भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३
भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था द्वारे विकसित उपग्रह वाहन आहे. १८ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी नऊ वाजता या यानाने सतीश धवन अंतराळ केंद्र येथुन अंतराळाच्या दिशेने झेप घेतली. या प्रायोगिक उड्डाणामध्ये इस्रोने या स्वरूपाच्या उड्डाणासाठी लागणाऱया सर्व चाचण्या घेतल्या. या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या. हे उड्डाण मानवरहित होते. उड्डाण प्रायोगिक असल्यामुळे प्रक्षेपणानंतर काही वेळाने यान बंगालच्या उपसागरात उतरविण्यात आले.
महत्त्वाची माहिती
संपादन- लांबी : ४३.४३ मीटर
- वजन : ६३०.५८ टन
- टप्पे : ३
- पेलोड : क्रु मोद्युल अटमोस्पेरिक रिएंट्री एक्सपेरिमेंट
संदर्भ
संपादन