विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २४

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चाविकिपीडिया:बार्नस्टार‎

संपादन

नमस्कार,

मी इंग्लिश विकिपीडियातून विकिपीडिया:बार्नस्टार‎ हे पान तयार केले आहे. प्रत्येक बार्नस्टार साठी गौरवसाचा तयार करून हवा आहे, उदा. {{साचा:भूगोल बार्नस्टार}}.

साचे तयार झाल्यावर ते यथोचित सदस्यांना देण्यात यावे ही विनंती.

विकिपीडिया:बार्नस्टार‎चे भाषांतर करुन हवे आहे.

अभय नातू १९:३४, २८ सप्टेंबर २००९ (UTC)


विकिपीडिया:बार्नस्टार‎ पान सुरू केल्या बद्दल धन्यवाद.मी नुकतीच समाज मुख्पृष्ठ येथील बार्नस्टार्स विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/निशाण पानावर हलवली. हि दोन्ही पाने एकत्रित करावयाची झाल्यास कोणते नाव कोणत्या नावाकडे स्थानांतरीत करावे.
मी विकिपीडिया:जादुई शब्द आणि पार्सर फंक्शन्स मध्ये पुढील प्रमाणे थंब करिता इवले हा शब्द वापरला आहे. thumbnail, thumb इवलेसे थंबटाइम=$1, इवलावेळ=$1, विकिपीडिया:बार्नस्टार‎ मध्ये minor करिता इवले शब्दाच्या उपयोगामुळे काही समस्या उद्भवेल असे सध्या तरी वाटत नाही. पण विकिपीडिया:जादुई शब्द आणि पार्सर फंक्शन्स चे मराठीकरण काही प्रमाणात लागू झाले आहे त्यामुळे महिरपी कंसात मराठी शब्द लिहीताना काय परिणाम येताहेत या कडे थोडे लक्ष असू द्यावे. काही अनपेक्षीत परिणाम आढळल्यास विकिपीडिया:जादुई शब्द एकदा अभ्यासून घ्यावेत.हि नम्र विनंती.
Mahitgar ०४:४६, २९ सप्टेंबर २००९ (UTC)

कोणत्याही नावाने पान असले तरी हरकत नाही. अमुकच नाव पाहिजे याचा माझा आग्रह नाही. सहजगत्या सापडण्याजोगे असले की झाले. जादुई शब्दांबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद. संपादने करताना लक्ष ठेवेन.

अभय नातू ०४:५२, २९ सप्टेंबर २००९ (UTC)

सन्मान

संपादन

एखाद्या थोर व्यक्तिस अनेक सन्मानाने विभुषित केल्या गेले असेल तर माहितीचौकटीत त्या सन्मानांचा क्रम कसा लावावा? प्रथम मिळालेला सन्मान आधी कि सर्वोच्च सन्मान आधी व मग उतरता क्रम? कृपया मार्गदर्शन करावे.

अल्पमती ०४:१३, २ ऑक्टोबर २००९ (UTC)

सर्वोच्च सन्मान प्रथम मग उतरता क्रम. लश्करी व बिगरलश्करी दोन्ही सन्मान असल्यास लश्करी सन्मान आधी.
अभय नातू ०४:२२, २ ऑक्टोबर २००९ (UTC)


धन्यवाद,मी आपला आभारी आहे.

अल्पमती ०४:४२, २ ऑक्टोबर २००९ (UTC)

टाकणकार(जात} ह्या लेखावर छायाचित्रे हवी आहेत.

लेखामध्ये छायाचित्रे कशी टाकावित. रविंद्र खानंदे

२५,००० नजरेच्या टप्प्यात

संपादन

सुमारे ५० लेख पाहिजेत. मराठी विकिपीडिया २५,००० लेख असलेला ५८वा विकिपीडिया असेल.

अभय नातू ०१:०९, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

मुखपृष्ठाचे छायाचित्र

संपादन

मुखपृष्ठाचे छायाचित्र कोण निवडतो? त्याचे निवडीची विशिष्ट अशी प्रक्रिया आहे काय? एकदा निवडलेले छायाचित्र किती दिवस राहते? त्यात आपण बदल करु शकतो काय? या बाबत विस्तृत माहिती कृपया पुरवावी ही नम्र व सादर विनंती.

अल्पमती ०७:२९, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे पहावे . कधी कधी मी किती लवकर उत्तरे देतो बरे , एवढे दिवस लेक्ष कसे गेले नाही कल्पाना नाही अक्षम्य उशीर केल्या बद्द्ल क्षमस्व माहितगार १५:२६, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

२५,००० लेखांचा टप्पा

संपादन

हा एक महत्वपुर्ण टप्पा गाठल्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन ! आता नव्या जोमाने ५०,००० चा टप्पा गाठण्यास सुरुवात करु या. इतक्या सर्व सदस्यांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन करणे शक्य नाही म्हणुन चावडीवर लिहित आहे.

V.narsikar

वाहव्वा

संपादन

मी काल रात्री २५,००० लेखांचा टप्पा जवळ असल्याचा संदेश घातल्यावर आज सकाळी बघतो तर काय! २५,०००च्या पुढे!! इतकी वर्षे स्वतःचा वेळ व मेहनत खर्ची घालून विकिपीडिया येथे आणल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन व धन्यवाद. जरी आज नसली तरी उद्या/परवा मराठी विकिपीडियाची महती मराठीभाषिकांना कळून येईलच. आपले अथक प्रयत्न काही तरी महत्वाचे व अनमोल असे तयार करीत आहे याची खात्री बाळगावी.

आता २५,००० लेख झाल्यावर थोडा विसावा घेतला तरी चालेल असे समजू नका! या २५,००० लेखांपैकी अनेक लेख अगदी छोटे आहेत. त्यांत माहिती भरुन ते उपयोगी ठरतील असे करुयात. अर्थात याचा अर्थ असा नाही की नवीन लेख तयार करू नयेतच.

असो. पुन्हा एकदा अभिनंदन व नरसीकर म्हणतात तसे नव्या जोमाने ५०,०००च्या टप्प्याकडे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू १५:३०, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)

विकिपीडिया:दिवाळी अंक ?

संपादन

मराठी विकिपीडियाने २५,००० लेखांचा टप्पा गाठल्याबद्दल सर्व सदस्य आणि वाचकांचे अभिनंदन. मी मासिक सदरां मध्ये आणि प्रत्यक्ष लेखात फारसे योगदान करत नाही आहे (पण मला वाटते माझे सहाय्यपानावरील योगदान पाहून आपण सर्व जण मला क्षमा करू शकाल) . एक काळ असा होता मासिक सदराकरिता लेख पण पूर्ण होत नसे आता जवळपास प्रत्येक महिन्यास मासिकसदरात लेख निवडले जाऊ लागले आहेत आणि सर्व सदस्यांचा त्यात सहयोग पाहून आनंद होतो.

मासिक सदरांच्या योगाने आता किमान पन्नासेक किंवा जास्तच चांगले दर्जेदार लेख मराठी विकिपीडियावर निश्चितच उपलब्ध झाले आहेत. अजूनही बरेच करावयास आहे, दिवाळी अंक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे.मायबोली डॉटकॉम मनोगत वगैरे इअतर मराठी संकेतस्थळांची दिवाळी अंक निघतात असे ऐकुन आहे.

ह्या दिवाळीत असा अंक काढणे तरी मराठी विकिपीडियास जमणारे नाही ; किमान पुढच्यावर्षीपासून किंवा त्यापुढच्या दिवाळी पासून दिवाळी अंक काढावा किंवा कसे ? सर्व सदस्य आणि वाचकांचे काय मत आहे? २५००० लेखांचा टप्पा गाठला गेल्याच्या निमित्ताने मी विकिपीडिया:दिवाळी अंक हे प्रकल्प पान सुरू केले आहे .विकिपीडिया:दिवाळी अंक पानावर आपापली मते आणि पुढच्या वर्षांच्या दृष्टीने सहभाग किंवा: समन्वयाची जबाबदारी घेणे शक्य असल्यास नोंदवावे.

Mahitgar ०८:५२, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)

पुस्तके वाचकाना पुस्तके उपलब्ध करुण देणे.

संपादन

नमसकार मित्रानो आपण रोज अनेक गोष्टी करतो पण आपण वाचन मात्र करित नाहि त्यामुळे आपले विचार हे सुधारित नाहित त्या मुळे आपल्या बुध्दीचा विकास होत नाही. आणी त्या मुळे आपण आपल्या समाजाचा विकास होउ शकत नही.Ajaygodbole १२:५२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

नमस्कार चावडी/जुनी चर्चा २४,

आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल.
हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाचीसुद्धा दखल घेतल्यास दुधास साखरेचा गोडवा लाभेल.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
विकिपीडिया मदतचमू ~~~~

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ शीर्षक

संपादन

येथे नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघ असे दोन लेख आहेत.

पैकी कोणते नावाचे convention स्वीकारावे? अबक (विधानसभा मतदारसंघ) कि अबक विधानसभा मतदारसंघ?

मला अबक विधानसभा मतदारसंघ हे जास्त उचित वाटते.

अभय नातू २०:०७, २८ ऑक्टोबर २००९ (UTC)

विनोदि कविता

संपादन

नम्स्कार् मी तुमच्हि वेब्सा इत् नेहमि पहाते मला विनोदि कविता हव्या आहेत् त्यासथि काही मदत् मिलेल् का?

समिक्षा शिरवाले shirwale.samiksha@gmail.com

Need feedback about Making wikipedia more relevant

संपादन

Hi everybody,

Wikimedia Strategywiki is trying to find out how they can improve reach and usability in Indian context.Previously on mr-wiki yahoo group I had taken online poll and found one of the glaring defficiancy in reaching out to the people. While other Marathi Language Websites get better word of mouth publicity and so they do have more editorial pool. Where as when it comes wikipedians my online survey shows that at least marathi wikipedians are reluctant to talk to their friends and family members about wikipedia.

And it is not about others it is a myself too,WHile I am a strong supporter of Wikipedia specialy local languge ones still, usually I do avoid to discuss about marathi languge wikipedia among my friends and family.

First of all let us discuss frankly and understand what is the reason of this reluctance? Wikipedia is too serious or boring a subject to discuss , wikipedia concept level is a too difficult to explain to others ?Objections and negative perceptions of the people are too deficult to handle? Wikipedia is not usefull to you in your own day to day life ? Wikipedia is not beneficial to your freind ? Wikipedia is not beneficial to your family? Wikipedia is not beneficial for my , my friend and family education , career/office work and rmy revenue ?

To which questions your answers goes yes ? If yes then is possible to elaborate or suggest a better solution that can make wiki movement more relevant to Indian context

Thanks and Regards Mahitgar

'विकिपीडियावरील लेखांची सूची'

संपादन

मुखपृष्ठावरील 'निवेदन' आणि 'विकिपीडियावरील लेखांची सूची' ही दोन सदरे 'सुस्वागतम' आणि 'मासिक सदर' यामध्ये टाकले तर ते नविन सदस्यांना वरच असल्यामुळे दिसतील आणि ते त्यांना हाताळण्यास सोपे होईल असे वाटते. काही दिवस असा बदल(२५-३० दिवस) करुन पहावा काय? खुपच खाली असल्यामुळे ते गौण होतात असे वाटते.

अल्पमती ०९:४७, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

एका अर्थाने आपल्याकडे सदस्यांची नवी फळी आली आहे वरील प्रतिक्रीयेप्रमाणेच इतरांच्याही काय प्रतिक्रीया आहेत ते जाणून घेणे आवडेल.नवीन येणार्‍या सर्वांनाच एक आग्रहाची विनंती आहेकी आपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती प्रथम कुठून आणि कशी मिळाली हे जाणून घेणे एकमेकांना कल्पना देणे सदस्यांच्या अपेक्षा समजावून घेण्यात आणि मराठी विकिपीडियाच्या भावी प्रगतीचा आराखडा बनवण्यात फार फार महत्वाचे आहे.


मला वाटते मराठी विकिपीडिया मुखपृष्ठ अधीक वाचकाभिमूख कसे होईल हे महत्वाचे आहे. अविशिष्ट लेख आणि अलिकडील बदल मधून लोक वाचक कमी माहिती असलेल्या लेखांवर पोहोचतात. माहिती नाही म्हणून व्हिजिटर्स कडून मराठी विकिपीडियास भेट देण्याकरिता इतरांशी चर्चेची शक्यता कमी होते.आणि मराठी विकिपीडिया वर्ड ऑफ माऊथ तयार होण्यास मागे पडतो आहे का काय अशी शंका मला पडते आहे. त्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे 'विकिपीडियावरील लेखा वर्गांची सूची' वर आणण्यास माझेही समर्थन आहे परंतू सध्या केवळ लोकप्रिय वर्ग क्रिडा , संगीत,महाराष्ट्र आणि मासिक सदरातील जुने लेख हे केवळ वर घ्यावेत.असे वाटते इतरांचे काय मत आहे ?
निवेदनाबद्दल मात्र सध्याचे निवेदन जसजशी त्याची गरज कमी होत गेली तसतसेच खाली गेले असले तरी वेगवेगळ्या स्वरूपात तीन निवेदने आणि सेंट्रल नोटीस असा बराच भार आहे. मला वाटते खूप सगळी विनंती करण्याचा फायदा होईलच असे सांगता येत नाही. मराठी विक्शनरीच्या संदर्भात अनुभवावरून तरी मला तसे वाटते आहे.

मला वाटते कोल्हापुरींनी पूर्वी म्हटल्या प्रमाणे या सर्व निवेदनांचे पुर्नलेखनही होणे गरजेचे आहे तसेच या संदर्भात स्ट्रॅटेजी विकिवरील अलिकडील चर्चेवरून मल्याळम विकिपीडिया चांगले काम करत आहे मल्याळम विकिपीडिया,जर्मन,फ्रेंच जपानी इत्यादी विकिपीडियावरील चांगल्या गोष्टी पैकी आपल्या विकिपीडिया मुखपृष्ठावर (किंवा इतरत्र) काही घेण्या सारखे आहे का ते पाहून मुखपृष्ठाची विकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी येथे पुर्नाआखणी करण्यात पूढाकार घ्यावा. त्या मुळे एक तर वाचकांनाही तोच तोपणा वाटणार नाही. तसेच सेंट्रल नोटीसवर आलटून पालटून दाखवण्याकरिता चपखल वाक्यांची आवश्यकता आहे.

माहितगार १३:०१, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

नरसीकरांना संक्षिप्त सूची अभिप्रेत आहे कि विकिपीडियावरील लेखांची सूची हे कळले नाही.
इतर विकिपीडियांवरील चांगल्या गोष्टी तसेच एतद्देशीय सूचनांवर अंमल करण्यास काहीच हरकत नाही, किंबहुना तसे केलेच पाहिजे.
अभय नातू १७:४२, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

विकिपीडियावरील लेखांची सूचीअकारविल्हे,निवेदनाखाली असलेली. अल्पमती ०३:४४, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)

नवीन पृष्ठ बनवताना प्रीलोडेड कंटेंट द्यावे काय?

संपादन

खालील दोन्ही इनपूटबोक्स आधारीत बटनांवर क्लिक करून पहा. त्यात तुम्हाला धूळपाटी आणि तुमच्या सदस्यापानावरील सहाय्या करिता प्रीलोडेड कंटेंट मिळण्याची व्यवस्था केली आहे. सर्व नवीन पृष्ठे बनवताना विस्तार साचा तसेच संदर्भ बाह्यदुवे इत्यादी नेहमी लागणारे विभाग देऊन प्रीलोडेड कंटेंट द्यावे काय? माहितगार १३:०९, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
वरीलप्रकारच्या बटनांचा विविध लेख आणि सहाय्य प्रकल्पातही करता येईल जसे की खाद्य पदार्था करिता किंवा व्यकिंबद्दल इत्यादी जे लेखांचे पुन्हा पुन्हा लागणारे आराखडे ठरून जातात तीथे वापरता येतील तसेच शुद्धलेखन विषयक किंवा सदस्यांना इतर सूचना देणे, इत्यादीकरिताही करता येईल पण त्यावर किती वेळ द्यावा हे त्याच्या उपयूक्तते बद्दल सदस्यांअकडून मिळणार्‍या प्रतिसादावरही अवलंबून आहे. अरे वा मी माझे हे वाक्य जतन करण्याच्या आत नरसिकरजींचा प्रतिसाद पण मिळाला, अर्थात इतरही प्रतिसादांची अपेक्षा आहेमाहितगार १३:२२, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

होय. मला तरी वाटते. अल्पमती १३:१९, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

चांगली कल्पना आहे.
स्वागत साच्यात योग्य ते बदल करावे.
अभय नातू १७:४४, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

लेख तपासून सूधारून हवेत

संपादन
खासकरून प्रारंभिक संपादने करताना नवागत सदस्यांकडून होणार्‍या चूकांचा अभ्यासकरून विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी , हवे होते अपेक्षा आणी परिघ आणि आवाका मर्यादा आणि तसेच सहाय्य:नेहमीचे प्रश्न या तीन लेखांचा प्रथमस्तरीय सहाय्यपर लेखामध्ये समावेश व्हावा असे वाटते.
हे तीन्ही लेख तपासण्यात तसेच सुधारण्यात सहाय्य हवेच आहे त्या शिवाय त्यांतील प्रत्येक विषयावर आपल्याला माहित आहेका स्वरूपाचे एक् बवाक्यीय प्रश्न बनवून हवेत जे सेंट्रल नोटीस मधून आलटून पालटून दाखवता येतील आणि विषयवार स्वतंत्र मार्गदर्श्क साचे बनवून हवेत जे नवागत सदस्यांना सहाय्य देणार्‍या सदस्यांना सहजपणे सहाय्य देताना वापरता येतील.
सहाय्य:नेहमीचे प्रश्न मधील प्रश्न प्रीलोड कंटेंट पानांच्या वर सहज दिसून हवेत सध्या त्याची व्य्वस्था केली आहे पण सध्याचे पान लांब झाले आहे .उपपाने बनवून सूचालन साचात जोडून मिळाल्यास हवे आहे. त्यामुळे पानाची लांबी कमी होईल आणि प्रिलोड पानांच्या वर सहाय्य पहाणे अधीक सोपे होईल .
माहितगार ०६:३०, १७ नोव्हेंबर २००९ (UTC)

नवीन सदस्यांना येणार्‍या अडचणी अभ्यास आणि चर्चा

संपादन
  1. मुख्पृष्ठावर सदस्य प्रवेश दिसतो पण नवीन सदस्य खाते उघडण्यास कुठे जावे ते स्पष्ट नमुद करत नाही.हिन्दी विकिपीडिया सदस्य प्रवेश करें / नया खाता बनाएँ तर इंग्रजी विकिपीडिया Log in / create account असा सुस्पष्ट निर्देश करतात.
  2. नवीन सदस्यत्व घेतल्या नंतर असा खालील प्रमाणे संदेश देत आहे. हा संदेश पान स्थानांतरण आणि संचिका चढवण्याची मान्यता आपोआप कितीदिवसानी मिळते याची काहीच माहिती देत नाही आहे. खास करून चित्र चढवणार्‍यां नवागत सदस्यांना त्रास होतोच आहे परंतु सहाय्य पुरवणार्‍या सदस्यांनाही हे त्वरीत सांगाणे लक्षात रहात नाही आहे.संबधीत सुचनेचा खालील सुचनेत अंतरभाव करणे अत्यंत निकडीचे आहे.
त्या शिवाय मराठी विकिपीडियावर चित्र आणि स्थानांतर विषयक फारसा उत्पात नसताना अशा जाचक अटी खरेच गरजेच्या आहेत का ? गरजेच्या नसतील तर टाळणे शक्य आहे काय? कारण ३-४ दिवसात आपोआप सुविधा सुरू होत असली तरी यामुळे नवीन सदस्याच्या उत्साहावर बनिश्च्चितपणे पाणी पडते असा माझा अनुभव होतो आहे. काही पर्यायी सोपी किंवा काही तासांचेच रिस्ट्रिक्शन असावे या बद्दल इतर सदस्यांची अनुभव आणि मते काय आहेत.

सुस्वागतम् माहितगार! विकिपीडिया सदस्य म्हणून आपले स्वागत आहे. आपले विकिपीडिया खाते यशस्वीरित्या उघडण्यात आले आहे. विकिपीडियाच्या नवीन सदस्यांना उपयोगी पडतील अशा लेखांचे दुवे खाली उपलब्ध करण्यात आलेले आहेत. 1. [[विशेष:पसंती|तुमची माहिती आणि पसंती]] 2. [[सहाय्य:संपादन|नवीन लेख कसा लिहावा]] 3. [[सहाय्य:संपादन|लेखांचे संपादन कसे करावे]] विकिमीडियाच्या अन्य प्रकल्पांमध्ये आपला प्रवेश नोंदवित आहोत:

याच वरील सुचनेत 2. नवीन लेख कसा लिहावा 3. लेखांचे संपादन कसे करावे या दोन्हीची लिंक एकाच ठिकाणी पोहोचते आहे वस्तुतः नवीन लेख कसा लिहावा ह्या बद्दल अधीक माहितीपूर्ण आणि सुलभ लेखाची आवश्यकता आहे. त्या एवजी नवीन लेख आणि धूळपाटीचे प्रिलोडेड इनपूट बॉक्सेस वापरणे कसे असेल (कारन मदतकेंद्र आणि विकिपीडिया धूळपाटी इत्यादी करिता उपलब्ध क्लेल्या बटनांना चांगला रिस्पॉन्स येतो आहे असे दिसते.
माहितगार १२:३७, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

इनपूट बॉक्स समस्या

संपादन
खालील इनपूट बॉक्स बेभरवशाने काम करतो आहे एखाद्या पानावर लावला असता मराठी विकिपीडियाचे टायपिंगवापरअयचे म्हटले तर एखादेवेळेस एखाद्या पानावर मराठीत टायपिंग करू देते तर कधी इंग्रजीतच टायपिंग करावे लागते . या समस्येमुळे नवागत लेखकांकडून इंग्रजी शीर्षक असलेल्या लेखांची निर्मिती होत आहे.तसेच स्वागत साचा आणि इतर अनेक ठिकाणचा प्रस्तावित उपयोग आणि सदस्य सहाय्यत सुधारणा अमलात आणता येत नाही आहे कुणी मदत करू शकेल ?माहितगार १४:२५, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

प्रकल्प संकल्पनेची आवश्यकता

संपादन
आपले एक सदस्य APAbhijit यांनी इंग्रजी विकिपीडियातून लेख आणून भाषांतरीत करताना त्यातील एक साचा मराठी विकिपीडडियात भाषांतरा साठी घेतला आणि जी शक्यता मी आधी व्यक्त केली तसे आधीच मराठी विकिपीडिया तो साचा वेगळ्या नावाने उपलब्ध होता. एकतर इंग्रजी विकिपीडियातील साचे मराठीत आणने काहीसे कष्टाचे आणि वेळखाऊ असते. साचांचे आंतरविकि दुवेकरण साचे सुसूत्रीकरणप्रकल्प आणि आणि विषयाशी संबधीत प्रकल्पातून उपलब्ध साचांची माहिती उपलब्ध करणे निकडीचे आहे. त्यामुळे एकमेकांना सहाय्य होऊन सर्वांचा वेळ वाचेल. या दृष्टीने अही गरज पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.माहितगार १५:२२, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)

सहमत वि. नरसीकर (चर्चा) १०:०१, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)


यात पसायदान यायला हवे.

मुखपृष्ठ

संपादन

मंडळी,

डिसेंबर २००९चा मुखपृष्ठ सदर लेख प्रकाशित करताना लक्षात आले की याने मुखपृष्ठावरील डावीकडील कॉलम मोठा झाला आहे व त्याने रचना बदलली आहे. मला ही रचनाही ठीक वाटते. तुमचे मत काय आहे? अनुकूल मते मिळाल्यास ही रचना महिनाभरासाठी अशीच राहू देऊयात.

अभय नातू २२:०१, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)

उजव्या कॉलमांना मराठी विकिवर अजून ठिकसे बाळसे धरावयाचे आहे,अधून मधून असा बदल ठिक आहे . तोच तो पणा टळेलमाहितगार ०६:०६, १ डिसेंबर २००९ (UTC)
ता.क. लेखात ऊजवीकडे सुचालन साचे असतील तरीही पहा प्रश्न नेहमी भेडसावतो. प्रोपोर्शनेटली झूमींग करण्याची काही सुविधा उपलब्ध होऊ धकणार नाही काय ?बर्‍याच लेखात मी वापरत असलेल्या सहाय्य दाखवा-लपवा साचे वापरतानाही हा प्रश्न सतावतोच माहितगार ०९:५१, १ डिसेंबर २००९ (UTC)

करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी

संपादन
कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रात जसे काही पूढाकार घेणारे असतात, बरेच लोक असतात कि ज्यांना काही करून हवे असते आणि बरेच जण असेही असतात कि मी काम करतो पण नेमके काय आणि कसे ते सांगा. अशीच स्थिती मराठी विकिपीडिया सदस्यांची बर्‍याच अंशी असावी. त्या सर्वंना विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख आणि {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} च्या माध्यमातून एक समन्वयीत माध्यम उपलब्ध व्हाव असा प्रस्ताव ठेवत आहे. खाली एक स्वरूप व्यक्तकरत आहे, हे स्वरूप अधीक सूस्पष्ट (crystalise) होण्याकरिता सूचना कराव्यात हि सर्वांना विनंती.
सर्व समन्वय आणि लेख प्रकल्प पाने, दालने, समाज मुखपृष्ठ, चावडी, मदते केंद्र इत्यादी इत्यादींचे "करावयाच्या गोष्टींचा विभाग साचा" प्रकल्प पानानुसार स्वतंत्र असेल(या मुळे त्याचे डेकोरेशन संबधीत पानास साजेसे राहू शकेल); पण प्रकल्पातील "करावयाच्या गोष्टीं तसेच हवे असलेले लेख यांची प्रत्य्क्ष यादी {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} मध्ये दाखवा लपवा साचाच्या स्वरूपात समाविष्ट होईल. {{करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी}} सर्व समन्वय आणि लेख प्रकल्प पाने, दालने, समाज मुखपृष्ठ, चावडी, मदते केंद्र इत्यादी ठिकाणी उपलब्ध असावी असे अभिप्रेत असेल.

माहितगार ०५:४५, ८ डिसेंबर २००९ (UTC)

सहमत.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:१९, ८ डिसेंबर २००९ (UTC)

हॉटकॅट व इतर उपकरणे

संपादन

'माझ्या पसंतीं'मध्ये इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे 'उपकरणे/गॅजेट' विभाग दिसत नाही. तो दिसावा यासाठी काय करावे लागेल? इंग्लिश विकिपीडियावर 'माझ्या पसंतीं'मध्ये असलेले 'हॉटकॅट' हे उपकरण वर्गीकरणासाठी अतिशय उपयोगी पडते असा माझा अनुभव आहे. खेरीज 'ट्विंकल' हे उपकरणही उत्पात निदर्शवण्यासाठी, उत्पातकर्त्यांना इशारा देण्यासाठी, पाने उडवण्यासाठी वापरले जाणारे बहूपयोगी उपकरण आहे. अशी उपकरणे मराठी विकिपीडियावर आणता आली, तर पाने संपादताना मोठी सोय होईल.

धन्यवाद!
संकल्प द्रविड (चर्चा) ०१:२१, १० डिसेंबर २००९ (UTC)

माझ्या अंदाजाने en:Special:Gadgets पानावरती उपकरणे दिली आहेत. ती आपल्या विशेष:Gadgets येथे आढळत नाहीत सिस्टीम मेसेहजेस मध्ये कुठे अरेंजमेंट असण्याची शक्यता असेल ? माहितगार १२:५८, १० डिसेंबर २००९ (UTC)


सदस्य नाव संकेत

संपादन
सदस्य नाव काय असावे यावर कमीतकमी बंधने ठेवली जात्तात.मोठ्या विकिंना त्यावरही संकेत ठरवून घ्यावे लागले. सदस्य:Hotel bhagwatpalace हे एक नवीन सदस्य नाव आले आहे. त्यांनी Hotel bhagwatpalace स्वतःचे पान स्वतः बनवू नये हा संकेत आहेच पण Hotel bhagwatpalace नावाचे सदस्य नाव असावे काय , इतर विकिंचे काय संकेत आहेत आणि मराठी विकिचा काय संकेत असावा कारण हे सदस्य जेवढ्या चर्चा पानावर सही साठी चर्चा करतील तेवढ्या पानावरून आपसूक जाहीरात होणार आहे आणि गूगल महाराजही त्याची दखल घेतील पण असे इतरही सदस्यांनी करून मागितले तर चर्चा पाने जाहीरातींचे आखाडे होतील किंवा कसे ?
चर्चेत सहभागी होताना विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा लेख वाचून घेतलेला असणे बरे ठरेल. :माहितगार १५:५२, ११ डिसेंबर २००९ (UTC)

balancing breahing space and accuracy

संपादन
कोणत्याही माहितीची विश्वासार्हता आणि दर्जा हा त्यातील शक्य तेवढ्या अचूकतेवर अवलंबून असतो. इंटरनेटवर सदस्यांनी केलेले बदल हे इतर वाचकांना लगेच दिसत असल्यामुळे, या दृष्टीने लेखांतील बदलांवर लेक्ष ठेवून असलेले विवीध सदस्यही त्यावर वेगाने सुचना लावतात किंवा काही वेळा लेख वगळण्याबद्दल सुद्धा सुचना लावतात काही वेळा लगोलग लेख वगळावे सुद्धा लागतात.ह्या भूमिकेचे महत्व वादातीत आहे


त्याच वेळी नवागत सदस्य या सूचना आणि लिहिलेले लेखन अचानक दिसेनासे होण्याने विकिपीडियास बिचकण्याची सुद्धा शक्यता असते. काही वेळा लेखन करणारी व्यक्ती स्वत:च सुधारणा करणारही असते पण इतर सदस्यांकडून येणारी सूचना एवढ्या वेगाने येते लेखना करिता लागणारी की मनातील विचारांची शृंखला मध्येच भंग पावल्यासारखी होते. या संदर्भाने काही सदस्य मार्गदर्शकाची भूमिका घेतात व सुयोग्य सहाय्य पूरवतात.
मुख्य अडचण येते ती मार्गदर्शक आणि गस्त आणि विकिकरण करणार्‍या मंडळीचे सम प्रमाण राहिले नाहीतर एकतर विकिपीडियातील माहिती अचूक आणि विशवासार्ह नसल्याच्या तरी तक्रारी वाढतात किंवा पारडे दुसर्‍या बाजूस झूकल्यास पुरेसा ब्रिदींगस्पेस मिळत नाही म्हणून बरेच संपादक दूरावतात
आपल्या विकिवर विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक ,विकिपीडिया:विकिकरण आणि विकिपीडिया:पहारा आणि गस्त इत्यादी प्रकल्प उपलब्ध केले आहेत वर उल्लेखलेला समतोल कसा साधता येईल या बद्दल काही सूचना असतील तर चर्चा लकरून हवी आहे.
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
माहितगार ०६:००, १४ डिसेंबर २००९ (UTC)~~

ज्या पानांवर उत्पात नाही अशा पानांवर पानकाढा सूचना लावताना पान सुधारण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी मुदत द्यावी. सहसा ३-५ दिवस मुदत दिल्यास मूळ लेखक किंवा इतर संपादकांना पान न काढण्याबद्दल समर्थन करता येईल. अभय नातू १७:१६, १४ डिसेंबर २००९ (UTC)

जाणीवपूर्वक खोडसाळपणा शिवीगाळ आणि अस्थानी अश्लिलता मर्यादीत गोष्टी तातडीच्या वगळण्यात घ्याव्यात असे आयपी विकिपीडिया:पहारा आणि गस्तमध्ये नोंदवून् ठेवावेत.
Trial and error मूळे होणारे उत्पातास वगळण्यापूर्वी त्या आयपीच्या चर्चा पानावर सुयोग्य मार्गदर्शन पोहोचवण्यास अधिक प्राथमिकता मिळावी असे मला वाटते साधारणतः एखाद तरी दिवसाचा त्याला अवधी मिळावयास हवा असे मला वाटते.हे पथ्य सदस्य संख्या ३०,००० पर्यंत तरी पाळावे असे मला वाटते.
वरील सूचना अंमलात आणण्यासाठी पानकाढा साच्यात मुदतदिवस हा नवीन पॅरामीटर घातला आहे. उदाहरणादाखल अबकड हे पान पहा.
अभय नातू १७:३७, १४ डिसेंबर २००९ (UTC)
हि चांगली सूचना वाटते माहितगार ०६:२७, १५ डिसेंबर २००९ (UTC)

आठवड्याचा उदयोन्मुख लेख

संपादन

हिंदी विकिपीडियावरील मुखपृष्ठावर hi:विकिपीडिया:आज का आलेख नावाचा नवीन स्तंभ गेले काही महिने सुरू आहे. शब्दसंख्या, आशय/मजकुरातील माहिती, संदर्भ, वर्गीकरण अशा पैलूंच्या दृष्टीने बाळसे धरलेल्या, उदयोन्मुख लेखांना पुढे आणण्यासाठी ही कल्पना गेले ९-१० महिने ते लोक राबवत आहेत. ही कल्पना मुखपृष्ठ सदर होण्याइतपत सविस्तर, सखोल न झालेल्या, परंतु लेखविषयाचे सर्वसाधारण स्वरूप चांगल्या पद्धतीने मांडलेल्या लेखांना लक्षून राबवली गेली आहे. त्यामुळे असे लेख मुखपृष्ठावर येऊन, त्या लेखात तोवर योगदान न दिलेल्या अन्य सदस्यांच्या नजरेस पडतात, व त्यांच्याकडूनही लेखात भर घातली जाण्याची शक्यता वाढते. खेरीज नवख्या सदस्यांनादेखील असे लेख लेखनशैली, मांडणी इत्यादी पैलूंसंदर्भात मार्गदर्शक व सहाय्यक ठरू शकतात.

मराठी विकिपीडियावरही असे बाळसेदार लेख आहेत. ते आपण 'आठवड्याचा उदयोन्मुख लेख' अशा सदरांतर्गत पुढे आणावेत. जेणेकरून एक आठवडाभर असे लेख सदस्यांना, नवागतांना दिसत राहतील व त्यांच्यात भर घातली जाईल. किंबहुना उदयोन्मुख लेखाच्या अनुषंगाने संबंधित अन्य लेखांमध्येही भर पडायची शक्यता वाढेल.

बाकी सदस्यांचे या बाबत मत काय? एकंदरीत अनुकूल प्रतिसाद असेल, तर ही कल्पना राबवताना लेखनिवडीचे निकष, सदराचा कालावधी इत्यादी बाबींवरही सूचना लिहाव्यात.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
संकल्प द्रविड (चर्चा

मराठी विकिपीडियावर दर महिन्याचा सदर लेखासाठीचेही उमेदवार फारसे नाहीत व असलेल्या उमेदवारांत फारशी भर घातली जात नाही.. अशा परिस्थितीत दर आठवड्याला सदस्यांकडून एक नवीन लेखात सुधारणा करण्याची अपेक्षा करणे बरोबर नाही.
त्याऐवजी मुखपृष्ठ लेख उमेदवारांची यादी/दुवा जास्त ठळकपणे प्रसिद्ध करुन त्यांत भर घालावी असे माझे मत आहे. महिन्याच्या महिन्याला नवीन सदर लेख असण्याइतके संपादन झाले तर तेही नसे थोडके.
अभय नातू १७:१९, १४ डिसेंबर २००९ (UTC)
>>> मराठी विकिपीडियावर दर महिन्याचा सदर लेखासाठीचेही उमेदवार फारसे नाहीत <<<

नेमकी हीच समस्या सोडवण्यासाठी उदयोन्मुख लेखांचा उपयोग होईल. मुखपृष्ठ सदर म्हणून निवडले जायला एखाद्या लेखात सांगोपांग माहिती भरावी लागते. तेवढा सखोलपणा पुरेशा लेखांना यायला अर्थातच वेळ लागणार आहे. परंतु त्याऐवजी मध्यम किंवा निम्न-मध्यम आकारमानाचे (म्हणजे शब्दसंख्या साधारणत: २५० पेक्षा जास्त असलेले) उदयोन्मुख लेख आठवड्याला एक या गतीने फुलवणे आपल्या मर्यादित संपादकसंख्येच्या आवाक्यातले काम आहे असा मला विश्वास वाटतो.

सध्या सक्रिय असलेल्या संपादकांचा संपादन करण्याचा पॅटर्न निरखल्यास, बहुतांश वेळा एखाद्या लेखात काही वाक्ये/ एखाद-दुसरा परिच्छेद अशी भर टाकण्याचा दिसतो. एकाच लेखाचा पाठपुरावा करून तो सशक्त करण्याएवढा वेळ व रेटा देणारे लोक (व त्यांनी तसा रेटा व वेळ देण्याचे प्रसंगही) मर्यादित आहेत.. त्यामुळेच मुखपृष्ठ सदरांना तशी समस्या जाणवते. परंतु उदयोन्मुख लेखांसाठी आपण शब्दसंख्येचा निकष २५० शब्द वगैरे ठेवल्यास, असे लेख जमणे व त्यातून मराठी विकिपीडियाचा आशयदृष्ट्या सखोलपणा (डेप्थ) वाढवत नेणे मर्यादित संपादकसंख्येतही पेलता येईल.
तिसरा फायदा मला असा वाटतो, की एखाद्या उदयोन्मुख लेखामुळे त्यात दुवे जडवलेले संबंधित लेख, वर्ग, नवीन लेख आणि नवीन वर्ग या सर्वांचा विस्तार व्हायला च्हालना मिळेल. उदयोन्मुख लेख लाइटवेट असल्यामुळे व त्यांचा कालावधी आठवडा किंवा १० दिवस ठेवल्यामुळे संबंधित लेख/वर्ग विस्तारण्याच्या ह्या प्रक्रियेला ढवळल्यासारखी (churning केल्यासारखी) चालना मिळेल.

>>> महिन्याच्या महिन्याला नवीन सदर लेख असण्याइतके संपादन झाले तर तेही नसे थोडके. <<<

तुमच्या अपेक्षांशी मीदेखील सहमत आहे; परंतु जर मोठे घास घेणे ( = महिन्याला नवीन सदर लेख) सातत्य राखत शक्य होत नसेल, तर पोषण व वाढ होण्यास (= मराठी विकिपीडियाचा सखोलपणा, पर्यायाने दर्जा व उपयुक्तता वाढण्यास) लहान घास व अन्नपूरके (= उदयोन्मुख लेखांची कल्पना) योजून बघायला हरकत नसावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५९, १४ डिसेंबर २००९ (UTC)
जर उदयोन्मुख लेख मालिकेतील प्रत्येक लेखाबद्दल तो मोठा थोरला लेख होण्याची अपेक्षा नसून अगदी स्टब-स्थितीतून बाहेर काढण्याची अपेक्षा असेल तर मला वाटते हा उपद्व्याप करणे हितकारक आहे. कदाचित या मालिकेतील लेख पुढे जाउन मुखपृष्ठ लेखही होतील.
या प्रकल्पाची मुखपृष्ठावर जाहीरात करण्याची आवश्यकता आहे असे वाटते? कि चावडीवरील चर्चा पुरेशी होईल?
याच अनुषंगाने - मुखपृष्ठ रचना बदलून अनेक महिने (वर्षे?) झाली आहेत. त्यात थोडे बदल केल्यास म्हणजे तोचतोपणा जाईल असे वाटते.
अभय नातू १८:१०, १४ डिसेंबर २००९ (UTC)
बरोबर. सध्यातरी स्टब लेखांना फुलवून मराठी विकिपीडियावर मध्यम / निम्न-मध्यम आकारमानाच्या लेखांची संख्या वाढवायला हा उपक्रम उपकारक ठरेल. अशा उदयोन्मुख लेखांमध्ये भर पडत जाऊन कालांतराने मुखपृष्ठ सदराचे लेख घडण्याची प्रक्रियादेखील आवाक्यात येत जाईल. दरम्यान, मराठी विकिपीडियाचा सर्वांगीण सखोलपणा प्रयत्नपूर्वक हळूहळू वाढवत नेता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य फायदा असेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५६, १४ डिसेंबर २००९ (UTC)

उदयोन्मुख लेखाची जाहिरात

संपादन

मला वाटते उदयोन्मुख लेखाची जाहिरात मुखपृष्ठावर होऊ द्यावी. यातून दोन हेतू साध्य होतील :

  1. मुखपृष्ठ दर आठवड्याने / दर ५ / १० दिवसांनी (जेवढा कालावधी उदयोन्मुख लेखासाठी ठरवू तेवढ्या दिवसांनी) अंशतः बदलल्यासारखे दिसेल.
  2. मध्यम आकारमानाचे लेख 'उदयोन्मुख लेख' सदरात मुखपृष्ठावर झळकल्यास विकिवाढीच्या प्रक्रियेस घुसळण होऊन (churning होऊन) चालना मिळेल.


--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५६, १४ डिसेंबर २००९ (UTC)

निर्देश (जाहिरात) central notice मध्ये घ्यावी काय ? कारण मुखपृष्ठावर वेगळे सदर म्हणून घेण्या एवढेही माणूस बळ नाहीये असे वाटते. दुसरे तर विकिपीडिया:निर्वाह या प्रकल्पातून मुखपृष्ठाची संपादने कुठे करावीत याची माहिती येते पण माझा अंदाजा असा आहे की निर्वाह हा शब्द वाचक आणि संपादकांच्या पसंतीस उतरत नसावा.निर्वाह शब्दास पर्यायी शब्द देणे गरजेचे वाटते.
>>> निर्देश (जाहिरात) central notice मध्ये घ्यावी काय ? कारण मुखपृष्ठावर वेगळे सदर म्हणून घेण्या एवढेही माणूस बळ नाहीये असे वाटते. <<<
उलट 'उदयोन्मुख लेख' हे सदर मुखपृष्ठावर आठवडाभर / ५-१० दिवस स्वतंत्र चौकटीत दिसल्याने विकिवाढीच्या प्रक्रियेस घुसळण होऊन (churning होऊन) चालना मिळेल. central notice वगैरे प्रकारांमध्ये नवागत सदस्य / पाहुणे रस घेऊन वाचतीलच असे नाही; परंतु त्यांना 'कामाचा' (= वैश्वकोशीय मूल्य असलेला) मजकूर झलक म्हणून वाचायला मिळाला, तर अपेक्षित परिणाम होण्याची शक्यता वाढेल. उदयोन्मुख लेखात चित्र असल्यास त्याकडे लक्षही वेधले जाईल. थोडक्यात, जे जाहिरात तंत्र मुखपृष्ठ सदरासाठी सध्या वापरले जाते, तेच या 'उदयोन्मुख लेखा'लाही लागू करावे. मुखपृष्ठ सदराची झलक मिळाल्याने वाचक मुखपृष्ठावरून ते सदर वाचायला मुख्य लेखपानावर जाईल; पण तो लेख अगोदरच विस्तृत लिहिला गेला असल्याने, भेट देणारे लोक 'वाचक मोडा'तच राहायची शक्यता जास्त असेल. या उलट उदयोन्मुख लेखाचा विस्तार मर्यादित असल्यामु़ळे त्याची मुखपृष्ठावरची झलक वाचून पानावर जाणारे लोक (निष्क्रिय वाचक मोड सोडून, सक्रिय संपादक मोडात शिरायची आणि) काहीतरी भर घालायची शक्यता तुलनेने अधिक वाटते. त्यामुळे माझे मत असे की, 'उदयोन्मुख लेख' या सदराला मुखपृष्ठावर स्वतंत्र चौकटीची जागा मिळावी.
सध्याच्या मुखपृष्ठाबद्दल माझी काही मते :
  1. 'आजचे छायाचित्र' या चौकटीला असलेले वरच्या भागातले स्थान मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने फारसे उपयुक्त वाटत नाहीये. पुष्कळदा विकिमीडिया कॉमन्स येथून घेतलेल्या या चित्राशी संबंधित लेख / विषय मराठी विकिपीडियावर लिहिलेच गेलेले नसतात किंवा असल्यास, स्टब स्वरूपाचेच दिसतात. खेरीज अस् छायाचित्र रोज बदलले जात असल्याने चित्रासंबंधित लेख / विषय लिहायला आवश्यक तेवढा 'फूटेज-अवधी' कमी पडतो (कारण एका दिवसात मराठी विकिपीडियाच्या मुपृवर जाऊन वाचणारे लोक मर्यादित; त्यात वाचून काही हालचाल करून लेख संपादणारे अजून कमी). त्यामुळे या सदराच्या स्थानाचा (आणि गरज भासल्यास औचित्याचा) पुनर्विचार करावा.
  2. सध्या असलेली '३०,००० चा टप्पा' ही चौकट माहितीच्या, नावीन्याच्या दृष्टीने बघितल्यास विकिपीडियावरील वर्तमान लेखसंख्या सांगते. केवळ वर्तमान लेखसंख्या नोंदवण्यासाठी स्वतंत्र चौकट ठेवण्यापेक्षा लेखसंख्या 'सुस्वागतम' चौकटीत ठळकपणे नोंदवावी.
  3. 'आणि हे आपणास माहीत आहे का?' हे सदर teaser म्हणून औचित्यपूर्ण असले, तरीही त्याचे विकिवाढीच्या दृष्टीने असलेले मूल्य बघता, सध्यापेक्षा थोडेसे कमी लांबीचे ठेवता आले तर अधिक बरे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३४, १५ डिसेंबर २००९ (UTC)
माझा प्रश्न त्याच्या ऊपयोगिते बद्द्ल नाही पण दर ५ ते १० दिवसांनी आठवनीने बदलणारे मनुष्य (संपादक) बळही उपलब्ध नसल्या बद्दल आहे. माहितगार ०८:४६, १५ डिसेंबर २००९ (UTC)
मला हे सदर ठराविक कालावधीनंतर मुखपृष्ठावर बदलण्याचे काम (इथून पुढे नियमितपणे :) ; कारण इथून पुढे मला विकिवर चक्कर टाकणे जमणार असल्याची व्हिजिबिलिटी आहे. :) ) करता येईल. त्यामुळे या बाबत सदर बदलण्याचा टप्पा अडसर ठरू नये.
जर सदस्यांना, 'उदयोन्मुख लेख' संकल्पना पसंत पडत असेल, तर अशा लेखांच्या निवडीचे निकष काय असावेत, याबद्दल कल्पना येऊ द्या.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:२१, १५ डिसेंबर २००९ (UTC)

करायची का सुरुवात?

संपादन

मंडळी, कुणाचा काही गंभीर आक्षेप नसेल, तर मी या उपक्रमासाठी साचे, धूळपाटी मुखपृष्ठ इत्यादी पायाभूत सुविधा बनवायला सुरुवात करतो. एकदा या पायाभूत सुविधा बनल्या, की मग बावनकशी प्रकल्पातून/ अन्य मार्गाने वाढत असलेल्या लेखांसाठी नामांकने मागवून कौल घेऊन दर आठवड्याला उदयोन्मुख लेख सदर बदलता येईल.

या अनुषंगाने मुखपृष्ठातील बदलांबद्द्ल काही सूचना असतील, तर त्या येथेच चावडीवर मांडाव्यात.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५५, ७ जानेवारी २०१० (UTC)

  पाठिंबा- या उपक्रमासाठी लेख उपलब्ध करवण्यासाठी व ते त्या दर्जास नेण्यास परिष्कृत करण्यासाठी आपण तयार. इतर तांत्रिक बाबी जाणकारांनी सांभाळाव्यात.. - Shivashree

गणेश धामोडकर १५:१३, ७ जानेवारी २०१० (UTC)

प्रताधिकार प्रश्न आणि शंका चर्चा

संपादन
  • विकिपीडियावर मुळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये , इतरांचे प्रताधिकारीत लेखनही घेऊ नये आणि तेव्हाच इतरांच्या लेखनाचा संदर्भही द्यावा हे त्रांगड परस्पर विरोधी नाही काय ही समस्या कशी सोडवावी ?
आपल्या आणि बहूसंख्य लोकशाही देशातील घटना स्वतःचे विचार आणि मते मांडण्याचे अभिव्यक्ति, विचार आणि मन व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते. आपण मिळवलेली माहिती आणि ज्ञान एखाद्या किंवा अनेक स्रोतातून आलेल असत.तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान (मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता) तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडता येत. तुम्ही स्वत: अर्जित केलेल्या ज्ञानावर स्वतःच्या शब्दात मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे.संदर्भ देताना आपण लिहिलेल्या स्वतःकडील माहितीस आपण दुसर्‍या व्यक्तिने दिलेला दुजोरा किंवा खंडन समिक्षणात मोडत.आणि समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.हे माझ व्यक्तिगत उत्तर आहे .या महत्वपूर्ण विषया बद्दल इतरांनी सोदाहरण माहिती आणि मार्गदर्शन करावे माहितगार ०९:४५, १८ डिसेंबर २००९ (UTC)
माहितगारांच्या उत्तरात भर --
मुळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये , इतरांचे प्रताधिकारीत लेखनही घेऊ नये
हे दोन निकष परस्परविरोधी वाटतात पण त्यांचा आशय एकमेकांना पूरक असाच आहे. येथे मूळ लेखन किंवा स्वतःचे संशोधन यात न पडताळण्याजोगे असे अभिप्रेत आहे. जर तुम्ही एखाद्या विषयात संशोधन केले असले आणि ते peer review झाले असले किंवा मान्यताप्राप्त प्रकाशनात प्रसिद्ध झाले असल्यास ते लिहिण्यास काहीच बंधन नाही, किंबहुना असे लेखक येथे आल्यास सोन्याहून पिवळे! वरील वाक्याचा आशय असा आहे की तुम्हाला जे वाटते किंवा तुमचा काही समज आहे किंवा तुम्ही घरबसल्या (किंवा ऑफिसबसल्या) चिंतन करून काही inferences काढले तर ते सत्य (facts) म्हणून विकिपीडियावर लिहू नये.
विकिपीडियावरील मुख्य नियम असा आहे की येथे सांगोवांगी माहिती लिहू नये. जी माहिती लिहिली जाते ती पडताळून पाहण्यासारखी असावी. त्याचवेळी इतरांच्या बौद्धिक संपत्तीचा मान राखावा. एखाद्या स्रोतातील माहिती त्याच शब्दांत जशीच्या तशी उतरवू नये, तर त्यातील सत्ये तुमच्या शब्दांत लिहावी पण मूळ स्रोताचा संदर्भ द्यावा, ज्याने तुम्ही लिहिलेल्या मजकूराची सत्यता पडताळून पाहता येईल. कोणतेही assertion केल्यास त्याला पुष्टी देणारा संदर्भ द्यावा
उदा -
बेळगांव महाराष्ट्राचाच भाग आहे. -- हे assertion आहे. याला संदर्भ नाही. तरी हे लिहू नये.
बेळगांव पूर्वी महाराष्ट्रात होते -- borderline truth. कारण बेळगांव जमखंडी संस्थानात (रामदुर्ग/धारवाड?) होते, जमखंडी संस्थान बॉम्बे प्रेसिडेन्सीत होते व बॉम्बे प्रेसिडेन्सीतील बराचसा भाग महागुजरात झाला. यातील विधानांना संदर्भ दिल्यास बेळगांव पूर्वी महाराष्ट्रात होते असे लिहिण्यास हरकत नाही.
बेळगांव कर्नाटकात आहे. -- हे सत्य आहे. याला अनेक संदर्भ मिळतील. ते द्यावे.
अबकड हे विष्णूचे अवतार होते. -- न पडताळण्याजोगे विधान. असे लिहू नये.
पण,
अबकड यांना विष्णूचा अवतार मानतात. -- जर कोण त्यांना विष्णूचा अवतार मानतात ते स्पष्ट करणारा संदर्भ दिला तर असे लिहिण्यास हरकत नाही.
क्ष धर्मीय अतिरेकी आहेत. -- न पडताळण्याजोगे विधान.
पण,
क्ष धर्मातील अनेक व्यक्ती अतिरेकी झाले आहेत.' -- अर्धसत्य. विधान आहे तसे सत्य आहे, पण कोणत्या contextमध्ये वापरले गेले आहे यावरुन त्याचा आशय ठरतो. इतर धर्मांतही अनेक व्यक्ती अतिरेकी असतात. हे येथे नाकारलेले नाही आणी assertही केलेले नाही. सहसा अशा नरो वा कुंजरो वा विधानांवरुन वाद होतात. या विधानाला प्रकाशित अभ्यासाचा (published study) संदर्भ दिल्यास हे विधान पूर्णपणे acceptable आहे.
समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.
अगदी बरोबर, पण असे लिखाण समीक्षण असल्याचे स्पष्ट करावे. आपली व्यक्तिगत मते किंवा समीक्षण सत्य म्हणून लिहू नये किंवा तसा आभास निर्माण करू नये.
आशा आहे येथे मूळ मुद्द्याला उत्तर मिळालेले आहे. जर अधिक clarification हवे असल्यास जरुर विचारावे. पुढेमागे या विषयावर विकिपीडिया नामविश्वात किंवा साहाय्य नामविश्वात एखादा लेखही असावा.
अभय नातू १६:५६, १८ डिसेंबर २००९ (UTC)

वायुप्रदूषण

संपादन
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
59.97.217.142 ०७:१०, २१ डिसेंबर २००९ (UTC)~~

बटन्स आणि प्रीलोडेड कंटेंट सहाय्याचे अनुभव

संपादन
मदत केंद्र , आणि विकिपीडिया धूळपाटीवर ,येथे चावडीवर पूर्वी चर्चा केल्या प्रमाणे, नवागतांकरिता बटन्स आणि प्रीलोडेड कंटेंट ऊपलब्ध केले आहे. मदत केंद्रावर सदस्य खाते ऊघडून संका विचारण्याची टक्केवारी बरी दिसते . पण विकिपीडिया धूळपाटीचा गेला जवळपास महिता पहाता १५च्या वरून संपादने अनामिक पणे झाली आहेत. अनामिक संपादने आपल्याला नवी नाहीत , पण या मंडलींना त्यांच्या चर्चापानावर सहाय्य पुरवता येत नाही आहे. या समस्येवर काही ऊपाय किंवा बाकी हि बटन सिस्टीम बद्द्ल काही अभिप्राय असल्यास नोंदवावेत म्हणजे पुढील टप्प्यातील सुधारणा शक्य होतील.माहितगार १३:३४, २६ डिसेंबर २००९ (UTC)
en:Fact आणि en:Objectivity (philosophy) साठी [मराठी शब्द सुचवा] लेख मराठी विकिपीडियात भाषांतरा साठी घावयाचे आहे .शीर्षकासाठी वास्तव शब्द चालेल का ? वस्तुस्थिती हा शब्द अधीक सयूक्तिक आहे ? माहितगार ०८:५२, २९ डिसेंबर २००९ (UTC)
Objectivity (philosophy) यासाठी 'वस्तुनिष्ठता (तत्त्वज्ञान)' या शीर्षकाने मराठीत लिहिता येईल (महत्त्वाचे : नुसतेच 'वस्तू' लिहिताना 'स्तू' दीर्घ असतो; परंतु वस्तुनिष्ठ/ वस्तुनिष्ठता या शब्दांत 'स्तु' र्‍हस्व लिहिणे योग्य). Objective = वस्तुनिष्ठ, Objectivity = वस्तुनिष्ठता, Objectivism = वस्तुनिष्ठतावाद अशा संबंधित संज्ञा असतील.
Fact या इंग्लिशीतील संज्ञेसाठी पुष्कळदा आपण 'वास्तव' आणि 'वस्तुस्थिती' असे दोन शब्द ढोबळपणे समसमान प्रमाणात वापरतो. माझ्या मते, 'वास्तव' या शब्दाची अर्थच्छटा बरीचशी Reality या संज्ञेस जवळची आहे, तर 'वस्तुस्थिती' ही संज्ञा बरीचशी Fact या संज्ञेस जवळची आहे. अर्थात, यावर अधिक जाणकारांची मीमांसा काय आहे, ती तपासणे जास्त बरे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:००, २९ डिसेंबर २००९ (UTC)

यात Fact=वास्तविकता असे लिहिणे कसे वाटते? वि. नरसीकर (चर्चा) १०:०५, २९ डिसेंबर २००९ (UTC)