भारतीय अंतराळ संशोधन संस्था

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (लघुरूप:इसरो)ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.[] फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.[] इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था
'संस्थेचा लोगो'
समानार्थी इस्रो
मालक भारत - भारत
स्थापना १५/०८/१९६९
मुख्यालय अंतरीक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग,बंगलोर, भारत
ब्रीदवाक्य मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान
प्रशासक एस. सोमनाथ
अंदाजपत्रक नफा७,३८८ कोटी (US$१.६ अब्ज)
(२०१५–१६)[]
संकेतस्थळ www.isro.gov.in

पूर्वकाळ

 
डॉ.विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक

ज्यांनी सन १९२० मध्ये आयनोस्फिअर व रेडियो यांबाबत अनेक प्रयोग केले, अशा कलकत्ता येथील शास्त्रज्ञ एस. के. मित्रा यांच्या कार्यापर्यंत, सध्याच्या भारताच्या आधुनिक अंतराळ संशोधनाचा पूर्वेतिहास पोचतो.[] त्यानंतर सी.व्ही. रमणमेघनाद साह सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळ संशोधनासाठी लागणाऱ्या शास्त्रात भर घातली.[] , सन १९४५ नंतरचा काळात अंतराळ संशोधनात भारताची बरीच प्रगती झाली.[] सन १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या उभारणीत ज्यांची महत्त्वाची भूमिका होती, ते अहमदावाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळा सुरू करणारे विक्रम साराभाईहोमी भाभा, या दोघांचा भारताच्या एकत्रित अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा आहे.[] अंतराळ संशोधनातील प्राथमिक प्रयोगात, वैश्विक किरण, अत्युच्च पातळीवर व अवकाशात अनेक उपकरणांची तपासणी, आणि जगात सर्वांत खोल खाणींपैकी एक समजल्या जाणाऱ्या कोलार येथील खाणीत केलेले अनेक महत्त्वाचे प्रयोग इत्यादींचा, तसेच, पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास आदींचा समावेश होतो.[] हा अभ्यास संशोधन प्रयोगशाळेत, अनेक विद्यापीठांत आणि वेगवेगळ्या स्वतंत्र जागेत केला गेला.[][] सन १९५०मध्ये जेव्हा भारत सरकारने अणुऊर्जा खात्याची स्थापना केली व होमी भाभा यांना त्याचे सचिव म्हणून नेमले, तेव्हा अंतराळ संशोधनात सरकारचा दृश्य सहभाग दिसून आला .[]

भारतीय अणुऊर्जा खात्याने अवकाश संशोधनासाठी पैसा पुरविणे सुरू केले.[] मुंबईत कुलाबा येथे सन १८२३ मध्ये वेधशाळा सुरू झाल्यापासून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राबाबत भारतात प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे, भूगर्भशास्त्राविषयी महत्त्वाची माहिती मिळत गेली. उत्तर प्रदेश राज्यामधील हिमालयाच्या पायथ्याशी सन १९५४ मध्ये एक वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[] त्यानंतर, हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठात रंगापूर वेधशाळाही स्थापन करण्यात आली.[] या दोन्ही वेधशाळांस अमेरिकेचे तांत्रिक व शास्त्रीय पाठबळ मिळाले.[]भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी अवकाश संशोधन कार्यक्रमास पुढे प्रोत्साहन दिले.[] सन १९५७ मध्ये रशियाने स्फुटनिकचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून संपूर्ण जगास अवकाशात प्रक्षेपणाचा मार्ग दाखवला.[]भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची (INCOSPAR) सन १९६२ मध्ये स्थापना करण्यात येऊन विक्रम साराभाई यांना त्याचे अध्यक्षपद देण्यात आले.[] सन १९६० मध्ये सुरुवात करून,रशियासोबत असलेल्या मैत्रीमुळे, इस्रोस अंतराळ कार्यक्रम व भारतास अणुऊर्जा कार्यक्रम राबविणे सोपे झाले. पोखरण येथे हसरा बुद्ध या सांकेतिक नावाखाली, दि. १८ मे १९७४ला भारताने पहिला अणु स्फोट केल्यानंतरही रशियाचे सहकार्य सुरूच होते.[] दि.२४ जानेवारी १९६६ रोजी होमी भाभा यांचा विमान अपघातात झालेला मृत्यु हा भारताच्या अवकाश कार्यक्रमास बसलेला एक मोठा धक्का होता.[] भाभांच्या मृत्यूनंतर, साराभाई अणुऊर्जा कमिशनचे अध्यक्ष व अणुऊर्जा खात्याचे सचिव झाले.[] त्यापूर्वीच, सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानकाचा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती.[] सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर [] ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.[]

ध्येय व उद्दिष्टे

अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा इस्रोचा मूळ उद्देश होता. त्यापूर्वी भारतीय अंतराळ विकास कार्यक्रम डॉ.विक्रम साराभाई करतच होते. म्हणून त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाते.[१०]

ते लिहितात ----

काहीजण आम्हांला विकसनशील राष्ट्रांमध्ये अंतराळ कार्यक्रमाच्या समर्पकतेबद्दल प्रश्न करतात. या कार्यक्रमाच्या हेतूबद्दल आमच्या मनांत कसलाच संभ्रम नाही. आम्हाला आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांशी, चंद्राच्या शोधाबद्दल, ग्रह वा मानवासहित अवकाश उड्डाणाबद्दल चढाओढ करण्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. आमच्या देशात तसेच इतर राष्ट्रांच्या समूहात जर आम्हास अर्थपूर्ण भूमिका पार पाडायची असेल तर, त्यासाठी आम्ही मानवाचे व समाजाचे खरेखुरे प्रश्न सोडविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सदैव अग्रभागी राहू.[]

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे----

अनेक संकुचित दृष्टीच्या लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या व ज्यास आपल्या लोकसंख्येला अन्न खाऊ घालणेही कठीण, अशा देशाने अवकाश कार्यक्रम राबविण्याची समर्पकता ती काय ?.... विक्रम साराभाईंची दृष्टी स्वच्छ होती. भारतीयांच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांबरोबरच तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासही आपण प्रथम क्रमांकावरच असायला हवे. अवकाश संशोधनास आपल्या सामर्थ्य प्रदर्शनाचे माध्यम म्हणून वापरण्याचा त्यांचा हेतू नव्हता.[११]
भारताच्या आर्थिक प्रगतीने त्यांचा अंतराळ कार्यक्रम ठळकपणे व प्रामुख्याने दिसू लागला. अंतराळ तंत्रज्ञानात जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेची या देशाची भूमिका राहिली. न्यूजवीक या प्रसिद्ध दैनिकाचे लेखक हेनॉक (Hennock) यांच्या मते, भारत त्याच्या अंतराळ शोधास त्यांच्या राष्ट्रीय मानबिंदूशी जोडते. पुढे ते म्हणतात, 'या वर्षी भारताने एकूण ११ कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले. त्यांतील ९ हे इतर देशांचे होते. २० उपग्रह एकाच अग्‍निबाणाने प्रक्षेपित करणारा भारत हा पहिला देश आहे."[१२]

प्रक्षेपण यानांचा ताफा

 
भारतीय वाहक अग्‍निबाण-डावीकडून उजवीकडे अनुक्रमे:एस एल व्ही, ए एस एल व्ही, पी.एस.एल.व्ही., जी एस एल व्ही, जी एस एल व्ही-३.

१९६० व १९७० च्या दशकात जागतिक राजकारण व आर्थिक बाबींच्या धाकाखाली, भारतास स्वतःचा प्रक्षेपण यान कार्यक्रम राबविणे भाग पडले.[१३] प्रथम स्तरात,(१९६०-१९७० चे दशकात) भारताने आपला दणदणीत अग्‍निबाण विकास कार्यक्रम पूर्ण केला.१९८० च्या दशकात, उपग्रह प्रक्षेपण यान-३ बनवले, आणि अतिप्रगत अशा Augmented Satellite Launch Vehicle (ASLV)चा वापर करून [१३] इस्रोने आपली संपूर्ण कार्यक्षमता, धृवीय उपग्रह प्रक्षेपणभूस्थिर उपग्रह यान बनविण्यावर केंद्रित केली.[१३]

उपग्रह प्रक्षेपण यान

Status: निवृत्त

भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० मध्य इस्रोने सुरू केले. ह्या कामाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. उपग्रह प्रक्षेपण यानाने ४०० किलोमीटरची उंची गाठावी असा ह्या कामाचा मुख्य उद्देश होता. उपग्रह प्रक्षेपण यान हे चार स्तरांचा अग्निबाण आहे व ह्याच्या प्रत्येक स्तरात अग्निबाण सॉलिड प्रोपेलंट मोटारी वापरल्या जातात.[१४] यातील प्रथम प्रक्षेपण सन १९७९ मध्ये झाले त्यानंतर प्रत्येक साली प्रत्येकी २.[१५]

संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान

सद्यस्थिती: अकार्यान्वित/निवृत्त

संवर्धित (ऑगमेंटेड) उपग्रह प्रक्षेपण यान,(ASLV) हा ५ टप्प्यांचा सॉलिड प्रॉपेल्ंट अग्निबाणहोता.त्याची क्षमता १५० किलोचा उपग्रह अवकाशात नेंण्याची होती.भूस्थिर कक्षेत तेवढ्या वजनाचा उपग्रह नेउन प्रस्थापित करण्यासाठी, इस्रोने सन १९८० साली, त्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा तो प्रकल्प सुरू केला.त्याचे आरेखन उपग्रह प्रक्षेपण यानावर अवलंबून होते.[१६] याची प्रथम प्रक्षेपण चाचणी सन १९८७ मध्ये घेतल्या गेली, त्यानंतरच्या तीन १९८८,१९९२ आणि सन १९९४ मध्ये.त्याचे अकार्यान्वयनापूर्वी, २ चाचण्या यशस्वी राहिल्या.[१५]

धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान

स्थिती : क्रियाशील

धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान असे याचे संक्षिप्त नाव असून इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीयच नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रोने बनवले आहे. पी.एस.एल.व्ही. हे भूस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत.[१७][१८][१९] पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ कोटी अमेरिकन डॉलर इतका असतो.

पीएसएलव्ही प्रक्षेपणांचा दशकांनुसार तपशिल:

दशक यशस्वी काही प्रमाणात
यशस्वी
अयशस्वी एकूण
१९९० हे दशक
२००० हे दशक ११ ११
२०१० हे दशक २२ २२

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान

स्थिती: क्रियाशील

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान ही भारताने त्याच्या इन्सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी विकसित केलेली व त्यास भूस्थिर करण्याची एक प्रणाली आहे.त्याद्वारे विदेशी अग्नीबाणावर भारताला विसंबून राहता येण्याची गरज नाही.सध्या ते इस्रोचे सर्वात मोठे उपग्रह प्रक्षेपण यान आहे.त्याद्वारे सुमारे ५ टनाचा उपग्रह पृथ्वीच्या निम्न-कक्षेत स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे.

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३

स्थिती: विकसनशील

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ हे विकसनशील असलेले भारताचे एक प्रक्षेपक यान आहे.त्याद्वारे, भूस्थिर कक्षेत जास्त वजनाचे उपग्रह नेण्याचे त्याचे उद्दीष्ट आहे.त्यायोगे, जास्त वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताला विदेशावर कमी अवलंबून रहावे लागेल.हे प्रक्षेपण यान (GSLV) पेक्षा प्रगत तंत्रज्ञानाचे असून, त्यापूर्वीच्या प्रक्षेपणयानाची ती सुधारित आवृत्ती नाही.[२०]

भू-निरीक्षण व दळणवळण उपग्रह

 
इन्सॅट-१ ब
भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट, याचे सन १९७५ मध्ये सोव्हियेट रशियामधून प्रक्षेपण केले गेले. त्यानंतरही रोहिणी मालिकेतले प्रायोगिक उपग्रहही तयार करून तसेच प्रक्षेपित केले गेले. सध्या इस्रोपाशी अनेक भूपाहणी उपग्रह आहेत.

इन्सॅट उपग्रहमालिका

भारतीय राष्ट्रीय उपग्रह (Indian Setellite) याचे लघुरूप इन्सॅट. ज्या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो अशा भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखलेचा कार्यक्रम म्हणजे इन्सॅट मालिका. हा एक इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.

सुदूर संवेदन उपग्रहांची मालिका

भारताचा सुदूर संवेदन उपग्रह ही पृथ्वीवरील ठिकाणाशी संपर्क करणाऱ्या उपग्रहांची मालिका आहे. त्यांची बांधणी, प्रक्षेपण व देखरेख इस्रोच करते. ते देशास सुदूर संवेदन सेवा पुरवितात. ती, जगातील देशाच्या नागरिकांसाठी असलेली, सर्वात मोठी सुदूर संवेदन उपग्रह संरचना आहे. सर्व उपग्रह हे ध्रुवीय कक्षेत(सूर्याच्या अनुषंगाने स्थिर असलेले) ठेवले जातात व त्यानुसार देशाच्या विकासासाठीच्या विविध कार्यक्रमांस आवश्यक असलेला, बराच महत्त्वाचा डाटा जसे, अभिक्षेत्रिय, स्पेट्रल ई. रिझोल्युशन्स आदी उपलब्ध होतो.

ओशनसॅट मालिका

भारतीय सुदूर संवेदन उपग्रहाचा (इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) भाग असणारी ओशनसॅट(ओशनसॅटेलाइट) मालिका ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आली. २७ मे १९९९ रोजी प्रक्षेपित झालेल्या IRS P4ला ओशनसॅट-१ म्हणून ओळखण्यात येते. २३ सप्टेंबर २००९ रोजी ओशनसॅट-२ प्रक्षेपित केला गेला.

इतर उपग्रह

जीसॅट मालिकेअंतर्गत भारताने प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले त्यांना जीसॅट असे नाव आहे. कल्पना-१ भारताचा हवामानशास्त्राविषयीचा प्रथम राखीव उपग्रह होता जो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे १२ सप्टेंबर २००२ला प्रक्षेपित केल्या गेला. त्याचे मूळ नाव मेटसॅट-१ होते.फेब्रुवारी २००३ मध्ये, त्याकाळचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी, कल्पना चावला, मूळ भारतीय वंशाची असलेली एक नासाची उपग्रहवीरांगना, जिचे नासाच्या कोलंबिया अपघातात निधन झाले, तिच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे नाव बदलून कल्पना-१ केले.

इस्रोचा परिचय करून देणारी मराठी पुस्तके

  • इस्रो-झेप नव्या क्षितिजाकडे (मूळ इंग्रजी लेखक - रामभद्र आणि गीता आरवमुदन; मराठी अनुवाद - प्रणव सखदेव)

पृथ्वीपल्याडचे संशोधन

 
चांद्रमोहिमेसाठी तयार करण्यात आलेले चांद्र आघात शोधयान(Moon Impact Probe) - आराखडा

.

भारताची पृथ्वीपल्याडची पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती. एक चांद्रयान, ज्याने चंद्राच्या कक्षेत ८ नोव्हेंबर इ.स.२००८ला यशस्वीरित्या प्रवेश केला. चांद्रयान १ पाठोपाठ इस्रो चांद्रयान २ आणि मंगळावर मानवरहित यान तसेच पृथ्वीजवळच्या वस्तू जसे, अवकाश अशनी, धूमकेतू यासाठी मोहिम राबवू इच्छिते.

चंद्रयान १

चांद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक, तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.

१४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेले चांद्र आघात शोधयान यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.[२१]

मंगळ स्वारी

इस्रोने मंगळस्वारीच्याही मोहिमेची तयारी सुरू केली असून त्यासाठी रु. १० कोटी त्यांना सरकारद्वारे प्राप्त झाले आहेत.सन २०१३ ते २०१५ दरम्यान ही संस्था त्याच्या प्रक्षेपणासाठी संधी शोधत आहे. [२२] ही अवकाश संस्था, उपग्रहास कक्षेत ठेवण्यास, त्यांचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान वापरेल त्यानंतर आयन थस्टर्स तरल इंजिन किंवा आण्विय उर्जा वापरून त्याचे मंगळाकडे उड्डाण करेल.[२३] मंगळ मोहिमेचा अभ्यास आधीच संपला आहे व ते अवकाश संशोधक वैज्ञानिक प्रस्ताव व वैज्ञानिक ध्येये शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.[२४]

भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस,मानव अवकाशोड्डान कार्यक्रमासाठी रु. १२,४०० कोटीचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे.भारत अवकाश आयोग,जो हे अंदाजपत्रक मंजूर करतो,त्याचेनूसार,पहिले मानवरहित उड्डाण सन २०१३-१४ मध्ये होईल तर मानवासहित उड्डाण मोहिम सन २०१४-२०१५ मध्ये. [२५] जर या कालात ती फलद्रूप झाली तर,भारत असे करणारा जगातील रशिया, अमेरिका, व चिन यांचे श्रेणीतील,स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मानवासह अवकाश मोहिम राबविणारा चौथा देश असेल.

तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

अवकाश कॅप्सूल पुनर्प्राप्ति प्रयोग तथा एसआरइ १ हे एक प्रायोगिक भारतीय अवकाशयान आहे जे पीएसएलव्ही सी७ प्रक्षेपणयान वापरून तीन उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले होते. ते, पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेश करण्यापूर्वी, कक्षेत १२ दिवस होते व ते बंगालच्या उपसागरात पडले.

एसआरइ १ याचे आरेखन,भ्रमण करणाऱ्या अवकाश कॅप्सूलला परत उतरवून घेण्याची व कक्षीय भ्रमण करीत असलेल्या मंचावर सूक्ष्मगुरुत्व स्थितीत प्रयोग करण्याची क्षमता दर्शविण्यासाठी होते.त्यात औष्णिक सुरक्षा, सुचालन, दिशानिर्देश, नियंत्रण, उद्घोषणा व तरंग प्रणाली तसेच उच्चस्वनातीत वायू-उष्मागतिकी, दळणवळण निःशब्दतेचे व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्ति चालन इत्यादींचे परिक्षण करणे हेही एक ध्येय होते.

इस्रो, भविष्यातील मानवासहित मोहिमेसाठी, अत्याधुनिक पुनर्प्राप्ति तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास, एसआरइ २एसआरइ ३ याचेही पुढे प्रक्षेपण करण्याचे योजत आहे.

अवकाशयात्री प्रशिक्षण व इतर सुविधा

सन २०१२ पर्यंत इस्रो ही अवकाश यात्रेसाठी,व्यक्ति व अवकाश कर्मचाऱ्यांसाठी बंगळुरू येथे अवकाशयात्री प्रशिक्षण केंद्र सुरू करेल.ते केंद्र निवडलेल्या अवकाशयात्रींना सुटका व पुनर्प्राप्ति चालन तसेच शून्य गुरुत्वाकर्षणात निभाव लागण्यासाठी,आवश्यक ते प्रशिक्षण देण्यास, जल अनुकृतीचा(water simulation) वापर करेल.तसेच ते अवकाशपोकळीतील किरणोत्सर्गी वातावरणाचाही अभ्यास करेल.

मोहिमेतील अवकाशयात्रींना त्वरण टप्प्यास (acceleration phase) अवगत होण्यास इस्रो केंद्रोत्सारी यंत्र बांधेल.त्यांची,सन २०१५ पर्यंत, मानवासहित अवकाश मोहिम पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यास, एक अवकाशस्थानक बांधण्याचीपण योजना आहे.तो श्रीहरीकोटा येथील भारताचा तिसरा अवकाशमंच असेल.

अवकाशवैमानिकांसाठी यानाचा विकास

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही पहिल्यावहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करीत आहे जे तीन अवकाशविरांना पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेत सात दिवसांसाठी घेउन जाईल.या भारतीय मानवासहित अवकाशयानाचे तात्पुरते नाव कक्षीय वाहन असे आहे.तो भारतीय मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमाचा एक स्वदेशी वापर आहे.

कॅप्सूलची व्यक्ति नेण्याची क्षमता तीन असेल व नियोजित दर्जोन्नत आवृत्तीत गुप्तस्थळी समुद्रात उतरविण्याची क्षमता असेल.या पहिल्या मानवसहित मोहिमेत, इस्रोचे स्वायत्त व मोठे ३ टन वजनाचे कॅप्सूल,हे २४८ मैल (३९९ किमी) उंचीवरून सात दिवस, दोन कर्मीदलासह पृथ्वीची प्रदक्षिणा करेल.हे कर्मीदल वाहन इस्रोच्या जीएसएलव्ही २ या उपग्रहाने प्रक्षेपित होईल.जीएसएलव्ही २ हे स्वदेशी उच्चस्थिती क्रायोजेनिक इंजिन आहे.[२६]

ग्रहीय विज्ञान व अवकाशविज्ञान

भारताचे अवकाशयुगाचा उदय सन १९६३ मध्ये थुंबा प्रक्षेपण केंद्रावरून दोन टप्प्याचे अवकाशयान प्रक्षेपणाने झाला.या एक महायुग सुरुवात करण्याच्या घटनेआधीही भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात नोंद घेण्याजोगे योगदान दिले:

  • वैश्विक किरणे[२७] व उच्च-उर्जेच्या खगोलशास्त्रीय अध्ययनात, जमिनीवर तसेच फुग्याद्वारे[२८] करण्यात येणाऱ्या परिक्षणात, जसे, न्यूट्रॉन/मेसन मॉनिटर्स कण-शोधक/गणकात इत्यादी
  • आयनोस्फेरिक संशोधनात जमिनीवरील रेडियो प्रसारण तंत्रज्ञान[२९] वापरून जसे:ionosonde,VLF/HF/VHF रेडियो शोधाग्र,चुंबकत्वमिति स्थानकांची साखळी वापरून इत्यादी.
  • जमिनीवरून प्रकाशिकी तंत्रज्ञान[३०] वापरून उच्च वातावरणिय संशोधन जसे, डॉबसन वर्णपटमापक वापरून एकूण ओझोन मात्रा,वायू प्रभादीप प्रकाशमापक इत्यादी.
  • भारतीय अवकाशयात्री हे जमिनीवरील अनेक प्रकाशिकी व रेडियो दुर्बिणी वापरून अत्याधुनिक पद्धतीने महत्त्वाचे अन्वेषण करीत आहे.
  • भारतीय अवकाश कार्यक्रमाचे येण्याने,देशातील अवकाश विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात, त्याचे ताबडतोब प्रायोगिक उपायोजन करण्याचे दृष्टीने, स्वदेशी व स्वयंपूर्ण तंत्रज्ञानावर व त्याचे विकासावर भर दिल्या गेला.

हैद्राबाद येथे इस्रो व टीआयएफ आर यांचे संयूक्त विद्यमाने असलेली राष्ट्रीय वातयान सुविधा[३१] आहे.या सुविधेचा वापर खगोलशास्त्रीय उच्च उर्जा (क्ष व गामा किरणे)high energy (i.e., x- and gamma ray) astronomy आय आर खगोलशास्त्र, मध्य वातावरणीय अनुरेख घटक, middle atmospheric trace constituents including CFCs & aerosols, ionisation, electric conductivity and electric fields.

मूळ वातावरणात असलेल्या व वैश्विक किरणांच्या आंतरक्रियेद्वारे उत्पादित दुय्यम कणांचा व क्ष-किरण व गामा किरण यांचा अभिवाह हा फारच कमी असतो. ही कमी असलेली पृष्ठभूमी, ज्यांच्या उपस्थितीत, कोणासही अत्यंत क्षीण असलेला संकेत एखाद्या वैश्विक स्रोतातून पकडायचा असेल तर,भारतातून या कठिण क्ष-किरणांची पाहणी करण्याचा मोठा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे कि, अनेक प्रखर स्रोत जसे, Cyg X-1,Crab Nebula,Scorpius X-1 व Galactic Centre स्रोत हे, त्यांच्या अनुकूल कलनामुळे, हैद्राबाद मधून पाहता येऊ शकतात. हे सर्व लक्षात घेऊन, सन १९६७ मध्ये एक क्ष- किरण खगोलशास्त्रिय गट TIFR मध्ये तयार करण्यात आला व एक असे उपकरण तयार करण्याचे काम घेण्यात आले, ज्यात,कठिण क्ष किरणांच्या पाहणीसाठी दिशानिर्धारण करता येण्याजोगा टेलिस्कोप असेल. याद्वारे, २८ एप्रिल १९६८ला या नवीन उपकरणासह, बलूनचे उड्डाण घेण्यात आले. यात Scorpius X-1च्या पाहण्या यशस्वीरित्या करण्यात आल्या. यानंतर, सन १९७४ पर्यंत उपर्निर्दिष्ट विविध किरणांच्य्६आ पाहण्याही करण्यात आल्या.अनेक खभौतिकीय निकाल या पाहणीतून प्राप्त करण्यात आले. [३२]

इस्रोची या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची उपलब्धी ही, उच्च वातावरणीय कक्षेत, समतापमंडलात, सुमारे २० ते ४० कि.मी दरम्यान, तीन प्रकारच्या जिवाणूंचे अस्तित्वाचा शोध होय. असे हे जीवाणू, जे अति-नील किरणांना प्रतिरोध करतात, पृथ्वीवर कुठेही सापडत नाहीत. त्याने अशी अटकळ बांधता येते कि ते मूळचे पृथ्वीबाह्य(अति-भौतिक) जीव असू शकतात. यापूर्वी समतापमंडल हे अतिनील किरणांच्या प्रारणांमुळे, रहिवासयोग्य नसल्याचे समजल्या जात होते. त्या तीन जीवाणूंचे नामाभिधान, त्यांचे शोधात असलेल्या इस्रोच्या योगदानामुळे, Bacillus isronensis, आर्यभट्ट या भारताच्या पुरातन खगोलशास्त्रज्ञावरून Bacillus aryabhata व Fred Hoyle या खभौतिकशास्त्रज्ञावरून,Janibacter Hoylei , असे केल्या गेले. [३३]

क्षेत्रीय उभारण्या

इस्रोचे मुख्यालय हे अंतरिक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग, बंगलोर, भारत येथे आहे.

संशोधन सुविधा

सुविधा स्थळ विवरण
भौतिकी संशोधन कार्यशाळा अमदावाद सौर-ग्रहीय भौतिकशास्त्र अवरक्त खगोलशास्त्र, भू-वैश्विक भौतिकशास्त्र, प्लाजमा भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र ,पुरातत्त्व शास्त्र आणि जल् विज्ञान या शाखांचा अभ्यास या संस्थेमध्ये करता येतो [३४] उदयपूर येथील एक वेधशाळा देखील या संस्थेच्या नियंत्रणाखाली येते.[३४]
अर्धवाहक प्रयोगशाळा चंदिगड अर्ध-वाहक तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन व विकास, अर्ध-वाहक प्रक्रियेशी संबंधीत असणारी सुक्ष्म विद्युत-यांत्रिकी प्रणाली व प्रक्रिया तंत्रज्ञान.
राष्ट्रीय वातावरण संशोधन प्रयोगशाळा चित्तूर राष्ट्रीय वातावरण संशोधन प्रयोगशाळा येथे वातावरण आणि अंतरिक्ष विज्ञान मधील मूलभूत आणि उपयोजित संशोधन चालते.
रामन संशोधन संस्था बंगलोर रामन संशोधन संस्था येथे भौतिकशास्त्र मधील निवडक भागात संशोधन केले जाते जसे कि खगोल आणि खगोलशास्त्र.
स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अमदावाद एसएसी हे अवकाश तंत्रज्ञान याचेशी संबंधित असणाऱ्या व त्याचे प्रयोगशील वापराच्या विविध पैलूंवर काम करते.[३४] स्पेस ऍप्लिकेशन सेंटर येथे संशोधनाचे क्षेत्र आहे:भूपृष्ठमितीय सर्वेक्षण उपग्रह आधारीत दूरसंचार, सर्वेक्षण, सुदूर संवेदन, हवामानशास्त्र, पर्यावरण नियंत्रण इत्यादी.[३४] या व्यतिरिक्त एसएसी हे दिल्ली भू-स्थानकाचेही चालन करते.[३५]
विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम सर्वात मोठा इस्रो बेस हे मुख्य तांत्रिक केंद्र आणि एसएलव्ही -3, एएसएलव्ही आणि पीएसएलव्ही मालिकेच्या विकासाचे ठिकाण आहे. हा बेस भारताचा थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आणि रोहिणी साउंडिंग रॉकेट प्रोग्रामला समर्थन देतो.

ही सुविधा जीएसएलव्ही मालिका देखील विकसित करीत आहे.

ईशान्य अंतरिक्ष अनुप्रयोग केंद्र शिलाँग रिमोट सेन्सिंग, जीआयएस, उपग्रह संप्रेषण आणि स्पेस सायन्स रिसर्च आयोजित करून विशिष्ट अनुप्रयोग प्रकल्प हाती घेऊन ईशान्येकडील विकासात्मक समर्थन पुरविणे.

चाचणी सुविधा

सुविधा स्थळ वर्णन
लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र बंगलोर, तिरुअनंतपुरम् महेंद्रगिरी लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र हे लिक्विड प्रोपल्शन नियंत्रण पॅकेजेस हाताळते व प्रक्षेपण यान व उपग्रहांसाठी आवश्यक असणारे इंजिनांचा विकास करण्यात सहाय्य करते.[३४] महेंद्रगिरी येथे याची चाचणी मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.[३४] लिप्रोसिके हे उच्च दर्जाचे ट्रांसपॉंडरही बनविते.[३६]

बांधणी व प्रक्षेपण सुविधा

सुविधा स्थळ वर्णन
इस्रो उपग्रह केंद्र बंगलोर उपग्रह तंत्रज्ञानाधारीत ८ यशस्वी प्रकल्प हे इस्रोचे उपग्रह तंत्रज्ञानाचा पायवा आहेत. हे भारतात अवकाशयान मोहिमांसाठी असलेले एक मुख्य स्थान आहे.[३४] आर्यभट्ट, भास्कर ॲपलआयआरएस-१ए या ठिकाणी निर्मिल्या गेलेत.आयआरएस व इन्सॅट मालिकेतील उपग्रह सध्या येथे निर्माणाधीन आहेत.[३६]
सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा बहुविध उप-स्थाने असलेले श्रीहरीकोटा बेट हे भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण केंद्र म्हणून काम करते.[३४] हे स्थान भारताच्या रॉकेट्सच्या प्रक्षेपणाचा तळही आहे.[३६] हे केंद्र भारताच्या सर्वात मोठ्या सॉलिड प्रोपेलंट स्पेस बूस्टर प्लॅंटचे गृहही आहे. यात स्थिरत्व चाचणी व मुल्यांकन संकुलही आहे.[३६]
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुवनंतपुरम हा भारतातील इस्रोचा सर्वात मोठा तळ आहे व मुख्य तंत्रज्ञान केंद्रही आहे. तसेच, एसएलव्ही-३, एएसएलव्हीपीएसएलव्ही या मालिकेतील यानांचा विकासही या ठिकाणी होतो.[३४] हा तळ थुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनच्या कामात, तसेच रोहिणी रॉकेटच्या मोहिमेतही सहाय्यीभूत ठरतो.[३४] येथे जीएसएलव्ही मालिकेच्या यानांवर देखील काम सुरू आहे.[३४]
तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन तुंबा तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनचा उपयोग रॉकेट पाठवण्याकरिता केला जातो.

मागोवा व नियंत्रण सुविधा

सोय स्थान वर्णन
इंडियन डिप स्पेस नेटवर्क (IDSN) बंगलोर या जालाद्वारे(नेटवर्क) अवकाशयानाच्या सुस्थितीची माहिती व भारवहन याबाबतच्या माहिती प्राप्त करण्यात येते,त्यावर प्रक्रिया करण्यात येते,तसेच त्याचे पुराभिलेखन व वितरणही करण्यात येते. हे सत्कालात(तत्क्षणी)(रियल टाईम)[मराठी शब्द सुचवा] करण्यात येते. ते उपग्रहांचा बऱ्याच दूरवर मागोवा घेऊ शकते व त्याचे नियंत्रणही करु शकते, अगदी, चंद्रापल्याडही.
नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद एनआरएसए हे नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करु शकते तसेच हवाई सर्वेक्षणाच्याद्वारे अभ्यासास उपयोगी आहे.[३४]बालानगरशादनगर (मेहबुबनगर जिल्हा) येथील केंद्रांव्यतिरिक्त, त्याचे देहरादून येथे प्रशिक्षण केंद्रही आहे. तेथील संस्थेचे नाव भारतीय सुदूर संवेदन संस्था आहे.[३४]
इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क याचे बंगलोर येथे मुख्यालय आहे व भारतात व जगात अनेक ठिकाणी भू-स्थानके आहेत.[३५] संचेतन विकास, भू-मोहिमा, ट्रॅकिंग टेलीमेट्री व नियंत्रण व सहाय्य आदी या संस्थेतर्फे केल्या जाते.[३४] भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे टेलीमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क याची मागोवा घेणारी केंद्रे देशभर व जगातील पोर्ट लुईसमॉरिशस रशिया [[इंडोनेशिया व ब्रुनेई इत्यादी ठिकाणी आहेत.
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हसन; भोपाळ भूस्थिर उपग्रहाची कक्षा वाढविणे, भारमापन चाचणी व कक्षेदरम्यानचे चालन येथे केल्या जाते.[३७] उपग्रहाच्या नियंत्रणासाठी याची भू-स्थानके व उपग्रह नियंत्रण केंद्रे आहेत.[३७] यासमानच सोय असलेले ठिकाण भोपाळ येथे तयार करण्यात येत आहे.[३७]
अंतराळ परिस्थिती जागरूकता नियंत्रण केंद्र पिन्या, बेंगलोर डायरेक्टरेट ऑफ स्पेस सिच्युएशनल अवेयरनेस  अँड मॅनेजमेंट व स्पेस सिलिझन व स्पेस आधारभूत मालमत्तांच्या संरक्षणासाठी एक दूरबीन व रडार यांचे जाळे तयार केले जात आहे. नवीन सुविधेमुळे इस्रोची नोराडवरील अवलंबित्व संपेल. नेलोरमध्ये परिष्कृत मल्टी-ऑब्जेक्ट ट्रॅकिंग रडार, एनई इंडिया मधील रडार आणि तिरुअनंतपुरम, माउंट अबू आणि उत्तर भारतमधील दुर्बिणी या नेटवर्कचा भाग असतील.

मानव संसाधन विकास

सुविधा स्थान वर्णन
भारतीय अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान संस्था तिरुवनंतपुरम ही संस्था, विमानन तंत्रज्ञान व अंतरिक्षयान याबाबत स्नातक व स्नातकोत्तर शिक्षण पुरविते.
भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था बंगलोर आयआयए ही खगोलशास्त्र, खगोलभौतिकी व त्यासंबंधीच्या भौतिकशास्त्राबाबत संशोधन करणारी प्राथमिक संस्था आहे.
विकास व शैक्षणिक दळणवळण एकक अमदावाद हे केंद्र इन्सॅट कार्यक्रमाचे संलग्नतेने शिक्षण,संशोधन व प्रशिक्षण यासाठी काम करते.[३४] DECU मध्ये करण्यात येणारे मुख्य क्रियाकलापात ग्रामसॅट व एज्यूसॅट प्रकल्प अंतर्भूत आहेत.[३६] ट्रेनिंग व डेव्हलपमेंट कम्यूनिकेशन चॅनेल याचे चालन व नियंत्रण DECUच्या अंतर्गत येते.[३५]
भारतीय दूरस्थ सेन्सिंग संस्था (आयआयआरएस) देहरादून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) ही एक प्राथमिक प्रशिक्षण आणि शैक्षणिक संस्था आहे जे प्राकृतिक संसाधने, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग, जिओनफॉरमॅटिक्स आणि जीपीएस तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिक (पी. जी. आणि पीएचडी स्तर) विकसित करण्यासाठी विकसित केली आहे. आयआयआरएस सामाजिक अनुप्रयोगांसाठी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस वर बरेच संशोधन व विकास प्रकल्प राबवित आहे. रिमोट सेन्सिंग आणि जिओस्पेशियल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आयआयआरएस विविध आउटरीच प्रोग्राम्स (लाइव्ह अँड इंटरएक्टिव आणि ई-लर्निंग) चालविते.
प्रादेशिक अकादमी सेंटर फॉर स्पेस (आरएसी-एस) येथे:

1.बनारस हिंदू विद्यापीठ

2.गुवाहाटी विद्यापीठ

3.कुरुक्षेत्र विद्यापीठ

4.मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

5.राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था कर्नाटक

6.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पटना

7.भारतीय तंत्रज्ञान संस्था (बीएचयू) वाराणसी

वाराणसी, गुवाहाटी, कुरुक्षेत्र, जयपूर, मंगलोर, पटना ही सर्व केंद्रे जनजागृती करण्यासाठी, शैक्षणिक सहकार्य बळकट करण्यासाठी आणि अंतराळ तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि अवकाश अनुप्रयोगांसाठी इनक्यूबेटर म्हणून काम करण्यासाठी स्तर -2 शहरांमध्ये स्थापित केल्या आहेत. आरएसी-एसचे कार्य अधिकतम संशोधन क्षमता, पायाभूत सुविधा, कौशल्य, अनुभव आणि क्षमता वाढविणे सुलभ करण्यासाठी वापरले जाईल.
अंतराळ तंत्रज्ञान उष्मायन केंद्रे (एस-टीआयसी) येथे:

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, अगरतला

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिराप्पल्ली

अगरतला, जालंधर, तिरुचिराप्पल्ली एस-टीआयसी भारतातील प्रिमियर टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये सुरू झाल्या ज्यायोगे उद्योगासंदर्भात अँप्लिकेशन्स आणि उत्पादने तयार करण्यासाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात आले आणि भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी याचा उपयोग केला जाईल. भारतीय अंतराळ कार्यक्रमाशी संबंधित संशोधन आणि विकास (आर अँड  डी) उपक्रमांमध्ये हातभार लावण्यासाठी एस-टीआयसी उद्योग, शैक्षणिक संस्था आणि इसरोला एका छाताखाली आणेल.

वाणिज्यिक शाखा

सुविधा स्थळ वर्णन
ॲंट्रिक्स कॉर्पोरेशन बंगलोर ही सरकारचे नियंत्रणात असलेली विपणन एजन्सी असून ती इस्रोचे हार्डवेर, मनुष्यबळ, व संचेतनाबद्दल व्यवसाय करते.[३७]

इतर सुविधा आहेत:

भविष्याचा वेध

 
A model of the Geosynchronous Satellite Launch Vehicle III.
 
A model of the RLV-TD

इस्रोची योजना नजिकच्या भविष्यकाळात नव-युगाचे पृथ्वी पाहणी उपग्रह प्रक्षेपित करायची आहे. ती संस्था नवीन प्रकारच्या प्रक्षेपण यानांच्या व अवकाशयानांच्या विकासाचे कामही हाती घेईल. इस्रोने नमूद केले आहे कि ती संस्था मंगळावर व पृथ्वीजवळील वस्तूंवर मानवविरहित मोहिमा आखेल.

भारतीय चंद्र संशोधन कार्यक्रम

  • देशाच्या चांद्रयान-१च्या यशस्वी मोहिमेनंतर, इस्रो ही पुढील दशकात, अनेक चांद्रमोहिमा आयोजण्याचा विचार करीत आहे.तसेच एक स-मानव मोहिम जी सन २०२० मध्ये कृतीत येईल.या मोहिमेचा कालावधी व चीनच्या आणि अमेरिकेच्या मोहिमेचा कालावधी जवळपास एकसारखाच राहील असा अंदाज आहे.
  • चांद्रयान-२ ही भारताची दुसरी चांद्रयान मोहिम आहे.ही मानवविरहित आहे.इस्रोद्वारे प्रस्तावित या मोहिमेचा खर्च सुमारे ४५० करोड रुपये आहे. यात एक ऑर्बिटर व एक लॅंडर/ रोव्हर असेल. चाके असणारा हा रोव्हर,चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माती व खडकांचे नमूने घेईल. त्याची रासायनिक तपासणी तो तिथेच करेल. याबद्दलची माहिती ऑर्बिटर मार्फत पृथ्वीवर पाठविली जाईल.

अवकाश संशोधन

  • इस्रो या दशकात, मंगळावर मानवविरहित मोहिम काढण्याचे आयोजित आहे. इस्रोनुसार ही मोहिम सध्या संकल्पनात्मक असली तरी लवकरच त्यात निश्चिती येईल. सध्याच्या जीएसएलव्ही वाहनाचा वापर हे यान अवकाशात सोडण्यास करण्यात येईल.[३८]
  • इस्रो एक सौर शोधयानाचे आरेखन करीत आहे, ज्याचे नाव आदित्य आहे. हा एक लघु-उपग्रह आहे जो पृथ्वी व सूर्याच्या संबधाचा अभ्यास करेल. त्याचे प्रक्षेपण २०१२ साली अपेक्षित आहे.

इंडियन रीजनल नॅव्हीगेशनल सॅटेलाईट सिस्टीम

इंडियन रीजनल नॅव्हीगेशनल सॅटेलाईट सिस्टीम ही एक स्वायत्त क्षेत्रिय सॅटेलाईट नॅव्हीगेशनल प्रणाली असून ती इस्रोद्वारे विकसित केल्या जात आहे. ही पूर्णतः भारत सरकारचे नियंत्रणात राहील. या अशा प्रकारच्या प्रणालीची आवश्यकता, जसे जीपीएस याची प्रतिकूल परिस्थितीत खात्री देता येऊ शकत नाही. यासाठी इस्रो ही एक उपग्रहांची संरचनाच तयार करीत आहे. ते उपग्रह २०१० ते २०१२ दरम्यान सोडण्यात येतील.

नवीन प्रक्षेपण यानांचा विकास

इस्रो सध्या दोन नव-युगीन प्रक्षेपण यान तयार करीत आहे. जीएसएलव्ही-३अवतार. ही प्रक्षेपण याने इस्रोची सध्याची प्रक्षेपण क्षमता वाढविल. याने भारतास वैश्विक उपग्रह प्रक्षेपण व्यापारातील अधिक हिस्सा मिळेल.

व्यावहारिक उपयोग

भारत त्याचे उपग्रह दळणवळणाच्या जाळ्याचा वापर - हे जगात सर्वात मोठ्या जालांपैकी आहे- भू-व्यवस्थापन, जलस्रोत व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती अंदाज, रेडियो नेटवर्किंग, हवामान अंदाज, भू-आरेखन व संगणक दळणवळण यासाठी करतो.[३९] व्यवसाय, प्रशासकीय सेवा व राष्ट्रीय माहिती केंद्र (निकनेट) हे या उपयोजित उपग्रह तंत्रज्ञानाचे थेट लाभार्थी आहेत.[३९] दिनशॉ मिस्त्री हे भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिक उपायोजनाबद्दल लिहितात:

इन्सॅट-२ प्रकारचे उपग्रह हे सुदूर क्षेत्रात दूरसंचार-दुवे देतात; भारतीय राष्ट्रीय रोखे बाजार सारख्या संस्था माहितीचे प्रक्षेपण करण्यास याला वापरतात;खाजगी चालकांना मोबाईल सेवा संवाद: रेल्वे व रस्त्याची वाहतूक; व प्रक्षेपण उपग्रह सेवा, ज्याचा वापर भारतातील राज्यांच्या मालकीची दूरचित्रवाहिनी व व्यावसायिक दूरचित्रवाहिनी चॅनेल्सही करतात. भारताचा एज्युसॅट (शैक्षणिक उपग्रह) ज्याला गीएसएलव्ही यानाद्वारे सन २००४ मध्ये प्रक्षेपित केल्या गेले होते, त्याचा वापर, गामीण क्षेत्रातील प्रौढ शिक्षणासाठी आणि डिस्टंस लर्निंगसाठी प्रस्तावित होता.त्याचे संवर्धन करण्यात आले आहे व पूर्वी पुरविलेल्या क्षमतांना इन्सॅट-३बी द्वारे खरोखरीच एक चांगला पर्याय ठरेल.

भारताच्या आयआरएस उपग्रहांनी भारतीय राष्ट्रीत स्रोत व्यवस्थापन कार्यक्रमात, भारतातील ५ शहरात असलेल्या क्षेत्रिय सुदूर संवेदन सेवा केंद्राद्वारे व २० राज्यात असलेल्या सुदूर संवेदन अनुप्रयुक्ति केंद्रांद्वारे, भर घातली आहे.ही सर्व केंद्रे आर्थिक विकासासाठी आयआरएस चित्रे वापरतात. यात पर्यावरण व्यवस्थापन, जमिनीची धूप व मृदा-संधारणाच्या उपाययोजनांचा प्रभाव, वनक्षेत्र व्यवस्थापन, संरक्षित वनांची भू-आवरण निश्चिती, भूजल प्रवण क्षेत्रांची आखणी, पूर आखणी, तसेच दुष्काळ-क्षेत्र आखणी, पीक पेरणी क्षेत्राचा अंदाज व शेतकी उत्पादनांचा अंदाज, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन, खनिकर्म व भौगोलिक अनुप्रयुक्ति जसे धातू व खनिजांचे सर्वेक्षण व शहरी नियोजन ही कामे अंतर्भूत आहेत.

भारताचे उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण यानांना लष्करी वळण देण्यात आलेले आहे. भारतीय अवकाश कार्यक्रमातून,९३–१२४ मैल (१५०–२५० किमी) पल्ला असलेले पृथ्वी क्षेपणास्त्र घेतल्या गेलेले नाही, मध्यम पल्ल्याचे पृथ्वी क्षेपणास्त्र हे भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या एसएलव्ही-३ कार्यक्रमातून घेतल्या गेले आहे.इस्रोच्या पूर्वीच्या काळात, हेंव्हा त्याचे प्रमुख विक्रम साराभाई व सतिश धवन होते, इस्रोने एसएलव्ही-३ या द्वीलक्षी प्रकल्पाचा वापर लष्करी कामासाठी करण्यास विरोध दर्शविला.नंतर, तरीही, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी माणसे व तंत्रज्ञान इसोकडून घेतले. क्षेपणास्त्र वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम (ज्यांची निवड सन २००२मध्ये भारताचे राष्ट्रपती म्हणून झाली) त्यानी इस्रोमध्ये एसएलव्ही-३ प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम केले होते, त्यांना लष्करी संशोधन व विकास संस्थेत भारतीय क्षेपणास्त्र मोहिमेसाठी हलविल्या गेले. त्यांचेसमवेत सुमारे १२ वैज्ञानिकही होते, जे इस्रोतून लष्करी संशोधन व विकास संस्थेत गेले.तेथे अब्दुल कलाम यांनी एसएलव्ही-३चे 'घन-जळण ' वापरून अग्नि क्षेपणास्त्र प्रथम टप्पा व तरल-जळण वापरून (पृथ्वी-क्षेपणास्त्र-व्युत्पन्न) दुसरा टप्पा विकसित केले.

आयआरएस व इन्सॅट उपग्रह हे प्राथमिकरित्या नागरी-आर्थिक प्रयुक्तीसाठी होते.पण ते लष्करी कामासाठीही कधीकधी वापरल्या जात होते. सन १९९६ मध्ये, दिल्लीच्या संरक्षण मंत्रालयाने, आयआरएस-१सी चा पर्यावरण व शेतकी मंत्रालयातर्फे करण्यात येणारा वापर सीमेवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संनियंत्रणासाठी तात्पुरता प्रतिबंधित केला होता. सन १९९७ मध्ये भारतीय वायू दलाने सर्वेक्षण व युद्ध व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर केला.[४०]

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) या सारख्या संस्था व भारतीय तंत्रज्ञान संस्था या उपग्रहांचा वापर शैक्षणिक कार्यांसाठी करतात.[४१] अवकाश तंत्रज्ञान वापरून भारताने सन १९७५ व १९७६ दरम्यान आपला सर्वात मोठा समाजशास्त्रीय कार्यक्रम राबविला. स्थानिक भाषांमध्ये,व्हीडियो प्रोग्रामिंग वापरून जवळपास २४०० खेड्यांमध्ये आपली पोहोच केली. या कार्यक्रमाचे ध्येय, नासाने विकसित केलेल्या एटीएस-६ तंत्रज्ञानाद्वारे साध्य करण्यात आले.[४२] या प्रयोगाने - ज्याचे नाव सॅटेलाईट इंस्ट्र्क्शनल टेलिव्हीजन एक्स्पेरिमेंट (SITE)असे होते- याने मोठ्या प्रमाणावर व्हीडियो ब्रॉडकास्ट केल्या गेलेत. याद्वारे, ग्रामीण भागात शिक्षणात बरीच सुधारणा झाली.[४२]

इसोने आपले तंत्रज्ञान 'टेलिमेडिसीन' क्षेत्रातही वापरले.त्यांनी उपग्रहाद्वारे, शहरी क्षेत्रातील वैद्यकिय अनुभविकांना थेट ग्रामीण भागातील रुग्णांशी जोडले.[४१] भारतातील काही सुदूर क्षेत्रांमध्ये,उच्च दर्जाची वैद्यकिय सेवा ही विस्तृतपणे उपलब्ध नसते म्हणून, सुदूर भागातील रुग्णांना शहरी केंद्रांमध्ये असलेले डॉक्टर त्यांचे तत्क्षणीच (real time)[मराठी शब्द सुचवा] निदान व पृथक्करण व्हिडियो कॉन्फरंसिंग मार्फत करतात.[४१] त्या रुग्णांना नंतर औषधयोजना व उपचार कळविल्या जातात.[४१] त्यानंतर मग त्या रुग्णावर अति-विशेषोपचार रुग्णालयात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करण्यात येतात.[४१] रुग्णांचे रोगनिदान व त्यांना सहाय्य करण्यासाठी, दूरवरच्या क्षेत्रात असलेल्या ठिकाणांवर चलित टेलिमेडिसीन गाड्याही पाठविल्या जातात.[४१]

इस्रोने भारताची जैवविविधता माहिती प्रणाली विकसित करण्यात सहाय्य केले आहे. ती सन २००२ मध्ये पूर्ण झाली.[४३] निरुपमा सेन या कार्यक्रमाबद्दल माहिती देतांना विवेचन करतात:उपग्रह सुदूर संवेदन प्रणाली व भू-अवकाशिक साधने वापरून व बऱ्याच मोठ्या प्रमाणात क्षेत्रिय नमूने घेऊन व त्यांची आखणी करून, १:२,५०,००० या प्रमाणात वृक्षवनस्पती-क्षेत्राचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. हे सर्व नकाशे जाल-सक्षम (web-enabled)[मराठी शब्द सुचवा] माहितीतळावर एकत्रितपणे टाकण्यात आले आहेत. जे, वनस्पतींची जैव-स्तर माहिती ही, पर्यावरणाचे दृष्टीने धोकादायक क्षेत्रातील बायोस्पेक डाटाबेसच्या अवकाशिय माहितीशी जोडते. जसे: उत्तर-पूर्व भारत पश्चिमी घाट पश्चिमी हिमालयअंदमान आणि निकोबार. हे केवळ इस्रो व जैवतंत्रज्ञान खात्यांच्या एकत्रित सहयोगानेच शक्य झाले."[४३]

भारताचा आयआरएस-पी५ (कार्टोसॅट-१) हा उपग्रह 'हाय रिझोल्यूशन पॅनक्रोमॅटिक साधनांद्वारे' सुसज्ज होता. त्याद्वारे मानचित्रीकरण (नकाशाशास्त्र) करता येऊ शकत होते.[१०] आयआरएस-पी५ नंतर त्यापेक्शा प्रगत असा आयआरएस-पी६ हे मॉडेल तयार करण्यात आले. त्याचा उद्देश शेतिविषयक होता.[१०]कार्टोसॅट-२ प्रकल्प हा कार्टोसॅट-१ नंतर आला, ज्यात एकल पॅनक्रोमॅटिक कॅमेरा होता, ज्याद्वारे दृश्य-वैशिष्ट्ये असलेली एखाद्या ठिकाणची चित्रे ताबडतोब काढता व पाठविता येऊ शकतात[४४]

वैश्विक सहयोग

इस्रोला, त्याच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय सहयोगाचे फायदे मिळत गेलेत.

  • TERLSची स्थापना; SITE व STEP आयोजणे, आर्यभट्ट, भास्कर, ॲपल,आय आरएस-१ए व आरएस-१बी यांचे प्रक्षेपण, स-मानव अवकाश मोहिम, इत्यादी. यात आंतरराष्ट्रीय सहयोग होता.
  • इस्रो हे आंतरराष्ट्रीय COSPAS/SARSAT कार्यक्रमांतर्गत LUT/MCC वापरते.शोध व सूटका यासाठी याचा वापर होतो.
  • भारताने आशियात एक अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण केंद्र स्थापले आहे. पॅसिफिकमधील (CSSTE-AP) हे यूनायटेड नेशन्स द्वारे प्रायोजित आहे.
  • भारताने सन १९९९ मध्ये दुसऱ्या UN-ESCAP Ministerial Conferenceचे यजमानत्व स्वीकारले.
  • भारत हा यूनायटेड नेशन्सच्या बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण वापराच्या समितीचा,Cospas-Sarsatचा,International Astronautical Federation,Committee on Space Research,Inter-Agency Space Debris Coordination Committee व Committee on Earth Observation Satellite सदस्य आहे.[४५]
  • चांद्रयान-१ने नासा, ESA व बल्गेरियन स्पेस एजन्सीसाठी वैज्ञानिक भारवहन केले.
  • चांद्रयान-२ साठी आवश्यक असणारे रोव्हर विकसित करण्यासाठी, रशियन स्पेस एजन्सी सहयोग देत आहे.त्यांचा सहयोग भारतीय स-मानव मोहिमेसाठीही आहे.

इस्रो व अवकाश खात्यांनी अनेक देशांसोबत मेमोरॅंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग करार केलेला आहे.

भारत हा विदेशाच्या अवकाश एजन्सीसोबत एकत्रितपणे कार्य करतो, जसे, भारत व फ्रेंचचे Megha-Tropiques Mission [४५] २५ जून २००२ला, विज्ञान व्ब तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, युरोपियन संघ व भारतादरम्यान एका द्वीपक्षी करारास मान्यता देण्यात आली.[४६] २३ नोव्हेंबर २००१ला भारत व युसंचा संशोधन व विकास करण्यास चालना देण्यास संयुक्तपणे गट तयार करण्यात आला.[४६] CERN मध्ये भारताचा दर्जा पर्यवेक्षकाचा आहे, यासमवेतच, भारत व युसं यांचे संयुक्तपणे संचेतन शिक्षण व विकास केंद्र बंगळुरू येथे होऊ घातले आहे.[४६]

महत्त्वाच्या व्यक्ती

व्यक्ती कालखंड योगदान
होमी भाभा ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९जानेवारी २४, इ.स. १९६६ होमी भाभाने सन १९४५ मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास हातभार लावला.सन १९५० पर्यंत,ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले. भारतीय अवकाशसंशोधनाचा कार्यभारही त्यांचेकडेच होता.[४७] त्यांनी भारतीय आण्विक उर्जा आयोगाचे अध्यक्षपदही भूषविले.त्यांचे दि.२४ जानेवारी १९६६ला एका विमान अपघातात झालेल्या निधनापर्यंत,ते ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव होते.[४७]
विक्रम साराभाई १२ ऑगस्ट, इ.स. १९१९३१ डिसेंबर, इ.स. १९७१ साराभाई यांनी अहमदाबाद मध्ये एक भौतिक संशोधन प्रयोगशाळेची; विक्रम साराभाई अवकाश केंद्र तिरुवनंतपुरम; अवकाश अनुप्रयुक्ति केंद्र अहमदाबाद आदींची स्थापना केली.Faster Breeder Test Reactor (FBTR), Kalpakkam; Variable Energy Cyclotron Project, Calcutta; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. हैदराबाद; व युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. जादुगुडा बिहार[४८] ते सन १९६२ मध्ये Indian National Committee for Space Researchचे अध्यक्ष होते. होमी भाभा यांच्या मृत्युनंतर, त्यांना भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच अणू ऊर्जा खात्याचे सचिव बनविण्यात आले.[४९] Sarabhai formally set up ISRO in its modern avatar in 1969.[४९]
सतीश धवन सप्टेंबर २५, इ.स. १९२० - जानेवारी ३, इ.स. २००२ धवन यांची नेमणूक सन १९७२ मध्ये इस्रोचे अध्यक्ष म्हणून केली गेली.[५०] भारताच्या अंतराळ खात्याचे ते सचिवही होते.[५०] त्यांचा मोठ्या कार्यकाळात, इस्रोच्या अनेक यशस्वी कामांना व जलदगती विकासास हातभार लागला.[५१]
राकेश शर्मा जानेवारी १३, इ.स. १९४९ - एप्रिल ३, इ.स. १९८४ला, राकेश शर्मांनी व Gennady Strekalov तसेच Yury Malyshev यांचे समवेत, रशियाच्या सोयुज टी-११ साल्युत ७ वर यशस्वीरित्या उतरले[५२] राकेश शर्मा हे भारताचे अवकाशात जाणारे प्रथम नागरिक ठरले. त्यांना, या मोहिमेसाठी, हिरो ऑफ सोव्हीयेट युनियन हा सोव्हीयेट सन्मान व भारताचा अशोक चक्र हा सन्मान देण्यात आला.[५२][५३]
राजा रामण्णा जन्म:१९२५ - मृत्यु:२३ सप्टेंबर २००४ राजा रामण्णा यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र येथे (१९७२–७८ व १९८१–८३) या कालावधीत निदेशक म्हणून;निदेशक जनरल म्हणून DRDOयेथे; भारताच्या संरक्षण संशोधन येथे सचिव म्हणून (१९७८-१९८१), सेवा दिलीअणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून १९८४-८७ दरम्यान, राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्था, बंगलोर येथे निदेशकाच्या पदावर; जानेवारी ते नोव्हेंबर १९९० दरम्यान भारताच्या मंत्रालयात संरक्षण राज्यमंत्री म्हणून; राज्य सभेचे सदस्य म्हणून ऑगस्ट १९९७ ते ऑगस्ट २००३ तसेच, भारताच्या प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून सेवा दिली.[५४]
ए.पी.जे. अब्दुल कलाम जन्म: १५ ऑक्टोबर इ.स. १९३१, मृत्यु: २७ जुलै, इ.स. २०१५ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या भारतीय आण्विक कार्यक्रमात,भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम आणि अनेक संरक्षण प्रकल्पात बरेच मोलाचे योगदान केले.[५५] त्यांनी एसएलव्ही-३ या प्रकल्पाचे निदेशक म्हणूनही काम केले[५५] इस्रोत यशस्वीरित्या काम केल्यावर,ते डीआरडीओ मध्ये संचालक म्हणून गेलेत.[५५]डीआरडीओ मध्ये ते अनेक अग्निबाण विकासाचे मुख्य होते. त्यात नाग, पृथ्वी, आकाश, त्रिशुल आणि अग्नि अग्निबाण हे अंतर्भूत होते.[५५] त्यांची भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून निवड केल्या गेली जेथे त्यांनी सन २००२ ते सन२००७ इतकी सेवा केली.[५५]
यु. रामचंद्रराव जन्म: १० मार्च १९३२ सन १९७२ नंतर राव यांनी भारतातील १५ उपग्रह प्रकल्पांच्या विकासावर देखरेख केली. त्यात आर्यभट्ट, ॲपल, रोहिणी, इन्सॅट व भारताचा सुदूर संवेदन उपग्रह यांचा समावेश होता.[५६] भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या शासन समितीचे ते अध्यक्ष म्हणून होते.अवकाश आयोगाचे अध्यक्ष व अवकाश खात्याचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले.[५६] एएसएलव्ही पीएसएलव्ही व जीएसएलव्ही या मालिकांतही त्याचे महत्त्वाचे योगदान होते.[५६] क्रायोजेनिक तंत्रज्ञान व अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करण्यात व भारतात अवकाश तंत्रज्ञानाचा प्रयोगक्षम वापर करण्यातही त्यांनी सहाय्य केले.[५६]
के. कस्तुरीरंगन जन्म:२० ऑक्टोबर १९४० कस्तुरीरंगन यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमात अनेक कळीची पदे भूषविलीत.ते २७ ऑगस्ट २००३ नंतर राज्यसभेचे सदस्य होते.[५७] त्यांच्या महत्त्वाच्या योगदानात, पीएसएलव्ही कार्यक्रम, जीएसएलव्ही मालिका व भारतीय सुदूर संवेदन उपग्रह मालिकांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ भारतीय अवकाश कार्यक्रमाचे मुख्य म्हणून, मार्च १९९४ ते ऑगस्ट २००३ इतका होता.[५८]
जी. माधवन नायर जन्म:३१ ऑक्टोबर १९४३ इस्रोचे पदधारक अध्यक्ष, भारतीय अवकाश खात्याचे सचिव आणि बंगळुरूच्या ॲंट्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष.
के.एन. शंकर जन्म: ७ मे १९४५ हे सन २००२-२००५ या काळात, इस्रोच्या अवकाश अनुप्रयुक्ति केंद अहमदाबाद व इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक होते. त्यांना २००४ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
एम. अण्णादुराई जन्म:२ जुलै १९५८ अण्णादुराई यांनी चांद्रयान चंद्र मोहिमेचे संचालन केले.[५९] त्यांनी आपली सेवा यापूर्वी आयआरएस १ए, आयआरएस १बी, इन्सॅट २ए, इन्सॅट २बी व एज्युसॅट प्रकल्पात दिली.[५९]

हे सुद्धा पहा

नोंदी

  1. ^ "एका दृष्टीक्षेपात बजेट" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-01-08 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b "ISRO - Vision and Mission Statements". 2015-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-18 रोजी पाहिले.
  3. ^ Eligar Sadeh (11 February 2013). Space Strategy in the 21st Century: Theory and Policy. pp. 303–. ISBN 978-1-136-22623-6.
  4. ^ a b c d Daniel, 486
  5. ^ a b Daniel, 487
  6. ^ a b c d e Daniel, 488
  7. ^ a b c d Daniel, 489
  8. ^ Khan, Sultanat Aisha (2006), "Russia, relations with", Encyclopedia of India (vol. 3) edited by Stanley Wolpert, 419-422, Thomson Gale: ISBN 0-684-31352-9.
  9. ^ a b c d e Daniel, 490
  10. ^ a b c Burleson, 136
  11. ^ In Wings of Fire: An Autobiography of APJ Kalam (1999), his autobiography.
  12. ^ Hennock etc. (2008), "The Real Space Race Is In Asia", Newsweek.
  13. ^ a b c Gupta, 1697
  14. ^ साचा:संकेतस्थळ स्रोतsantosh
  15. ^ a b "ISRO milestones[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2009-01-27 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  16. ^ "ASLV[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2009-01-27 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  17. ^ "PSLV-C9". ISRO official website. 2014-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 November 2014 रोजी पाहिले.
  18. ^ Bagla, Pallava (30 April 2008). "India's growing strides in space". 2 November 2014 रोजी पाहिले.
  19. ^ Atkinson, Nancy (28 April 2008). "10 Satellites Launched in Record Setting Mission for India (Video)". 2 November 2014 रोजी पाहिले.
  20. ^ http://economictimes.indiatimes.com/News/News_By_Industry/ET_Cetera/ISRO_plans_NextGen_vehicle_to_reduce_launch_costs_by_50/articleshow/3923921.cms
  21. ^ "Chandrayaan team over the moon". 2008-12-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-14 रोजी पाहिले.
  22. ^ http://www.domain-b.com/aero/space/spacemissions/20090812_chandrayaan_1_oneView.html
  23. ^ "संग्रहित प्रत". 2011-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.
  24. ^ http://news.rediff.com/report/2009/aug/31/isro-to-launch-mars-mission-by-2015.htm
  25. ^ "संग्रहित प्रत". 2014-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.
  26. ^ "संग्रहित प्रत". 2009-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.
  27. ^ इंग्लिश:cosmic rays
  28. ^ इंग्लिश:Baloon
  29. ^ इंग्लिश:Radio propogation Technology
  30. ^ Optical Technology
  31. ^ national balloon launching facility
  32. ^ "संग्रहित प्रत". 2002-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.
  33. ^ http://sify.com/news/fullstory.php?id=14871264&?vsv=TopHP1
  34. ^ a b c d e f g h i j k l m n o India in Space", Science & Technology edited by N.N. Ojha, 142.
  35. ^ a b c "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 415.
  36. ^ a b c d e "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 414.
  37. ^ a b c d "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 416.
  38. ^ "संग्रहित प्रत". 2009-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.
  39. ^ a b Bhaskaranarayana, 1738–1746
  40. ^ Mistry, 94–95
  41. ^ a b c d e f Bhaskaranarayana, 1744
  42. ^ a b Bhaskaranarayana, 1737
  43. ^ a b Sen, 490
  44. ^ Burleson, 143
  45. ^ a b "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, 447.
  46. ^ a b c Ketkar, Prafulla (2006), "European Union, Relations with (Science and technology)", Encyclopedia of India (vol. 2), edited by Stanley Wolpert, 48-51, Thomson Gale: ISBN 0-684-31351-0.
  47. ^ a b Daniel, 486-489
  48. ^ ""Vikram Sarabhai", Vigyan Prasar, Deprtment of Science and technology, Government of India.
  49. ^ a b Daniel, 486–490
  50. ^ a b Narasimha, 223
  51. ^ Narasimha, 223–225
  52. ^ a b "U.S. and Russian Human Space Flights: 1961–September 30, 1999" Archived 2010-03-11 at the Wayback Machine., NASA, Government of the United States of America.
  53. ^ "Sqn Ldr Rakesh Sharma" Archived 2011-07-21 at the Wayback Machine., National Defence Academy, Government of India.
  54. ^ "Raja Ramanna", Vigyan Prasar, Department of Science and Technology, Government of India.
  55. ^ a b c d e "Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam", Vigyan Prasar, Department of Science and Technology, Government of India.
  56. ^ a b c d "IAA Attributes the Von Karman Award for 2005 to Prof. Udipi Ramachandra Rao (India)", International Academy of Astronautics, October, 2005.
  57. ^ "K. Kasturirangan " Archived 2007-10-15 at the Wayback Machine., ISRO, Government of India.
  58. ^ Current Science (2004), 86 (7): 895-896, Bangalore: Indian Academy of Sciences.
  59. ^ a b "मोहपात्र, सत्येन (२००७), "रीचिंग फॉर द मून", Hindustan Times". 2009-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.

संदर्भ

  • Bhaskaranarayana etc. (2007), "Applications of space communication", Current Science, 93 (12): 1737-1746, Bangalore: Indian Academy of Sciences.
  • Burleson, D. (2005), "India", Space Programs Outside the United States: All Exploration and Research Efforts, Country by Country, pp. 136–146, United States of America: McFarland & Company, ISBN 0-7864-1852-4.
  • Daniel, R.R. (1992), "Space Science in India", Indian Journal of History of Science, 27 (4): 485-499, New Delhi: Indian National Science Academy.
  • Gupta, S.C. etc. (2007), "Evolution of Indian launch vehicle technologies", Current Science, 93 (12): 1697-1714, Bangalore: Indian Academy of Sciences.
  • "India in Space", Science & Technology edited by N.N. Ojha, pp. 110–143, New Delhi: Chronicle Books.
  • Mistry, Dinshaw (2006), "Space Program", Encyclopedia of India (vol. 4) edited by Stanley Wolpert, pp. 93–95, Thomson Gale, ISBN 0684313537.
  • Narasimha, R. (2002), "Satish Dhawan", Current Science, 82 (2): 222-225, Bangalore: Indian Academy of Sciences.
  • Sen, Nirupa (2003), "Indian success stories in use of Space tools for social development", Current Science, 84 (4): 489-490, Bangalore: Indian Academy of Sciences.
  • "Space Research", Science and Technology in India edited by R.K. Suri and Kalapana Rajaram, pp. 411–448, New Delhi: Spectrum, ISBN 8179302946.

बाह्य दुवे

लेखात प्रयुक्त संज्ञा

या लेखात प्रयुक्त करण्यात आलेल्या भाषांतरीत शब्दांची/संज्ञांची/शब्दसमुच्चयाबद्दल माहिती:

केलेले मराठी भाषांतर मूळ इंग्रजी शब्द शेरा
इस्रो / भारतीय अंतराळ संशोधन संस्था /
भारतीय अवकाश संशोधन संस्था
ISRO / Indian Space Research Organisation
उपग्रह प्रक्षेपण यान Satellite Launch Vehicle /(SLV)
संवर्धित उपग्रह प्रक्षेपण यान / पूरक उपग्रह प्रक्षेपण यान Augmented Satellite Launch Vehicle (ASLV)
धृवीय उपग्रह प्रक्षेपण यान Polar Satellite Launch Vehicle (PSLV)
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV)
भू-निरिक्षण व दळणवळण उपग्रह
भारतीय सुदूर संवेदन उपग्रह Indian Remote Sensing satellite
पृथ्वीजवळच्या वस्तू near-Earth objects
अवकाश अशनी asteroids
चांद्र आघात शोधयान Moon Impact Probe
मानव अवकाशोड्डान कार्यक्रम Human spaceflight program
मंगळ स्वारी Mars mission
तंत्रज्ञानाचे प्रदर्शन Technology demonstration
अवकाशयात्री प्रशिक्षण व इतर सुविधा Astronaut training and other facilities
अवकाशवैमानिकांसाठी यानाचा विकास Development of crew vehicle
ग्रहीय विज्ञान व अवकाशविज्ञान Planetary Sciences and Astronomy
क्षेत्रीय उभारण्या Field installations
बांधणी व प्रक्षेपण सुविधा Construction and launch facilities
मागोवा व नियंत्रण सुविधा Tracking and control facilities
भारतीय चंद्र संशोधन कार्यक्रम Indian lunar exploration program
अवकाश संशोधन Space exploration
व्यावहारिक उपयोग Applications
वैश्विक सहयोग Global cooperation