मुख्य मेनू उघडा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

घन म्हणजे भरीव, घट्ट किंवा दृढ. जो पदार्थ पाण्याप्रमाणे किंवा हवेप्रमाणे प्रवाही नसतो त्या पदार्थाला घन पदार्थ म्हणतात. घन स्थितीत असणे हा त्या पदार्थाचा एक भौतिक गुणधर्म आहे. पदार्थाच्या घट्टपणाच्या मोजमापाला घनता म्हणतात.

२. घन हा एक भौमितिक आकार आहे. घनाला लांबी, रुंदीजाडी(किंवा उंची) असते (त्रिमिती असलेला आकार). घनाकृतीतील लांबी, रुंदी आणि उंची दाखवणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतात आणि त्यांचे माप समान असते. किंवा दुसऱ्या शब्दांत, सहा चौरसांनी सीमित केलेल्या आकृतीस घन म्हणतात.

. कोणत्याही संख्येला त्याच संख्येच्या वर्गाने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. किंवा तीन समान संख्यांचा गुणाकार हा त्या समान संख्येचा घन असतो.

४ गुणले ४ = १६.

४ गुणले १६ = ६४.

किंवा, ४ x ४ x ४ = ६४

म्हणजे, ६४ हा ४ चा घन आहे.

आणि ४ हे चौसष्टचे घनमूळ आहे.

४. एखाद्या भरीव वस्तूने व्यापलेल्या जागेच्या मोजमापाला त्या वस्तूचे घनफळ म्हणतात.

. घन या शब्दाचे अन्य अर्थ :- मेघ, निबिड(अरण्य वगैरे), गंभीर(गर्जना वगैरे), दाट(प्रेम, साखरेचा पाक वगेरे), विस्तार(पूर्वक म्हणणे=घनपाठ)