फरीदा जलाल
फरीदा जलाल ( १८ मे १९४९) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० सालापासून बॉलिवूडमध्ये कामे करीत असलेली फरीदा १९६९ सालच्या आराधना ह्या सिनेमात राजेश खन्नाच्या नायिकेच्या रूपात चमकली. तेव्हापासून आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये फरीदाने भूमिका केल्या आहेत.
फरीदा जलाल | |
---|---|
![]() | |
जन्म |
१८ मे १९४९ नवी दिल्ली |
कारकीर्दीचा काळ | १९६०-वर्तमान |
पती | तब्रेज बर्नावर |
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कहो ना... प्यार है, कभी खुशी कभी गम इत्यादी तिचे अलीकडील गाजलेले चित्रपट आहेत.
पुरस्कारसंपादन करा
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - पारस (१९७१)
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - हिना (१९९१)
- सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) - मम्मो (१९९४)
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील फरीदा जलाल चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत