खून पसीना
खून पसीना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
देश | भारत |
---|---|
भाषा | हिंदी |
पार्श्वभूमी
संपादनहा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले.
कथानक
संपादनदोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात.
शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो.
एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो.
असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात.
उल्लेखनीय
संपादनअमिताभचे डायलॉग --
१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि
सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी.
२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता.
३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही
फौलाद होगी.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |