फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार

फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर किशोर कुमारने सर्वाधिक वेळा (८) हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस्कार दिला जात असला तरी १९६७ पर्यंत पुरुष व महिला पार्श्वगायकांमध्ये मिळून एकच विजेता ठरवला जात असे.