रेखा

हिंदी चित्रपट अभिनेत्री
(रेखा (हिंदी चित्रपट अभिनेत्री) या पानावरून पुनर्निर्देशित)

भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.

रेखा
रेखा
जन्म भानुरेखा जेमिनी गणेशन
१० ऑक्टोबर, १९५४ (1954-10-10) (वय: ७०)
चेन्नई, तमिळनाडू
इतर नावे रेखा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६६ - सद्य
वडील जेमिनी गणेशन
आई पुष्पवल्ली

व्यक्तिगत परिचय

संपादन

रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती.

इतिहास

संपादन

मोहन सैगल यांना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची जरूर होती. धीरेंद्र महाजनने रेखाचा मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, 'तुला हिंदी बोलता येते?, तुला नाच येतो? ' अशा प्रकारच्या सर्वच प्रश्नांची उत्तर रेखाने नकाराने दिली. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली, तिने मोहन सैगलना म्हठले, की 'हिची स्क्रीन टेस्ट घ्या'. ते म्हणाले 'काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटत काम करेल.'

'सच है'च्या सेटवरती तेच झाले, पुण्याच्या फिल्म इन्टिट्यूटमधून अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल म्हणाला, 'ही काळी मद्रासीण' कुठून पकडून आणली?' पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा एकच हंगामा झाला. नवीन निश्चल हे जीतेंद्रसारखे उछल-उछल करून नाचण्याचा प्रयत्न करीत असताना या 'काळ्या मद्रासिणी'करिता गीत गात होते. 'कान में झुमका, चाल में ठुमका, लगे पचासी झटके, हो तेरा रंग है नशीला, अंग-अंग है नशीला. सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या 'काळ्या मद्रासिणीचे स्वागत केले. आणि 'सच है' बाॅक्स ऑफीसवर यशस्वी झाला.

त्यानंतर पुढच्याच वर्षी, १९७१ साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले, विनोद मेहराबरोबरचा 'एलान', संजय खानबरोबरचा 'हसीनों के देवता' आणि प्रेमेंद्रबरोबरचा 'साज और सनम'. १९७२मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गॉंव हमारा शहर तुम्हारा (दोन्हींचे नायक - राजेंद्रकुमार), एक बेचारा (नायक - जीतेंद्र), रामपुर का लक्ष्मण (नायक - रणधीर कपूर) आणि जमीन आसमान (नायक - सुनील दत्त).

१९७३ या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोंसह हृषीकेश मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली.

चित्रपट कारकीर्द

संपादन

१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८०हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.

निवडक चित्रपट

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



पुरस्कार

संपादन

रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले उल्लेखनीय पुरस्कार :

रेखाचे चरित्रग्रंथ

संपादन
  • Rekha: The Untold Story (लेखक : उस्मान यासीर). सायन पब्लिकेशनने या पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. अनुवादक - चैतन्य झुंबरे
  • Eurekha! The Intimate Life Story Of Rekha (इंग्रजी, लेखक : मोहन दीप)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन