दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
१९९५ मधील आदित्य चोप्रा दिग्दर्शित चित्रपट
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (लोकप्रिय संक्षेप: डी.डी.एल.जे) हा १९९५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोल ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे | |
---|---|
दिग्दर्शन | आदित्य चोप्रा |
निर्मिती | यश चोप्रा |
कथा |
आदित्य चोप्रा जावेद सिद्दिकी |
प्रमुख कलाकार |
शाहरुख खान काजोल अमरीश पुरी फरीदा जलाल अनुपम खेर |
गीते | आनंद बक्षी |
संगीत | जतिन-ललित |
पार्श्वगायन | उदित नारायण, लता मंगेशकर, कुमार सानू, आशा भोसले, अभिजीत |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २० ऑक्टोबर १९९५ |
अवधी | १८९ मि. |
निर्मिती खर्च | ४ कोटी |
एकूण उत्पन्न | १२२ कोटी |
कलाकार
संपादन- शाहरुख खान - राज मल्होत्रा
- काजोल - सिमरन सिंग
- अमरीश पुरी - चौधरी बलदेव सिंग
- फरीदा जलाल - लाजवंती सिंग (लज्जो)
- अनुपम खेर - धरमवीर मल्होत्रा
- पूजा रुपारेल - राजेश्वरी सिंग (चुटकी)
- सतीश शाह - अजित सिंग
- परमीत सेठी - कूलजीत सिंग
- मंदिरा बेदी - प्रीती सिंग
- अचाला सचदेव - दादी
पुरस्कार
संपादनएकूण १० फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा ह्या बाबतीत बॉलिवूडमध्ये देवदास सोबत दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावर ११ पुरस्कार मिळवणारा ब्लॅक हा चित्रपट आहे.
- सर्वोत्तम चित्रपट
- सर्वोत्तम दिग्दर्शक - आदित्य चोप्रा
- सर्वोत्तम अभिनेता - शाहरूख खान
- सर्वोत्तम अभिनेत्री - काजोल
- सर्वोत्तम विनोदी कलाकार - अनुपम खेर
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - फरीदा जलाल
- सर्वोत्तम गीतकार - आनंद बक्षी
- सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - उदीत नारायण
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चे पान (इंग्लिश मजकूर)