गीता बाली

हिंदी चित्रपट अभिनेत्री

गीता बाली तथा हरिकीर्तन कौर (इ.स. १९३०:अमृतसर, पंजाब, भारत - २१ जानेवारी, इ.स. १९६५:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या १९५० आणि १९६० च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.

Geeta Bali in Naya Ghar (1953).jpg

त्यांचे कुटुंब अमृतसर शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी द कॉबलर या चित्रपटात पहिली भूमिका केली तर १९४६मध्ये बदनामी या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

१९५५मध्ये गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न केले. योगिता बाली या गीता बाली यांची पुतणी होत.

जानेवारी १९६५मध्ये एक चद्दर मैली सी या कादंबरीवर आधारित राणो या चित्रपटाचे चित्रकरण चालू असताना त्यांना देवीची बाधा झाली व वयाच्या ३५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.