दैनिक भास्कर

भारतीय हिंदी भाषेचे दैनिक वृत्तपत्र
(भास्कर या पानावरून पुनर्निर्देशित)


दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. इ.स. १९५८ सालापासून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र भारतातील ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे.

दैनिक भास्कर
प्रकार

मालकरमेशचंद्र अग्रवाल हे दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आहेत
मुख्यालयभोपाळ,मध्य प्रदेश

संकेतस्थळ: http://www.bhaskar.com/


दैनिक भास्कराच्या मराठी आवृत्त्या दिव्य मराठी या नावाने, महाराष्ट्रातील औरंगाबाद(पहिला अंक २८ मे २०११), नाशिक आणि जळगांव(पहिला अंक १० सप्टेंबर २०११) या ठिकाणांहून प्रकाशित होतात. कुमार केतकर(की अभिलाष खांडेकर?) हे मराठी आवृत्त्यांचे मुख्य संपादक आहेत. गुजराती आवृत्ती दिव्य भास्कर या नावाने आहे. इ.स.२०११ सालच्या स्थितीनुसार रमेशचंद्र अग्रवाल हे दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आहेत.

इतिहास

संपादन

दैनिक भास्कर पहिल्यांदा भोपाळमधून 'सुबह सवेरे' या नावाने इ.स. १९५६ साली, आणि 'गुड मॉर्निंग इंडिया' या नावाने इ.स. १९५७ सालापासून ग्वाल्हेरमधून प्रकाशित होऊ लागले. दोन्ही आवृत्त्या हिंदी होत्या. वृत्तपत्राचे नाव इ.स. १९५८ साली 'भास्कर समाचार' झाले आणि नंतर 'दैनिक भास्कर'. आज दैनिक भास्कर हे खपाच्या बाबतीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे आणि जगातले अकराव्या क्रमांकाचे दैनिक वृत्तपत्र आहे[ संदर्भ हवा ].

मध्य प्रदेशाबाहेर

संपादन

दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन जयपूरमधून आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरातील आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली, तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. परिणामी, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर, इ.स. १९९६ रोजी जयपूरमध्ये दैनिक भास्करच्या तब्बल १,७२,३४७ प्रति खपल्या[ संदर्भ हवा ]. त्या शहरातील 'राजस्थान पत्रिका' या आघाडीच्या वृत्तपत्राचा खप त्या काळी मात्र एक लाख प्रति इतका होता. त्याहून जास्त प्रति खपवण्याचा नवा उच्चांक दैनिक भास्करने प्रस्थापित केला.

त्यानंतर चंदीगड(मे २०००), हरियाणा(जून २०००), अहमदाबाद (जून २००३), सुरत-बडौदा(२००९)आणि नंतर राजकोट, जामनगर, भुज, मेहसाणा येथून आवृत्त्या निघू लागल्या. भावनगरहून निघणारे वृत्तपत्र 'सौराष्ट्र समाचार' या नावाने निघते. हिंदी आवृत्त्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जयपूर, जोधपूर, उदयपूर, लुधियाना, रांची आदि शहरांतून निघतात. २०१०-११ मध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांतून दिव्य मराठी या नावाखाली भास्कर निघू लागले. एसेल ग्रुपच्या सहभागाने मुंबई, पुणे, बंगलोर, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांमधून भास्कर गटाचे इंग्रजी वृत्तपत्र डीएनए या नावाखाली निघते.

दैनिक भास्कर आणि त्याची सर्व वृत्तपत्रे यांचा भारताच्या उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड, दिल्ली, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, आदि १३ राज्यांतून आणि ६४ शहरांतून होणारा रोजचा खप ३५ लाख प्रतींच्या वर आहे(सन २०११).

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (हिंदी भाषेत).