एम. अण्णादुराई
मयिलस्वामी अण्णादुराई (तमिळ:மயில்சாமி அண்ணாதுரை; २ जुलै १९५८, पोल्लाची, कोइंबतूर जिल्हा, तामिळ नाडू) हे एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सदस्य आहेत. चंद्रयान, चंद्रयान २, ॲस्ट्रोसॅट, आदित्य, मंगळयान इत्यादी अनेक महत्त्वाच्या व प्रतिष्ठित संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.