मोहित चौहान हा एक भारतीय गायक आहे. इंडियन पॉप संगीतामधील सिल्क रूट ह्या बॅंडद्वारे आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात करणारा मोहित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २०१० व २०१२ सालचे सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

मोहित चौहान
Mohit Chauhan 2009 - Still 88976 crop.jpg
मोहित चौहान
आयुष्य
जन्म स्थान नहान, हिमाचल प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार इंडियन पॉप, बॉलिवूड
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९८ - चालू

२००६ मधील रंग दे बसंतीमध्ये गाणे म्हटल्यानंतर २००७ सालच्या जब वी मेट ह्या चित्रपटामध्ये प्रीतमने मोहित चौहानला पार्श्वगायनाची संधी दिली ज्यामुळे त्याला लोकप्रियता लाभली. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत.

पुरस्कारसंपादन करा

फिल्मफेअर पुरस्करसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा