चर्चा:बास्तीय

Active discussions

बास्तीय की बॅस्टिल?संपादन करा

हे बास्तीय नसून बॅस्टिल असावे.

Pushkar Pande (चर्चा ) १२:२४, १९ जानेवारी २०१५ (IST)

Bastilleचा मूळ फ्रेंच उच्चार बास्तीय आहे.
अभय नातू (चर्चा) २२:०३, १९ जानेवारी २०१५ (IST)

पण मुळ उच्चारापेक्षा सध्या प्रचलित असलेल्या उच्चाराचांच वापर केल्याने लेख लवकर सापडण्यास जास्त मदत होते.

Pushkar Pande (चर्चा) १२:४४, ३१ जानेवारी २०१५ (IST)

खरी गोष्ट आहे. अमराठी शब्दाचे प्रचलित मराठी लिखाणच प्रमाण समजले पाहिजे. फ्रेन्चसारख्या अनेक परभाषांतील शब्दांचे उच्चार मराठी लिपीत लिहिणे शक्य नसते, त्यासाठी प्रत्येक उच्चाराचे मराठीकरण करूनच ते शब्द मराठीत लिहिण्याची प्रथा आहे. जगातील अन्य भाषा हीच प्रथा पाळतात...J (चर्चा) १४:०६, ३१ जानेवारी २०१५ (IST)

यावरून पूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे.
१. पण मुळ उच्चारापेक्षा सध्या प्रचलित असलेल्या उच्चाराचांच वापर केल्याने लेख लवकर सापडण्यास जास्त मदत होते.
मूळ उच्चाराचा लेख आणि प्रचलित उच्चार (आणि इतर उच्चार) यांकडून पुनर्निर्देशन असल्यास शोधण्यात कोणताही फरक पडत नाही.
२. प्रत्येक उच्चाराचे मराठीकरण करूनच ते शब्द मराठीत लिहिण्याची प्रथा आहे.
कुठे? इतरांनी ही प्रथा केली यामागची कारणे अनेक आहेत. पैकी बरीच कारणे कालबाह्य झालेली आहेत. मराठी/देवनागरीमध्ये जे उच्चार लिहिता येत नाहीत त्यांचे मराठी/देवनागरीकरण (शक्यतो मूळ उच्चाराच्या जवळ राहून) करणे मान्य आहे परंतु जेथे गरज नाही तेथे उगीचच मराठीकरण ठोकण्यात हशील नाही.
३. जगातील अन्य भाषा हीच प्रथा पाळतात.
असतील आणि त्यामुळेच बॉम्बे, मॅड्रास, पंजिम, रामा, क्रिश्ना, घँडी, मराट्टा असले धेडगुजरी शब्द आपल्या पदरात पडतात. प्रत्येक भाषेने/देशाने आपआपले धोरण ठरवावे परंतु मराठी विकिपीडियाने स्वतःची कमतरता (उच्चार, लिखाणाची) इतरांच्या माथी मारू नये. #३ हा अगदी कळीचा मुद्दा नसून तत्त्वाचा प्रश्न आहे पण तरीही छोटा का होईना मुद्दा आहेच. :-)
अभय नातू (चर्चा) ००:२७, २ फेब्रुवारी २०१५ (IST)
"बास्तीय" पानाकडे परत चला.