घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत.[ संदर्भ हवा ]

समस्या

संपादन

घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.समाजात पहावे एवढे मानाचे स्थान मिळत नाही. समाजाचा घटस्फोटित स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील बदलतो. त्याचबरोबर तिच्या या परिस्थितीला सर्वस्वी स्त्रीलाच जबाबदार धरले जाते तिची काहीही चूक नसेल तरी.त्याचबरोबर  घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह होण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होताना आपल्याला समाजात दिसून येतात. त्यातूनच घटस्फोटित स्त्रीला मूल असेल तर अडचणी अधिकच वाढतात. घट स्फोटामुळे अजून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे स्त्रीचे हक्काचे घर नेमके कोणते. कारण मुलीला लहानपणापासून सांगितलेलं असत तू लग्न करून ज्या घरी जाशील तेच तूज  घर पण  घटस्फोट जाला कि ते घर तीचं रहात नाही आणि पुन्हा माहेरी आल्यानंतरही बऱ्याचदा ते घर तिला स्वीकारत नाही. मला असं वाटतं कि समाजामध्ये घटस्फोटाबद्दल जागृती करणे गरजेचं आहे.[१]

संदर्भ

संपादन
  1. ^ "घटस्फोट — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2018-10-29 रोजी पाहिले.