नलिनी जयवंत (१८ फेब्रुवारी, १९२६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २२ डिसेंबर, २०१०:चेंबूर, मुंबई) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.[]

नलिनी जयवंत
नलिनी जयवंत
जन्म १८ फेब्रुवारी १९२६
बॉम्बे, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश इंडिया
मृत्यू २२ डिसेंबर, २०१० (वय ८४)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९४१ ते १९६५, १९८३
भाषा हिंदी
पती
वीरेंद्र देसाई
(ल. १९४५; घ. १९४८)
,
प्रभू दयाल
(ल. १९६०; मृ. २००१)

नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनीच्या आत्या होत्या. रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ असून, शोभनाच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत.[] इ.स. १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून नलिनी मुख्यतः एकाकी जीवन जगत होत्या.[][]

जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता. इ.स. १९४८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभु दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.[]

मृत्यू

संपादन

जयवंत यांचे २२ डिसेंबर, २०१० रोजी, वयाच्या ८४ व्या वर्षी, युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथे त्यांच्या ६० वर्षांच्या बंगल्यावर निधन झाले . तिच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर रुग्णवाहिकेने तिचा मृतदेह घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू कोणाच्याही लक्षात आला नाही. जयवंतच्या शेजाऱ्यांनी सांगितले की तिने स्वतःला समाजापासून वेगळे केले आहे आणि २००१ मध्ये दयालच्या मृत्यूनंतर ती लोकांना भेटत नव्हती. तिचे नातेवाईक देखील तिच्याशी बराच काळ संपर्कात नव्हते.[]

नलिनी वरील चित्रित काही गाणी

संपादन

तो काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमधुर गाण्यांचा असल्याने नलिनी जयवंत वर चित्रित केलेली काही प्रसिद्ध गाणी पुढील प्रमाणे आहेत.

  • ठंडी हवाएं लहरा के आएं...(नौजवान);
  • नजर लगी राजा तोहरे बंगले पे...(काला पानी);
  • तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार...(नास्तिक);
  • हाए जिया रोए...(मिलन);
  • गिन गिन तारे मैं हार गई रात को...(जादू);
  • हाय जिया रोये पिया नही आए...(मिलन);
  • जि़न्दगी भर गम जुदाई का...(मिस बॉम्बे);
  • बुझ गए आशा के दिए बदले रंग जहां के...(शिकस्त);
  • ओ जाने वाले राही इक पल रुक जाना...(राही);
  • कहां ले चले हो बता दो मुसाफिर...(दुर्गेश नन्दिनी);
  • ओ माटी के पुतले इतनाना कर गुमान...(शेरू)
  • जीवन के सफर में राही, मिलते हैं बिछड़ जाने को...(मुनीम जी) इत्यादी.[]

चित्रपट सूची

संपादन
  • नास्तिक (१९८३)
  • बॉम्बे रेस कोर्स (१९६५)
  • तुफान में प्यार कहां (१९६३)
  • गर्ल्स हॉस्टेल (१९६२)
  • जिंदगी और हम (१९६२)
  • सेनापती (१९६१)
  • अमर रहे ये प्यार (१९६१)
  • मुक्ती (१९६०)
  • माँ के आंसू (१९५९)
  • काला पानी (१९५८)
  • मिलन (१९५८)
  • शेरू (१९५७)
  • मिस्टर एक्स (१९५७)
  • नीलमणी (१९५७)
  • मिस बॉम्बे (१९५७)
  • कितना बदल गया इंसान (१९५७)
  • राणी रुपमती (१९५७)
  • हम सब चोर हैं (१९५६)
  • दुर्गेश नंदिनी (१९५६)
  • आवाज (१९५६)
  • इन्साफ (१९५६)
  • फिफ्टी फिफ्टी (१९५६)
  • आन बान (१९५६)
  • २६ जानेवारी १९५० (१९५६)
  • रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५)
  • मुनीमजी (१९५५)
  • राजकन्या (१९५५)
  • चिंगारी (१९५५)
  • नास्तिक (१९५४)
  • कवी (१९५४)
  • बाप बेटी (१९५४)
  • नाझ (१९५४)
  • लकीरे (१९५४)
  • मेहबूबा (१९५४)
  • शिकस्त (१९५३)
  • राही (१९५२)
  • जलपरी (१९५२)
  • सलोनी (१९५२)
  • काफिला (१९५२)
  • नौदोबाराह (१९५२)
  • दो राह (१९५२)
  • नौजवान (१९५१)
  • जादू (१९५१)
  • एक नजर (१९५१)
  • नंदकिशोर (१९५१)
  • संग्राम (१९५०)
  • समाधी (१९५०)
  • मुकद्दर (१९५०)
  • आंखे (१९५०)
  • अनोखा प्यार (१९४८)
  • गुंजन (१९४८)
  • फिर भी अपना है (१९४६)
  • अदाब अर्झ (१९४३)
  • आंख मिचौली (१९४२)
  • निर्दोष (१९४१)
  • बहेन (१९४१)
  • राधिका (१९४१)

पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Nalini Jaywant". Upperstall. 2019-02-18 रोजी पाहिले.
  2. ^ "नलिनी जयवंत". २५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Rediff On The NeT, Movies: Down memory lane with Shobhana Samarth
  4. ^ Nalini Jaywant profile
  5. ^ The Tribune, Chandigarh, India - Ludhiana Stories
  6. ^ "Actress Nalini Jaywant's 'death' shrouded in mystery".
  7. ^ "बोल्ड एवं ब्यूटीफुल अभिनेत्री थी नलिनी जयवंत". dainiktribuneonline.com. 2021-06-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.