अशोक चक्र

भारताच्या राष्ट्रध्वजातील चक्र

अशोकचक्र म्हणजे ‘जैनधरमाचे चक्र. यामधे चोवीस आरे आहेत जे जैन धर्मातील चोवीस तिर्थंकारांनचे प्रतिनिधीत्व करतात. सम्राट अशोक यांचे आजोबा म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्म स्विकारला तेव्हा त्यांनी भगवान महावीर यांचे लांछण म्हणजे चिन्ह सिंह हे राजचिन्ह म्हणून स्विकारले. जैन धर्मात चोवीस तिर्थंकार होवून गेले. पहीले तिर्थंकार आदीनाथ उर्फ रिशभनाथ यांच्या पासून जैनधर्म ची सुरुवात झाली. पहीले तिर्थंकार आदीनाथ यांचे चिन्ह बैल आहे तर दुसरे तिर्थंकार अजितनाथ यांचे चिन्ह हत्ती आहे तर तिसरे तिर्थंकार संभवनाथ यांचे चिन्ह घोडा आहे. शेवटचे व महत्त्वाचे चोवीसवे तिर्थंकार भगवान महावीर उर्फ वर्धमान यांचे चिन्ह सिंह आहे. भगवान महावीर यांची, सत्य अहींसा, अपरीग्रह, ,अस्तेय आणि ब्रम्हचर्य ही शिकवण चारही दिशेने करण्यासाठी चार सिंह असे हे संपूर्ण जैन धर्म दर्शवणारे स्तंंभ ज्याला अशोक स्तंभ म्हणतात ते वास्तविक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी योजलेले स्तंभ आहे असे दिसून येते.

अशोक चक्र


भारतीय राष्ट्र ध्वजात अशोकचक्र

संपादन
 
भारताचा ध्वज

आॅगस्ट १९४७ पूर्वी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राज्यघटना लिहिण्यासाठी एक विशेष समिती नेमली होती, त्या समितीने असा निर्णय घेतला की, भारताचा राष्ट्रध्वज हा सर्व पक्षांना, सर्व जाती-धर्मीयांना मान्य होईल असा असायला हवा. अनेक नमुण्यातून केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग असणारा आणि पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र असणारा ध्वज ‘राष्ट्रध्वज’ म्हणून निवडला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी व तर्कशुद्ध विचारांनी या अशोकचक्राला राष्ट्रध्वजात स्थान मिळाले.

राष्ट्रध्वजातील भगवा किंवा केशरी रंग सर्वसंगपरित्याग किंवा निष्काम-निःस्वार्थी बुद्धी दर्शवतो. मध्यभागी असणारा पांढरा रंग म्हणजेप प्रकाशाचे द्योतक, सत्याचा मार्ग आणि हिरवा रंग म्हणजे वनस्पती-जीवन-मातीशी- असलेले नाते, ज्यावर इतर सगळी सृष्टी अवलंबून असते आणि म्हणून हे नाते कायम स्मरणात ठेवायला हवे हे या रंगातून ध्वनीत केले आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यभागी रेखलेले अशोकचक्र म्हणजे धर्म-नियमांचे चक्र आहे. या राष्ट्रध्वजाच्या साक्षीने काम करणाऱ्यावर नियमत्रण ठेवणारे तत्त्व म्हणजे सत्य आणि धर्मपालन (धम्मपालन) म्हणजेच सदाचार हेच असायला हवे. याखेरीज हे चक्र म्हणजे गतिमानतेचे द्योतक आहे. जो कोणतेही कार्य न करता, आळसातून क्रियाशून्य होतो तो मृतवतच होतो म्हणजे आजच्या रूढ वाक्यप्रचारानुसार ‘थांबला तो संपला’. क्रियाशीलता म्हणजेच आयुष्य, जिवंतपणा. यापुढे भारताने कुठल्याही बदलाला अकारण विरोध करता कामा नये. देशाने आणि देशातल्या नागरिकांनी सतत कार्यरत राहून प्रगती साधली पाहिजे. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या बदलांची, सुधारणांची आणि प्रगतीची गतिशीलता दाखवणारे प्रतीक म्हणजे हे चक्र होय. त्यावरील २४ आरे हे दिवसाचा २४ तासांचे प्रतिनिधित्व करतात.

या ध्वजाचे असेही वैशिष्ट्य, अगदी सर्वसामान्यपणे सांगितले जाते की, त्यातला केशरी रंग हा पवित्रता आणि त्यागाचे प्रतिक आहे, पांढरा रंग हा शांतता आणि सत्याचे प्रतीक आहे आणि हिरंवा रंग हा सुपीकता, सुफलता आणि भरभराटीचे द्योतक आहे आणि निळे अशोकचक्र हे न्याय आणि सदाचरण यांचे प्रतीक आहे.

भारतीय बौद्ध ध्वजात अशोकचक्र

संपादन
 
भारतीय बौद्ध ध्वज (भीम ध्वज)

जगभरातील आंबेडकरवादी या भारतीय बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात. बौद्ध विहारे, दलित - बहुजन आंदोलनात, घरांवर हा ध्वज बौद्ध वापरतात. निळा रंग हा आंबेडकरवादी बौद्धांचे प्रतीक आहे.

 अशोक चक्र हे वेळेचे प्रतीक आहे. 24 आरेे हे 24 तासाचेे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी अशोक चक्राचा उपयोग वेळ पाहण्यासाठी केला जात होता. सूर्योदयापासून अशोक स्तंभाची सावली ची उंची  कमी होत जात होती नंतर उंची वाढत जात होती यावरून वेळ ठरवले जात होते.  

२४ आऱ्यांचा अर्थ जैन धर्मातील एकूण चोवीस तिर्थंकार, प्रथम आदीनाथ चिन्ह बैल,दुसरे अजीतनाथ चिन्ह हत्ती, तिसरे संभवनाथ चिन्ह घोडा,शेवटचे भगवान महावीर यांचे चिन्ह सिंह.[]

संपादन

अशोकचक्रावरील २४ आरे, म्हणजे पुढीलप्रमाणे २४ सद्गुणांचे द्योतक आहे :-

  1. प्रेम
  2. शौर्य
  3. सहनशीलता
  4. शांतताप्रियता
  5. दयाळूपणा
  6. चांगुलपणा
  7. प्रामाणिरपणा
  8. सभ्यता
  9. स्व-नियंत्रण
  10. निःस्वार्थीपणा
  11. स्वार्थत्याग
  12. सच्चेपणा
  13. सद्ववर्तन / सदाचार
  14. न्याय
  15. अनुकंपा / करुणा
  16. आनंदी-वृत्ती
  17. विनम्रता
  18. सहभावना (दुसऱ्याचा भावना समजून घेण्याची क्षमता)
  19. सहानुभूती / इतरांबद्दल कळवळा
  20. सर्वोच्च दर्जाचे ज्ञान
  21. सर्वोच्च दर्जाचे चातुर्य
  22. सर्वोच्च नैतिकता / सर्वोत्तम चारित्र
  23. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम
  24. निसर्गाच्या भलेपणावर दृढ विश्वास, निष्ठा आणि आशा

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ जैन, प्रो. बी. एल.; जैन, डॉ.अमिता (2022-02-28). "व्यक्तित्व और जीवन जीने की कला". Praxis International Journal of Social Science and Literature: 44–47. doi:10.51879/pijssl/050210 Check |doi= value (सहाय्य). ISSN 2581-6675.

बाह्य दुवे

संपादन

iee33