ए.टी.आर. ७२ हे ए.टी.आर. या विमान तयार करणाऱ्या कंपनीचे छोट्या पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

ए.टी.आर. ७२

फायरफ्लायचे ए.टी.आर. ७२ झेपावताना

प्रकार छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान
उत्पादक ए.टी.आर.
समावेश ऑक्टोबर २७, १९८८
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
उपभोक्ते अमेरिकन ईगल एअरलाइन्स
डेल्टा कनेक्शन
उत्पादित संख्या ३२३+
मूळ प्रकार ए.टी.आर. ४२

या विमानाची प्रवासीक्षमता ७२ असून ते चालवण्यासाठी दोन वैमानिक असतात.

विकसन

संपादन
 
बॅंगकॉक एरवेझचे ए.टी.आर. ७२-५०० लाओसच्या लुआंग प्रबांग विमानतळावर उतरताना

ए.टी.आर. ७२ची रचना ए.टी.आर. ४२ प्रकारच्या विमानावर आधारित आहे.[] यासाठी विमानाची लांबी ४.५ मीटर (१४ फूट ९ इंच) वाढवण्यात आली, पंखाचा विस्तार वाढवण्यात आला व जास्त क्षमतेची इंजिने लावण्यात आली. याशिवाय इंधनक्षमताही १० टक्क्यांनी वाढवली गेली. ए.टी.आर. ७२ प्रकारच्या विमानाची घोषणा १९८६त केली गेली व ऑक्टोबर २७, इ.स. १९८८ रोजी या विमानानी पहिले उड्डाण केले. एक वर्षाने ऑक्टोबर २७, इ.स. १९८९च्या दिवशी फिनएरने या प्रकारच्या विमानातून प्रवासी ने-आण करण्यास सुरुवात केली.[]

जानेवारी २००७ च्या गणतीनुसार ३२३ ए.टी.आर. ७२ विमाने विविध विमानकंपन्यांना विकण्यात आली आहेत व ११३ विमानांची मागण्या अपूर्ण आहेत.[]

 
फिनएरचे एटीआर ७२

७२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या या विमानांमध्ये सहसा प्रवाश्यांना मागील दारातून चढवले व उतरवले जाते तर पुढच्या दारातून सामान हाताळले जाते. फिनएर याला अपवाद असून त्यांची ए.टी.आर. ७२ प्रकारची विमाने प्रवासी पुढील दारातून तर सामान मागच्या दारातून हाताळतात.[]

मागच्या दारातून प्रवासी चढ-उतार करीत असताना विमानाच्या शेपटाखाली आधार द्यावा लागतो. हा आधार नसल्यास विमानाचे नाक उचलले जाण्याची शक्यता असते.

ए.टी.आर. ७२ला ऑक्झिलरी पॉवर युनिट नसते पण त्याच्या प्रॉपेलरना अवरोधक असतात. हे अवरोधक लावले असता विमानाचे इंजिन सुरू असूनही प्रॉपेलर अथवा पंखे फिरत नाहीत (व विमान पुढे सरकत नाही) आणि तरीही इतर उपकरणांना वीज मिळू शकते. याप्रकारे विमान चालू ठेवण्याला हॉटेल मोड म्हणतात. यामुळे ए.पी.यू. लावण्याचा खर्च व वजन टाळता येतात.[]

उपप्रकार

संपादन
 
ऑरिन्यी एर सर्व्हिसेसचे ए.टी.आर. ७२-२०० ब्रिस्टॉल विमानतळावर
 
एटीआर ७२-६००चा चालककक्ष

ए.टी.आर. ७२ चेतीन उपप्रकार आहेत. याशिवाय एक अजून उपप्रकार नुकताच विकसित करण्यात आला आहे.

ए.टी.आर. ७२-२००

संपादन

-२०० हा ए.टी.आर. ७२चा मूळ उपप्रकार होता. याला प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू १२४बी प्रकारची दोन विमाने लावण्यात आली होती. यांची क्षमता प्रत्येकी २,४०० हॉर्सपॉवर इतकी होती. []

ए.टी.आर. ७२-२१० (२१२)

संपादन

-२१० उपप्रकाराला प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू १२७ प्रकारची इंजिने लावण्यात आली. या इंजिनांची क्षमता २,७५० हॉर्सपॉवर होती व उष्ण प्रदेशात तसेच अतिउंचीवरील वापरासाठी ही इंजिने उपयुक्त होती. याशिवाय सामानभंडाराचे दारही मोठे करण्यात आले.

ए.टी.आर. ७२-२१० (२१०ए/२१२ए)

संपादन

या उपप्रकाराला आधी -२१०ए नाव देण्यात आले होते व अमेरिकन ईगल एरलाइन्सने त्याला २१२ए असे नाव दिले होते. -५०० ही -२१०ची सुधारित आवृत्ती असून त्यात सहा पंखांचे प्रॉपेलर आहेत. या उपप्रकाराची भारवहनमता जास्त आहे तसेच उर्जावापरप्रणालीचे संगणकीकरण करण्यात आले आहे. यामुळे पायलटला विमान उडवण्याकडे जास्त लक्ष देता येते.

ए.टी.आर. ७२-६००

संपादन

ऑक्टोबर २, इ.स. २००७ रोजी ए.टी.आर.च्या मुख्याधिकारी स्टेफाने मायरने -६०० उपप्रकाराची घोषणा केली. ए.टी.आर. ४२-६०० तसेच ए.टी.आर. ७२-६०० उपप्रकारांची इंधनउपयुक्तता जास्त आहे व पर्यायाने चालवण्याचा खर्चही कमी असेल. यांत प्रॅट अँड व्हिटनी पी.डब्ल्यू. १२७एम प्रकारची इंजिने असतील. हे उपप्रकार इ.स. २०१०च्या सुमारास उपलब्ध होतील.

इतर उपप्रकार

संपादन

याशिवाय फक्त सामानवाहतूक करणारा उपप्रकारही उपलब्ध आहे. फेडेक्स एक्सप्रेस, डी.एच.एल.यु.पी.एस. एरलाइन्स या प्रकारची विमाने वापरतात.[]

-५०० चे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठीचा वेगळा उपप्रकारही उपलब्ध आहे.[]

प्रमुख चालक

संपादन
एर अरान (९) एरो एरलाइन्स (६) एर डेक्कन (८)
एर डोलोमाइट (८) एर जमैका (७) एर न्यू झीलँड (माउंट कूक एअरलाइन) (११)
* एर नॉस्ट्रम (७) एर ताहिती (५) अलिटालिया एक्सप्रेस (१०)
आर्किया इस्रायल एरलाइन्स (४) अटलांटिक साउथईस्ट एरलाइन्स (१२) ए.एम.आर. होल्डिंग कॉर्पोरेशन (एक्झेक्युटिव्ह एर) (३९)
ऑरिन्यी एर सर्व्हिसेस (३) अझरबैजान एरलाइन्स (६) बी अँड एच एरलाइन्स (२)
बॅंगकॉक एरवेझ (९) बिंटर कॅनेरियास (१३) सेबु पॅसिफिक एर (१)
सिम्बर एर (४) कॉन्व्हियासा (१) चायना सदर्न एरलाइन्स (५)
चेक एरलाइन्स (४) डेल्टा कनेक्शन युरोलॉट (८)
फेडेक्स एक्सप्रेस (१३) फिनकॉम एरलाइन्स (४) इरान असेमान एरलाइन्स (६)
जाट एरवेझ (५) जेट एरवेझ (१०) हांसुंग एरलाइन्स (४)
किंगफिशर एरलाइन्स (१२) लॉट पोलिश एरलाइन्स (८) ऑलिंपिक एरलाइन्स (७)
टोटल लिन्हास एरियास (२) ट्रान्सएशिया एरवेझ (१०) टी.ए.सी.व्ही. काबो व्हेर्दे एरलाइन्स (४)
ट्रिप लिन्हास एरियास (२) व्हियेतनाम एरलाइन्स (१०)

याशिवाय ४७ इतर विमानकंपन्या थोड्या संख्येत ए.टी.आर. ७२ विमाने वापरतात.

मागण्या

संपादन

अपघात व दुर्घटना

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ कालरेषा Archived 2006-10-17 at the Wayback Machine.
  2. ^ ए.टी.आर.चे निरूपण Archived 2007-04-09 at the Wayback Machine.
  3. ^ जागतिक वितरण Archived 2007-05-21 at the Wayback Machine.
  4. ^ एरलाइनर्स डॉट नेटवरील ए.टी.आर. ७२-२०१ची चित्रे
  5. ^ https://web.archive.org/web/20061017034646/http://www.atraircraft.com/downl/ATR%2042-72%20The%20Regional%20Way%202005.pdf
  6. ^ ए.टी.आर. ७२-२०० इंजिने Archived 2007-02-02 at the Wayback Machine.
  7. ^ ए.टी.आर. एर कार्गो सोल्युशन्स Archived 2007-04-08 at the Wayback Machine.
  8. ^ ए.टी.आर. व्ही.आय.पी. Archived 2007-04-06 at the Wayback Machine.
  9. ^ http://www.airliners.net/articles/read.main?id=17 Archived 2007-11-03 at the Wayback Machine. पायलटच्या दृष्टिकोनातून ए.टी.आर.
  10. ^ "एव्हियेशन सेफ्टी काउंसिलचे अन्वेषण". 2014-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-04-14 रोजी पाहिले.