्करेन्हास रॉक ऑन!!
२०१०   कल्की केकला चंदा देव.डी
अरुंधती नाग भूमी भारद्वाज पा
डिंपल कपाडिया नीना वालिया लक बाय चान्स
दिव्या दत्ता जलेबी दिल्ली-६
शहाना गोस्वामी मुनीरा फिराक
सुप्रिया पाठक सरिता मेहरा वेक अप सिड
२०११   करीना कपूर श्रेया अरोरा वी आर फॅमिली
अमृता पुरी शेफाली ठाकूर ऐशा
प्राची देसाई मुमताज वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई
रत्ना पाठक शाह गीता 'गुड्डी' पटनायक गोलमाल ३
सुप्रिया पाठक हंसा प्रफुल पारेख खिचडी: चित्रपट
२०१२   राणी मुखर्जी मीरा गायटी नो वन किल्ड जेसिका
जुही चावला मेघा आय ॲम
कल्की केकला नताशा अरोरा जिंदगी ना मिलेगी दोबारा
परिणीती चोप्रा डिंपल चड्ढा लेडीज व्हर्सेस रिकी बहल
स्वरा भास्कर पायल तनु वेड्स मनु
२०१३   अनुष्का शर्मा अकीरा राय जब तक है जान
हुमा कुरेशी मोहसिना हमीद गँग्स ऑफ वासेपूर
इलिआना डिक्रुझ श्रुती घोष सेनगुप्ता बर्फी!
राणी मुखर्जी रोशनी शेखावत तलाश
रिचा चड्ढा नगमा खातून गँग्स ऑफ वासेपूर
२०१४   सुप्रिया पाठक धनकोर 'बा' सनेरा गोलियों की रासलीला राम-लीला
दिव्या दत्ता इश्री कौर भाग मिल्खा भाग
कल्की केकला आदिती मेहरा ये जवानी है दिवानी
कंगना राणावत काया क्रिश ३
कोंकणा सेन शर्मा डायना एक थी डायन
स्वरा भास्कर बिंदिया त्रिपाठी रांजणा
२०१५   तबू गझला मीर हैदर
अमृता सिंग कविता मल्होत्रा २ स्टेट्स
डिंपल कपाडिया रोझालिना 'रोझी' युकेरिस्टिक फाइंडिंग फॅनी
जुही चावला सुमित्रा देवी गुलाब गँग
लिसा हेडन विजयालक्ष्मी क्वीन
२०१६   प्रियांका चोप्रा काशीबाई बाजीराव मस्तानी
अनुष्का शर्मा फराह अली दिल धडकने दो
शेफाली शाह नीलम मेहरा
हुमा कुरेशी जानकी 'झिमली' डगावकर बदलापूर
तब्बू महानिरीक्षक मीरा देशमुख दृश्यम
तन्वी आझमी राधाबाई बाजीराव मस्तानी
२०१७   शबाना आझमी रमा भानोत नीरजा
करीना कपूर डॉ. प्रीत साहनी उडता पंजाब
कीर्ती कुल्हारी फलक अली पिंक
रत्ना पाठक शाह सुनीता कपूर कपूर अँड सन्स
रिचा चड्ढा सुखप्रीत कौर सरबजीत
२०१८   मेहेर विज नज्मा मलीक सिक्रेट सुपरस्टार
रत्ना पाठक शाह उषा 'रोजी' बुवाजी लिपस्टिक अंडर माय बुरखा
सीमा पहवा सुशीला मिश्रा बरेली की बर्फी
सौ.जोशी शुभ मंगल सावधान
तिलोतमा शोम बोनी बक्षी अ डेथ इन द गुंज
२०१९   सुरेखा सिक्री दुर्गा कौशीक बधाई हो
गीतांजली राव प्रा.विद्या अय्यर ऑक्टोबर
कतरिना कैफ बबिता कुमारी झीरो
शिखा तलसानिया मीरा कौर स्टिन्सन वीरे दी वेडिंग
स्वरा भास्कर साक्षी सोनी
यामिनी दास निम्मो शर्मा सुई धागा
२०२०   अमृता सुभाष रझिया अहमद गल्ली बॉय
अमृता सिंग राणी कौर बदला
कामिनी कौशल साधना कौर (दादी) कबीर सिंग
माधुरी दीक्षित बहार बेगम कलंक
सीमा पहवा आनरा (मौसी) बाला
झायरा वसीम आयशा चौधरी द स्काय इज पिंक
२०२१   फारुख जाफर फातिमा बेगम गुलाबो सीताबो
मानवी गाग्रू रजनी "गोगल" त्रिपाठी शुभ मंगल ज्यादा सावधान
नीना गुप्ता सुनैना त्रिपाठी
रिचा चड्ढा मीनल "मीनू" सिंग पंगा
तन्वी आझमी सुलक्षणा सभरवाल थप्पड
२०२२   सई ताम्हणकर शमा मिमी
कीर्ती कुल्हारी इन्स्पेक्टर दलबीर कौर बग्गा द गर्ल ऑन द ट्रेन
कोंकणा सेन शर्मा सीमा रामप्रसाद की तेहरवी
मेघना मलिक उषा राणी नेहवाल सायना
नीना गुप्ता आंटी "मीनू" सिंग संदीप और पिंकी फरार
२०२३   शीबा चड्ढा सौ. ठाकूर बधाई दो
मौनी रॉय जुनून ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा
नीतू कपूर गीता सैनी जुगजुग जीयो
शीबा चड्ढा शोभा गुप्ता डॉक्टर जी
शेफाली शहा डॉ.नंदिनी श्रीवास्तव
सिमरन मीना नारायणन रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
२०२४   शबाना आझमी जैमिनी चॅटर्जी रॉकी और रानी की प्रेम कहानी
जया बच्चन धनलक्ष्मी रंधावा रॉकी और रानी की प्रेम कहानी
रत्ना पाठक शाह मनप्रीत कौर सेठी "माही" धक धक
शबाना आझमी अनिनाची आजी घूमर
तृप्ती डिमरी झोया ॲनिमल
यामी गौतम कामिनी माहेश्वरी ओएमजी २

