आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळे (उदा.: वैफल्य, छिन्नमनस्कता,अनैच्छिक ब्रम्हचर्य, मद्यपाश, नशेच्या पदार्थांचा अंमल इत्यादी) व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंते यांचाही यात वाटा असू शकतो. आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्ती गळफास लावून घेणे, नस कापणे, विषारी पदार्थ खाणे, उंचावरून उडी मारणे असे विभिन्न मार्ग चोखाळत असल्याचे आढळते.

एदुआर्द माने याने रंगवलेले चित्र - "आत्महत्या" (इ.स. १८७७-८१)

जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख माणसे आत्महत्या करतात[ संदर्भ हवा ]. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीत आत्महत्या तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे[१].

आत्महत्येची कारणे संपादन


या लेखातील किंवा विभागातील मजकुराचा दृष्टिकोन विषयाची जागतिक व्याप्ती दर्शवत नाही. स्थानिकतेच्या संदर्भापुरतीच व्याप्ती सीमित ठेवणे अपेक्षित असल्यास, देशाचा/स्थानिक व्याप्तीचा स्पष्ट उल्लेख करावा. किंवा जागतिक संदर्भांत लिहावयाचे असल्यास पुनर्लेखन करावे. यासंबंधी चर्चा घडवून आणण्यासाठी कृपया चर्चापानावर चर्चा करावी.

ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरर्थक व नीरस वाटते तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक पाठबळ मिळाले नाही तर तो स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रातील विदर्भ या क्षेत्रातील कितीतरी शेतकऱ्यानी नापिकी आणि सावकारी कर्जापायी आत्महत्या केली आहे. तसेच विद्यार्थी परीक्षेत अपयश आले म्हणून आत्महत्या करतात.

हे ही पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "चॅप्टर ७ - सेल्फ-डायरेक्टेड व्हायलन्स (मराठी: प्रकरण ७ - आत्मलक्ष्यी हिंसा)" (PDF). वर्ल्ड रिपोर्ट ऑन व्हायलन्स ॲंड डेथ (मराठी: हिंसा आणि मृत्यू यांविषयीचा जागतिक अहवाल) (इंग्लिश भाषेत). ७ जानेवारी २०१२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)