Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०
चर्चा ३४ (Archive 34) जानेवारी, इ.स. २०२० १७ एप्रिल, इ.स. २०२१
चर्चा ३५ (Archive 35) १७ एप्रिल, इ.स. २०२१ १७ जानेवारी, इ.स. २०२२
चर्चा ३६ (Archive 36) १७ जानेवारी, इ.स. २०२२ २० फेब्रुवारी, इ.स. २०२३

मराठी लिहिण्यातिल एक लहानशी अडचण

संपादन

इथे लिहिताना अक्षरावर अर्धचंद्र कसा लिहायचा?

ज्या अक्षरावर अर्धचंद्र हवा असेल तेव्हा E वापरा. उदा. कॅ हवे असल्यास kE, मॅ हवे असल्यास mE इत्यादी. - अभिजीत साठे (चर्चा) १४:२०, ३ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

'ॲ' चे ते वेगळे लेखन हवे

संपादन

आपण मागे एका जुन्या चर्चेत "............मराठी विकिपीडियावर देवनागरीतून लिहिताना अॅ चार-पाच प्रकारे लिहिता येतो. अॅ, ऍ, अॅरिस्टोटलच्या चर्चापानावर उद्धृत केलेला चौकोनी आयत, बराहात लिहिलेला अॅ आणि '"नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो). ......." असा उल्लेख केला होता.

ॲ चा प्रश्न धसास लावण्या साठी सर्वच संबंधीत जुने उल्लेख सध्या अभ्यासत आहे. '"नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो) ह्यात उल्लेखीलेल्या ॲ च्या टंकनाचे सोदाहरण उदाहरण प्राप्त करून द्यावे हि विनंती. तसेच संबंधीत टंकन आपण कोणत्या प्रणाली वापरून साधता तेही कळवावे ही विनंती.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०३, ८ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

Wikimedia Consultation in Bangalore

संपादन

Dear fellow Wikipedian,

I write to you because you're one of the most active Marathi Wikipedians.

The Wikimedia Foundation (the non-profit operating Wikipedia sites) is holding an important community consultation in Bangalore on October 4th-5th about the future of Wikimedia work in India.

All the information is here.

So far, none of the most active Marathi Wikipedians have been nominated to represent the Marathi Wikipedia community, and I think it would be a pity not to have you with us to share your perspective on how we can best support you and promote your work.

Please consider having a discussion on-wiki and coming up with delegates to nominate on the talk page here.

Looking forward to meeting some of you soon!

Asaf Bartov
Wikimedia Foundation
Ijon (चर्चा) ०६:३८, १४ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

Urgent: Bangalore travel

संपादन

Dear Abhay,

we need to organize your travel to Bangalore. Please e-mail me urgently, at abartov@wikimedia.org

Thanks! Ijon (चर्चा) १४:४९, १९ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

रेल्वे स्थानक

संपादन

अभय, तू ठाणे रेल्वे स्थानक पानावर मार्गक्रमण साचे लावल्याचे पाहिले. रेल्वे स्थानक इन्फोबॉक्समध्ये मागील व पुढील स्थानकांची माहिती जास्त elegant वाटते. शिवाय मार्गक्रमण साच्यांमध्ये स्थानकाऐवजी त्या उपनगराचे नाव दिसते आहे जे चुकीचे आहे. उदा. मुलुंड हे स्थानक नव्हे. मुलुंड रेल्वे स्थानक हा दुवा योग्य आहे. हे साचे जुने प्रोग्रॅमिंग वापरून बनवले असावेत ज्यामुळे ते आउटडेटेड वाटतात. अभिजीत साठे (चर्चा) ०१:१६, २४ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

अभिजित,
तू म्हणतोस ते बरोबर आहे. हे साचे जुने (४-५ वर्ष!) असल्याने बॉक्सी वाटतात. जर तीच माहिती इतरत्र असल्यास ते साचे काढून टाकणेस हरकत नाही. मी करेनच पण तुला दिसल्यास व सवड मिळाल्यास काढून टाक.
उपनगराऐवजी रेल्वे स्थानकाचा दुवा देणेच बरोबर आहे.
अभय नातू (चर्चा) ०२:४७, २४ सप्टेंबर २०१४ (IST)Reply

Started edits in Marathi

संपादन

Hi Abhay. I have stared edits on Marthi Wiki. As i am not very proficient in language please check out gramatic corrections in my edits. Recetly edited article चिंचपोकळी. Please check out. --Sushant savla (चर्चा) ०९:०३, ६ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply


पुरस्कार विजेते

संपादन

पुरस्कारविजेते हा सामासिक शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबरच आहे. तरी हल्ली हल्ली जोडशब्द फार मोठा(!) होतो आहे असे वाटले तर समास सोडवून लिहिण्याची प्रथा सुरू झाली आहे. उदा० अनाथविद्यार्थिगृह असे न लिहिता अनाथ विद्यार्थी गृह असे लिहितात.(विद्यार्थी अनाथ, की गृह अनाथ हा प्रश्न विचारू नये!) कृषिमहाविद्यालय/विधिमहाविद्यालय ऐवजी कृषी महाविद्यालय./विधी महाविद्यालय, वगैरे. त्या प्रथेनुसार ’पुरस्कार विजेते’ असा दोनशब्दी मथळा लिहायला हरकत नसावी.....J (चर्चा) २३:४६, १८ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

समर्थ रामदास स्वामी

संपादन

समर्थ रामदास स्वामी हे पान नारायण सूर्याजी ठोसरकडे स्थानांतरीत करताना अनेक गाळण्यांचा अडथळा आल्याने स्थानांतरण होऊ शकले नाही तरी समर्थ रामदास स्वामी या पानाची ही आवृत्ती पुर्नस्थापित करुन नारायण सूर्याजी ठोसर हे पूर्वीचे पान वगळून त्याकडे स्थानांतरीत करावी जेणेकरुन संपादन इतिहास सांभाळला जाईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:३१, २२ ऑक्टोबर २०१४ (IST)Reply

वर्ग

संपादन

अभय, अनेक लेखांमध्ये हा वर्ग का दिसत आहे ह्याचे कारण शोधू शकशील काय? मी देखील प्रयत्न करतो आहे. - अभिजीत साठे (चर्चा) ११:४६, २ नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

धन्यवाद

संपादन

कालव्या बद्दल धन्यवाद. पण तुम्ही मला धन्यवाद कसे दिले होते ते कळले नाही. मला माझ्या नावापुढ्गे १ असे दिसून संदेश आल्याचे कळले. पण नंतर तो कुठेच सापडल नाही. काय केले म्हणजे तुमच्या सारखे धन्यवाद देता येतील?Gundopant (चर्चा) ०६:१२, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

वा ! जमले. अगदी सोपे होते. परत धन्यवाद! :) Gundopant (चर्चा) ०६:२२, १३ नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

एअर इंडिया

संपादन

एअर इंडिया लेखाला मासिक सदर नामनिर्देशनासाठी आणखी काय माहिती लागेल? - अभिजीत साठे (चर्चा) २१:०१, २० नोव्हेंबर २०१४ (IST)Reply

खूप दिवसांनी

संपादन

नमस्कार अभय! हो, फारा दिवसांनी इकडे येऊन संपादन करणं जमलं. काम आणि घर या दोन्ही आघाड्यांवर सध्या व्यग्रता असल्यामुळे विकिपीडियावर डोकावायला सध्या कधीतरीच वेळ मिळतोय.

बाकी कसं चाललंय ? सर्व सुरळीत असेल अशी आशा.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १०:५२, २२ नोव्हेंबर २०१४ (IST)

हो अभय, पुण्यातच आहे. सध्या भरपूर गोष्टींमुळे व्यग्र असल्यामुळे येणे होत नाही.
बाकी काय चाललंय ? माहितीत हळूहळू वाढ होतेय असं वाटतंय.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:२१, १९ जुलै २०१५ (IST)Reply

मासिक सदर

संपादन

मराठी विकिपीडियावरील मासिक सदर दर महिन्यांनी बदलत नसल्याने त्याला मासिक सदर असे म्हणने चूकीचे ठरेल.

पुष्कर पांडे (चर्चा) १८:५०, ११ डिसेंबर २०१४ (IST)Reply

घनगड किल्ला

संपादन

घनगड हा किल्ला मुळशी / ताम्हिणी जवळ पुणे जिल्ह्यात आहे. इगतपुरी फार लांब आहे तिथुन. आपली काही हरकत नसल्यास मी बरोबर माहिती टाकू इछितो. देवदत्त काणे

विलिनीयकरण

संपादन

कृपया पिसोरी या लेखाचे पिसूरी हरीण या लेखामध्ये विलिनीयकरण करून द्याल का?

पुष्कर पांडे (चर्चा) २०:०१, २७ डिसेंबर २०१४ (IST)Reply

सदस्य पानावर आपण किती लेख लिहिले आहे ते कसे प्रदर्शित करायचे ? त्याच्यासाठी काही साचे वापरतात का ? ती माहिती तुम्ही द्यावी हि विनंती .


अश्विनी_सुर्वे (चर्चा) १२:५३, ६ जानेवारी २०१५

चर्चा:बास्तीय

संपादन

अभय, आपले मत कृपया येथे नोंदवावे.

पुष्कर पांडे (चर्चा) १९:५५, ०१ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

Hello from United States

संपादन

Hello, I edit as en:user:bluerasberry. I heard that you were especially active on Marathi Wikipedia and I wanted to say hello. I wish that all Indic language Wikipedias could be more developed and to the extent that it is possible I wish that people outside of India could better support them. I cannot speak any Indian language myself but I still encourage those who can to do so.

Thanks for your contributions to Marathi Wikipedia. Blue Rasberry (talk) ०४:४६, ५ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

User page deletion

संपादन

Can you please delete my user page, so I can access global user page.☆★संजीव कुमार (बातें) १५:२३, २२ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

  - Done.
अभय नातू (चर्चा) १५:२६, २२ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply


व्हॅाल्तेर

संपादन

सॅारी मी पाहिले नव्हते. पुन्हा पहिलेसारखे केले आहे.

पुष्कर पांडे (चर्चा) २०:४४, ०४ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

व्होल्तेर किंवा व्हॅाल्तेर ऐवजी व्हॅाल्तेअर असे लिहले तर चालणार नाही का?

पुष्कर पांडे (चर्चा) ११:१५, ०५ फेब्रुवारी २०१५ (IST)Reply

नमस्कार

संपादन

मला, जुन २०१४ मध्ये झालेल्या एका घरघुती अपघातामुळे, माझा उजवा हात जायबंदी झाला होता. तो अद्याप पूर्वपदावर आला नाही.सबब,टंकलेखन करणे शक्य नसल्यामूळे, माझे येथे येणे शक्य झाले नाही. पुर्वीसारखा येथे वेळ देता येणार नाही याची खूप खंत वाटत आहे.बाकी क्षेम. मी प्रचालकपदावर रहावे काय कारण पूर्वीसारखा त्या पदाला न्याय देणे जमणार नाही.आपले याबद्दलचे विचार कृपया कळवावेत ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १२:०३, २९ मार्च २०१५ (IST)Reply

ई-मेल

संपादन

अभय,

आपल्याला मराठीत ई-मेल कसा करावा हे माहित आहे का? माहित असल्यास कृपया सांगावे.

पुष्कर पांडे (चर्चा) १४:३१, २९ मार्च २०१५ (IST)Reply

अभय,

विंडोज 7 मध्ये इनस्क्रीप्ट कळपट कसा अॅक्टिव्हेट करावा?

पुष्कर पांडे (चर्चा) १९:०१, ३० मार्च २०१५ (IST)Reply

धन्यवाद अभय, आपल्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल

पुष्कर पांडे (चर्चा) १३:२०, ३१ मार्च २०१५ (IST)Reply

मासिक सदर

संपादन

अभय, एखादा लेख मासिक सदरासाठी निवडल्यानंतर त्या लेखाच्या Wikidata मध्ये जाऊन मराठी लिंकच्या समोरील Featured article हा फ्लॅग activate करावा. ह्यामुळे इतर विकिपीडियांवर हा लेख मराठीमध्ये Featured article आहे हे समजते. - अभिजीत साठे (चर्चा) ०९:१८, २ एप्रिल २०१५ (IST)Reply

एअर इंडिया व तिसरे म्हैसूर-इंग्रज युद्ध ह्या दोन्ही लेखांना मी हा फ्लॅग दिला आहे.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

संपादन

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:१३, ९ एप्रिल २०१५ (IST)Reply

आभारी आहे

संपादन

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. --वि. नरसीकर (चर्चा) १६:०९, १० एप्रिल २०१५ (IST)Reply

स्पॅम स्वरुपातील लेखन सँकेतांच उल्लंघन करणार भिन्न भाषी लेखन

संपादन

वेगवेगळ्या भाषांमधील नवागत उत्साही मंडळींकडून अजाणता अथवा जाणीवपुर्वक स्पॅम सालू असते. संवाद न साधणाऱ्या अथवा सतत अंकपत्ता बदलणाऱ्या अंकपत्त्यां बद्दल चिंतीत होण्यापेक्षा अथवा नंतर लेख(न) वगळत बसण्या पेक्षा संपादन गाळण्या सर्वसाधारणत: इफेक्टीव्ह आहेत. बहुधा गाळणी तात्पुरती वापरून नंतर पुन्हा तसेच झालेतर वापरण्यासाठी अकार्यान्वित करून ठेवता येऊ शकते. (चिनी भाषेतील उत्पात आपल्या गाळण्यांनी यशस्वी काम केले. लिपी देवनागरीच असेल तर मराठीत नसलेल्या शब्दांचा विशेषत: क्रियापदांचा संच विकिपीडिया:संपादन गाळणी/प्रस्ताव येथे नमुद करून ठेवल्यास संपादन गाळणी शीघ्रतेने कार्यान्वीत करणे सोपे जाऊ शकेल असे वाटते. लेख किंवा लेखन वगळले गेल्यानंतर ते शोधून गाळणी बनवण्यात अधीक वेळ जातो तो जरासा वाचू शकेल असे वाटते.


नेपाळी भाषा क्रियापदे आणि शब्द तुर्तास हिंदी विषयक गाळण्यांमध्येच जोडेन आणि हिंदी सूचनेचे नेपाळी विकिपीडियातून अनुवाद मागवून तो गाळणीत जोडेन.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०३, १८ एप्रिल २०१५ (IST)Reply

संत चोखामेळा

संपादन

स्वरांगी यांनी संत चोखामेळा हे पान असताना चोखामेळा हे नवीन पान तयार केले. आता या पानांचे विलिनीयकरण करून द्यावे.

पुष्कर पांडे (चर्चा) २०:०२, १९ एप्रिल २०१५ (IST)Reply

cross wiki spam - see Wikimedia Forum Discussion

संपादन

Dear Abhay, hope you remember meeting last year @ Bangalore during WMF India Community Consultation

(See my blogpost: http://blog.wikimedia.org/2014/11/13/india-community-consultation-2014/).

This is with regard user "20 anniversarier". This userhas posted the spam article in his sandbox / userpages on many Wikis and asked for the translation of the same. I've speedy-tagged it everywhere except here because the browser is not accepting. Please delete Fall of Srebrenica and Žepa. For some details, plz see: Wikimedia Forum Discussion.

You can also reach me on my Hindi Wikipedia userpage--Hindustanilanguage (चर्चा) १३:१७, २१ एप्रिल २०१५ (IST).Reply

Translating the interface in your language, we need your help

संपादन
Hello अभय नातू, thanks for working on this wiki in your language. We updated the list of priority translations and I write you to let you know. The language used by this wiki (or by you in your preferences) needs about 100 translations or less in the priority list. You're almost done!
 
सर्व विकिंवर अनुवाद जोडण्याकरता किंवा बदलण्याकरता, कृपया ट्रांसलेटविकि.नेटचा वापर करा,जो मिडियाविकिचा स्थानिकीकरण प्रकल्प आहे.

Please register on translatewiki.net if you didn't yet and then help complete priority translations (make sure to select your language in the language selector). With a couple hours' work or less, you can make sure that nearly all visitors see the wiki interface fully translated. Nemo १९:३६, २६ एप्रिल २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा

संपादन

नमस्कार अभय नातू/जुनी चर्चा २७,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

व्यक्तिविषयक पाने

संपादन

व्यक्तिविषयक पाने लिहिताना पहिल्या ओळीत नावानंतर 'जन्म आणि मृत्यू' हे शब्द यायला हवेत. असे न केले तर उल्लेखलेला काळ ही त्या व्यक्तीची कारकीर्द वाटू शकेल. .... (चर्चा) ११:३२, ४ मे २०१५ (IST)Reply


>>नावानंतर लगेचच जन्मतारीख, जन्मस्थळ, मृत्यूतारीख, मृत्युस्थळ घातल्यास या तारखा कारकीर्द वाटण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, प्रत्येक व्यक्तीच्या लेखात माहितीचौकट साचा अपेक्षित आहे. या साच्यात कारकीर्दीचा काळ वेगळ्याने उद्धृत केलेला असतोच तरी गल्लत होण्याची शक्यता नाही. << --अभय नातू जन्मतारीख व मृत्यूची तारीख अनेकदा ddmmyy या साच्यात उपलब्ध नसते. कधीकधी दोघांपैकी एकच माहीत असते. जन्मस्थळ-मृत्यूस्थळतर क्वचितच ठाऊक असते. माहिती चौकट साचा, त्यात शुद्धलेखनाच्या आणि भाषेच्या चुका असल्याने भरावासा वाटत नाही. शिवाय या साच्यांचा नमुना विकीवर सहज सापडत नाही.

नावानंतर जन्म आणि मृत्यू हे शब्द न लिहिण्यात कोणता परमार्थ साधतो हे समजले नाही.... (चर्चा) २३:०१, ४ मे २०१५ (IST)Reply

संचिकांचे त्रुटीयूक्त परवानीकरण आपल्या बॉट करवी वगळून मिळावीत हि विनंती

संपादन

नमस्कार,

विशेष:योगदान/चीत्रकाम्या या सांगकाम्याकरवी स्वत: न चढवलेल्या संचिकांचे परवानीकरण त्रुटीयूक्त असण्याची आणि सदर कृती विकिमिडीयास अभिप्रेत मुक्त सांस्कृतीक काम च्या परिभाषेस अनुसरून नसल्याची, गाढ शक्यता असून, त्यामुळे परवाना अद्ययावत करण्यासंबंधी अभियान चालवूनही संबंधीत संचिका चढवणारे सदस्य गोंधळू शकतात अथवा सदस्यांची दिशाभूल होऊ शकते.

उदाहरणार्थ आपण चढवलेल्या चित्र:100Rupees.png यास {{Own Work}} {{Cc}} हे संभाव्य त्रुटीचे परवाने जोडले गेलेले प्रथम दर्शनी दिसते आहे. या संदर्भाने सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101#कॉपीराईट इश्यूज आणि सदस्य_चर्चा:चीत्रकाम्या#missing evidence of permission अन्वये सदर सदस्य महोदयांना सूचीत केलेले आहे.

विशेषत्वाने सदर सांगकाम्याची १८ फेब्रुवारी २०१३ने जोडलेले सदस्य:Rahuldeshmukh101 यांनी स्वत: चढवलेल्या संचिका सोडून, उर्वरीत सर्व संचिकांमधून {{Own Work}} {{Cc}} साचे वगळण्यात आपल्या बॉटचे साहाय्य प्राप्त झाल्यास हवे आहे.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४६, १३ मे २०१५ (IST)Reply


>>मी तुमच्याकडून सविस्तर बदलांची वाट पहात होतो. अर्थात, मी तसे कळविण्यात उशीर केला हे खरे. आणि शंका ही तुमच्या बदलांबद्दल नसून तुम्ही करीत असलेले बदल स्वयंचलित आहेत का आणि तसे असल्यास त्यांच्याकडे तुमचे लक्ष आहे का याबद्दल होती. <<

माझ्या वरील विनंती प्रतिसादातील " विशेषत्वाने सदर सांगकाम्याची १८ फेब्रुवारी २०१३ने जोडलेले सदस्य:Rahuldeshmukh101 यांनी स्वत: चढवलेल्या संचिका सोडून, उर्वरीत सर्व संचिकांमधून {{Own Work}} {{Cc}} साचे वगळण्यात आपल्या बॉटचे साहाय्य प्राप्त झाल्यास हवे आहे. "

.{{Own Work}} {{Cc}} या दोनच संचिका वगळावयाच्या आहेत एवढाच बदल अपेक्षीत तेव्हा, 'अधिक काय लिहिणे' असा विचार केला (तोही मी) :) मला वाटले की मी वरच्या वाक्याचे उदाहरण म्हणजे, मी कधी नाहीते संक्षीप्त तरी पुरेशी माहितीसहीत लिहीले. :)
एनीवे मी आपले उत्तर आले नाही पाहून स्टूअर्डना विनंती केली (मला स्वत:ला अमराठी व्यक्तींसमोर मराठी लोक कमी पडतोय हे उघड करणे आवडत नाही तरीही नाइलाजाने तसे मी केले) त्यांनी ती विनंतीही लगोलग स्विकारली (माझे मराठी विकिपीडियन मित्र लाजत असले तरी स्टुअर्ड मंडळी अमराठी असुनही मी केलेला मराठी-अमराठी भेद स्विकारूनही मदतीस तत्पर असतात , माझा मराठीवाद समजून घेतात हे खरेच कौतुकास्पद वाटते- अर्थात मीही त्यांना सुयोग्य ठिकाणी मदतीस धाऊन जातो हेही ते पहात असावेत कदाचित) पण त्यांच्याकडून ते काम काल काही तांत्रिकतेमुळे होऊ शकले नाही, आज त्यांच्या कडून उर्वरीत काम केले जाइल, त्यांना सांगितले आहे आणि आज उद्यात त्यांच्याकडून होऊन जाइल तेव्हा ते त्यांच्या कडून होऊन जाऊ द्यात.
कालच्या माझ्या कामाबद्दल काम चालू करताना मॅन्यूअली एवढा वेग घेता येईल असे मलाही वाटले नव्हते, तसे छोट्या संपादनांचा आणि मॅन्युअली अधिकतम वेग किती घेता येतो याचा आपला एकुण अनुभव आणि कल्पना आपणास माझ्यापेक्षा अधिक असणार तरी सुद्धा माझी संपादने मॅन्युअल नसतील अशी आपणास शंका वाटली याची गंमत वाटली :) (ह्. घ्या)
>>असो, तर हे बदल अजूनही सांगकाम्याकडून करवून घेणे असेल तर २-३ गोष्टी कळवाव्यात -- <<
वर म्हटल्या प्रमाणे तुर्तास सदर काम स्टुअर्ड महोदयांच्या बॉटला दिले आहे. भविष्यात संचिका मोठ्या प्रमाणावर वगळण्याचे काम बॉटकरवी करावे लागेल त्यास अद्यापी बराच दीर्घ कालावधी आहे, तेव्हा आपणास पुन्हा एकदा विनंती करेन
१. या चित्रांवर कोणते बदल करायचे आहेत? शेवटचा एक बदल उलटवायचा आहे कि own work साचा घालवायचा आहे?
केवळ {{Own Work}} {{Cc}} घालवणे एवढेच काम होते.
२. या चित्रांना कोणता निकष लावला? own work साचा असलेली सगळी चित्रे? चीत्रकाम्याने शेवटचा बदल केलेली सगळी चित्रे? इतर काही निकष?
राहुल देशमुखांनी स्वत: चढवलेली सोडून चित्रकाम्या सांगकाम्याने लावलेले सर्व चित्रातील {{Own Work}} {{Cc}} घालवणे हे दोन साचे.
३. हे बदल करण्याआधी राहुल देशमुख, प्रिया हिरेगंगे किंवा चित्र चढवाणाऱ्या इतर सदस्यांना साद घालून त्यांचे मत घ्यायची गरज आहे का?
कळवावे म्हणजे गरज असल्यास सांगकाम्या तयार करून चालवता येईल.
थोडक्यात राहुल देशमुखांशी खालील दीर्घ उत्तरात नमुद केल्या प्रमाणे सविस्तर संवाद साधला गेला आहे. इतरांच्या संचिकांवर परवाने लावण्या आधी परवानगी घेण्याची जबाबदारी राहुल देशमुखांची होती (ऊद्देश ब्लेम टाकण्याचा नाही केवळ त्रुटी दाखवण्याचा आहे.) ज्या सदस्यांना राहुल देशमुखांना विहीत नमुन्यात लेखी कायदेशीर परवानगी किंवा अजून इतर कुणास द्यावयाची असेल त्यास माझी ना नाही. ॲज ऑफ नाऊ चित्रकाम्याची सदर कृती void डिक्शनरीत पोकळ आणि अग्राह्य असे पारिभाषिक शब्द दिले आहेत. त्या संचिकांचा प्रताधिकार चित्रकाम्याच्या अयोग्य कृतीने संपत नाही. ज्या संचिकेचा प्रताधिकार खऱ्या अर्थाने संपलेला नाही ते विकिमिडीयाच्या लायसन्सींग पॉलीसीतले मुक्त सांस्कृतीक काम ठरत नाही. शिवाय जी गोष्ट अनुभवी स्टुवर्डने स्विकारली आहे. तुम्ही सर्वांचे डेमॉक्रॅटीक मत घेऊन चित्रकाम्याचे त्रुटीयुक्त काम अबाधित ठेवण्याचे ठरवल्यास असे काम अबाधित ठेवण्यास समती देऊ इच्छिणारे आणि विकिमिडीयाने आपापसात पाहुन घ्यावे. मी त्यात निश्चित पडणार नाही.


* उत्तराचा दीर्घ भाग
राहुल देशमुख यांच्या चर्चा पानावर केलेल्या चर्चेचा दुवा आपणास दिलेला आहेच. त्याशिवाय त्यांना इमेलद्वारेही कल्पना दिली, त्यांना जोखीम नको म्हणून इमेल चर्चेचा उल्लेख मी टाळला होता. त्यांची शंका आणि निरसन याची माहिती खाली देतोच पण तत्पुर्वी त्यांनी The Bot work if you find problematic we can revert it any time. असे उत्तर दिले त्या शिवाय "मराठी भाषा दिनानंतर बहुधा आपली मराठी विकिपीडियास निवांत भेट झाली नसावी." ला Yes, you are right. I am not in touch from March due to the busy schedule असे उत्तर दिले तेव्हा त्यांना स्वत:स हे बदल उलटवण्यास तुर्तास वेळ नाही असा अर्थ काढून मी बदल करण्याची विनंती आपल्या चर्चा पानावर केली आपला प्रतिसाद नाही पाहून, त्यांनंतर स्टूअर्ड महोदयांसमोर विषय मांडला.


आता राहुल देशमुखांचा इतरांच्या छायाचित्रावर परवाने लावण्यापुर्वी असलेला किंवा त्यांनी सांगितलेला गैरसमज अभ्यासू ते इमेल मध्ये म्हणतात "If the Bot work has been done in past is just to visualize the image states indicator which bye default is accepted/declared by the uploading member as per wikipedia/wikimedia policy at the time of upload. " म्हणजे त्यांना म्हणावयाचे आहे की Text मजकुरा प्रमाणेच विकिपीडियावर चढवलेले प्रत्येक (छाया)चित्र आपोआप प्रताधिकार मुक्त होते. ह्या गैर समजातील फ्लॉज खाली मांडतो :
माझे उत्तर: विकिपीडियाच्या तळाचे इंग्रजी वाक्य "Text is available under the Creative Commons Attribution-ShareAlike License; additional terms may apply. By using this site, you agree to the Terms of Use and Privacy Policy. " असे आहे यात आपोआपचा उल्लेख केवळ टेक्स्टचाच आहे. वापरावयाच्या अटी छायाचित्रासाठी परवाने ज्यात्या व्यक्तीने आपापले लावण्यास सांगतात.
(छाया)चित्र चढवतानाच्या फॉर्म मध्ये राहुल म्हणतात तसे आपोआप प्रताधिकार मुक्ती केव्हा आणि कोठे होते ? (माझ्या माहितीनुसार मजकुर संपादनाच्या खिडकीत आणि (छाया)चित्र चढवतानाच्या अपलोडफॉर्म मध्ये अल्पसा फरक असावा अन्यथा कदाचित इतर सर्व विकिप्रकल्प (छाया)चित्रांसाठी लायसन्स निवडण्यासाठीचे विकल्प देत बसले नसते. हा एक भाग झाला. कॉमन्स व्यतरीक्त इतर विकिप्रकल्पात कॉपीराईटेड चित्रे चढवली आणि वापरली जाण्याची अंशत:तरी शक्यता उरते त्यामुळे राहुल ना वाटत होते तसे छायाचित्र चढवताना छायाचित्रांसहीत आपोआप प्रताधिकार त्याग होत असल्याची सरसकट घोषणा करणे विकिमिडीयास शक्य होत नसावे असा कयास आहे, या बाबत अधिक माहिती विकिमिडीया फाऊंडेशनचे लिगल प्रतिनिधीच सांगू शकतील) दुसरे माझ्या मतानुसार विकिमिडीयास अभिप्रेत मुक्त सांस्कृतीक काम या तत्वात न बसणाऱ्या त्रुटींना वाव मिळतो आहे.
कॉमन्सवर बनवला गेलेला {{No permission since}} हा साचा काय म्हणतो पहा, " This media file is missing evidence of permission.....but there is no proof that the author agreed to license the file under the given license. Please provide evidence of permission" (हा साचा लावलेली चित्रे कॉमन्सवरून ७ दिवसांनंतर वगळली जाण्यास पात्र होतात.)
कुणाला दुसऱ्यांच्या छायाचित्रावर परवाना लावायचा असेल तर commons:Commons:Email templates येथील विहीत नमुन्यात + भारतीय प्रताधिकार कायद्यातील अभिप्रेत लेखी करार अथवा लायसन्स अथवा अफीडेव्हीट प्रताधिकार मालकाकडून अथवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधी कडून हवे, राहुल देशमुखांच्या इमेल मधील एक स्टेटमेंट त्यांची जोखीम वाढू नये म्हणून मी येथे देत नाहीए." थोडक्यात कायतर इतरांच्या संचिकांवर परवाने लावण्या आधी परवानगी घेण्याची जबाबदारी राहुल देशमुखांची होती.


उदाहरण पहा एक व्यक्ती येते, एका सार्वजनिक ठिकाणी एक वस्तु कोणत्याही सुचना न देता ठेऊन जाते. दुसरी व्यक्ती येते त्यावस्तुवर वस्तु सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध असल्याचे लिहून जाते, तिसरी व्यक्ती येते त्या वस्तुवरची सार्वजनिक वापरासाठीची सूचना वाचते आणि वापरास घेऊन जाते. चौथी व्यक्ती येते या चौथ्या व्यक्तीच्या लक्षात येते कि अरेच्चा हि तर आपली वस्तु आहे आता हि चौथी व्यक्ती जेव्हा न्यायालयापुढे जाइल तेव्हा तीसऱ्या व्यक्तीस सार्वजनिक वापरासाठी हि सूचना वाचल्यामुळे गूडफेथ क्लॉजचा फायदा मिळण्याची शक्यता असेल. पहिल्या व्यक्तीवर जबाबदारी आली तरी तो काय म्हणेल मी चौथ्या व्यक्तीच्या मालकीची वस्तु सार्वजनिक ठिकाणी ठेवली हे चुकले पण मी एकटा दोषी कसा ? ज्याने माझ्या मौनाचा परस्पर अर्थ काढून परस्पर सूचना लिहिली त्याचे काय ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०८, १६ मे २०१५ (IST)Reply

पहावे

संपादन

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:१५, १५ मे २०१५ (IST)Reply


जन्म-मृत्यू

संपादन

>>अकबर इलाहाबादी (१६ नोव्हेंबर, इ.स. १८४६,:बारा, अलाहाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत; इ.स. १९२१:अलाहाबाद) हे एक उर्दू कवी होते.<<. हे समजायला अवघड आहे असे वाटत नाही?--- (चर्चा) ००:३९, १६ मे २०१५ (IST) --Reply

चिं.गं. भानू

संपादन

हे नाव तीन चार ठिकाणी चिं. भानू असे वाचायला मिळाले. तेव्हा या व्यक्तीचे मधले नाव गजानन तर नसेल ना, असा संशय येऊ लागला होता. त्यामुळे मी चिं.ग. लिहिले होते. शेवटी एका ठिकाणी चितामण गंगाधर असे पूर्ण नाव आणि चिं.गं. अशी आद्याक्षरे वाचायला मिळाली, तेव्हा शोध थांबवला. ’ग’चे ’गं’ केल्याबद्दल आभार! ... (चर्चा) ०१:०५, १७ मे २०१५ (IST)Reply

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिडेटावर दुवा

संपादन

नवीन पान तयार केल्यानंतर त्याचा विकिडेटावर दुवा कसा द्यावा?

पुष्कर पांडे (चर्चा) २०:१८, २० मे २०१५ (IST)Reply

मी आत्ता वर्ग:मराठी संगीत नाटककार हे नवीन पान तयार केले पण तेथे मला डाव्या बाजूला दुवे संपादा नाही तर दुवे जोडा असे दिसले.

पुष्कर पांडे (चर्चा) २१:२२, २० मे २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करावेत

संपादन

नमस्कार अभय नातू/जुनी चर्चा २७,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Your file

संपादन

अभय, I have moved this photo चित्र:वडोदरा एक्सप्रेस.JPG to Commons. Hope this is okay. - अभिजीत साठे (चर्चा) १०:३०, १० जून २०१५ (IST)Reply

अभय, चित्रकाम्या विषयक आपल्याशी चर्चा होऊन गेल्यामुळे इतरांच्या संचिकांवर परस्पर, परवाना लावण्याचा मुद्दा आपणास ठाऊक असेलच; कॉमन्सवर उपरोक्त फाईल मी डिलीशन करता नॉमीनेट करण्याचा विचार करतो आहे. साठे साहेबांना हा मुद्दा आपण क्लिअर करू शकाल तर दुधात साखर.

आपल्या प्रतिसादाची प्रतिक्षा असेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४५, १० जून २०१५ (IST)Reply

माहितगार, ह्यात पराचा कावळा करण्यासारखे काहीही नाही. On English and other Wikipedias, all self works are flagged and uploaded to the Commons. If you look closely, the description on Commons says it is Abhay Natu's work, not mine. Perhaps if you stop making your own policies here and look at how things are done elsewhere, this would make sense to you. From my understanding of Abhay, I hope he will not mind me uploading his file on his behalf. येथे नाक खुपसण्याअगोदर आपण माझ्या येथील प्रश्नाचे उत्तर दिले असते तर जास्त सयुक्तिक ठरले असते नाही का? So spare your sarcasm and first fix the Copyright mess you have created here. - अभिजीत साठे (चर्चा) १४:४९, १० जून २०१५ (IST)Reply
PS: And if Abhay does in fact object to my actions, my sincere apologies to him. - अभिजीत साठे (चर्चा) १४:५४, १० जून २०१५ (IST)Reply


अभय, मला वाटते या विभागातला मी माझा संवाद आपणास उद्देशून केला आहे. कॉमन्सवरील डिलीशन रिक्वेस्ट चर्चा पान commons:Commons:Deletion requests/File:Vadodara Express at Vadodara station.JPG या पानावर आहे. धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१४, १० जून २०१५ (IST)Reply
अभिजित,
संचिका हलविण्याबद्दल काहीच हरकत नाही. हलविल्याबद्दल धन्यवाद.
माहितगार,
आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद
तुम्ही नॉमिनेट करण्याचा विचार करतो आहे आणि नॉमिनेशन करण्यात अत्यल्प वेळ घालवलात हे पाहून आश्चर्य वाटले.
जरी तुम्ही मला उद्देशून लिहिले असलेत तरी ते अभिजितच्या संदेशाखाली लिहिले आहे तरी त्यांना उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे.
अभय नातू (चर्चा) १९:४७, १० जून २०१५ (IST)Reply
अभय, संसदेत विवाद मर्यादेच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून, सर्वजण सभापतींना उद्देशून बोलण्याची प्रथा असते आणि मी श्रीमान साठेसाहेबांशी प्रत्यक्ष संवाद मागेच कमी केला आहे. आणि आपण किंवा इतर कुणा मार्फतच त्यांना उत्तरे देईन, इतरत्रही त्यांना उत्तर न देण्याचे तेच कारण आहे.
दुसऱ्याच्या नावावर अनुमतीची सुविहीत प्रक्रीया पार पाडल्या शिवाय परस्पर परवाने लावणे टाळावे हि भूमिका केवळ अभिजीत साठे महोदयांची त्रुटी पाहीली आणि मागे लागलो असे नाही, ती भूमिका जिथ पर्यंत मला विकिमिडीया तत्वे अभ्यासता आली त्यातून आली आहे.
१) त्यात माझी व्यक्तीगत मते लादण्याचा कोणताही प्रश्न नाही. स्थानिक संचिका परवाना निती बाबत मी केवळ आधारभूत किमान स्वरूपाची माहिती कुठे मिळते एवढे सांगण्याचेच काम केले आहे. संचिका परवाना नितीच्या चर्चा पानावर नितीची चर्चा करा ज्याकाही नितीस मराठी विकिपीडिया सदस्यांची सहमती असेल त्यास माझी ना नाही आपण तशा निती प्रमाणे करू हेच उत्तर मी साठे साहेबांनाही माझ्या चर्चा पानावर दिलेले आहे.
२) जिथपर्यंत नॉमिनेशनचा भाग आहे ते केव्हा न केव्हा करावेच लागणार होते, नॉमिनेशन केल्यामुळे तांत्रिक गोष्टी आणि कॉमन्सच्या ज्या काही प्रक्रीया असतील त्या आपोआपच स्पष्ट होतील, माझ्या सारख्या कुणीतरी म्हणणे आणि प्रत्येकाने आपापले अनुभवातून शिकणे सर्वोत्तम. उत्साहाच्या भरात आपण करतो ते गूडफेथ मध्ये आणि इतर करतात ते गूडफेथ मध्ये नसते ? त्या बद्दल अरेरावी, अहंकार आणि सौजन्याचा अभाव असलेली भाषेचा वापर ज्यांच्या तत्वात बसते ते तसे त्यांना लखलाभ असो. उत्साहाच्या भरात आपण एखादी गोष्ट गूडफेथ मध्ये करू शकतो तसेच इतरही लोक गूडफेथ मध्येच करत असतात हा मुद्दा जमल्यास संबंधीतांना समजावा म्हणून नॉमीनेट करण्यात फार वेळ घालवला नाही.

धन्यवाद आणि शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३४, १० जून २०१५ (IST)Reply

माहितगार,
आपण संसदेत नाही आहोत. विकिपीडया हा collaborative project आहे. येथे नको त्या प्रथा पाडणे टाळावे.
दुसऱ्याच्या नावाने परवाने लावणे टाळावे हे मान्य असले तरी थोडासा संवाद साधणे गरजेचे आहे.
तुम्ही लगेचच डिलीशन नॉमिनेशन लावले त्याबद्दल मला तुमचा राग नाही पण आश्चर्य वाटले की माझ्या उत्तराची काही ताससुद्धा वाट न पाहता आपण ही कार्यवाही केलीत.
एक जुने आणि सुज्ञ विकिपीडिया सदस्य म्हणून आपण अभिजित आणि आपल्याशी मतभेद असलेल्या इतर सदस्यांशी संवाद साधाल ही आशा, अपेक्षा आणि आग्रह आहे. आपण गुडफेथबद्दल म्हणलात तर तशीच गुडफेथ मराठी विकिपीडिया सदस्यांबद्दलही ठेवालच. रुसवे, फुगवे यांना येथे स्थान नाही हे आपणास सांगणे नलगे.
क.लो.अ.
अभय नातू (चर्चा) २०:५२, १० जून २०१५ (IST)Reply

अभय,

मी प्रसंगी अत्यंत कठोर टिकाकार होऊ शकतो पण संवादात सहसा नम्रतेचा अभाव नसतो. श्रीमान अभिजीत साठेंचीं संवादाची भाषा (इतरही काही गोष्टी कि ज्यांना अलिकडे मनावर न घेता दुर्लक्ष करण्यास शिकलो आहे) मला झेपणारी नाही. आणि त्यांच्याशी अधिक वादात वेळ दवडू इच्छित नाही. आपणास श्रीमान अभिजीत साठेंचे संवादांचे महत्व आणि उत्तमता एवढी भावत असेल तर त्यांचे संवाद दत्तक घेऊन त्याखाली आपल्या सहीने मला द्यावेत मग 'त्या' संवादांना मी यथोचीत उत्तरे देईन.

आभार आणि शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५०, १० जून २०१५ (IST)Reply

This is getting sillier by the hour/day.
माहितगार,
मला फक्त अभिजित नव्हे तर इतर सगळ्या सदस्यांच्या संवादांचे महत्व आहे. मी दुसऱ्यांचे संवाद दत्तक घेण्याने (म्हणजे नक्की काय?!) काय साधणार? तुम्हाला एखाद्या सदस्याशी बोलायचे नसेल तर नका बोलू...तो तुमचा प्रश्न आहे पण अगं अगं म्हशी करण्यात काय हशील आहे?
बालवाडीतील मुले फुरंगटून मी नाय बोलत जा त्याच्याशी किंवा तो/ती माझ्याशी नीट वागत नाही म्हणून माझी त्याच्याशी कट्टी हे असले बालवाडीत शोभणारे तंटे सांभाळण्यास मला वेळ नाही व तशी इच्छाही नाही.
अभिजितने (किंवा इतर कोणीही) उपस्थित केलेले मुद्दे मला ती व्यक्ती किंवा त्याची भाषा भावत नाही म्हणून दुर्लक्षिलेत तर तो ही तुमचाच अधिकार आहे परंतु सुज्ञपणा नक्कीच नाही. अर्थात, हे माझे मत. तुमचे मत वेगळे आहे हे उघडच आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २३:०४, १० जून २०१५ (IST)Reply

अभय, सभ्यता आणि शिष्टाचार पाळणारी/पाळताना व्यक्ती दुसऱ्यांचे संवाद दत्तक घेताना किमान शिष्टाचारास नसलेला भाग सुज्ञपणे टाळेल, ह्या गोष्टी बालवाडीतल्या नाहीत म्हणूनच, काही मोठ्या लोकांनी मोठ्यालोकांसाठी सांगीतलेल्या चार युक्तीच्या गोष्टींचे पालन करत आहे एवढेच. नाहीत्या व्यक्तींशी वाद घालून आपली स्वत:ची पातळी घसरण्याचा धोका असतो. आणि तुर्तास तसे करण्याचा माझा कोणताही विचार नाही.

धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:०५, ११ जून २०१५ (IST)Reply

माहितगार, your actions on Commons are motivated only by a personal vendetta against me. Do you go around tagging all such files on Wikimedia Commons? Your contribution on Commons suggests otherwise. मोठमोठे निर्थरक निबंध लिहिले म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर हा तुमचा समज चुकीचा आहे. I do not like your way of working here either but that does not mean I won't communicate with you. - अभिजीत साठे (चर्चा) १०:४५, ११ जून २०१५ (IST)Reply

काही दिवसांपूर्वी मी स्फातीकातले दोष हा लेख लिहिला होता. परंतु आता तो लेख स्फटिक या लेखातच समाविष्ट केला आहे. स्फटिक आणि स्फातीकातील दोष या दोन भिन्न शाखा आहेत. त्या अशाप्रकारे एकत्राकरणे बरोबर ठरणार नाही. कृपया योग्य ती कारवाई करावी.

सही

संपादन

आपण मला काही दिवसांपूर्वी सहि करू नये असे सांगितले होते. तांत्रिकदृष्ट्या जरी मी हा संदेश पाहिल्याचे दिसत असले तरी कालच मी तो संदेश पहिला. मी येथे नवखी असल्याने असे घडले. इथून पुढे असे घडणार नाही. --स्वरांगी (चर्चा) १९:२१, १६ जून २०१५ (IST)--स्वरांगी (चर्चा) १९:२१, १६ जून २०१५ (IST)Reply


दिनविशेष

संपादन

मी बनवलेल्या साच्यावरील तारखा येथे व्यवस्थित दिसत आहेत परंतु येथे त्रुटी येत आहे. असे का होते आहे ह्याबद्दल संशोधन करू शकाल काय? - अभिजीत साठे (चर्चा) ११:५७, २ जुलै २०१५ (IST)Reply


फत्तेसिंह संग्रहालय

संपादन

>>माझ्या अनुभवात फतेसिंह संग्रहालय लक्ष्मीविलास महालाच्या प्रांगणात नसून सयाजीबागेत आहे. ---- अभय नातू (चर्चा) १८:०५, ४ जुलै २०१५ (IST)

फत्तेसिंह संग्रहालय लक्ष्मीविलास पॅलेसच्या प्रांगणातच आहे; कमाटीबागेत ऊर्फ सयाजीबागेत एक रंगचित्रांचे कलादालन, प्लॅनेटेरियम, प्राणिसंग्रहालय आणि एक वस्तुसंग्रहालय आहे. परंतु कमाटीबागेतले हे वस्तुसंग्रहालय फत्तेसिंह संग्रहालयापेक्षा वेगळे आहे. ... (चर्चा) १७:२२, ५ जुलै २०१५ (IST)Reply

बांग्लादेशी अंकपत्त्यांचे मशिनी अनुवाद

संपादन

साधारणत: जून २०१४ पासून म्हणजे गेल्या वर्षाभरात बांग्लादेशी अंकपत्त्यावरून मशिनी अनुवादांची दोन डझनच्या आसपासतरी संपादने झाली असावीत असा कयास आहे. त्यातील एखाद दोन संपादनांना मराठी विकिपीडियन्सने सुधारले आहे. बाकी तशीच सुधारणां अभावी पडीक असावीत.. त्यांच्या मशिनी अनुवाद संपादनांचा बाइट मधील आकार ५, ५४, ६४, २५०, ३९८, ४८६, ६५९, ६६२, ९९१, १३३२, १७६७, २२६१, २५८४ अशा रेंजमध्ये दिसतो

बांग्लादेशी अंकपत्त्यांवरून केलेल्या संपादनात इतर (?) बांग्लादेशी अंकपत्त्यांकडून उत्पात संपादने सुद्धा होताना दिसतात.

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन/त्रुटी अभ्यास या पानावर या मशिनी अनुवाद प्रकरणांचा थोडक्यात आढावा नोंदवला आहे तो आपण एकदा पाहून घ्यावा.

सुरवातीस संपादन गाळणीतून अटकाव करून त्यांना चर्चा पानावर चर्चा करण्यास सांगावे. दर ४५ दिवसात ७०० बाइट पेक्षा जास्तीच्या फारतर एकाच मशिनी अनुवाद संपादनास अनुमती द्यावी म्हणजे मशिनी अनुवादांचे प्रमाण अर्ध्यानेतरी कमी हण्याची शक्यता असेल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२२, २४ जुलै २०१५ (IST)Reply


कसे आहे चार गट असणार पहिला गट मराठी व्यवस्थीत येऊनही मशिन ट्रांसलेशन करतो आणि आळसाने ते तसेच सोडतो, दुसरा गट मराठी अर्धवट येणाऱ्यांचा आहे, तीसरा गट ज्यांना मराठी आजीबात येत नाही हिंदी मुळे देवनागरीशी अथवा हिंदीशी परिचय झाल्यामुळे मराठी येते असे वाटते, चौथा गट देवनागरी लिपीशी परिचयसुद्धा नसलेला गट.

पहिल्या दोन गटांना आठवड्यास २५०० बाईट ठिक वाटतात. पण नंतरच्या दोन गटांना मराठी विकिपीडियावरील इतर सदस्यांचे सक्रीय साहाय्य पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर प्रत्यक्षात मराठी विकिपीडियावर अद्यापही मशिन ट्रांसलेशन झाले नाही तेवढे unprocessed साचत तर रहाणार नाही ना अशी भिती वाटते कारण अद्याप पर्यंतचे बहुतांश मशिन ट्रांसलेशन unprocessed आहे.

एक व्हाया मिडीया असा की नंतरच्या दोन गटांना त्यांची मशिन ट्रांसलेशन चर्चा पानांवर अथवा धूळपाटीवर लावण्यास सांगावीत तपासून मग लेखात घ्यावीत.

जो पर्यंत अंकपत्ते समस्येच्या सोडवणूकीत सहकार्य करत आहेत तो पर्यंत गूडफेथ अंकपत्त्यांना मज्जाव करण्याचा फारसा मानस नाही. कारण अंकपत्त्यांमुळे अनुवादक कोणत्या प्रातांतून देशातून आहे हे समजून अनुवादातील सर्वसाधारण समस्यांचे वर्गीकरण आणि त्यांना मार्गदर्शन करण्यास हातभारच लागेल.

बांग्लादेशी अंकपत्त्यांवरून उत्पातही येतो आहे म्हणून नेमके काय करावे असा विचार करतो आहे.

(बाकी मराठी विकिपीडियावर युनिकोडातील ७०० बाईट म्हणजे मराठी विकिपीडियाची डेस्कटॉपवरील साधारणत: एक ओळ दिसेल एवढा मजकुर ज्यात २-३ वाक्ये बसू शकतात. २००० बाइट साधारणत: एक परिच्छेद व्हावा)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०५, २४ जुलै २०१५ (IST)Reply

विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन

संपादन

मला विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन या प्रकल्पात योगदान द्यायचे आहे. त्यामुळे त्याचा सदस्य होवून दालन पानावर योगदान कसे द्यावे?

पुष्कर पांडे (चर्चा) २०:४८, २४ जूलै २०१५ (IST)

Number of Articals

संपादन

Hi, ‎अभय नातू

I am from Sinhala Wikipedia. Recently the number of our Wikipedia articles have reduced, according to the page count indicators. (This happened in last March.) Did your Wikipedia face this same incident? If you have a time please check this and [reply here]. Thank you.--L Manju (चर्चा) १२:३९, २५ जुलै २०१५ (IST)Reply


Thank you:)--L Manju (चर्चा) २०:२२, २८ जुलै २०१५ (IST)Reply

आषाढी एकादशी

संपादन

आषाढ महिन्यात किमान दोन एकादश्या असतात, शुद्ध आणि वद्य. तिथीची वृद्धी झाली तर आणखीही असू शकतील. यंदा २०१५ साली आधिक आषाढ असल्याने आणखी दोन एकादश्या उद्‌भवल्या.

गेल्या वर्षी २०१४ साली अधिक महिना नव्हता, तरीही दोन शुद्ध आषाढ एकादश्या होत्या. पहिली स्मार्तांची एकादशी, तिला नाव नव्हते; दुसरी आपली नेहमीची एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. या देवशयनी एकादशीलाच सामान्यतः आषाढी एकादशी किंवा नुसती आषाढी म्हटले जाते. वद्य एकादशीचे नाव कामिका एकादशी. हिला मराठी आणि त्यांतही वारकरी लोकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व नसल्याने, आषाढी म्हटले की देवशयनी एकादशीच मनात येते..

अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

लेखाचे नाव आषाढ शुद्ध एकादशी हे बदलून देवशयनी एकादशी केल्यास लेख सहजासहजी सापडणार नाही. तेव्हा देवशयनी एकादशी हे पान आषाढी एकादशी किंवा आषाढ शुद्ध एकादशी कडे पुर्ननिर्देशित करणे योग्य ठरेल. लेखात मी येथे दिलेली माहिती असावी.

चतुर्मास म्हणजे पावसाळी वातावरण असलेले चार महिने. हा काळ आषाढी (शुद्ध) एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापर्यंत असतो. कार्तिक शुद्ध द्वादशीला चतुर्मास नसतो. चतुर्मासाचे महिने द्यावयाचे असतील तर.... आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस असे द्यावे लागेल. २०१४ साली चतुर्मास ८ जुलै ते ३ नोव्हेंबर या कालावधीत होता, तर २०१५ साली तो २७ जुलै ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आहे. .... (चर्चा) १३:५०, २७ जुलै २०१५ (IST)Reply

रशिया

संपादन

अभय,

रशिया हा देश नेमका कोणत्या खंडात आहे? कारण मी बऱ्याचश्या युरोप खंडाच्या नकाशात रशियाचा पश्चिमेकडील काही भाग हा युरोपात असल्याचे पाहिले आहे.

पुष्कर पांडे (चर्चा) २१:१३, ३० जूलै २०१५ (IST)

संपादन

अभय, Navbox अजूनही नीट दिसत नाहीयेत. उदा. लंडन. मी बदल करण्याअगोदर Navbox असेच दिसत होते. बराच वेळ घालवून देखील मला दुरुस्त करण्यात यश आले नाही. I think there is some fundamental difference between coding for English and Marathi Wikipedias that we cannot see. Many templates don't work well here as compared to English Wikipedia. - अभिजीत साठे (चर्चा) १०:२४, ३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply


नमस्कार अभय
CSS मध्ये केलेल्या दुरुस्ती नंतरही एक त्रुटी अजूनही बाकी आहे असे दिसते सर्व दाखवा/लपवा साचे हे लपवा स्थितीत त्यातील कनटेण्ट च्या आकारात छोटे होत आहे. nowrap फकषण चे मध्ये गल्लत असावी. कुपया त्रुटी दुरुस्त केल्यास साचे सुरळीत काम करू शकतील. तसेच साच्यान मध्ये काही इंग्रजी दुवे पण दिसत आहेत त्यांना पण देवनागरीत बदलता आले तर पाहावे, धन्यवाद - राहुल देशमुख १८:१९, ५ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

अनंततनय

संपादन

तुम्ही जेव्हा ’अनंततनय’चे संपादन केले तेव्हा मी भर घातलेली बरीचशी माहिती पुसली गेली. त्यावेळी माझ्या संगणकावर ’अनंततनत’ची एकाच वेळी दोन पाने उघडली गेली होती. त्यांतले योग्य पान निवडून जतन करण्यासाठी मला तुमचे लिखाण उडवावे लागले. विचार असा होता की, सवड मिळाल्यावर काय काय उडाले आहे ते पहावे, तोच आपला संदेश मिळाला. तुम्ही केलेले बदल वाचून कसे आणि काय करायचे ते पाहीन. ... (चर्चा) १२:४४, १३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

धोंडोपंत बाजीराव पेशवे

संपादन
 
अनवधानाने होणारे चुकीचे पुर्ननिर्देशनाचे उदाहरण

नानासाहेब हे टोपण नाव असलेले दोन वेगवेगळे पेशवे होऊन गेले. (दोघांच्याही वडीलांचे नाव बाजीराव पेशवे होते- पण पुन्हा हे दोघे बाजीराव वेगवेगळ्या पिढ्यांमधील होते) १८५७च्या नानासाहेब पेशव्यांचे खरेनाव धोंडोपंत बाजीराव पेशवे आहे त्यांच्या खऱ्यानावाने लेख लिहून बरोबर दुवेही कुणी दिले आहे याची मलाही कल्पना नव्हती.

