राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र
राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर) या संस्थेचे पुर्वीचे नाव 'नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी' होय.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अखत्यारित असलेली या संस्थेचे मुख्यालय तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरामधील बालानगर परिसरात आहे. येथून सुमारे ७० किमी अंतरावर शादनगर येथेदेखील या संस्थेचा परिसर आहे.
या संस्थेद्वारे विद्यार्थी / प्राध्यापक / शास्त्रज्ञ / सरकारी अधिकारी यांचेकरिता अल्पमुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.