बी अँड एच एरलाइन्स
बी ॲन्ड एच एअरलाइन्स (बॉस्नियन: B&H Airlines) ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९४ साली एअर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना करून बी ॲन्ड एच एअरलाइन्स ही नवी कंपनी निर्माण केली.
| ||||
स्थापना | १९९४ (एअर बोस्ना नावाने) | |||
---|---|---|---|---|
हब | सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे | बंजा लुका | |||
विमान संख्या | २ | |||
मुख्यालय | सारायेव्हो, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | |||
संकेतस्थळ | http://www.bhairlines.ba/ |

बी ॲन्ड एच एअरलाइन्सचे भूतपूर्व बोईंग ७३७ विमान
बी ॲन्ड एच एअरलाइन्सचे मुख्यालय सारायेव्हो येथे असून सारायेव्होच्या सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. सध्या ह्या कंपनीकडे केवळ २ ए.टी.आर. ७२ बनावटीची विमाने आहेत व ती सारायेव्हो, बंजा लुका, कोपनहेगन व झूरिच ह्या चार शहरांना विमानसेवा पुरवते.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत