सारिका

मराठी चित्रपट अभिनेत्री

सारिका (रोमन लिपी: Sarika;) (३ जून, इ.स. १९६२; नवी दिल्ली, भारत - हयात) ही मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री आहे.[] तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.

सारिका
जन्म सारिका हासन
३ जून, इ.स. १९६२
नवी दिल्ली, भारत
इतर नावे सारिका ठाकूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट (अभिनय)
भाषा मराठी, तमिळ, हिंदी
पती
कमल हासन
(ल. १९८८; घ. २००४)
अपत्ये श्रुती हासन
अक्षरा हासन

काहीकाळ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता कमल हासन सोबत इ.स. १९८८ मध्ये लग्न केले. तमिळ अभिनेत्री श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन दक्षिणात्य अभिनेत्री सारिकाच्या मुली आहेत. इ.स. २००४ मध्ये कमल हासन सोबत घटस्फोट झाल्या नंतर सारिका मुंबई येथे स्थलांतरित झाली असून चित्रपट सृष्टीत वेशभूषाकार (ड्रेस डिझाईनर)चे ती काम करत आहे.

सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट

संपादन
  • गीत गाता चल
  • ज़िद
  • तहान
  • परजानिया
  • प्रतिमा और पायल
  • भेजा फ्राई
  • मनोरमा सिक्स फीट अंडर
  • माझा पती करोडपती (मराठी)
  • रक्षाबंधन
  • राज तिलक
  • श्रीमान श्रीमती
  • सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं.

पुरस्कार

संपादन
 
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते परजानिया' चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना सारिका

संदर्भ

संपादन
  1. ^ "I get devastated at the idea of marriage: Shruti Haasan". २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन