चंद्रयान २

भारताची दुसरी चंद्र मोहीम

चांद्रयान २ ही मोहीम चंद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चंद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लॅंडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत.

चंद्रयान २
चंद्रयान २
साधारण माहिती
संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
मुख्य कंत्राटदार भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)
सोडण्याची तारीख २२ जुलै २०१९
कुठुन सोडली सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
सोडण्याचे वाहन LVM3 M1
प्रकल्प कालावधी ऑर्बिटर : ~ ७.५ वर्षे (नियोजित);

३ वर्षे, १० महिने, 1४ दिवस (elapsed) विक्रम लँडर: ≤ १४ दिवस (नियोजित); ० दिवस (अयशस्वी) प्रज्ञान रोव्हर: ≤ १४ दिवस (नियोजित);

० दिवस (not deployed)
वस्तुमानवस्तुमान = एकत्रित (आर्द्र) :

३,८५० kg

एकत्रित (शुष्क) :

१,३०८ kg यानभाराचे वस्तुमान = कक्षाभ्रमर(आर्द्र) : २,३७९ किग्रॅ कक्षाभ्रमर(शुष्क) :६८२ किग्रॅ

विक्रम लॅंडर (आर्द्र) :१,४७१ किग्रॅ

विक्रम लॅंडर (शुष्क) :६२६ किग्रॅ

प्रज्ञान रोव्हर : २७ किग्रॅ
ठिकाणसतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
संकेतस्थळ
www.isro.gov.in/chandrayaan2-home-0

इतिहास

संपादन

१२ नोव्हेंबर २००७ रोजी, रशियन सांघिक अवकाश संस्थेच्या व इस्रोच्या प्रतिनिधींनी 'चांद्रयान २' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर एकत्र कार्य करण्याचा करार केला होता. या प्रकल्पात इस्रोने कक्षाभ्रमर, रोव्हर तर रशियन सांघिक अवकाश संस्थेने लॅंडर तयार करण्याची मुख्य जबाबदारी स्वीकारली होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली १८ सप्टेंबर २००८ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत भारत सरकारने या मोहिमेला मंजूरी दिली. ह्या यानाचा आराखडा दोन्ही देशांतील वैज्ञानिकांच्या एकत्रित बैठकीने ऑगस्ट २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. इस्रोने या यानावरील भार (payload) वेळापत्रकाप्रमाणे निश्चित केला, मात्र ही मोहीम जानेवारी २०१३ पर्यंत स्थगित करून पुन्हा २०१६ साली करण्याचे ठरवले. कारण रशियन सांघिक अवकाश संस्थेला लॅंडर वेळेत पूर्ण करणे शक्य नव्हते. २०१६ असणाऱ्या मोहिमेकरिता २०१५ पर्यंत सुद्धा रशियन अवकाश संस्थेला हा लॅंडर, काही अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण करणे शक्य झाले नाही. मग मात्र भारताच्या इस्रो संस्थेने ही चांद्र मोहीम स्वतंत्रपणे पार पाडायचे निश्चित केले. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर मार्च २०१८ला चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्याचे नक्की करण्यात आले. मात्र सुरुवातीला एप्रिलपर्यंत आणि नंतर ऑक्टोबरपर्यंत काही अन्य अंतराळ वाहनांची चाचणी करण्याकरिता ही मोहीम स्थगित करण्यात आली. २०१९ च्या पहिल्या अर्धवर्षात ह्या मोहिमेच्या चौथ्या सर्वसमावेश तांत्रिक चर्चामंडळाच्या सभेनंतर यानाच्या संरचनेत व अवतरण क्रमात काही बदल करण्यात आला.

फेब्रुवारी २०१९ च्या चाचणीत, लॅंडरच्या दोन पायांना अल्पप्रमाणात हानी पोहोचली होती. ती दुरुस्ती झाल्यावर चांद्रयान २ चेप्रक्षेपण १४ जुलै २०१९ला ठरवण्यात आले. मात्र पुन्हा काही तांत्रिक गोंधळामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी १८ जुलै रोजी, इस्रोने २२ जुलै २०१९ हा दिवस चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी जाहीर केला.

चंद्रयान २ 'GSLV MK lll' ह्या प्रक्षेपकाद्वारे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २२ जुलै २०१९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:४३ (जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:१३) वाजता प्रक्षेपित झाले.

७ सप्टेंबर, २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्रतलापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्यावेळी यानाशी संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे.

'इस्रो ची  महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या 'चांद्रयान - २'च्या अखेरच्या टप्प्यात चंद्रभूमीपासून केवळ २.१ कि.मी. उंचीवर असतांना विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्याने देशभरातील खगोलप्रेमींना आणि भारतीय शास्त्रज्ञांना धक्का बसला.

८ सप्टेंबर २०१९ - विक्रम लॅंडरशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातील खगोल प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरलेले असतांनाच आज पुन्हा एकदा आशेचा किरण सापडला. ऑर्बिटरच्या माध्यमातून विक्रम लॅंडरची थर्मल छायाचित्रे मिळाली आहेत. मात्र 'विक्रम' शी अद्याप  संपर्क झाला नसून तो प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

चांद्रयानच्या ऑर्बिटरने काढलेल्या एका छायाचित्रात 'विक्रम' चंद्राच्या पृष्ठभागावर सापडल्याचे दिसून आल्याचे के. सिवन, प्रमुख, इस्रो यांनी  सांगितले आहे. यामुळे  सर्वांचेच मनोबल पुन्हा उंचावले आहे.

भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉं. विक्रम साराभाई यांच्या गौरवार्थ लॅंडरचे 'विक्रम' असे नामकरण करण्यात आले आहे.

११ सप्टेंबर २०१९ - चांद्रयान २ मोहिमेदरम्यान संपर्क तुटून चंद्रावर पडलेल्या विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात अद्याप यश  मिळालेले नाही. 'विक्रम ' सापडल्याचे आणि तो चांद्रभूमीवर तिरपा पडल्याचे छायाचित्रातून स्पष्ट होत असल्याचे 'इस्रो' ने सांगितले.   

विक्रम लॅंडरच्या आत प्रज्ञान बग्गी असून तिलाही बाहेर पडत आलेले नाही. या बग्गीद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार होता.

उद्देश

संपादन

चंद्राच्या भूरचनेचा, तिथल्या खनिजांचा व बाह्य वातावरणाचा अभ्यास करणे हा चांद्रयान सोडण्यामागचा उद्देश होता.

हे सुद्धा पहा

संपादन