अमीशा पटेल
(अमिषा पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)
अमिशा पटेल ( ९ जून १९७६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व निर्माती आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरामधील टफ्ट्स विद्यापीठामधून पदवी घेतलेल्या अमिशाने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गदर: एक प्रेम कथा, आप मुझे अच्छे लगने लगे इत्यादी चित्रपटांमध्ये तिने कामे केली आहेत.
अमिशा पटेल | |
---|---|
जन्म |
९ जून, १९७६ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माती |
कारकीर्दीचा काळ | २००० - चालू |
नातेवाईक | अश्मित पटेल |
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमीशा पटेल चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत