सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा १५

Active discussions

चित्तासंपादन करा

The image of cheetah range (image:Cheetah range.gif) does not appear in चित्ता article, please help

अजयबिडवे १५:५९, १७ जून २००८ (UTC)

Bot flag for WikiDreamer Botसंपादन करा

What happens to my request? --WikiDreamer १९:०८, २४ जून २००८ (UTC)

When you will decide, please contact me here. Thank you. --WikiDreamer २१:१६, ८ जुलै २००८ (UTC)

इ.स. अबकसंपादन करा

व्याकरणाप्रमाणे जागा सोडणे आवश्यक आहे. म्हणून "इ.स. अबक मधील" हे बरोबर आहे.

तसेच प्रत्येक वर्षाप्रमाणे घेण्यास भाषेनुसार चित्रपट लेख कमी आहेत.

i am correcting all the articles to make sure that they are following same trend.

thanks

सुभाष राऊत ०५:२१, २५ जून २००८ (UTC)

नो प्रोब्लम, मी तो बदल करतो.
सुभाष राऊत ०५:३२, २५ जून २००८ (UTC)

अबकमधील/अबक मधीलसंपादन करा

अभय, तुम्ही व सुभाष यांच्यामधील चर्चेत कुठल्या व्याकरणविषयक संदर्भांची/ नियमांची चर्चा झाली ते सापडले नाही. कृपया कुठल्या संदर्भातून तुम्हाला ही माहिती कळली ते सांगावे.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:५७, २६ जून २००८ (UTC)

अभय, काही उदाहरणे देतो. ’भारतामधील’(भारता मधील नव्हे), ’पुण्यामधील’ (पुण्या मधील नव्हे), ’गंगेमधील (गंगे मधील नव्हे). कारण ’मधील’ हा स्वतंत्र शब्द म्हणून वापरला जात नसून विभक्तिप्रत्ययासारखा वापरला जातो. त्यामुळे इतर विभक्तिप्रत्ययांसारखाच तो आधीच्या शब्दाचे रूप बदलवतो आणि आधीच्या शब्दास जोडला जातो. सुभाष यांनी सांगकामे वापरून जर काही बदल केले असतील तर दुरुस्तीचे काम करावे लागेल.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:१९, २६ जून २००८ (UTC)

Dear Sir,

I am not sure to put this request. Today I just opened the Telugu Wiki and hindi Wiki. There one can edit in Devnagari or Telugu script directly in the Edit box. Can we do it for Marathi wikipedia too. Currently we are using external sites like Gamabhana or Baraha etc. Please don't take me wrong. I know this issue has been discussed before. But I think Hindi Wikipedia has recently started this.

129.69.23.120 ११:२९, ७ जुलै २००८ (UTC)

माहिती चौकट सेनानीसंपादन करा

 • मी काही सेनापतींवरचे लेख संपादित केले आहेत व अजून काही जसे जमतील तसे करायचे आहेत. उदा आर्थर वेलेस्ली, जोन ऑफ आर्क, जर माहिती चौकट उपलब्ध असेल तर मी जरूर वापरेन.
 • हिंदी विकी वरती देवनागरी मध्ये संपादन करायची सोय सूरू केलेली आहे, मराठी विकीवर पाहिजे असल्यास काय करावे लागेल. ह्या विनंतीवर पहिले पण अनेकांनी चर्चा केलेली आहे. ही केवळ विनंती आहे, कृपया राग-लोभ नसावा. मी संपादन करताना बाहेरील साईटस वापरतो व कॉपी पेस्ट करून मराठी विकी वर टाकतो. जर मराठी विकीवर डायरेक्ट मराठीत टंकलेखन उपलब्ध झाले तर कॉपी पेस्ट ची झंझट कमी होईल एवढेच. परंतु माझ्यामते जर चुका (मी स्वता: खूप चुका करतो) सुधारायच्या असतील तर डायरेक्ट टंकलेखन केव्हाही बाहेरील साईटस वरील टंकलेखनापेक्षा सोयीस्कर आहे.

अजयबिडवे १२:४५, ९ जुलै २००८ (UTC)

संगणक विज्ञान → タチコマ robotसंपादन करा

I own both accounts. This request is to unify all of my bot accounts for SUL. Thanks. -- Cat chi? १०:५०, ११ जुलै २००८ (UTC)

विकिपिडियावरील buttons आणि tooltipsसंपादन करा

विकिपिडियावरील buttons आणि tooltips वरील मराठीकरण काही ठिकाणी अजून चपखल करणे शक्य आहे असे वाटते. हे कोठे करता येते, हे फक्त admins ना करता येते का? उदा: IMHO "हे पान सुरक्षित आहे, तुम्ही ह्याचा स्रोत पाहू शकता" येथे "सुरक्षित" शब्दाऐवजी "संरक्षित" शब्द अधिक बरोबर वाटतो. असे बदल करायचे झाल्यास कोठे करावे, व regular user ला ते करता येतात का? Ctcliff ०८:१९, १३ जुलै २००८ (UTC)

request for help with SUL problem.संपादन करा

Hi ,

I am contacting you since I have a problem with my SUL login( see this discussion[१]. I had created this id "डी. डी." and made some edits. However I had not authenticated the emailaddress. Recently I created a SUL ID with the same name as my English Wikipedia login (Deepak D'Souza). NOw I am fcing the prblem that my original ID "डी. डी." has not been linked to the SUL and instead a new ID has been created on th Marathi wikipedia (with the name: Deepak D'Souza). Kylu has suggested that "Deepak D'Souza" can be renamed to "Deepak D'Souza unused" and then "डी. डी." can be renamed to "Deepak D'Souza". Will it be possible for you to do that . If it creates a problem then I will get my SUL deleted before renaming. I do not wish to keep two sepearate logins. Please reply below this message itself so that can keep a watch. Thanks in advance. --डी. डी. १९:१७, १६ जुलै २००८ (UTC)

I cannot locate the change username page on this Wikipedia. Can you tell me please. Myt SUL problem has been fixed on the Simple English wikipedia . only this one is remaining.--डी. डी. ०९:०७, २२ जुलै २००८ (UTC)

Done.

अभय नातू २०:१९, १ ऑगस्ट २००८ (UTC)

मझ सदस्यनाव बदलन्यासाठि धन्यवाद. thanks a million! :-). --Deepak D'Souza १८:३३, २३ ऑगस्ट २००८ (UTC)

Changes pertaining to National Awardsसंपादन करा

Hi Abhay, i reverted your changes pertaining to year

i.e. १९९७

because most of the times movie get award a year later thus we cannot point it.

सुभाष राऊत १३:३८, २० जुलै २००८ (UTC)

इटलीतील शहरेसंपादन करा

अभय, ते काम करून मी ’वर्ग:इटलीतील शहरे’हा वर्ग उडवला आहे. आता सर्व लेख ’वर्ग:इटलीमधील शहरे ’वर्गात आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:३५, २२ जुलै २००८ (UTC)

भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीसंपादन करा

अभय, धन्यवाद, तुमच्या सूचनेसाठी. मी महाराष्ट्र आणि आंन्ध्र प्रदेश वर बदल करतो. तुम्ही इतर चालू ठेवा.
Padalkar.kshitij ०१:०३, २८ जुलै २००८ (UTC)

लोकसभा सदस्य प्रकल्पसंपादन करा

Thanks for the support, i guess we should go for project loksabha than 14th loksabha because sooner we would be having 15th loksabha.

for the timebeing lets start off with प्रकल्प:लोकसभा. i feel even though it looks bigger project but once primary templates are fixed it would be easier. for reference we have loksabha.nic.in

thanks

सुभाष राऊत ०६:१४, २८ जुलै २००८ (UTC)

धन्यवादसंपादन करा

अभय,
गौरवासाठी धन्यवाद.
पण अजून दिल्ली (i mean दिल्ली लोकसभा मतदारसंघ) बरीच दूर आहे. :)
ते कोंढाण्याचे लगीन झाले की दिमाखाने लावेल गौरवचिन्ह.
Padalkar.kshitij ०२:३७, ३० जुलै २००८ (UTC)

लोस२००४ साचासंपादन करा

तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी यावर नक्कीच काम सुरु करतो.

सुभाष राऊत ०४:१२, ३१ जुलै २००८ (UTC)

लोकसभा मतदारसंघ खासदार सूचीसंपादन करा

ही सूची आवडली, पण काही मतदारसंघांमध्ये bi-elections झाले होते.
तेथे एकाच लोकसभेसाठी २ नेत्यांचा उल्लेख हवा, ते या सूचीने करता येऊ शकते का? नाहीतर यात बदल करावा लागेल.
Padalkar.kshitij २२:५९, १ ऑगस्ट २००८ (UTC)

१४ वी लोकसभा लेखाचे स्वरूप मस्त बनले आहे.
Leader of the House ला काय म्हणतात?
इतर पाने याच स्वरूपात तयार करतो.
Padalkar.kshitij ०२:३३, २ ऑगस्ट २००८ (UTC)

collapsible table supportसंपादन करा

जर लोकसभा लेखांमधील जर संसदसदस्यांची यादी असलेला टेबल collapsible करता आला, तर ते चांगले ठरेल.
But on the Help:Collapsing page it is mentioned that this feature is not part of MediaWiki and should be added to the common.js.
Should we add this functionality?
Padalkar.kshitij ०२:३७, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

हो,..पण मराठी विकिवरील collapsible table Firefox 3 मध्ये काम करत नाहीत...पण IE मध्ये काम करतात.
इंग्रजी विकिमधील collapsible table दोन्ही मध्ये बरोबर काम करतात...असे का?
Padalkar.kshitij ०२:५२, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

Bot username renameसंपादन करा

Hi, I'd like my bot सदस्य:संगणक विज्ञान to be renamed to User:タチコマ robot. This rename request is per my wikimedia wide bot username rename. I have decided to have a single username to more efficiently use SUL. Thanks.

 • If this is not the right place to make this request, please move it to the right place.

-- Cat chi? १५:४७, १३ ऑगस्ट २००८ (UTC)

Done per m:Steward requests/Username changes. —Pathoschild ००:०६:४२, ०६ सप्टेंबर २००८ (UTC)

Convert Templateसंपादन करा

Dear Abhay

I have nearly completed work on conversion for length sub. Chceck the {{Convert/list of units/length/short list}} for a detailed view of units covers also your help is required to translate following words

 • alternative
 • abbreviation
 • conversion factor/m
 • combinations

Maihudon ०८:२१, १४ ऑगस्ट २००८ (UTC)

Usageसंपादन करा

You can see some exapmle on सदस्य:Maihudon/temp. I am trying solve the error, i guess that is due to formatnum function used in template, I guess this particular function returns numbers in devnagari and that is causing the error in expressions/ equtions, which can handle only english number.

Maihudon ०८:१९, १५ ऑगस्ट २००८ (UTC)

भाषांतर मदतसंपादन करा

अभय,
मला महात्मा गांधीजींच्या लेखाच्या भाषांतरात थोडी मदत हवी आहे.
माझ्या धूळपाटीवर कच्चा आराखडा आहे, कृपया त्यातील एक-दोन वाक्यांचे भाषांतर सुचवावे
Padalkar.kshitij ०१:१९, १५ ऑगस्ट २००८ (UTC)

Re:आर्जेन्टीनासंपादन करा

नमस्कार,

स्पॅनिशमध्ये आर्जेन्टिनाचे स्पेलिंग Argentina असे लिहिली जाते. यात ’i’ चा उच्चार र्‍हस्व ’इ’ असा होतो. स्पॅनिशमध्ये दीर्घ ’ई’ साठी ’í’ हे अक्षर वापरतात. स्पॅनिशमधले दीर्घ उच्चार हे मराठीप्रमाणे जाणवण्याइतपत दीर्घ असतात. शिवाय शब्द लिहिताना उच्चार दीर्घ असल्यास तसे दाखवण्याची सोय आहे. त्यामुळे मूळ उच्चाराचे मराठीकरण करताना र्‍हस्व इ वापरून ’आर्जेन्टिना’ असे केले आहे. वास्तविक हे नाव ’आर्हेन्तिना’ असे लिहावयास हवे. मात्र ’आर्जेन्टिना’ हा उच्चार प्रचलित असल्यामुळे नावात केवळ र्‍हस्व-दीर्घाची सुधारणा केली आहे.

--संकेत अंधारीकर ०७:१७, ३० ऑगस्ट २००८ (UTC)

नमस्कार,

आर्जेन्टिना या लेखाच्या चर्चेत व तुम्ही दिलेल्या संकेतस्थळांवरचे उच्चार ऐकले. ही संकेतस्थळे मूळ शब्दांचे इंग्रजी उच्चार दाखवणारी आहेत, स्पॅनिश उच्चार दाखवणारी नाहीत. उच्चारांसाठी संदर्भ म्हणून इंग्रजीचा वापर हा काही फार चांगला पर्याय नव्हे. इंग्रजीत उच्चाराचे खास नियम नाहीत हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे इतर पर्याय नसतील तरच इंग्रजीचा वापर उच्चारांसाठी संदर्भ म्हणून करावा असे माझे मत आहे. इंग्रजी वगळता दुसरी एखादी परकीय भाषा येत असेल तर त्या भाषेतील लिखाणाचे भाषांतर करताना इंग्रजीच्या कुबड्या आधारासाठी घेण्याची काही गरज नाही. मराठीप्रमाणेच स्पॅनिशमध्ये स्वरांचे र्‍हस्व-दीर्घ उच्चार हे शब्दांच्या अर्थाशी संबंधित असतात. खासकरून क्रियापदाचा काळ दर्शविण्यासाठी स्पॅनिशमध्ये र्‍हस्व-दीर्घ उच्चार वापरले जातात. स्पॅनिश शब्दांचे भाषांतर करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते.

चर्चेत म्हटले आहे की ’अर्जेंटिना’ असे मराठी वृत्तपत्रांमध्ये आणि वेबपानांवर छापले जाते. हा इंग्रजी उच्चाराचा प्रभाव आहे. मात्र इथे एक फरकही आहे. Argentinaतल्या -tinaचा उच्चार इंग्रजीत दीर्घ होतो (-टीना), तर मराठीत र्‍हस्व (-टिना) जो मूळ स्पॅनिश उच्चारासारखा आहे. मराठीतला उच्चार जर अर्धा बरोबर असेल तर तो पूर्ण बरोबर करण्यास हरकत नसावी. इंग्रजीचा आधार घेण्याची प्रवृत्ती जशी कमी होत जाईल तसे परभाषेतल्या शब्दांचे मूळ उच्चार वृत्तपत्रांमध्ये पहायला मिळतील अशी मला खात्री आहे.

--संकेत अंधारीकर ०८:१२, ३० ऑगस्ट २००८ (UTC)

ता.क.:- स्पॅनिश उच्चारांकरता खालील दुवे पहा. यात आर्जेन्टिना या शब्दाचा उच्चार नसला तरी स्पॅनिश उच्चारांची (विशेषत: स्वरांच्या उच्चारांची)कल्पना येऊ शकेल.

http://www.practique-espanol.com/pronunciacion.htm http://es.wikipedia.org/wiki/Transcripci%C3%B3n_fon%C3%A9tica_del_espa%C3%B1ol_con_el_AFI http://www.uiowa.edu/~acadtech/phonetics/spanish/frameset.html

--संकेत अंधारीकर ०८:५३, ३० ऑगस्ट २००८ (UTC)

सद्य घटना/ स्प्टेंबर २००८संपादन करा

नमस्कार,

सद्य घटना/ स्प्टेंबर २००८ चे पान तयार करण्यासाठी मदत हवी आहे.

--संकेत अंधारीकर ०८:५१, २ सप्टेंबर २००८ (UTC)

नमस्कार,

सद्य घटना/ स्प्टेंबर २००८ चे पान मी नुकतेच, अगदी एक मिनिटापूर्वी तयार केले आहे. या पानाचे दुवे तपासून बघत आहे. तुम्ही देखील दुवे पुन्हा तपासून बघा.

--संकेत अंधारीकर २०:०३, २ सप्टेंबर २००८ (UTC)

साल्व्हादोर अलेंदेसंपादन करा

नमस्कार,

साल्व्हादोर अलेंदे या लेखाचे मूळ नाव ’साल्वादोर आयेंदे’ हे बरोबर होते. कृपया मूळ नावानुसार पुन: स्थानांतर करावे.

--संकेत अंधारीकर १२:५०, १० सप्टेंबर २००८ (UTC)

हा उच्चार आयेंदे (a-llen-de) असा आहे. a = आ; ll+e+n = य+ए+न = यें; d+e = द+ए= दे

--संकेत अंधारीकर १५:४३, १० सप्टेंबर २००८ (UTC)

धन्यवादसंपादन करा

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. यापुढे काळजी घेईन. कृपया मी करत असलेले पानांचे वर्गीकरण बरोबर होत आहे याकडे देखील लक्ष असू द्यावे. सौरभदा ०५:३५, ११ सप्टेंबर २००८ (UTC)

बंगालचा अखातसंपादन करा

अभय, 'बंगालचा अखात' हा शब्दप्रयोग अशुद्ध लिहिलेला आणि व्याकरणदृष्ट्या चूक आहे. मुळात 'अखात' असे लिहिले जात नाही; 'आखात' हे शुद्ध लेखन आहे. आणि Gulf या शब्दाकरता 'आखात' हा शब्द योजला जातो. Bay करता 'उपसागर' किंवा 'खाडी' हे शब्द योजले जातात. शिवाय 'आखात' हा शब्द पुनर्निर्देशात योजायचाच आग्रह असेल तर किमान त्याचे लिंग तरी नीट लिहिणे आवश्यक आहे. 'आखात' हे पुल्लिंगी नाम नसून नपुंसकलिंगी नाम आहे. त्यामुळे 'बंगालचे आखात' हा शब्द योग्य ठरला असता. हवाच असेल तर हा शब्द पुअनर्निर्देश म्हणून वापरायला हरकत नाही. बंगालचा अखात' हा शब्द एकंदरीतच चुकला असल्यामुळे मी तो हातासरशी उडवला.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:३४, १२ सप्टेंबर २००८ (UTC)

re:सान्तियागो (निःसंदिग्धीकरण)संपादन करा

सान्तियागो (निःसंदिग्धीकरण) तपासत आहे. --संकेत अंधारीकर ०२:५९, १३ सप्टेंबर २००८ (UTC)

en:Vithobaसंपादन करा

Does an article about Vithoba exist on this wiki? Is yes, wikilink.--59.183.31.34 १५:०७, १४ सप्टेंबर २००८ (UTC) (en:user:Redtigerxyz)

Helpसंपादन करा

Regarding: https://secure.wikimedia.org/wikipedia/en/wiki/User_talk:Rlevse#Pengguna:Rlevse_on_w:mr

I tried to move it but I think I goofed. Please move for me. Sorry for the trouble and thanks for the help. When done, please post to my user page a link to the proper page of my mr home page. Thank you much. Rlevse ०१:३२, १५ सप्टेंबर २००८ (UTC)

रद्दीकरणसंपादन करा

नमस्कार,

मराठीवर्ल्ड आणि शुक-रंभा संवाद हे लेख काढून टाकावेत का? --संकेत अंधारीकर १६:०५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

 • मराठीवर्ल्ड हा लेख Mahitgar यांनी पुन्हा निर्माण केला आहे. मात्र यावेळेस या लेखाचे स्वरुप जाहिरातसदृश नाही; तरी एक बदल सुचवावासा वाटतो. लेख संकेतस्थळाबद्दल असल्यामुळे लेखनावात डोमेन नाव (.com, .org इ.) असल्यास बरे पडेल आणि गोंधळ उडण्याची शक्यता कमी होईल.
 • शुक-रंभा संवाद या लेखाचे स्वरुप बदलण्याची गरज आहे. सध्या लेखात संपूर्ण कथा दिलेली आहे असे वाटते. याऐवजी कथेचे थोडक्यात स्वरुप, कथेच्या रचनेचा इतिहास, रचनाकार, वाङ्मयातील/समाजातील स्थान, कथेचा उद्देश आणि दिला जाणारा संदेश याबद्दल माहिती हवी.

काय वाट्टेल ते होईल या लेखाबाबतही अशी सुधारणा करण्याची गरज आहे.

--संकेत अंधारीकर १६:५३, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

खैरलांजी हत्याकांडसंपादन करा

मला खैरलांजी हत्याकांडासंदर्भात लेख तयार करायचा आहे. या लेखाचे स्वरुप कसे असावे? हत्याकांडांविषयक लेखांसाठी एखादा वर्ग आहे का? इंग्रजी विकिवर यासंदर्भात एक लेख आहे, मात्र त्याचे सरसकट भाषांतर न करता स्वतंत्रपणे लेख लिहावा असे मला वाटते. या लेखात पुढीलप्रमाणे विभाग ठेवत आहे.

१.पार्श्वभूमी २.हत्याकांड ३.प्रतिक्रिया व आंदोलने ४.कारवाई ५.न्यायालयीन प्रक्रिया/खटला ६.निकाल ७.निकालावर प्रतिक्रिया

--संकेत अंधारीकर १७:२५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

नमस्कार,

खैरलांजी हत्याकांड या लेखाचा पहिला परिच्छेद लिहिला आहे. लेखाची भाषा योग्य आहे की नाही हे तपासावे. तसेच संदर्भ गोळा करण्यात काही अडचणी येत आहेत. मुख्य अडचण आहे ती घटना घडली त्यावेळचे, म्हणजे २ वर्षांपूर्वीचे मराठी वृत्तपत्रांमधील दुवे मिळत नाहीत. इंग्रजी विकिवरील लेखातून इंग्रजी वृत्तपत्रांमधील दुवे मिळतात; मात्र मराठी दुवे मिळाल्यास बरे पडेल. शिवाय तपासकामातील प्रगती, न्यायालयीन प्रक्रिया यांसंदर्भातील तत्कालीन बातम्यांचेही दुवे मिळाले नाहीत. न्यायालयाचे निकालपत्र तसेच राज्य शासनाने दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी समाजकल्याण संचालनालयातर्फे जाहीर केलेल्या अधिसूचनेचा दुवा मिळाल्यसही बरे होईल. खैरलांजीची घटना ही माझ्यामते कोठेवाडी सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्रात घडलेली आणि चर्चेत राहिलेली सर्वात भयानक घटना आहे. मात्र या मताला दुजोरा देणारे संदर्भही सापडले नाहीत.

--संकेत अंधारीकर १३:५७, १७ सप्टेंबर २००८ (UTC)

अकोलाकर/अकोलकरसंपादन करा

अभय, तुम्ही म्हणतातसे अकोलकर आणि भंडारकर योग्य असावे असे वाटते.मला वाटते तशी दुरूस्ती साचां मध्ये करावयास लागेल. आत्त्ता मी घाईत कॊपी पेस्टींग फक्त केले.पुढच्या भेटीत (एक दोन दिवसात) दुरूस्त्या निश्चीत करेन. Mahitgar १६:५८, १८ सप्टेंबर २००८ (UTC)

double redirectsसंपादन करा

Hi Abhay,
Please check this double-redirect : there seems to be a loop, without main page.
संत सर्जियस पहिला →‎ संत सर्जियस पहिला →‎ संत सर्जियस पहिला
पोप सर्जियस पहिला →‎ संत सर्जियस पहिला →‎ संत सर्जियस पहिला
Also,this one
सदस्य चर्चा:संगणक विज्ञान →‎ सदस्य चर्चा:タチコマ robot →‎ सदस्य चर्चा:White Cat
No idea about this.
Padalkar.kshitij ०१:१७, १ ऑक्टोबर २००८ (UTC)

Thank you
Padalkar.kshitij ०१:२१, १ ऑक्टोबर २००८ (UTC)

सद्य घटनासंपादन करा

नमस्कार,

सप्टेंबर महिन्यातल्या जुन्या बातम्या लिहिण्यामागे केवळ प्रकल्प पानात सातत्य रहावे हा हेतू होता. भारनियमनामुळे नियमित योगदान करणे जमत नाही म्हणून कधीकधी २-३ दिवसांच्या बातम्या एकत्र द्याव्या लागतात.

सद्य घटना प्रकल्प पानाची पुनर्रचना जरुर करावी. मात्र याबाबत इतर सदस्यांकडूनही मत मागवावे. मागच्या ७ दिवसांच्या बातम्या ठेवल्यास पानास आटोपशीरपणा येईल.

मुखपृष्ठावरही "ठळक घटना/सद्य घटना" अशी चौकट जरुर सुरु करावी. या चौकटीत गेल्या २/४ दिवसांमधल्या महत्वाच्या बातम्या देता येतील.

संदर्भासाठी इंग्रजी आणि इतर भाषांतील विकिवरच्या Current events पानांचा आधार घेता येईल.

--संकेत अंधारीकर १२:१७, ३ ऑक्टोबर २००८ (UTC)

माज्याशी संपर्क साधा 9850991995संपादन करा

गोब्राह्मणप्रतिपालक हे विशेषण नंतर मागाहून साहित्तिकानी वापरलेले आहे. शिव चररित्राच्या कोणत्याही प्रथम सधानात गोब्राह्मणप्रतिपालक नावची उपाधि आढळत नाही.

गोब्राह्मणप्रतिपालकसंपादन करा

गोब्राह्मणप्रतिपालक हे विशेषण अभय नातू तुम्हाला योग्य वाटत आसेल तर त्या सम्भंधी कारने कालवा

वर्ग:हंगेरीचे भौतिकशास्त्रज्ञ वगैरेसंपादन करा

अभय, भौतिकशास्त्रज्ञ वर्गात ’वर्ग:हंगेरीचे भौतिकशास्त्रज्ञ’ वगैरे वर्ग ’वर्ग:देशानुसार भौतिकशास्त्रज्ञ’ या वर्गात दाखल केलेले आहेत. खरे तर ’वर्ग:देशानुसार भौतिकशास्त्रज्ञ’ या वर्गाऐवजी ’वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार भौतिकशास्त्रज्ञ’ असा वर्ग हवा. आणि त्यात ’वर्ग:हंगेरियन भौतिकशास्त्रज्ञ’, ’वर्ग:स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ’, ’वर्ग:ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ’ अशा नावांचे वर्ग असायला हवेत. तुम्हाला सांगकाम्या चालवून हे बदलता येईल काय?

--संकल्प द्रविड (चर्चा) ०४:४३, १५ ऑक्टोबर २००८ (UTC)

देवनागरी कळफलक पुनर्भेटसंपादन करा

अभय, मी पुर्वी मराठी लिहीण्यासाठी कळफलक लिहीण्याचा प्रयत्न केला होता पण तो असफल ठरला होता. यावेळी नेपाळी विकिपीडियावरून स्क्रिप्ट वापरली आहे.त्यावेळी सांगितलेल्या बर्याच तृटी अजुनही आहेत तरीही आपण काही दिवसांसाठी सर्व विकिपीडियासाठी वाप्रून पहावी असे वाटते. सदस्य:कोल्हापुरी/monobook.js


कोल्हापुरी १३:४०, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)

मेगाबाइट, गिगाबाइटसंपादन करा

अभय, There is generally confusion among IT industry and manufacturing people also about what is kilobyte (1000 or 1024).
Please see this article from IEC standards site, which mentions that.
when is a kilobyte kibibyte
That's why IEC-67002 has introduced 'kibibyte' unit which means 'kilo binary byte' and is equal to 1024 bytes. And as per them, the term kilobyte should refer to 1000 bytes.
English wiki mentions "A kilobyte (derived from the SI prefix kilo-, meaning 1,000) is a unit of information or computer storage equal to either 1,024 bytes (210) or 1,000 bytes (103), depending on context" And explains "the situation" in separate section.
आपणही तसेच करावे का?
Padalkar.kshitij ०१:१५, २० ऑक्टोबर २००८ (UTC)

साचा:वर्ग/वर्ष/इ.स. शतकसंपादन करा

अभय, हा साचा अनेक वर्गांमध्ये वापरण्यात आला आहे
but this does not work properly
eg. it categorizes 1809 in [[वर्ग:{{{शतक}}} शतक]], but in fact it should do it in [[वर्ग:इ.स.चे १९ वे शतक]]
There are inconsistencies in how years are categorized
I haven't checked this fully, if this is true then it will require quite an effort to get this proper.
What is your opinion?
Padalkar.kshitij २२:०३, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)

i will remove only the category redirects now, will look into above later.
Padalkar.kshitij २२:१२, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)

done, please remove those mentioned categories. I have put the comment
about इ.स. XXXX category, there is no need to delete anything.
Padalkar.kshitij २२:४०, २१ ऑक्टोबर २००८ (UTC)

विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकीसंपादन करा

अभय,
विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प/सांख्यिकी या पानावर अजून जुन्याच तारखा आहेत.
तसेच तेथील साचे व वर्ग बदलावे लागतील.

(चला...आता कामाला लागावे लागेल :) )
Padalkar.kshitij १९:४७, २२ ऑक्टोबर २००८ (UTC)

दोन कल्‍पना_चावलासंपादन करा

अभय,
दोन लेख एकाच नावाने आहेत.
कल्पना चावला
कल्‍पना चावला
unicode मूळे तसे आहे...याबाबत काय करावे?
padalkar.kshitij ०३:३७, २६ ऑक्टोबर २००८ (UTC)

स्वाध्याय परिवारसंपादन करा

नमस्कार,

मी मुद्दाम या पानावरचा मजकूर राहू दिला होता कारण तेथे प्रताधिकारमुक्तीची घोषणा होती. जर हा मजकूर शब्दशः इतर संकेतस्थळावरुन उचललेला असला तर हा संदेश येथे ठेवणे महत्वाचे आहे.

मलाही तो संदेश/मजकूर चर्चेत ठेवावा असेच वाटत होते. परंतु मुळ लेखक प्रा. डॉ. दिलिप बिरुटे यांनी मजकूर काढावा अशी सूचना केल्यामुळे मी तो मजकूर काढला आहे. अन्यथा मी काढला नसता.

या शिवाय मी त्याम्नाही सदस्यत्व घेवून येथे लिखाण करावे असे सूचवले आहेच. बहुदा लवकरच तसे घडेल अशी आशा आहे.

असो, आधीच्या संदेशातल्या लिखाण सूचना मिळाल्या व नोंद घेतली आहे. शक्य तोवर लिखाण बरे असावे असाच प्रयत्न असतो. माझ्या परीने चांगल्या लिखाणाचा प्रयत्न करतो आहे. -निनाद निनाद २१:५९, २७ ऑक्टोबर २००८ (UTC)

अभय,

केरळातील कोझिकोडे(कालिकत) नावाच्या जिल्ह्याबद्दल एक पृष्ठ आहे. जसा Alappuzha ह्या इंग्रजी स्पेलिंगचा उच्चार अलप्पुळा असा होतो, त्याचप्रकारे Kozhikode चा उच्चार कोळिकोड असा होतो. कृपया पानाच्या नावात योग्य तो बदल करावा. (मी केला असता, पण नवीन सदस्य असल्याने मला विकिपीडिआचे बारकावे समजून घ्यायला वेळ लागत आहे)

कोझिकोडे जिल्हासंपादन करा

अभय,

केरळातील कोझिकोडे(कालिकत) नावाच्या जिल्ह्याबद्दल एक पृष्ठ आहे. जसा Alappuzha ह्या इंग्रजी स्पेलिंगचा उच्चार अलप्पुळा असा होतो, त्याचप्रकारे Kozhikode चा उच्चार कोळिकोड असा होतो. कृपया पानाच्या नावात योग्य तो बदल करावा. (मी केला असता, पण नवीन सदस्य असल्याने मला विकिपीडिआचे बारकावे समजून घ्यायला वेळ लागत आहे)

नरेन ताम्हाणेसंपादन करा

Hello, The title of this page is wrong. I request a move to नरेन ताम्हणे. Thanks. Unpopular Opinion ०५:३७, ३१ ऑक्टोबर २००८ (UTC)

पाहिजे असलेले लेखसंपादन करा

नमस्कार,

"पाहिजे असलेले लेख" येथील माहिती अद्ययावत करता येईल का? ही माहिती या आधी सुमारे वर्षभरापूर्वी अद्ययावत केली गेली होती.

--संकेत अंधारीकर २१:२६, १ नोव्हेंबर २००८ (UTC)

साचा:reflistसंपादन करा

नमस्कार,

साचा:reflist सुधारण्यासाठी मदत हवी आहे. हा साचा मी सध्या साचा:संदर्भयादी या नावाखाली स्थानांतरीत केला आहे. संदर्भांची एक सलग यादी करताना कोणतीही अडचण येत नाही. मात्र संदर्भांसाठी दोन किंवा अधिक गट (reference group) तयार करता येत नाहीत. असा गट तयार करताना गटासाठी इंग्रजीतून नाव लिहिले तरच वेगळा गट तयार होतो अन्यथा नाही.

--संकेत अंधारीकर १५:१२, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

ता.क.: 'पाहिजे असलेले लेख' येथून मी सध्या नवीन लेख तयार करत आहे. या विभागातली माहिती अद्ययावत नसल्याने तयार झालेले लेखही या यादीत दिसतात. यामुळे नवीन लेख तयार करण्यासाठी नावे शोधताना त्रास होतो. अशा तयार झालेल्या लेखांची केवळ नावे या विभागातून काढता आली तर पहावे.

--संकेत अंधारीकर १५:१२, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

कृपया साचा:संदर्भयादी तपासून पहा. काही सुधारणा हव्या असल्यास सुचवा. तसेच ’भारतीय रेल्वे’ या लेखात शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत त्या सुधाराव्या लागतील.

--संकेत अंधारीकर १९:०९, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

मुखपृष्ठ सदरसंपादन करा

अभय, या महिन्याच्या मुखपृष्ठ सदराचे काय करायचे?
त्याबाबतीत अजून एकमत नाही आहे.
padalkar.kshitij १८:०९, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

सचिन तेंडुलकर अजून पूर्ण नाही आहे, तसेच त्यातील काही भाग अवैश्वकीय स्वरूपातील आहे. उदा. प्रसिद्ध खेळी (कोणाच्या मते??)
मराठी विकिवर बहुमताचे काय धोरण आहे? संपूर्ण एकमत हवे असते का मताधीक्य ?
तुम्ही ए.टी.आर. ७२ ला दिलेला पाठिंबा तात्पुरता काढला तर तेवढ्यात तेवढे बहुमत होईल. :)
padalkar.kshitij १८:२७, ३ नोव्हेंबर २००८ (UTC)

Bot flag for Luckas-botसंपादन करा

Hi. I made a request here and I'm still waiting for bot flag. Please, give bot status to the bot above and to the others. Luckas Blade १४:०३, ८ नोव्हेंबर २००८ (UTC)

Some edits made. I think that it can have bot status now. --Luckas Blade १९:५०, २४ डिसेंबर २००८ (UTC)
Bot flag for LUCKAS-BOT', not to Luckas Blade. Remove bot status from Luckas Blade (my user account) and give bot status to LUCKAS-BOT (my bot account)'. --Luckas Blade १३:५०, २५ डिसेंबर २००८ (UTC)

स्वागत क्रमांकसंपादन करा

अभय,
आज विकिवर एकदम सगळे शांत शांत वाटते होते :)
असो, एक प्रश्न होता, नवीन सदस्याचा क्रमांक कुठे कळतो?
मला माहित नसल्यामुळे मी एक-दोन सदस्यांच्या चर्चा पानात साचा:Welcome वापरला नव्हता.
padalkar.kshitij

व्याकरणसंपादन करा

अभय,

हो .. मागे आपली संबंधित विषयावरून चर्चा झाली होती. त्यासंबंधाने काही अभ्यासही मधल्या काळात झाला. मराठी भाषेचा मूळ पिंड याबाबत लक्षात घेण्याजोगा आहे. मी शक्य तेवढे संक्षिप्त पण मुद्देसूद लिहायचा प्रयत्न करतो.:

 1. मराठी भाषेत प्रत्येक नामाला तीन लिंगांपैकी एक लिंग द्यावे लागते. याला खरे तर विशेषनामे - जसे भारत, इराण, इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका, युरोप - हे शब्दही (नियमानुसार बघितल्यास) अपवाद नाहीत. सर्व प्रकारांतली नामे (विशेषनामे, सामान्यनामे, सर्वनामे) विकारी असतात. म्हणजे त्यांची रूपे करताना (प्रथमा ते संबोधन अश्या आठ विभक्त्या चालवताना) त्यांची मूळ रूपे लिंगानुसार आणि अंत्य स्वरानुसार बदलतात. हा नियम सर्वच नामांना - मूळ मराठी, तसेच इतर भाषांमधून उसन्या आलेल्या नावांनाही - लागू होतो. त्यामुळे आफ्रिका, युरोप, आशिया, भारत, टेबल, पेन, तारीख या सर्व देशी/परदेशी मूळ असलेल्या नामांची रूपे त्या-त्या लिंगाप्रमाणे विकारी होतात.
 2. आता दुसरा मुद्दा म्हणजे नामांची लिंगे ठरवणे. भाषिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया काहीशी जटिल (नेमके सांगायचे तर इंग्रजीत 'ऑर्गॅनिक' म्हणतात तसे :) ) असते. विशेषकरून परभाषअंमधून आलेल्या शब्दांबद्दल ही प्रक्रिया मजेशीर असते. मराठीत बाहेरून आलेल्या शब्दांची लिंगे ठरताना पुष्कळदा त्या वस्तूचा/नामाचा ढोबळरित्या समानार्थी शब्द असलेल्या रूढ मराठी नामाचे लिंग नव्या शब्दाला चिकटते. उदा.: (ते) स्कूल/हायस्कूल/कॉलेज हे शब्द (ते) विद्यालय/महविद्यालय या समानार्थी नामांप्रमाणे नपुंसकलिंगी म्हणून रुळले आहेत. बहुसंख्य देशांची नामे '(तो) देश' या वर्गवाचक नामाप्रमाणे पुल्लिंगी धरली गेली आहेत. उदा.: (तो) इराण, (तो) ब्राझिल, (तो) जर्मनी. अर्थात याला काही अपवाद आहेत. उदा.: (ते) इंग्लंड (इंग्लंड ब्रिटिश बेटांवर वसल्यामुळे पूर्वापार '(ते) बेट' अशा संदर्भाने इंग्लंद हे नाम नपुंसकलिंगी मानले जात असावे.), (ती) अमेरिका (अमेरिका हा देश असला तरी कोलंबसाने 'अमेरिका' नावाची नवी भूमी शोधली अशा संदर्भाने '(ती) भूमी' या नामाप्रमाणे 'अमेरिका' हे नामही पूर्वीपासून स्त्रीलिंगी मानले गेले असावे.). या शब्दांची लिंगे पूर्वीपासून अशी रुळल्यामुळे व्याकरण नियमांनुसार त्यांची रूपेही इतर मराठी नामांप्रमाणे व्हायला हवीत. हा व्याकरणशास्त्राबद्दलचा डोळसपणा ब्रिटिशांकडून पहिल्यांदा पाश्चात्य ज्ञान मिळवून ते एतद्देशीय साहित्यात आणू पाहणार्‍या लेखकांमध्ये आढळतो. काही दशकांपूर्वीची पुस्तके धुंडाळलीत तर त्यात 'इंग्लंडाचा राजा/ इंग्लंडाची राणी', 'तुर्कस्तानाचा खलिफा' अशी व्याकरणसुसंगत शब्दयोजना आढळते. पण मधल्या काही काळात लेखकांच्या, पत्रकारांच्या एक-दोन पिढ्यांमध्ये हा डोळसपणा ओसरला :) .. 'इंग्लंडचा क्रिकेट संघ' वगैरे व्याकरणबाह्य योजना लिहिली जाऊ लागली. वाचून तुमच्या-माझ्यासारख्या लोकांच्या नजरेला चुकीची असली तरीही अंगवळणी पडून गेली. :D

अर्थात तरीही काही नामांबद्दल (त्या नामांच्या सद्भाग्यामुळे) व्याकरण आजही पाळले जाते. उदा.: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष असे अजूनही होत नाही :) ); 'आफ्रिकेतल्या जंगलात (आफ्रिकातला जंगलात असे अजूनतरी होत नाही). पण तरीही आपल्या समाजाच्या भाषिक डोळसपणाअभावी 'धड ना इथे, धड ना तिथे' अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. माझ्या माहितीप्रमाणे शासकीय पातळीवरूनही भाषातज्ज्ञांची समिती नेमून हा गोंधळ निस्तरायचे ठोस प्रयत्न झाले नाहीयेत (सरकाराला अगोदरच इतक्या पंचायती पडल्या असताना, वारसाहक्काने गळ्यात पडलेल्या भाषेबाबतचे घोळ ते कधी निस्तरणार? :P).

 1. आता गाडी 'युरोप' या शब्दाकडे वळवतो. 'युरोप' हा अकारान्त शब्द आहे हे तर उघड आहे. हे नाम आपल्या बोलण्यामध्ये सध्या आणि पूर्वीदेखील अध्याहृतपणे '(तो) युरोप खंड' असे पुल्लिंगी गृहित धरले जाते (आठवून बघितलंत तर आफ्रिका खंड मात्र '(ती) आफ्रिका' असा स्त्रीलिंगी गृहित धरून आपण बोलतो असे जाणवेल.). अकारान्त पुल्लिंगी शब्द '(तो) पर्वत' या नामाप्रमाणे चालेल - युरोपाला, युरोपाने, युरोपाच्या, युरोपामध्ये/युरोपात (पर्वताला, पर्वताने, पर्वताच्या, पर्वतामध्ये/पर्वतात याप्रमाणे). समजा आपल्यापैकी एखाद्या 'हटके स्टाइल' माणसाने तो अपवाद म्हणून '(ते) युरोप' असा गृहित धरून वापरला तरी तो '(ते) घर' या अकारान्त नपुंसकलिंगी नामाप्रमाणे चालेल - युरोपाला, युरोपाने, युरोपाच्या, युरोपामध्ये/युरोपात (घराला, घराने, घराच्या, घरामध्ये/घरात). त्यामुळे 'युरोप (खंड)' हे नाम वापरताना त्याची रूपे 'युरोपा--' अशी होतात. आता 'युरोपा' या देवतेच्या संदर्भाने जेव्हा हा शब्द वापरायचा असेल तेव्हा आकारान्त स्त्रीलिंगी नामाप्रमाणे 'युरोपेला, युरोपेने, युरोपेच्या' (सीतेला, सीतेने, सीतेच्या याप्रमाणे) वापरायला हवा. 'युरोपा' हे नाम गुरूच्या उपग्रहासंदर्भात वापरायचे असेल तेव्हा '(तो) युरोपा (उपग्रह)' अशा संदर्भाने आकारान्त पुल्लिंगी शब्दाप्रमाणे (जसे - (तो) तारा, (तो) धोंडा, (तो) बटाटा) चालवायला हवा - युरोप्याला, युरोप्याने, युरोप्याच्या, युरोप्यात (बटाट्याला, बटाट्याने, बटाट्याच्या, बटाट्यात). मला कल्पना आहे की मी सांगत असलेली उदाहरणे तुम्हाला व्याकरणनियमाप्रमाणे आहेत हे मान्य असेल्, पण तरीही त्यांची 'अशी' रूपे स्वीकारणे जड जात असेल. आपल्या कानांना चुकीची रूपे ऐकण्याची सवय पडून गेल्यामुळे ही रूपे कायदेशीर असूनही ऐकायला खटकतील. मी तुमच्या/इतर कुणाच्या चुका/स्वभावदोष सांगण्याच्या हेतूने हे लिहीत नसून, चांगल्या हेतूने खरे ते लिहीत आहे. मी स्वतःदेखील या चुका आजवर करत आलोय (कदाचित अजूनही अजाणतेपणे करत असेन), पण आपल्या भाषेबद्दल आपुलकीने गोष्टी अभ्यासत असताना भाषेत शिरलेला हा धेडगुजरीपणा लक्षात येत गेला. भाषिकदृष्ट्या योग्य सवयी लिहिण्या-बोलण्यात स्वीकारणे जड असते याची मला कल्पना आहे.. पण चुकांवर पांघरूणे घालण्यापेक्षा त्या निस्तरलेल्या बर्‍या असे मला वाटते.

या पार्श्वभूमीवर मी व्याकरणनियमांनुसार 'युरोपामधील' असे रूप वापरले.

लिहिताना उणे-अधिक झाले असल्यास क्षमस्व.

--संकल्प द्रविड (चर्चा) १७:४७, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)

निःसंदिग्धीकरण साचेसंपादन करा

अभय,
मी निःसंदिग्धीकरण साच्यांमध्ये थोडे बदल केले आहेत तसेच नवीन कागदपत्रांची पाने तयार केली आहेत.
हे साचे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्यामुळे हे बदल करतांना रूढ वापरावर काही परिणाम होऊ नये याची काळजी मी घेतली आहे.
तरी एकदा ते तपासून पहावेत.
ते बरोबर असले, तर संरक्षित करता येतील का?
क्षितिज पाडळकर १९:१४, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)

कळपटसंपादन करा

अभय, कळपट कायमचा करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या वेगळे काही करावे लागणार नाही असे वाटते. कौल घेऊन सदस्यांना काही अडचणी नसल्यास आहे ही पद्धत सुरू ठेवावी.
बाकी तो "देवनागरी"चा दुवा या जावास्क्रीप्टनेच टाकला आहे.
- कोल्हापुरी ०४:४४, २७ नोव्हेंबर २००८ (UTC)

प्रयत्न करेनसंपादन करा

नमस्कार अभय,

निरोप मिळाला, माझाही लेख चांगले असावेत (किमान बरे!) असा प्रयत्न असतोच. (बरा लेख असेल तर तसे कौतुकही प्रबंधकांनी करायला हरकत नसावी ;-) )

काही वेळ लेख वेगळ्या नावाने आहे/असेल हे लक्षात येत नाही. या शिवाय मराठी भाषा ही तशी उच्चारानुसार बदलते. ती ती सर्व नावे पुनर्निर्देशीत स्वरूपात असायला हरकत नाही. त्यामुळे शोधाला मदत होईल असे माझे मत आहे. त्याच वेळी, येथुन पुढे मी शोध घेण्याचा जास्त प्रयत्न ही करेन असे आश्वासन देतो.

या उपर, मी काही या क्षेत्रातला स्कील्ड माणूस नाही. मला जमेल तसेच काँट्रिब्युशन मी करणार, हे पण सांगणे माझे काम आहे असे आता मला सूचवावेसे वाटते. ते काम योग्य नसल्यास इतरांनी सुधारण्यास माझी कोणतीच हरकत नाहे हे पण तेव्हढेच खरे!

असो, आशा आहे की आपण लवकरच म्हणजे जानेवारी २००९ च्या आत २५००० लेख पूर्ण करूया!

आपला निनाद २१:२३, २५ डिसेंबर २००८ (UTC)

ठीक आहेसंपादन करा

जमेल तसे करेनच. पण मी काही फार भारीतला लेखक नाही हो! तेंव्हा जरा समजून घ्या. ;)) इतर सगळ्यांनी माझे लेखन संपादित केले तर मला चालते. शिवाय इतर कुणी वाचकही(कधी जर वाचलाच तर!) सुधरवतीलच ही अपेक्षा आहेच! क्षितिज पाडळकरही मला मदत करतो आहे असे दिसते. निनाद २१:२६, १ जानेवारी २००९ (UTC)

ओके!संपादन करा

करतोच आहे सुधारणा माझ्या लेखनाच्या पॅटर्नस् मध्ये... संभाषण खुंटवणे वगैरे काही नको. (खरं सांगायचे तर फार टेंशन नको देवू (आणि घेवू)यार! इथे आनंदीपणे "अन् वाईंड" व्हायला येतो त्यात अजून कशाला इगो चे इश्युज्? मला जमेल तसे आणि झेपेल तसे करतोच.)

वर्गसंपादन करा

(खुंटवले वगैरे तर नाही ना अभयराव, संभाषण?) मला वाटते की वर्ग ही भानगड मला नीट कळलीच नाहीये. मी वर्ग विसर्ग न वापरता कोलन वापरून टाकतोय पणे ते वर्ग येतच नाहीत. म्हणजे बरेचदा लाल रंगातच येतात.

 • म्हणजे ते वर्ग बनलेच नाहीयेत अजून, असे असते का?
 • मग मला तो वर्ग बनवावा लागेल का?
 • या वर्गांना काही यम-नियम?

नाहीतर मग नेहमीप्रमाणे असे तर काहीच्या बाही वर्ग बनत जातील ना माझ्या कडून? ;)) असो, बाकी डीझेलवाला लेख बरा झालाय का? त्याला आख्खा निळा करण्याचा प्रयत्नात आहे मी. :) पण हायड्रोकार्बन वगैरे ला मराठी शब्द काही सापडत नाहीये मला.

धन्युसंपादन करा

नातू साहेब, तुमच्या सूचना उपयोगी आहेत. सूचनांबद्दल धन्यवाद! Dakutaa ०५:२३, ५ जानेवारी २००९ (UTC)

डेटनसंपादन करा

Just curious!! हा डेटनचा काय फंडा आहे? आपण डेटन ह्या नावांच्या सर्व शहरांचे लेख तयार केलेत..... Do you live in Dayton? अभिजीत साठे २३:१७, ८ जानेवारी २००९ (UTC)

ऑस्ट्रेलियन ओपनसंपादन करा

ऑस्ट्रेलियन ओपन करण्याचा प्रयत्न नक्की करतो. त्यासाठी मी तिथले फोटोही काढून ठेवली आहेत. पण सध्या वेळेची फार मारामारी झाली आहे. :( निनाद ०५:०९, १७ जानेवारी २००९ (UTC)

५७ वर जाऊ का?संपादन करा

आपण आता इंटर विकी क्रमात ५८ व्या स्थानावरून ५७ वर जायला फार वेळ लागू नये! मला अजून असे अमिताभ बच्चन सारखे टेबल्स दाखवत रहाल का? मी ते भरत राहतो/प्रयत्न करतो.

ओबामासंपादन करा

अभय, बराक ओबामांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त "बराक ओबामा हा लेख मासिक सदरासाठी nominate करता येईल का? 

अभिजीत साठे १३:४४, १९ जानेवारी २००९ (UTC)

चित्र वगळावेसंपादन करा

अभय, "चित्र:Baba+Bamte.jpg" कृपया वगळावे. याची जुळी प्रत मी चढवलेली आहे. चित्र वगळण्याचा आधिकार सर्वसामान्य वापरकर्त्यांना असतो का ? Dakutaa ०५:०१, २० जानेवारी २००९ (UTC)

महाराष्ट्राचे भौगोलिक उपप्रांतसंपादन करा

अभय,

 • महाराष्ट्राचे भौगोलिक उपप्रांत असा कोकण विदर्भ मराठवाड्आ माणदेस एका नजरेत दाखवणारा वर्ग आहे का ?
 • मी मेधा पाटकर हा लेख समाजसुधारक ह्या वर्गात टाकला आहे. प्रत्यक्षात तो वर्गः सामाजिक कार्यकर्ते यात जास्त साजेसा राहिल.

वरील दोन्ही वर्ग जर अस्तित्वात नसतील तर तयार करणे योग्य राहिल. तुम्हाला काय वाटते ? Dakutaa ०९:४७, २१ जानेवारी २००९ (UTC)

धन्यवाद अभय,

महाराष्ट्र लेखात मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख असा उल्लेख आहे. हा लेख सुरक्षित असल्याने मी संपादित करू शकलो नाही.

Dakutaa

धन्यवादसंपादन करा

मराठीत लिहिण्यासाठी मदत कुठे मिळू शकेल. e.g. Australia Maihudon १०:४५, २२ जानेवारी २००९ (UTC)

अभय, आपण केलेला रेल्वेबद्दलचा साचा मी पाहिला. काही प्रस्तावः रेल्वेचे नाव दोनदा दिसत आहे, ते दुरुस्त करता येईल का? दुसरं म्हणजे, गाडीचा अप व डाउन नंबर आणि निघण्याच्या व पोचण्याच्या वेळा पण ह्या माहितीचौकटीत add करता येतील का? बाकी हा साचा चांगला आणि उपयुक्त वाटतो आहे. अभिजीत साठे ०४:१५, २४ जानेवारी २००९ (UTC)

अभिनेता साचासंपादन करा

मला अभिनेता हा साचा वापरायचा आहे. पण मला ते जमत नाहीये. मी राज कपूर मध्ये तो प्रयत्न केला आहे, पण तो काहीच्या काहीच झाला! तो मला योग्य रीतीने लावून दाखवता का? मी तो सगळा मजकूर कॉपी करून पेस्ट केला आहे. त्या ऐवजी विस्तार अथवा वर्ग या सारखा अभिनेता याचाही एक शब्दी साचा असु शकतो का? निनाद २२:२२, २४ जानेवारी २००९ (UTC)

Re: नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला‎संपादन करा

नमस्कार अभय, आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद. वेळ काढून तुम्ही त्या पानाचा मजकूर वाचलात व सूचना दिलित, याबद्दल अतिशय आनंद वाटतो. मी घाईघाईत "मुंबईवरील दहशतवादी हल्ला" व "नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला" यांचाच फक्त शोध घेतला, तो ही विकिपीडियाच्या शोध पेटीत. शोध घेताना माझ्या मनात इंग्रजी विकिपीडियाचा विचार होता, जिथे विस्कळित शब्द शोधले तरी लेख सापडतो. मला वाटते की अजून मराठी विकिपीडिया वर हे तंत्र विकसित व्हायचे आहे. मात्र गूगलवर शोध घेणे हा सोपा पर्याय मला वेळीच सुचला नाही :-(. असो.

आपल्या तत्पर सहकर्याकरिता व आपण दिलेल्या उपयुक्त सूचनांबद्दल खूप आभारी आहे. कळावे, - पुणेकर ०६:४०, २५ जानेवारी २००९ (UTC)


टिंग्यासंपादन करा

टिंग्या, चित्रपट साठी श्वास, चित्रपट प्रमाणे पोस्टर चढवता येईल काय ?? Do we need prior written permission if we want to upload for illustration purpose  ?? Dakutaa १०:२६, २७ जानेवारी २००९ (UTC)

नदी - मुखपृष्ठसंपादन करा

थांकु थांकु!! नदी ला मुखपृष्ठावर वाहू द्यायला हरकत नाही, पण आधी सगळा लेख नीळा करतो... मगच जाऊ देवु, काय म्हणता? बाकी, तुमच्या मदती बद्दल पण धन्यु - त्यामुळे उत्साह वाढतो! :)

गणपतीसंपादन करा

गणपतीच्या कौतुकाबद्द्ल धन्यवाद. हा लेख पूर्ण झाला आहे. Dakutaa ०६:०५, ८ फेब्रुवारी २००९ (UTC)


सिअॅटल का सिऍटलसंपादन करा

Hi,

The pronounciation of Seattle is /siˈætɫ/ according to the English wikipedia article on Seattle (http://en.wikipedia.org/wiki/Seattle). The correct pronunciation for/æ/ is अॅ and not ऍ according to the wikipedia article on Marathi phonology (http://en.wikipedia.org/wiki/Marathi_phonology).

Please note the following sentence in the article in support of my original way of writing Seattle. "There are two more vowels in Marathi to denote the pronunciations of English words such as of 'a' in act and 'a' in all. These are written as 'अँ' and 'आँ'. The IPA signs for these are /æ/ and /ɔ/, respectively." I would request that the article be renamed to सिअॅटल as it is closest in pronunication to the way it is pronounced by the natives of Seattle.

For further information please refer to the following document regarding the representation of /æ/ sound in Marathi: http://std.dkuug.dk/jtc1/sc2/wg2/docs/n3249.pdf

Specifically, section E states: "The Government of India brought to the attention of Unicode Consortium the need to represent a text element used in Marathi documents. This text element is used in writing load words from languages such as English to represent the vowel sound /æ/ (e.g. the “a” in “apple”). Others have mentioned a letter they deemed to be missing from Unicode. For instance, Gautam Sengupta [1] mentions that Marathi uses “a CANDRA mounted on A”, and that Unicode does not represent this missing “DEVANAGARI LETTER CANDRA A”."

Thanks, Vayu ००:३५, १० फेब्रुवारी २००९ (UTC)

संदर्भसंपादन करा

एकच संदर्भ दोनपेक्षा अधिक वेळा लेखात द्यावा लागला तर ते कसे द्यावे. इतर विकीमध्ये बघितल्याप्रमाणे संदर्भांना नावे देउन त्यांना अनेकवेळा वापरता येतात. परंतु मला ते समजले नाही कसे ते. मार्गदर्शन् करावे

अजयबिडवे १७:४०, १० फेब्रुवारी २००९ (UTC)

Return to the user page of "अभय नातू/जुनी चर्चा १५".