Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

नितीश भारद्वाज (जन्म २ जून १९६३) हे दूरचित्रवाणीवरील बी.आर. चोपरांच्या महभारत या मालिकेतल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे रातोरात विख्यात झाले.

मुंबईच्या व्हेटरनरी काॅलेजातील शिक्षण पूर्ण करून नितीश मराठी नाटकांत अभिनय करू लागले. होते. बीआर चोपरांची महाभारत ही मालिका सुरू झाली होती तरी कृष्णाची भूमिका कोण करणार हे नक्की झाले नव्हते. निर्माते कुणा वेगळ्याच अभिनेत्याला घेऊन आले होते. परंतु लेखक राही मासूम रझा, लेकिन कॉन्सेप्चुअल ॲडवायझर पंडित नरेंद्र शर्मा आणि चोपडांना 'तो' कृष्ण पसंत पडला नाही. तेव्हा नरेंद्र शर्मांना नितीश भारद्वाज आठवला. त्यांनी नितीशला आपल्या घरी बोलावले आणि 'कृष्णासंबंधी तुला काय काय माहिती आहे सांग' म्हटले. नितीशने सांगायला सुरुवात केली आणि तीन तास झाले, तरी सांगणे संपले नव्हते. नरेंद्र शर्मानी श्रीकृष्णाची भूमिका नितीश भारद्वाजनेच करायची असे ठरवून टाकले. शेवटी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर नितीश भारद्वाज आला आणि हा श्रीकृष्ण लोकांच्या डोळ्यात भरला.

त्यानंतर अनेक कृ्ष्ण आले आणि गेले, पण लोकांच्या मनात नितीश भारद्वाज म्हणजे श्रीकृष्ण हे कायम राहिले.

नितीश भारद्वाजांनाही या कामामुळे खूप लाभ झाला असे ते म्हणतात. यानंतर त्यांना कधीही 'स्क्रीन टेस्ट' द्यावी लागली नाही. या कामामुळे नितीशना खूप समाधान मिळाले. त्यांच्या अभिनेत्याच्या कारकिर्दीत कृष्णासारखा पूर्ण मनुष्य, पूर्ण पुत्र, पूर्ण बंधू, पूर्ण योद्धा, पूर्ण मित्र, ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास ठेवता येईल असा स्त्रीचा पूर्ण सखा, स्त्रीशक्तीवर पूर्ण विश्वास असलेला माणूस, समाजसुधारक आणि रणनीतिधुरंधर माणूस पडद्यावर साकारायला मिळाला याबद्दल ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात.

कौटुंबिकसंपादन करा

नितीश भारद्वाज यांच्या आई-वडिलांचे नाव अनुक्रमे साधना उपाध्ये आणि जनार्दन उपाध्ये. पहिल्या पत्नीचे नाव मोनिषा पाटील (१९९१-२००५) आणि दुसरी स्मिता गटे (२००९ पासून).

काही किस्सेसंपादन करा

जयपूरला 'महाभारता'चे शूटिंग चालू असताना, त्यादिवशी काही काम नव्हते म्हणून नितीश तंबूत बसून आराम करीत होते. तेथील गावकरी धरणे धरून बसले होते की जोपर्यंत कृष्णाचे दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही शूटिंग होऊ देणार नाही. शेवटी कॅमेरामन धर्म चोपरा आले आणि नितीशला गाडीमध्ये बसवून गावात घेऊन गेले. इतकी प्रसिद्धी नितीशला टी.व्हीवरच्या पहिल्याच भूमिकेत मिळाली.

नितीश भारद्वाज यांच्या भूमिका असलेले चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा

 • अजब गजब घर जॅंवाई (हिंदी दूरचित्रवाणीवरील एक कार्यक्रम)
 • गीता रहस्य (हिंदी दूरचित्रवाणीवरील एक कार्यक्रम)
 • खट्याळ सासू नाठाळ सून (मराठी चित्रपट)
 • ञान गंधर्वन (Jnan Gandharvan) (मलयालम चित्रपट, १९९१)
 • तुझी माझी जमली जोड़ी (मराठी चित्रपट)
 • त्रिशाग्नि (हिंदी चित्रपट)
 • नाचे नागिन गली गली (हिंदी चित्रपट)
 • पसंत आहे मुल्गी (मराठी चित्रपट)
 • पितृऋण (मराठी चित्रपट, दिग्दर्शन)
 • प्रेम शक्ति (हिंदी चित्रपट)
 • महाभारत (हिंदी टी.व्ही. सीरियल)
 • रामायण (हिंदी टी.व्ही. सीरियल)
 • वि़ष्णुपुराण (हिंदी टी.व्ही. सीरियल)
 • संगीत (हिंदी चित्रपट)

सन्मान आणि पुरस्कारसंपादन करा

 • लोकसभेचे सदस्यत्व

(अपूर्ण)