काशीनाथ घाणेकर

भारतीय नट

डॉ. काशीनाथ घाणेकर (१४ सप्टेंबर, १९३२:चिपळूण, महाराष्ट्र - २ मार्च, १९८६:अमरावती, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. स्त्रीरोगतज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत. त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले. कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर नाथ हा माझा नावाचे पुस्तक लिहिले आहे. इरावती घाणेकर या पुढे डाॅ. इरावती भिडे झाल्या. अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते.

काशीनाथ घाणेकर
जन्म १४ सप्टेंबर, १९३० (1930-09-14)
चिपळूण, महाराष्ट्र
मृत्यू २ मार्च, १९८६ (वय ५६)
अमरावती, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट आणि नाट्य अभिनेते
भाषा मराठी
पत्नी  •  इरावती भिडे,
 •  कांचन घाणेकर
अपत्ये रश्मी घाणेकर
धर्म हिंदू

प्रारंभिक जीवन

संपादन

घाणेकर यांचा जन्म चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.

व्यावसायिक जीवन

संपादन

सन १९६० ते १९८० या कालावधीत काशीनाथ हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते, आणि त्याकाळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते. दादी मॉं या १९६६ साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती. साचा:संदर्भ?

वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला.. [8]

सन १९६८ मध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर एक मोठा मराठी चित्रपट स्टार बनले..नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना. असे एक अलौकिक अद्भुत कलाकार पिढीन पिढी होणे नाही .अशा कलाकाराला कोटी कोटी प्रणाम. .. [9]

अमरावती शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रयोगानंतरच काही वेळातच त्यांचे निधन झाले. [3].

नाटके

संपादन

चित्रपट

संपादन

मराठी चित्रपट:-

  • मराठा तितूका मेळवावा
  • पाहू किती रे वाट
  • एकटी
  • झेप
  • देवमाणूस
  • पाठलाग
  • मधुचंद्र
  • हा खेळ सावल्यांचा
  • सुखाची सावली
  • मराठा तितुका मेळवावा
  • धर्मपत्नी
  • पडछाया
  • लक्ष्मी आली घरा
  • प्रीत शिकवा मला
  • मानला तर देव
  • घर गंगेच्या काठी
  • अन्नपूर्णा
  • चंद्र होता साक्षीला
  • अजब तुझे सरकार
  • गारंबीचा बापू

हिंदी चित्रपट:-

  • दादी मॉं
  • अभिलाषा

काशीनाथ घाणेकर यांच्यावर लिहिलेले आठवणीवजा पुस्तक

संपादन
  • नाथ हा माझा (लेखिका - कांचन घाणेकर)

चित्रपट

संपादन

घाणेकर यांच्या आयुष्यावर आणि...डॉ. काशीनाथ घाणेकर नावाचा चित्रपट आहे. त्यात घाणेकरांची भूमिका सुबोध भावे यांनी केली आहे. []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Uma & Prakash Bhende Remember Dr.Kashinath Ghanekar". ZEE Talkies. 2016-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-08 रोजी पाहिले.