संगीता बिजलानी (९ जुलै १९६०) एक भारतीय माजी बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती आहे.[३] तिने १९८८ मध्ये कातिलमध्ये मुख्य भूमिकेतून तिच्या बॉलीवूड कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्रिदेव या चित्रपटातील तीन प्रमुख अभिनेत्रीपैकी एक होती.

संगीता बिजलानी
संगीता बिजलानी (लकमे फॅशन वीक-२०१७)
जन्म

९ जुलै, १९६० (1960-07-09) (वय: ६३)

[१]
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मॉडेल, अभिनेत्री
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट त्रिदेव
पती [२]

प्रारंभिक जीवन संपादन

बिजलानी यांचा जन्म ९ जुलै १९६० रोजी मुंबई , महाराष्ट्र, येथे एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला.[१][४]

वैयक्तिक जीवन संपादन

बिजलानी आणि सलमान खानने १९८६ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा ते दोघे मॉडेलिंग करत होते आणि त्यांचे हे नाते १० वर्षे टिकले. २७ मे १९९४ रोजी सलमान आणि संगीता लग्न देखील करणार होते. परंतु मूळची पाकिस्तानी असलेली, हिंदी चित्रपट अभिनेत्री सोमी अली सोबत सलमान खानच्या वाढलेल्या जवळीकतेमुळे हे लग्न रद्द झाले.[१][५][६]

१४ नोव्हेंबर १९९६ रोजी मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये एका रिसेप्शनमध्ये बिजलानीने क्रिकेट खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले. अझहरच्या बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टासोबतच्या कथित अफेअरमुळे २०१० मध्ये या दोघात घटस्फोट झाला.

मॉडेलिंग आणि जाहिराती संपादन

बिजलानीने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली.[३] तिने निरमा आणि पॉन्ड्स सोपच्या जाहिरातींसह अनेक जाहिराती केल्या .[१] संगीताला तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांपासून तिचे लोकप्रिय नाव "बिजली" मिळाले.[३]

मिस इंडिया युनिव्हर्स आणि आंतरराष्ट्रीय मान्यता संपादन

१९८० मध्ये बिजलानीला मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब देण्यात आला.[३] तिने दक्षिण कोरिया मधील सेऊल येथे मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले जेथे तिने तिची आई पूनम बिजलानी यांनी डिझाइन केलेला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्कार जिंकला.[७]

अभिनयाची कारकीर्द संपादन

बिजलानीने १९८७ मध्ये आदित्य पांचोली सोबत 'कातिल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्रिदेव, हाथयार, जुर्म, योधा, युगंधर, इज्जत आणि लक्ष्मण रेखा या चित्रपटांमध्ये काम केले. तिने दक्षिणात्य अभिनेता विष्णू वर्धन सोबत कन्नड भाषेतील 'पोलीस मत्थु दादा' चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिंदी मध्ये त्याच सोबत 'इन्स्पेक्टर धनुष' नावाने पुनर्निर्मित झाला. विनोद खन्ना यांच्या सोबत 'जुर्म' चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्काराने नामांकन मिळाले होते आणि महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केले होते. सलीम खान यांनी लिहिले आहे. तिने महेश भट्ट, मुकुल आनंद, जेपी दत्ता, राहुल रवैल आणि एन चंद्रा यांच्यासोबतही काम केले आहे.

दूरदर्शन कारकीर्द संपादन

बिजलानीने १९९६ च्या सुरुवातीला अभिनेता शाहबाज खान सोबत चांदनी - अ टेल ऑफ पॉवर, रिव्हेंज, अँड लव्ह मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिने स्टार प्लस वर कादर खान सोबत 'हसना मत' आणि झी टीव्ही वर 'किनारे मिलते नहीं'ची निर्मिती देखील केली.

वर्ष मालिका भूमिका दूरचित्रवाणी नोंद संदर्भ
२०२१ सुपर डान्सर पाहुणे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन जॅकी श्रॉफसोबत [८]

चित्रपट सूची संपादन

वर्ष चित्रपट भूमिका नोंदी
१९८६ निशाण
१९८८ कातिल किरण माथूर
१९८९ हत्यार जेनी
१९८९ त्रिदेव नताशा तेजानी
१९९० जय शिव शंकर
१९९० गुनाहोंका देवता भिंडेची बहीण
१९९० हातीम ताई गुलनार परी, हुस्ना परी
१९९० जुर्म गीता साराभाई
१९९० पाप की कमाई
१९९१ योद्धा विद्या अग्निहोत्री
१९९१ पोलीस मत्थु दादा (कन्नड) संगीता इन्स्पेक्टर धनुष (हिंदी)
१९९१ धुन रिलीज न झालेला चित्रपट
१९९१ नंबरी आदमी संगीता राणा
१९९१ इन्स्पेक्टर धनुष संगीता पोलीस मत्थु दादा (कन्नड)
१९९१ विष्णू-देवा संगीता संपत
१९९१ खून का कर्ज सागरिका डी. मेहता
१९९१ गुनाहगार कौन निशा
१९९१ इज्जत सूर्या
१९९१ शिव राम
१९९१ लक्ष्मणरेखा बेनू
१९९३ युगंधर
१९९३ तहकीकात रूपा
१९९३ गेम अधिवक्ता श्रद्धा
१९९६ निर्भय राधा
१९९७ जगन्नाथ
१९९७ ए बी सी डी

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d "10 साल तक संगीता बिजलानी और सलमान खान ने किया था डेट, इस वजह से नहीं हो सकी शादी". Amar Ujala (हिंदी भाषेत). 8 July 2018. 21 May 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Gupta, Rajarshi (21 December 2015). "Mohammad Azharuddin furious with reports of third marriage". India Today. 7 May 2016 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d Sangeeta Bijlani. movies.yahoo.com
  4. ^ Dixit, Shivani (9 July 2021). "10 Then vs now photos! 61-year old Sangeeta Bijlani's transformation is sure to make your eyes pop". Zoom TV. 25 November 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "जन्मदिन: कार्ड छपने के बाद भी सलमान संग फेरे नहीं ले पाई थीं संगीता बिजलानी, इस क्रिकेट खेळाडू से की थी शादी". अमर उजाला. Archived from the original on 2021-07-09. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "Sallu's ex Somy Ali finally speaks up". Hindustan Times. 4 एप्रिल 2011. Archived from the original on 11 जुलै 2011. 27 जुलै 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "'Bijlee' Sangeeta Bijlani's career Net Worth is testimony of her success; Read details". republicworld.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2022-02-11. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "Sangeeta Bijlani recreates Tridev magic with Jackie Shroff on Super Dancer 4". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 15 August 2021. 15 August 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन