बलदेव राज तथा बी.आर. चोप्रा (२२ एप्रिल, १९१४ - ५ नोव्हेंबर, २००८[१] ) हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. यांनी नया दौर, साधना, कानून, गुमराह, हमराझ, इन्साफ का तराझू, निकाह, इ. हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. चोप्रा यांनी महाभारत या दूरचित्रवाणीमालिकेचे निर्माण केले.[२]

बी.आर.चोप्रा

चोप्रा यांना १९९८मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला..[३]

बी.आर. चोप्रा यांचा लहान भाऊ यश चोप्रा, मुलगा रवी चोप्रा, पुतण्या आदित्य चोप्रा हे सुद्धा हिंदी चित्रपट दिग्दर्शक आहेत. याशिवाय उदय चोप्रा हा पुतण्या हिंदी चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Filmmaker B R Chopra passes away. Press Trust of India via NDTV. 5 November 2008
  2. ^ B.R.Chopra made socially relevant films The Hindu, 6 November 2008.
  3. ^ B.R. CHOPRA – Purposeful Film Maker – 30th Recipient – 1998 Archived 1 September 2009 at the Wayback Machine. Dadasaheb Phalke Award.