तनुजा

भारतीय चित्रपट अभिनेत्री
(तनुजा (अभिनेत्री) या पानावरून पुनर्निर्देशित)

तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ, (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत.

तनुजा
जन्म तनुजा मुखर्जी
(पूर्वाश्रमी तनुजा समर्थ)

२३ सप्टेंबर, इ.स. १९४३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
भाषा हिंदी (अभिनय),
मराठी (मातॄभाषा)
वडील कुमारसेन समर्थ
आई शोभना समर्थ
पती शोमू मुखर्जी
अपत्ये काजोल, तनिशा

थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (इ.स. १९६६), ज्वेल थीफ (इ.स. १९६७), अनुभव (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००८ मध्ये 'रॉक अँड रोल फॅमिली' या झी टीव्हीवरील रिॲलिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्यासोबत सह-परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

२०१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

पुरस्कार

संपादन
  • कलर्स मराठी या दूरदर्शन वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार (डिसेंबर २०१५)

बाह्य दुवे

संपादन
  • दिनेश रहेजा. "स्पार्कलिंग स्पिटफायर तनुजा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)