अनेक पुरस्कार आणि नामांकन

संपादन

पाच अभिनेत्रींना हा पुरस्कार तीन वेळा मिळाला आहे: निरूपा रॉय (१९५६, १९६२, १९६५), फरीदा जलाल (१९७२, १९९२, १९९६), जया बच्चन (२००१, २००२, २००४), सुप्रिया पाठक (१९८२, १९८३, २०१४) व राणी मुखर्जी (१९९९, २००५, २०१२). तसेच नऊ अभिनेत्रींनी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे: शशिकला (१९६३, १९६४), सिमी गरेवाल (१९६७, १९६९), राखी गुलजार (१९७४, १९९०), रोहिणी हट्टंगडी (१९८४, १९९१), अरुणा इराणी (१९८५, १९९३), कोंकणा सेन शर्मा (२००७, २००८) आणि शबाना आझमी (२०१७, २०२४).

अरुणा इराणीला सर्वात जास्त वेळा (१०) नामांकन मिळाले आहे पण फक्त दोन वेळा (१९८५, १९९३) पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल शशिकला आणि राखी गुलजार यांना ८ नामांकन आहे; बिंदू, फरीदा जलाल व राणी मुखर्जी यांना ७ नामांकन आहेत. १९७० च्या दशकात बिंदू यांना ७ वेळा नामांकन मिळाले असले तरी एकही वेळा हा पुरस्कार प्रदान केला गेला नाही.

शशिकला यांच्या नावावर १९६३ ते १९६७ दरम्यान सर्वाधिक लागोपाठ असे ६ नामांकनांचा विक्रम आहे; ज्यात १९६७ मध्ये त्या दोनदा नामांकित झाल्या होत्या. एकाच वर्षात सर्वाधिक नामांकन मिळवण्याचा विक्रम अकरा अभिनेत्रींच्या नावावर आहे. कालक्रमानुसार, शुभा खोटे (१९६२), शशिकला (१९६७), नूतन (१९७४), बिंदू (१९७५), स्मिता पाटील (१९८४), सुश्मिता सेन (२०००), राणी मुखर्जी (२००५), कोंकणा सेन शर्मा (२००८), सीमा भार्गव पाहवा (२०१८), शिबा चड्ढा (२०२३) आणि शबाना आझमी (२०२४).

