नफीसा खान

(जिया खान या पानावरून पुनर्निर्देशित)

नफीसा खान उर्फ जिया खान (फेब्रुवारी २०, इ.स. १९८८ - जून ३, इ.स. २०१३) ही एक ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री होती. तिने २००७ साली निःशब्द ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००८ सालच्या गजनीमध्ये देखील तिने काम केले होते.

नफीसा खान
जन्म नफीसा खान
२० फेब्रुवारी १९८८ (1988-02-20)
चेल्सी, लंडन
मृत्यू ३ जून, २०१३ (वय २५)
मुंबई
इतर नावे झिया खान, जिया खान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा हिंदी

३ जून २०१३ रोजी नफीसाने आपल्या मुंबई येथील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत