एस. सोमनाथ

भारतीय एयरोस्पेस इंजीनियर
S. Somanath (es); এস. সোমনাথ (bn); શ્રી. સોમનાથ (gu); Sreedhara Somanath (eu); S. Somanath (ast); Sreedhara Somanath (ca); एस. सोमनाथ (mr); Sreedhara Somanath (de); ଏସ୍. ସୋମନାଥ (or); S・ソマナス (ja); S. Somanath (sv); S. Somanath (nn); S. Somanath (nb); S. Somanath (nl); एस. सोमनाथ (hi); ఎస్. సోమనాథ్ (te); ਸ਼੍ਰੀਧਾਰਾ ਪਨੀਕਰ ਸੋਮਨਾਥ (pa); S. Somanath (en); ᱮᱥ ᱥᱳᱢᱟᱱᱟᱛ (sat); എസ്‌. സോമനാഥ്‌ (ml); எசு. சோமநாத் (ta) ১০ম ভারতীয় মহাকাশ গবেষণা সংস্থার চেয়ারম্যান (bn); એરોસ્પેસ ઈજનેર જે હાલમાં ઇસરોમાં ચેરપર્સન તરીકે કાર્યરત છે (gu); ruimteingenieur (nl); enginyer aeroespacial (ca); भारतीय एयरोस्पेस इंजीनियर (hi); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱮᱭᱟᱨᱮᱥᱯᱮᱥ ᱤᱱᱡᱤᱱᱤᱭᱟᱨ (sat); ଭାରତୀୟ ବୈଜ୍ଞାନିକ ଏବଂ ଏରୋସ୍ପେସ୍ ଇଞ୍ଜିନିୟର୍ (or); Indian aerospace engineer (en); भारतीय एयरोस्पेस इंजीनियर (mr); ਭਾਰਤੀ ਏਰੋਸਪੇਸ ਇੰਜੀਨੀਅਰ (pa); இந்திய விண்வெளி பொறியாளர் மற்றும் ஏவூர்தி தொழில்நுட்பவியலாளர் (ta) Sreedhara Panicker Somanath, Sreedhara Somanath (en); एस सोमनाथ (hi); ਐੱਸ. ਸੋਮਨਾਥ (pa); ଶ୍ରୀଧର ସୋମନାଥ, ଶ୍ରୀଧର ପାନିକର ସୋମନାଥ (or)

श्रीधर पणिकर सोमनाथ (जन्म:जुलै १९६३) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष म्हणून काम करणारे भारतीय एरोस्पेस अभियंता आहेत. [१] त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने चांद्रयान-३ नावाची तिसरी भारतीय चंद्र शोध मोहीम पार पाडली. विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी IST १८:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरला, ज्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला.[२] [३] [४] [५]

एस. सोमनाथ 
भारतीय एयरोस्पेस इंजीनियर
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • flight engineer
पद
  • Chairperson of the Indian Space Research Organization (इ.स. २०२२ – )
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक आणि लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर, तिरुवनंतपुरमचे संचालक म्हणून काम केले आहे. [६] [७] विशेषतः लाँच व्हेईकल सिस्टीम इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स आणि पायरोटेक्निक्स या क्षेत्रांमध्ये वाहन डिझाइन लाँच करण्यासाठी सोमनाथ त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. [८] [९]

एस. सोमनाथ

वैयक्तिक आयुष्य

संपादन

सोमनाथ यांचा जन्म आणि केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील थुरावूर येथे एका मल्याळी कुटुंबात झाला होता.[१०] त्यांच्या वडिलांचे नाव श्रीधर पणिकर असुन ते हिंदी शिक्षक होते, तर त्यांच्या आई चे नाव थंकम्माअसे आहे.[११]

सोमनाथ यांचे शालेय शिक्षण सेंट ऑगस्टीन हायस्कूल, अरूर येथे झाले असुन त्यांनी महाराजा कॉलेज, एर्नाकुलम येथून पआपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी थंगल कुंजू मुसलियार अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्लम, केरळ विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि डायनॅमिक्स आणि नियंत्रण या विषयातील स्पेशलायझेशनसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी पीएच.डी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT मद्रास) येथे प्रबंध सादर केला.

सोमनाथचे वलसाला यांच्या सोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.[१२]

२ सप्टेंबर २०२३ रोजी जेव्हा आदित्य एल.१ चे यशस्वी प्रक्षेपण झाले, त्याच दिवशी सोमनाथ यांना पोटाच्या कर्करोगाचे निदान झाले. नंतर त्यांनी चेन्नई येथे जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली तसेच त्यांच्यावर केमोथेरपी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर तशाही परिस्थितीत लगेचच पाचव्या दिवशी सोमनाथ कामावर हजर देखील झाले.[१३]

कारकीर्द

संपादन

पदवीनंतर, सोमनाथ १९८५ मध्ये विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात रुजू झाले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात ते संबंधित होते. २०१० मध्ये ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सहयोगी संचालक आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३ लाँच व्हेईकलचे प्रकल्प संचालक होते. नोव्हेंबर २०१४ पर्यंत ते प्रोपल्शन आणि स्पेस ऑर्डिनन्स एंटिटीचे उपसंचालक होते.[८] जून २०१५ मध्ये, त्यांनी वलियामाला, तिरुवनंतपुरम येथील लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि जानेवारी २०१८ पर्यंत काम केले. सोमनाथ यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून के. सिवन यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर के. सिवन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष झाले. जानेवारी २०२२ मध्ये, त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, पुन्हा के. सिवन यांच्याच जागेवर.

विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, १८ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने, तमिळनाडूच्या SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने २५ सप्टेंबर रोजी सोमनाथ यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स (ऑनॉरिस कॉसा) ही पदवी प्रदान केली.[१४][१५] २३ ऑगस्ट २०२३ रोजी, इसरो चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे नेतृत्व केले.

पुरस्कार

संपादन

उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीने १० ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या ७ व्या दीक्षांत समारंभात त्यांना साहित्याची मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान केली गेली.[१६]

२०१४ मध्ये, एस सोमनाथ यांना इसरो कडून GSLV Mk-III प्राप्तीसाठी कामगिरी उत्कृष्टता पुरस्कार दिल्या गेला.[१७] [१८] [१९] २०२३ मध्ये, कर्नाटक सरकारने त्यांना प्रतिष्ठित राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले. [२०] [२१]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Shri. S Somanath assumes charge as Secretary, Department of Space". ISRO. 14 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 January 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Chandrayaan-3 launch on 14 July, lunar landing on 23 or 24 August". The Hindu (इंग्रजी भाषेत). 6 July 2023. ISSN 0971-751X. 11 July 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 July 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "India lands spacecraft near south pole of moon in historic first". The Guardian (इंग्रजी भाषेत). 23 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 August 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "What foreign media said on Chandrayaan-3's historic lunar feat". India Today (इंग्रजी भाषेत). 24 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 August 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "चंद्रयान-3: भारत ने रचा इतिहास, चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर की सफल लैंडिंग". Post Inshort (हिंदी भाषेत). 24 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 August 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Somanath takes charge as VSSC director". www.indiatoday.in. 22 January 2018. 23 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 January 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Somanath takes charge as VSSC director". Business Standard India. Press Trust of India. 22 January 2018. 23 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 January 2018 रोजी पाहिले.
  8. ^ a b "New Directors for Three Major ISRO Centres: Three major ISRO Centres have new Directors from today". www.isro.gov.in. 1 June 2015. 23 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 January 2018 रोजी पाहिले.
  9. ^ Prasanna, Laxmi (22 January 2018). "S Somnath takes charge as Vikram Sarabhai Space Centre's director". The Times of India (इंग्रजी भाषेत). 19 November 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 May 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "എസ്.സോമനാഥ് തുറവൂർ മഹാക്ഷേത്ര ദർശനം നടത്തി" (Malayalam भाषेत). 2023-08-29. 2023-09-23 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  11. ^ "New Isro chief S Somanath: All you need to know". The Times of India. 13 January 2022. ISSN 0971-8257. 23 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 August 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "എസ്. സോമനാഥിലൂടെ വാനംതൊട്ട് വീണ്ടും മലയാളിപ്പെരുമ". Madhyamam (Malayalam भाषेत). 2022-01-13. 2023-08-30 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 August 2023 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  13. ^ "'आदित्य'यान झेपावले अन् इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान; आजारातून सावरत असल्याचे केले स्पष्ट ". दैनिक लोकमत. ५ मार्च २०२४ रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 93 (सहाय्य)
  14. ^ "SRMIST hosts 18th convocation". 25 September 2022. 13 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 February 2023 रोजी पाहिले.
  15. ^ "SRM's Mega Convocation for 7380 Graduands". 13 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 February 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "Uttarakhand Technical University confers DLitt to Isro chairman". The Times of India. 2023-10-11. ISSN 0971-8257. 2023-10-24 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-02-27 रोजी पाहिले.
  17. ^ "S Somanath: Personal Life, Education, Awards and Honors, Salary".
  18. ^ "Shri S. Somanath".
  19. ^ "Alumnus Shri S Somanath appointed next ISRO Chair".
  20. ^ "Karnataka Rajyotsava award presented to ISRO's S Somnath, journalist Maya Sharma and 66 others".
  21. ^ "ISRO Chairman S Somanath Among 68 Awardees Of Karnataka's Rajyotsava Award".
मागील
के. शिवन
भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे अध्यक्ष
2022-present
सहयोगी संचालक, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र
2018-2022
पुढील
एस. उन्नीकृष्णन

नायर