सोबत जोडलेले छायाचित्र संक्षीप्त आणि टोपणनावाच्या आग्रहांनी काय होते या बद्दल पुरेसे बोलके आहे.


पुन्हा संबंधीत पेशवे स्वत: पेशवे हे पद म्हणून लिहीत की आडनाव म्हणून पण वापरत हा आणखी वेगळा प्रश्न आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०५, १५ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

लेख दिसत नाहीए

संपादन

नमस्कार सर, जयती घोष हा लेख काही कारणास्तव दिसत नाहीए. खाली त्या लेखाची लिंक दिलेली असून https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7 कृपया मदत करावी. --Sandhya Gawali (चर्चा) १३:२९, २१ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

नमस्कार

संपादन

मी ठिक आहे.थोडे काम सुरु केले आहे बऱ्याच वेळेनंतर. अनेक गोष्टी विसरायल्या झाल्या होत्या. उजळणीत येतीलच ताळ्यावर. बाकी आपले क्षेम-कुशलच असेल ही खात्री. चौकशी केल्याबद्दल धन्यवाद.

--वि. नरसीकर (चर्चा) १०:१८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

चित्र समस्या

संपादन
@अभय नातू:
आपण ट्ंकलेला [[चित्र:मे. पुं. रेगे.JPG|इवलेसे|40px|उजवे|मेघश्याम पुंडलिक रेगे - 40px]] हा सिंटॅक्स जसाच्या तसा कॉपीपेस्ट करून वापरला तर त्यात px च्या ठिकाणी पक्ष काम करते. आकडे बदलून चित्र लहान मोठे सुद्धा होते.(तुम्ही स्वत: टंकलेल्या सिंटॅक्स मध्ये 'पक्ष' काम करत नाही आहे का ? हे वेगळे तपासून पहावे). त्या शिवाय चित्रा खालचा मजकुरही दिसू लागतो.
श्रीनिवास हेमाडींना आलेली अडचण मला नेहमीच सर्व ब्राऊजर मधून इर्रेस्पेक्टीव्ह ओफ एनी इनपुट मेथड येते. त्यामुळे हि अडचण येऊ नये म्हणुन नेहमीच इतरांचा सिंटॅक्स जसाच्या तसा कॉपीपेस्ट करून वापरत आलो आहे. हेमाडी आणि मला जाणवणारी समस्या px एवजी पक्ष वापरल्यामुळे नसावी.
[[, |, ]] हि तिन्ही चिन्हे टंकल्यावर इतर वेळी व्यवस्थीत काम करतात केवळ चित्रासाठी बगमुळे त्रास देत राहतात. असे का होत असेल हे समजले नाही बग कसा रिप्रोड्यूस करावयाचा माहित नसल्यामुळे आणि अशी अडचण आहे म्हणजे माझ्या एकट्याच्या संगणकाचा काही प्रॉब्लेम आहे समजून सहन करत होतो आता बग रिपोर्ट केलेला बरा असेल असे दिसते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:१८, २४ ऑगस्ट २०१५ (IST)Reply
ता.क. ऐन बग फाईल करण्यापुर्वी पुन्हा तपासले तर व्यवस्थीत काम करते आहे पण असेच मध्येच काम होते मध्येच अडचण येते त्यामुळे बग फाइल कसा करावा असा प्रश्न पडत राहतोय माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५९, २४ ऑगस्ट २०१५ (IST)Reply

राईट बंधू

संपादन

साम्राज्यवाद या लेखातील राईट बंधूंच्या दोन फोटोंना एकत्रीत राईट बंधू असे नाव देता येईल का? देता येत असल्यास सांगावे.

Pushkar Pande (चर्चा) २१:१०, २४ आॅगस्ट २०१५ (IST)

विकीमीडिया काॅमन्स

संपादन

विकिमीडिया कॅामन्सवर एखादे नवीन चित्र कसे चढवता येईल?

Pushkar Pande (चर्चा) १३:२८, १ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

विकिपीडिया Upload Wizard मधील Release rights या काॅलम मध्ये This file is my own work असे लिहावे की This file is not my own work असे लिहावे?

पुष्कर पांडे (चर्चा) १९:२५, ४ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

मी काही चित्रे इंटरनेटवरून घेतली असल्याने त्यांचे Author माहित नसतात. मग काय लिहावे?

Pushkar Pande (चर्चा) १८:०२, ५ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

Weatherbox

संपादन

अभय, मी recently साचा:माहितीचौकट हवामान बदलला कारण पहिला साचा चालत नव्हता. नवा साचा बरा दिसतोय पण रंग गायब झालेत व dual units डिस्प्ले होत नाहीयेत. Unfortunately, I have very little experience working on Modules. Do you know how to debug and make things right. उदा. पहा: हो चि मिन्ह सिटी - अभिजीत साठे (चर्चा) १०:१७, २९ सप्टेंबर २०१५ (IST)Reply

  झाले.. विभाग:Math ह्यामध्ये थोडे बदल केले. आता व्यवस्थित दिसत आहे.

हॉटकॅट

संपादन

अभय, which pages are you referring to? माझ्या अकाउंटमध्ये व्यवस्थित चालू आहे हॉटकॅट. Please keep in mind that Hotcat will not work if the category is included inside a template. उदा. जन्म दिनांक आणि वय हा साचा वापरल्यास जन्मवर्ग आपोआप लावला जातो व तो हॉटकॅटने एडिट करता येत नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ०७:०२, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

साहाय्याची विनंती

संपादन

दालन:विशेष लेखन चा दालन:विशेष लेखन/सद्य हा मधला भाग आहे. दालन:विशेष लेखन/सद्य हे विभागाचे नाव कितपत उपयूक्त आहे ते माहित नाही बदलले तरीही चालेल. बेसिकली विकिपीडियावरील मुखपृष्ठावर येऊन गेलेले, येऊ घातलेले आणि इतर चांगले लेख प्रदर्शित करणे असा या विभागाचा मुख्य उद्देश आहे. सध्याचा त्या विभागाचा (उपपानाचा) ढाचा तारीखवार आहे , तो बदलून रॅंडमली विशेष लेख प्रदर्शीत करण्याची सुविधाही चालेल मुख्य म्हणजे आपल्याकडे हे करण्यासाठी माणूसबळाची कमतरता आहे तेव्हा विशेषलेख आपोआप सलेक्ट होऊन प्रदर्शित केले जातील अशा पद्धतीने दालन:विशेष लेखन/सद्य (किंवा त्याचे नाव बदलून) अद्ययावत करण्यात आपल्या सक्रीय साहाय्याची विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१५, ५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

दिनाविशेष

संपादन

तुमचे suggestion पटते. सध्या आज संपादन केलेल्या पानांमध्ये बदल करतो. चर्चा:ऑक्टोबर १५ येथे एक प्रश्न टाकला आहे. तो पण बघावा. - प्रबोध (चर्चा) १०:११, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

दोन व

संपादन

>>हे दोन व संस्कृतमध्ये लिहिताना वेगळी अक्षरे वापरली जातात का? असल्यास उदाहरणे कोठे सापडतील?<<

हे दोन ’व’ स्वतंत्रपणे दाखविण्याची सोय संस्कृतमध्ये नाही. पण ’वकारस्य दंतोष्ठम्‌’ हे सूत्र आणि पाणिनीय शिक्षेतली ’दंतोष्ठयो वः’ ही ओळ प्रसिद्ध आहे. म्हणजे संस्कृतमधला नेहमीचा व हा दंत्य+ओष्ट्य आहे. याचा अर्थ तो उच्चारताना ओठावर दात रोवायला पाहिजेत. इंग्रजी व्ही चा उच्चार करताना असेच दात ओठावर ठेवावे लागतात. म्हणजे व्ही चा उच्चार दंत्योष्ठ्य आहे.

उ+अ मिळून जो व बनतो तो उच्चारताना किंवा Woman मधला W चा उच्चार करताना दात ओठावर ठेवावे लागत नाहीत, त्याअर्थी हे दोन्ही व एकसारखेच असावेत.

एकसारख्या दिसणार्‍या दोन चिन्हांसाठी काही वेळा संस्कृतमध्ये एकच चिन्ह वापरले जाते. उदा० संस्कृतमध्ये लिहिल्या जाणार्‍या यःकश्चित्‌, दुःख आदी शब्दांमध्ये जे विसर्गसदृश चिन्ह आहे, तो विसर्ग नाही. त्याला संस्कृतमध्ये जिव्हामूलीय म्हणतात. त्याचा उच्चार क्‌ किंवा ख्‌ सारखा होतो. यःकश्चित्‌, दुःख या शब्दांचे उच्चार अनुक्रमे यहाकश्चित्‌, दुहुख असे न होता, यक्‍कश्चित्‌, दुख्ख असे होतात. एक विसर्ग चिन्ह पण दोन उपयोग याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

दुसरे उदाहरण - ’कःपदार्थ’ मधील विसर्गसदृश चिन्हाला विसर्ग नाही तर उपध्मानीय म्हणतात. या चिन्हाचा उच्चार प्‌ सारखा होतो. कहापदार्थ नाही तर कप्‌पदार्थ. (वि.सू. - अधःपतनमध्ये विसर्ग आहे, उपध्मानीय नाही, म्हणून उच्चार अधह्‌पतन.) उपध्मानीयाचे चिन्ह आणि विसर्गाचे चिन्ह सारखेच दिसते. .... (चर्चा) १४:२२, २४ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

भाषांतरे

संपादन

मागील पूर्ण महिन्यात ट्रांसलेट विकिवर राहून, आपल्या विकिमधील, विशेष पानांमधील, गॅजेटमधील, बीटा मधील व इतर अनेक अशी जवळपास १८८० भाषांतरे माझ्याद्वारे पूर्ण करण्यात आलीत.त्यादरम्यान अनेकदा, योग्य शब्द सापडत नसल्याने पुष्कळ वेळ खर्च झाला पण ते काम नेटाने पूर्ण केले.

हे सर्व सांगायचे कारण असे कि, विकिच्या वापरादरम्यान भाषांतराबाबत,आपणास किंवा इतर कोणासही काहीही त्रूटी, कमतरता आढळल्यास, विनंती आहे कि कृपया मला कळवावे/चर्चा करावी किंवा मोठ्या मनाने ट्रांसलेट विकिवर जाउन ती दुरुस्त करावी.

ता.क.-१) मी केलेल्या भाषांतरांचे मीच पुनरावलोकन करु शकत नाही. यात कोणीतरी मदत केली तर बरे होईल. ती भाषांतरे मार्गी लागतील. २) तेथिल माझा सध्याचा धावफलक ८८८४ आहे.[१]

विकिपीडिया आशियाई महिना

संपादन

नमस्कार ,

विकिपीडिया आशियाई महिना ह्याचे भाषांतर तर झाले पण हे लिखाण मुख्य नामविश्वात असावे कि विकिपीडिया नामविश्वात ? कि चावडीवर ? ते ठरवून मग तसे हलवावे अन्यथा अश्या आशयाच्या लिखाणाची मुख्य नामविश्वात लिहिण्याची परंपरा पडावी का ? आणि तसे मान्य केल्यास लिखाणाची शैली कशी असावी ? सध्या ती नोटीसी सारखी दिसते आहे . कुपया लक्ष्य घालावे - Nankjee (चर्चा) १२:५६, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply

मोल्सवर्थ

संपादन

>>.मोल्सवर्थ म्हणेल ते ब्रह्मवाक्य हा समज फोल आहे. मोल्सवर्थ यांच्या कामाचे मोल (हा!) करणे अशक्य आहे. त्यांनी मराठी भाषेला दिलेली देणगी अत्युच्च कोटीतील आहे यात थोडाही संशय नाही<<

स्थानिक नावे या विषयात मोल्सवर्थ कुठून आला, हे समजले नाही; कदाचित विकीवरचा काही मजकूर माझ्या वाचनात आला नसावा. असो, पण ते महत्त्वाचे नाही. मोल्सवर्थने नेमके काय आणि किती केले याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मोल्सवर्थची डिक्शनरी म्हणून जी ओळखली जाते, ती मुळात कँडीने बनवलेली आहे. मोल्सवर्थ ई्स्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मेजर होता. त्याने मराठी-इंग्रजी शब्दकोश तयार करायला सुरुवात केली खरी, पण त्याला ते काम जमेना. त्या सुमारास इंग्लंडहून मराठी शिकून आलेला कॅप्टन थॉमस कँडी त्याच्या हाताखाली आला. मोल्सवर्थने कोशाची सर्व जबाबदारी कँडीवर टाकून तो बाजूला झाला. कँडीने कोशासाठी किती मेहनत घेतली ते सांगायला एक स्वतंत्र लेख लिहायला पाहिजे. तयार झालेल्या कोशावर, कोणत्याही प्रबंधावर असते त्याप्रमाणे सीनियर मोल्सवर्थचे नाव कँडीच्या नावाआधी आले.

या कोशाला तत्कालीन विद्वान कँडीचा कोश म्हणत, मोल्सवर्थचा नाही. कँडी पुण्यातल्या ब्राह्मणांत इतका मिसळून गेला होता, की जेव्हा त्याचे महाबळेश्वरात निधन झाले तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मणांनी सुतक पाळले. .... (चर्चा) १७:१६, ६ नोव्हेंबर २०१५ (IST) ---Reply

कँडीचे शब्द मिळवण्यासाठीचे प्रयत्न

संपादन

कँडीनॆ शब्द मिळवण्यासाठी कोंकणात, खानदेशात आणि देशावर ब्राह्मण पाठवले होते. शब्द निवडण्यासाठी चार-पाच खोल्या होत्या. पहिल्या खोलीत शब्द जमा होत. तिथून एकेक शब्द दुसऱ्या खोलीत जाई. तेथे शब्द नवा आहे, की आधीच आलेला आहे याची तपासणी होई; तिसऱ्या खोलीत अर्थाची छाननी होई; शेवटच्या खोलीत स्वत: कँडी काही विद्वानांशी चर्चा करून शब्दाचा अर्थासकट स्वीकार करी व अशा मेहनतीने जमा झालेल्या शब्दाचा क्रम लावला जाई. मोल्सवर्थने असले काही केले नव्हते. त्याने पुण्यातल्या पुण्यात शब्द जमा करून त्यांची जंत्री करून कोशाच्या कामाला सुरुवात केली होती. अर्थात हेही काही कमी नव्हते. ... (चर्चा) १६:२६, ७ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply


कॅंडींनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे अशी: १) A Dictionary of Murrat,hi and English, Molesworth and Candy Brothers, 1831, २) A Dictionary of Marathi and English, Molesworth and Candy Brothers, 1857, बॉंबे एज्युकेशन सोसायटी छापखाना ३) A Dictionary of English and Marathi, 1847, अमेरिकन मिशन छापखाना, ४) A Dictionary of English and Marathi, 1873, 2nd Ed, गणपत कृष्णाजी छापखाना, ५) नीतिज्ञानाची परिभाषा (The Principles of Morality, D.A.Isdale ह्याचे भाषांतर), १८४८, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ६) कर्तव्यकर्माचा विचार (The Principles of Morality, D.A.Isdale ह्याचे भाषांतर), १८५१, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ७) वाचनपाठमाला (इंग्रजी गोष्टींचे भाषांतर), १८५०, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ८) हिंदुस्तानचे वर्णन (भूगोल, इतिहास, व्यापार इ.) १८६०, गणपत कृष्णाजीचा छापखाना, ९) भूगोलाचे वर्णन, भा. १, १८६३ आणि १८६५, इंदुप्रकाश छापखाना, १०) भाव कोणावर ठेवावा याचा विचार, १८७५, बाँबे ट्रॅक्ट ॲन्ड बुक सोसायटी, वगैरे. मोल्सवर्थने काही पुस्तके लिहिल्याचे माहीत नाही. ... (चर्चा) १६:४३, ७ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply

वैश्विक भाषा वरणित्र (यूनिव्हर्सल लॅग्वेज सिलेक्टर)

संपादन

आपल्या विकिच्या कडपट्टीमध्ये असलेल्या वैश्विक भाषा वरणित्रात,(न टिचकता बघितले तर त्या कळीतील) मूळ संकेत भाषांतरीत संदेशासह योग्य तऱ्हेने(त्यात सुरुवातीचा एक '{' हा न टाकल्यामुळे ) ते योग्य तऱ्हेने दिसत नाही. कृपया ही बाब विकिच्या योग्य त्या अधिकाऱ्याचे निदर्शनास आणुन ती चुक दुरुस्त करवावी ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा) १३:३८, ९ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply

आता हे काम झाले आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) २०:१२, १३ नोव्हेंबर २०१५ (IST)Reply

Translation notification: Wikimedia Highlights, October 2015

संपादन
Hello अभय नातू,

You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Wikimedia Highlights, October 2015 is available for translation. You can translate it here:



Please consider helping non-English-language Wikimedia communities to stay updated about the Wikimedia blog's most notable posts from October, covering Wikimedia Foundation activities and other important events from across the Wikimedia movement. Completed translations will be announced on social media, project village pumps and (for some languages) mailing lists.

Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.

You can change your notification preferences.

Thank you!

Meta translation coordinators‎, ०६:०२, १३ नोव्हेंबर २०१५ (IST)

Request for endorsement

संपादन

Hi Abhay, I am Santoshi, President- Nashik Wikipedia club. For conference at Delhi, i applied few days back. Fortunately, I have been selected. But there are two names. My purpose to visit this conference is to represent Marathi Wikipedia and community. I need endorsements so that I can proceed for the same. My contribution to Marathi Wikipedia: Leading team of 15 in Nashik, Modified and updated Marathi Wiki page and involved in many projects. Proposed bid for Nashik for Wiki Conference India 2016. Please endorse for me. Thank you

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा २७".