जयश्री तळपदे

मराठी चित्रपट अभिनेत्री

जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी. (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी मराठी अभिनेत्री व नर्तकी आहे.

जयश्री टी.
जन्म जयश्री चित्रसेन तळपदे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी,
हिंदी (चित्रपट)
वडील चित्रसेन तळपदे

इ.स. १९६० च्या दशकात सहायक अभिनेत्री/ विनोदी व्यक्तिरेखेच्या भूमिकांमार्फत जयश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. काही बिगबजेट चित्रपटांतील गाण्यांवर तिने केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. उदाहरणार्थ, शर्मिली (इ.स. १९७१) चित्रपटातील रेशमी उजाला है, मैं सुंदर हूं (इ.स. १९७१) चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, तराना (इ.स. १९७९) चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी तिला ख्याती मिळवून दिली.

अभिनेता चित्रसेन तळपदे हे तिचे वडील. तर हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री मीना टी., ऊर्फ मीना तळपदे ही तिची बहीण आहे[१].

चित्रपट कारकीर्द

संपादन
चित्रपट वर्ष भाषा सहभाग
चंदा और बिजली इ.स. १९७० हिंदी अभिनय
आफत इ.स. १९७७ हिंदी अभिनय
मोर्चा इ.स. १९८० हिंदी अभिनय
गोष्ट धमाल नाम्याची इ.स. १९८४ मराठी अभिनय
एक चिट्ठी प्यार भरी इ.स. १९८५ हिंदी अभिनय
बड़े घर की बेटी इ.स. १९८९ हिंदी अभिनय
काला कोट इ.स. १९९३ हिंदी अभिनय
हम साथ साथ है इ.स. १९९९ हिंदी अभिनय
ये रस्ते है प्यार के इ.स. २००१ हिंदी अभिनय
चलते चलते इ.स. २००३ हिंदी अभिनय
मेरी बिवी का जवाब नाही इ.स. २००४ हिंदी अभिनय

संदर्भ

संपादन
  1. ^ पाध्ये, अनिता. "माइलस्टोन - आठवणीतली मीना टी". 2010-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन