ईशान्य भारत

(उत्तर-पूर्व भारत या पानावरून पुनर्निर्देशित)

ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

Northeast India
Location of Northeast India
ईशान्य भारताचे भारतामधील स्थान
लोकसंख्या ३,८८,५७,७६९
क्षेत्रफळ २,६२,२३० चौ. किमी (१,०१,२५० चौ. मैल)
लोकसंख्या घनता १४८ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
राज्ये आणि प्रदेश अरुणाचल प्रदेश
आसाम
मणिपूर
मेघालय
मिझोराम
सिक्कीम
नागालॅंड
त्रिपुरा
मोठी शहरे (2012) गुवाहाटी, आगरताळा, शिलॉंग, ऐझॉल, इम्फाळ

सेव्हन सिस्टर्ससंपादन करा

 
सात भगिनी राज्ये

भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश.हा भाग चोहोबाजुंनी बांगलादेश, म्यानमार,चीन आणि नेपाळ या देशानी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गीरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपाआपल्या अस्मीता जपणाऱ्या विवीध् जमातीचे आहेत. या भागात अंदाजे १६० च्या वर बोली भाषा आहेत. भारतातून या भागात पर्यटक म्हणुन जाणारे असे फारच थोडे कारण प्रदेशाची दुर्गमता त्यामुळे त्यांच्यात आणि इतर भारतीयांत म्हणावा तसा दुवा कायम होउ शकला नाही.१०० वर्षापूर्वी ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि त्याचा परीणाम आज मेघालयात ८०% लोक हे ख्रिश्चन असलेले आढळतात. आंतरराष्ट्रीय सीमेला लागुन असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेलाआहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हे धबधबे अधिकच वेगाने खाली कोसळतात. सूर्याची किरणे या धबधब्याच्या तुषारांवर पडून इंद्रधनुष्य तयार होते. ते अतिशय विलोभनीय दिसते. पावसाळ्याची खरी खुरी अनुभूती घ्यायची असेल तर ईशान्य भारतातील या परिसरात मेघालय हादेखील उत्तम पर्याय आहे. आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय ला जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहने देखील भाड्याने उपलब्ध असतात.