फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी हिंदी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. १९९१ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९९७ पर्यंत पुरुष व महिला अभिनेत्यांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.
यादीसंपादन करा
- १९९१ - अभिनेत्याने जिंकला
- १९९२ - पुरस्कार नाही
- १९९३ - डिंपल कापडिया - रुदाली
- १९९४ - अभिनेत्याने जिंकला
- १९९५ - फरीदा जलाल - मम्मो
- १९९६ - मनीषा कोइराला - बॉम्बे
- १९९७ - मनीषा कोइराला - खामोशी
- १९९८ - तब्बू - विरासत
- १९९९ - शेफाली छाया - सत्या
- २००० - तब्बू - हु तु तू
- २००१ - तब्बू - अस्तित्व
- २००२ - करिष्मा कपूर - झुबैदा
- २००३ - मनीषा कोइराला - कंपनी, राणी मुखर्जी - साथिया
- २००४ - उर्मिला मातोंडकर - भूत
- २००५ - करीना कपूर - देव
- २००६ - राणी मुखर्जी - ब्लॅक
- २००७ - करीना कपूर - ओंकारा
- २००८ - तब्बू - चीनी कम
- २००९ - शहाना गोस्वामी - रॉक ऑन!!
- २०१० - माही गिल - देव.डी
- २०११ - विद्या बालन - इश्किया
- २०१२ - प्रियांका चोप्रा - ७ खून माफ
- २०१३ - रिचा चड्ढा - गॅंग्ज ऑफ वासेपूर
- २०१४ - शिल्पा शुक्ला - बी.ए. पास
- २०१५ - आलिया भट्ट - हायवे
- २०१६ - कंगना राणावत - तनू वेड्ज मनू रिटर्न्स