निम्मी
निम्मी ( जन्म : फतेहाबाद-आग्रा, १८ फेब्रुवारी १९३३; - २६ मार्च २०२०) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी बरसात सिनेमात ग्रामीण मुलीच्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
भारतीय अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Nimmi | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी १८, इ.स. १९३३ आग्रा | ||
मृत्यू तारीख | मार्च २५, इ.स. २०२० मुंबई | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
निम्मी यांचे आजोबा जमीनदार होते. त्यांना इंग्रज सरकारने नबाब हा किताब द्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. किताब मिळाला नाही, पण त्याऐवजी आपल्या मुलीला- वहिदनला झालेल्या कन्येचे नावच त्यांनी नबाबबानू ठेवले. निम्मीचे वडील अब्दुल हकीम हे कंत्राटदार होते, तर आई वहिदन या त्या काळच्या लोकप्रिय गायिका व अभिनेत्री होत्या. मावशी सितारा बेगम ज्योती या नावाने चित्रपटांत कामे करीत. त्यांचे लग्न पार्श्वगायक जी. एम. दुराणी यांच्याबरोबर झाले होते.
निम्मी अकरा वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. आजीने पालनपोषणाची जबाबदारी घेतली. त्यावेळी आग्ऱ्यातील वातावरण हिंसक झाल्याने आजीने निम्मीला घेऊन मुंबईला स्थलांतर केले. त्या दोघी पूर्वपरिचय असलेल्या मेहबूबखान यांच्याकडे गेल्या. मेहबूबखान सेन्ट्रल स्टुडियेमध्ये अंदाज या चित्रपटाचे चित्रण करत होते. नर्गिसच्या आई जद्दनबाई यांच्या शेजारी बसून शूटिंग पहात असताना निम्मी या राज कपूर यांच्या नजरेस पडल्या. त्यांना ही मुलगी इतकी आवडली की त्यांनी निम्मीला बरसात चित्रपटासाठी निवडले. निम्मी हे नाव राज कपूर यांनीच ठेवले.
निम्मी यांचे लग्न पटकथा लेखक अली रझा (निधन २००७) यांच्याशी झाले. त्यांना मूलबाळ झाले नाही.
निम्मीने आयुष्यभर दुय्यम नायिकेच्या भूमिका केल्या, पण प्रत्येक भूमिकेत त्यांच्या वाट्याला नायिकेपेक्षा अधिक हिट गाणी आली.
चित्रपट
संपादन- अमर
- आन
- उडन खटोला
- दाग
- दीदार
- पूजा के फूल
- बरसात
- मेरे महबूब
निम्मी यांनी अभिनय केलेली गाणी (चित्रपट)
संपादन- अल्ला बचायें नौजवानों को (मेरे मेहबूब)
- आज मेरे संग सखी (आन)
- एक बात कहूॅं (अमर)
- खेलो रंग हमारे संग (आन)
- जिया बेकरार है (बरसात)
- ना मिलता गम (अमर)
- पतली कमर है (बरसात)
- बरसात में हम से मिले तुम (बरसात)
- मेरा नाम अब्दुल रेहमान (भाई भाई)