मुख्य मेनू उघडा

देवी या रोगाचे स्वरूपसंपादन करा

१९५० सालापर्यंत देवी या रोगाने जगभर ६० टक्के लोक मृत्युमुखी पडत होते.मरीआई आणि शितलादेवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर आणि वेदनादायी आहे.हा रोग देवीबाधित रुग्णाच्या संपर्काने अथवा त्याच्या वस्तू वापरल्याने होतो.हा विषाणूजन्य रोग आहे.

 
शितलादेवी
 
गंभीर अवस्थेत असलेला देवीचा रुग्ण

लक्षणेसंपादन करा

रुग्णाला ताप येणे,थंडी वाजणे,स्नायू दुखी ही लक्षणे दिसून येतात.त्यानंतर त्वचेवर पुरळे येतात.पुरळ शरीरभर पसरतात.पुरळ यांमध्ये पाण्यासारखा द्रव होतो. १० ते १५ दिवसांनी पू भरतो.अंधत्व येते.नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होतो.या अवस्थेत ७ ते ८ दिवसात मरण पावतो.

संशोधन कार्यसंपादन करा

ब्रिटीश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्याने १७९८ साली देवी या रोगावारची लस शोधून काढली.१९७७मध्ये हा रोग भारतातून व १९८०मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला.

संदर्भसंपादन करा