एस.पी. बालसुब्रमण्यम
एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम (तेलुगू: శ్రీపతి పండితారాధ్యుల) ( ४ जून १९४६, - २५ सप्टेंबर २०२०) हे तमिळ, तेलुगु, कानडी, मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते.[१] २५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड-१९ ग्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.
श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम | |
---|---|
एस.पी. बालसुब्रमण्यम | |
आयुष्य | |
जन्म | ४ जून १९४६ |
जन्म स्थान | नेल्लोर, मद्रास (वर्तमान आंध्रप्रदेश) |
मृत्यू | २५ सप्टेंबर, २०२० (वय ७४) |
मृत्यू स्थान | चेन्नई, तमिळनाडु |
पारिवारिक माहिती | |
अपत्ये | मुलगा:- एस्. पी. चरण. मुलगी:- पल्लवी बालसुब्रम्हण्यम्. |
संगीत साधना | |
गायन प्रकार | तमिळ, तेलुगू, हिंदी चित्रपट गायक |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | गायन, अभिनय, निर्माते, संगीत दिग्दर्शन. |
कारकिर्दीचा काळ | १९६६ ते २०२० |
गौरव | |
पुरस्कार | पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११), पद्मविभूषण (२०२०) |
बालपण
संपादनएस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन) (सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. त्यांचे पिता हरिकथा निरुपणकार होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला.शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. एका स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.[२]
महाविद्यालयीन शिक्षण
संपादनअनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला तथापि विषमज्वर झाल्याने प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स या संस्थेचे (एएमआयआई) सभासदत्व त्यांनी घेतले.[२]
सांगीतिक कारकीर्द
संपादनगंगाई अमरन,इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलगू होती आणि एस. पी. कोदंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना तेलगू चित्रपटासाठी गायनाची प्रथम संधी दिली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन,जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत.[३]
जागतिक विक्रम
संपादनसंगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने ४०,००० गीते गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदविला गेला आहे. उपेंद्रकुमार या कानडी संगीतकारासाठी १९८१ साली त्यांनी बारा तासात २१ गाण्यांचे ध्वनिमुद्रण केलेले आहे.[२]
पुरस्कार
संपादन- काही स्त्रोतांच्या मते, एका गायकाने ४०,००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यानां गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला.[४]
- भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) आणि पद्मविभूषण (२०२०) या सर्वोच्च बहुमानाचे प्राप्तकर्ता होते. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मरणोत्तर दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[५]
- २०१२ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल राज्य एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
- २०१६ मध्ये,त्यांना त्या वर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व म्हणून रौप्य मयूर पदक देऊन गौरविण्यात आले.
- कन्नड, तेलगू, तामिळ आणि हिंदी या चार वेगवेगळ्या भाषांमधील कामांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी सहा राष्ट्रीय चित्रपट मिळाले जिंकले
- आंध्र प्रदेश राज्य तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कार्यासाठी नंदी पुरस्कार आणि कर्नाटक आणि तामिळनाडूमधील इतर अनेक पुरस्कार त्यांना दिले गेले होते.
- या व्यतिरिक्त, त्यांनी फिल्मफेर पुरस्कार , आणि सहा फिल्मफेर अवॉर्ड्स दक्षिणमध्ये जिंकले होते.
संदर्भ
संपादन- ^ "Exclusive biography of #SPBalasubramaniam and on his life". FilmiBeat (इंग्रजी भाषेत). 2020-09-26 रोजी पाहिले.
- ^ a b c "मखमली आवाजाचा धनी". Maharashtra Times. 2020-09-26 रोजी पाहिले.
- ^ "SP Balasubrahmanyam Passes Away : उमदा सूर हरपला...! ज्येष्ठ गायक बालसुब्रमण्यम यांची कारकीर्द". marathi.abplive.com. 2020-09-25. 2020-09-26 रोजी पाहिले.
- ^ "Have lost count of songs sung, says record holder S.P. Balasubrahmanyam". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-11-20. 2020-09-26 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. 2021-11-08 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.