एकाच चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी दोन वेगवेगळ्या अभिनेत्रींना नामांकन मिळाल्याचे अनेकदा घडले आहे. १९६१ मध्ये नंदा आणि ललिता पवार या दोघींना आंचल मधील आपल्या भूमिकांसाठी नामांकन मिळाले होते. १९६४ मध्ये अमीता आणि निम्मी यांच्या मेरे मेहबूब साठी; तसेच १९७९ मध्ये आशा पारेख आणि नूतन यांना मैं तुलसी तेरे आंगन की साठी नामांकन मिळाले. नंतर १९८३ मध्ये किरण वैराळे आणि वहिदा रेहमान यांना नमकीन साठी नामांकन मिळाले. त्याचप्रमाणे १९९५ मध्ये हम आपके हैं कौन..! साठी रीमा लागू आणि रेणुका शहाणे यांना नामांकन देण्यात आली. १९९७ मध्ये हेलन आणि सीमा बिस्वास यांच्या खामोशी: द म्युझिकल साठी; २००२ मध्ये करीना कपूर आणि जया बच्चन यांच्या कभी खुशी कभी गम साठी; २००५ मध्ये राणी मुखर्जी आणि दिव्या दत्ता यांच्या वीर-झारा साठी; २००७ मध्ये किरण खेर आणि प्रीती झिंटा यांच्या कभी अलविदा ना कहना साठी; २०१६ मध्ये अनुष्का शर्माशेफाली शाह यांच्या दिल धडकने दो साठी आणि सोबत प्रियांका चोप्रातन्वी आझमी यांच्या बाजीराव मस्तानी साठी पण; २०१९ मध्ये शिखा तलसानिया आणि स्वरा भास्कर यांच्या वीरे दी वेडिंग साठी; २०२१ मध्ये मानवी गाग्रू आणि नीना गुप्ता यांच्या शुभ मंगल ज्यादा सावधान साठी; २०२३ मध्ये शीबा चड्ढा आणि शेफाली शाह यांना डॉक्टर जी साठी; आणि २०२४ मध्ये शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्यासाठी रॉकी और रानी की प्रेम कहानी साठी नामांकन देण्यात आली.

इतर माहिती

संपादन

या श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रत्‍ना पाठक आणि सुप्रिया पाठक या आणखी बहिणी आहेत ज्यांना पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे; पण रत्ना पाठक यांनी कधी हा पुरस्कार जिंकला नाही. या प्रकारात उषाकिरण यांनी पहिला पुरस्कार पटकावला; पण त्यांची मुलगी तन्वी आझमी ५ वेळा नामांकित झाली आहे कधीही पुरस्कार न मिळवता. शर्मिला टागोर आणि सोहा अली खान हे आणखी एक आई-मुलगी जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

वैजयंतीमाला अश्या पहिल्या अभिनेत्री होती ज्यांना सर्वोत्तम अभिनेत्री आणि सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हे दोन्ही पुरस्कार मिळाले. १९५७ मध्ये देवदास मधील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार नाकारणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांच्या नंतर १९७९ मध्ये रीना रॉय यांनी देखील त्यांच्या अपनापन चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार नाकारला. दोघांनीही त्यांच्या भूमिका प्रमुख होत्या व सहाय्यक नसल्याचा कारण देत पुरस्कार नाकारले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Encyclopedia of Bollywood–Film Actresses. Diamond Pocket Books Pvt Ltd. 2014. ISBN 9789350836910.
  2. ^ "Winners of the 69th Filmfare Awards 2024". Filmfare. 28 January 2024. 29 January 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Miglani, Surendra (2005-02-13). "Hits and misses". The Tribune. 2011-08-08 रोजी पाहिले.