फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे.
सर्वोत्तम अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चित्रपट पुरस्कार श्रेणी, सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार, फिल्मफेर पुरस्कार | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
विजेता |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती.[१] पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोल व आलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.
१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडिया व जया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.
विजेते व नामांकन
संपादनअनेक पुरस्कार आणि नामांकन
संपादनतीन अभिनेत्रींना हा पुरस्कार सर्वाधिक असा पाच वेळा मिळाला आहे: नूतन (१९५७, १९६०, १९६४, १९६८ व १९७९), काजोल (१९९६, १९९९, २००२, १००७ व २०११) आणि आलिया भट्ट (२०१७, २०१९, २०२०, २०२३ व २०२४). त्यांच्या खालोखाल तीन अभिनेत्रींना हा पुरस्कार चार वेळा मिळाला आहे: मीना कुमारी (१९५४, १९५५, १९६३ व १९६६), माधुरी दिक्षीत (१९९१, १९९३, १९९५ व १९९८) आणि विद्या बालन (२०१०, २०१२, २०१३ व २०१८). लागोपाठ अशे दोन वेळा पुरस्कार मिळवण्यास सहा अभिनेत्रींना यश मिळाले आहे: मीना कुमारी (१९५४-५५), जया बच्चन (१९७४-७५), शबाना आझमी (१९८४-८५), राणी मुखर्जी (२००५-०६), विद्या बालन (२०१२-१३) आणि आलिया भट्ट (२०१९-२० व २०२३-२४). २०२४ मध्ये विजेताहोऊन भट्ट अश्या एकमेव अभिनेत्री झाल्या ज्यानी लागोपाठ दोन वेळा पुरस्कार मिळवला आहे.
माधुरी दिक्षीतला सर्वात जास्त वेळा (१४) नामांकन मिळाले आहे पण फक्त चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या खालोखाल मीना कुमारी आणि विद्या बालन यांना १२ नामांकन आहे; हेमा मालिनी, काजोल व राणी मुखर्जी यांना ११ नामांकन; ऐश्वर्या राय, श्रीदेवी व दीपिका पडुकोण यांना १० नामांकन मिळाले आहेत. १९९० च्या दशाकापासून अभिनेत्री तब्बूला सातवेळा नामांकन मिळाले असून एकदाही पुरस्कार मिळाला नाही. १९८४ मध्ये शबाना आझमी यांना एकाच वर्षी असे सर्वाधिक ४ नामांकन मिळाले असून अर्थ चित्रपटातील कामगिरीसाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. तसेच १९६३ मध्ये मीना कुमारी यांना तीन पैकी तीन नामांकन प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये काजोलला देखील तीन नामांकन मिळाले व कुछ कुछ होता है साठी पुरस्कार मिळाला होता. १९८९ ते १९९६ या सात वर्षात सलग अशे १० नामांकन मिळवण्याचा विक्रम माधुरी दिक्षीत यांनी केला आहे.
इतर माहिती
संपादनया श्रेणीसाठी विविध नातेवाईकांना विजय आणि नामांकन प्राप्त झाले आहे. करिश्मा आणि करीना कपूर या दोन बहिणी आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २००२ मध्ये त्या दोघी त्यांच्या झुबेदा आणि अशोका चित्रपाटातीला कामांसाठी नामांकीत होत्या. श्रीदेवी आणि जान्हवी कपूर ही एक माय-लेकीची जोडी आहे ज्यांना या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरी परिणीता वर आधारीत असलेल्या "ललिता" ह्या पात्राच्या अभिनयासाठी मीना कुमार यांना १९५५ चा हा पुरस्कार मिळाला व पुन्हा २००६ मध्ये विद्या बालन यांना नामांकन मिळाले आहे. १९७३ मध्ये पाकीजा चित्रापाटातील भुमीकेसाठी मीना कुमारींना मरणोत्तर नामांकन मिळाले होत. पण मरणोत्तर न देण्याच्या फिल्मफेअरच्या नियमामुळे त्यांना पुरस्कार न देण्याचा निर्णय झाला.[४] या श्रेणीतील पुरस्कार कधीही कोणी नाकारला नाही. तथापि, २०२३ मध्ये, त्यांच्या थलायवी चित्रपटासाठी कंगना राणावतने पक्षपाती मतदानाचा फिल्मफेअर पुरस्कारांवर आरोप केला आणि त्यांचे नामांकन रद्द करण्याची मागणी केली.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Best Actress Award (1953-2000)". Official Listings, Indiatimes. 2017-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2013 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for the 68th Hyundai Filmfare Awards 2023 with Maharashtra Tourism". Filmfare. 24 April 2023. 24 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". Filmfare. 15 January 2024. 15 January 2024 रोजी पाहिले.
- ^ Reuben, Bunny (2005). ...and Pran: A Biography. HarperCollins and Living Media. p. 266. ISBN 978-81-72234-66-9.
- ^ "Filmfare Awards withdraw Kangana Ranaut's nomination after 'false accusations', she says 'see you in court'". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-08-21. 2022-10-18 रोजी पाहिले.