श्वास (चित्रपट)

(श्वास, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)


श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वासला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

श्वास
दिग्दर्शन संदीप सावंत
निर्मिती

कथी आर्टस्
अरुण नलावडे
संदीप सावंत
देवीदास बापट
राजन चेउलकर
नरेंद्रचंद्र जैन
व्ही.आर. नायक

दीपक चौधरी
कथा माधवी घारपुरे
प्रमुख कलाकार

अरुण नलावडे
अश्विन चितळे
संदीप कुलकर्णी
अमृता सुभाष
गणेश मांजरेकर

अश्विनी गिरी
संवाद संदीप सावंत
संकलन नीरज वरोलिया
छाया संजय मेमाणे
संगीत भास्कर चंदावरकर
ध्वनी सुहास राणे
वेशभूषा नीरजा पटवर्धन
रंगभूषा अंजी बाबू
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

कथानक

संपादन

नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे.

कलाकार

संपादन
  • अश्विन चितळे (परशुराम विचारे , रेतीनल कॅन्सर ग्रस्त मुलगा )
  • अरुण नलावडे (परशुरामचे आजोबा , जे त्याला मुंबईला उपचारासाठी नेतात)
  • संदीप कुलकर्णी (डॉक्टर मिलिंद साने , परशुराम वर उपचार करणारे वैद्य)
  • अमृता सुभाष (आसावरी , वैद्यकीय समाजसेविका जी आजोबा व मुलगा यांच्यात सांगड घालते. )
  • गणेश मांजरेकर (दिवाकर , परशुरामचे काका)
  • अश्विनी गिरी (परशुरामची गावातील आई)

यशालेख

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

आजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो

बाह्य दुवे

संपादन