बराक हुसेन ओबामा ( ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे ४४वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. २०१२ साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

बराक ओबामा

कार्यकाळ
२० जानेवारी २००९ – २० जानेवारी २०१७
उपराष्ट्रपती जोसेफ बायडेन
मागील जॉर्ज डब्ल्यू. बुश
पुढील डॉनल्ड ट्रम्प

सेनेटर
इलिनॉय
कार्यकाळ
२००५ – २००८

इलिनॉय राज्य सेनेट
१३ व्या जिल्ह्यातुन
कार्यकाळ
१९९७ – २००४

जन्म ४ ऑगस्ट, १९६१ (1961-08-04) (वय: ६३)
होनोलुलु, हवाई, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष
पत्नी मिशेल ओबामा
गुरुकुल कोलंबिया विद्यापीठ,
हार्वर्ड विधी विद्यालय
धर्म ख्रिश्चन
सही बराक ओबामायांची सही

९ ऑक्टोबर, २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. ८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये ओबामांनी नवे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प ह्यांच्याकडे सत्ता सुपूर्त केली.

जन्म, लहानपण व शिक्षण

बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरिक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले.

राजकारण

 
निवडणुकीच्या एका प्रचारसभेत बोलताना

१९९६ मध्ये ओबामांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड झाली. पुढची ८ वर्षे त्यांनी राज्य सेनेटर म्हणून विविध समित्यांवर पदे स्वीकारली आणि अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. इथे त्यांनी डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून एक वेगळा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.[] २००४ साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान पक्षाचे तत्कालीन अध्यक्षीय उमेदवार जॉन केरी ह्यांच्यासाठी पाठिंब्याचे भाषण दिल्यानंतर ओबामा प्रसिद्धीच्या झोतात आले.[] दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा नवा चेहरा अशी त्यांची लोकप्रियता वाढत राहिली.[]

२००४ साली ओबामांची अमेरिकेच्या सेनेटरपदी निवड झाली. ह्या निवडणुकीमधे त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला ७०% विरुद्ध २१% अशा मतफरकानी पराभूत केले. अमेरिकेच्या इतिहासात ते फक्त पाचवे कृष्णवर्णीय सेनेटर आहेत. अमेरिकन सेनेटमध्ये त्यांना नवीन तसेच जुन्या सेनेटरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सेनेटच्या अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्षपदी आणि सदस्यपदी राहुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच महत्त्वाचे अहवाल मंजूर करण्यात वाटा उचलला[]. आपल्या सेनेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यक्ष बुश आणि उपाध्यक्ष डिक चेनी ह्यांच्या निर्णयांवर प्रचंड टीकेची झोड उठवली.

 
२० जानेवारी २००९ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना बराक ओबामा

फेब्रुवारी २००७ मध्ये ओबामांनी आपण २००८ची अध्यक्षीय निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनुभवी सेनेटर हिलरी क्लिंटन ह्यांचा पराभव केला. त्यांच्या सर्व प्रचारसभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि त्या जोरावर अमेरिकन मतदारांमध्ये (विशेषतः तरुण पिढीमध्ये) अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्ष बुशच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा त्यांना फायदा मिळाला. आपल्या बदल ह्या मुद्द्याच्या जोरावर ओबामांनी नोव्हेंबर २००८ मधील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर त्यांनी "अमेरिकेमध्ये बदल आला आहे" असे उद्गार काढले.[].

निवडणुकीनंतर ओबामांनी आपल्या आगामी प्रशासनामध्ये आपल्या काही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची (हिलरी क्लिंटनः परराष्ट्रसचिव) तसेच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांची (रॉबर्ट गेट्स: संरक्षणसचिव) निवड करून आपण राजकारणात मोठा बदल आणणार असल्याचे सुतोवाच केले[]. निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना व अमेरिकेचे नवीन परराष्ट्रधोरण तयार करताना त्यांनी आपले प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा वारंवार सल्ला घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षातील आपल्या विरोधकांशी मैत्री करण्यात पुढाकार घेणारे ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे[].

पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ६, २०१२ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉम्नी ह्यांचा ३०२ विरुद्ध २०३ मतांनी पराभव केला.

राजकीय भूमिका

अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांच्या इराकवर चढाई करण्याच्या निर्णयाला ओबामांनी प्रथमपासूनच ठाम विरोध दर्शविला आहे.[] अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेचा शेवट करायचा असेल तर अमेरिकेने इराकवर नव्हे तर अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावर ते अजूनही कायम आहेत.[] आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराकमधून १६ महिन्यात काढून घेऊ तसेच अफगाणिस्तानात अतिरिक्त ७,००० जवान पाठवू अशी घोषणा त्यांनी केली आहे.[१०] इराण हा मध्यपूर्वेतील सर्वांत धोकादायक देश आहे आणि तेथे यादवी टाळायची असेल तर इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून परावॄत्त करणे गरजेचे आहे, असे ओबामांचे ठाम मत आहे.[११] इराण, उत्तर कोरियाक्युबा ह्या देशांशी विनाशर्त वाटाघाटी करण्यास ओबामा तयार आहेत. कोणत्याही देशावर लष्करी कारवाई करण्यापुर्वी राजकीय वाटाघाटींना पूर्ण संधी द्यायला हवी, आणि सैन्य पाठवणे हा सर्वांत शेवटचा पर्याय असायला हवा ह्या विचारांचे ते आहेत.[१२]

ओबामांच्या मते तालिबानअल कायदा ह्या अतिरेकी संगटनांना अमेरिका अथवा इतर लोकशाही राष्ट्रांवर अधिक दहशतवादी हल्ले करण्यापासुन थांबवायचे असेल, तर पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक आहे. पाकिस्तानकडे जर ह्या संघटनांच्या अड्डयांबद्दल खात्रीलायक बातमी असेल आणि तरीही त्यांनी काही कारवाई केली नाही, तर अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय ह्या ठिकाणांवर हल्ले करेल असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान केले.[१३] आपले प्रशासन पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानातील दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणेल तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीचा पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्यासाठी दुरुपयोग केला आहे असेही त्यांनी सांगितले आहे.[१४]

बुश प्रशासनाने ग्वांतानामो बे येथील लष्करी तळावर उघडलेल्या कुप्रसिद्ध बेकायदेशीर तुरुंगाला ओबामांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि तो आपण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे[१५]. गर्भपातावर कायदेशीर बंदी घालण्याच्या ते विरोधात आहेत[१६], तसेच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करणे त्यांना मान्य नाही[१७].

कौटुंबिक व खाजगी आयुष्य

 
बराक ओबामा आणि पत्नि मिशेल

बराक ओबामांची मिशेल रॉबिन्सन ह्यांच्याशी १९८९ मध्ये शिकागोत भेट झाली व त्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया (वयः १० वर्षे) आणि नताशा (वयः ७ वर्षे) ह्या दोन मुली आहेत. आजी मॅडेलाईन डनहम ह्यांना ओबामा कायम आपल्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ असे संबोधतात.[१८] अध्यक्षीय निवडणुकीच्या फक्त २ दिवसांआधी मॅडेलाईन डनहमांचे हवाईमध्ये वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.[१९]

बराक ओबामांनी आत्तापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father) हे आत्मचरित्र १९९५ मध्ये तर द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी आपले राजकीय विचार सविस्तर मांडले आहेत.

बास्केटबॉल हा ओबामांचा आवडता खेळ आहे. निवडणुकीच्या धामधूमीत विरंगुळ्यासाठी ते बऱ्याचवेळ बास्केटबॉलचा आधार घेत असत.[२०] अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ओबामांनी आपण धुम्रपान सोडत असल्याचे जाहीर केले.[२१] २००८ साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणपणी मद्यसेवन व अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याची कबुली दिली.[२२]

बराक ओबामा हे धर्माने ख्रिश्चन आहेत. "आपले वडील त्यांच्या लहानपणी मुस्लिम होते पण तरुणपणापासुन ते नास्तिक बनले, तर आपली आई धार्मिक नव्हती", असे ओबामा आपल्या द ऑड्यासिटी ऑफ होप ह्या पुस्तकात लिहितात. ओबामांनी इंडोनेशियात शिकताना गुप्तपणे मुस्लिम धर्मांतर केले होते किंवा ते एका मदरश्यामध्ये शिकत होते अशा स्वरूपाच्या अफवा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत असे निष्पन्न झाले.[२३] ओबामा शिकागोच्या ट्रिनीटी युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट (Trinity United Church of Christ)चे सभासद होते, पण त्या चर्चचे पाद्री जेरेमाइयाह राईट हे प्रार्थनांदरम्यान वारंवार वर्णद्वेषी व अमेरिकाविरोधी वक्तव्ये करीत असल्याची बातमी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांदरम्यान बाहेर आल्यानंतर ओबामांनी पाद्री राईटशी (आणि पर्यायाने ट्रिनीटी चर्चशी) असलेले संबंध तोडून टाकले.[२४]

जागतिक लोकप्रियता

बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते.[२५] केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते.[२६] ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.[२७]

ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते.[२८] निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला.[२९] ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.[३०] जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.[३१]

समाजकार्य

बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे. १९८५ मध्ये शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प (Developing Communities Project) यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली. त्यापुढील ३ वर्षे त्यांनी कममिळकतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यापैकी काही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रस्तेदुरुस्ती, जुन्या इमारतींतून ॲस्बेस्टॉस काढणे, बेरोजगारांसाठी प्रशिक्षण, इत्यादी.[३२] इथेच त्यांच्या राजकारणातल्या भावी कारकिर्दीची पाळेमुळे घडली.[३३]

१९९३ साली हार्वर्डहून शिकागोत परतल्यावर ओबामा कायदाहक्काचे वकील हा पेशा स्वीकारून कृष्णवर्णीय व गरीब समाजाच्या कायदेशीर हक्कांसाठी (मतदानहक्क, रोगनिवारण, इत्यादी) काम करत राहिले.[३४]

संदर्भ

  1. ^ चार्ल्स पीटर्स (जानेवारी ४, २००८). "Judge Him By His Laws", द वॉशिंग्टन पोस्ट.
  2. ^ (ऑगस्ट २, २००४) "Star Power"[मृत दुवा], विदागारातील आवृत्ती न्यूजवीक साप्ताहिक.
  3. ^ मोनिका डवेय (२६ जुलै, २००४) "A surprise Senate contender reaches his biggest stage yet", द न्यू यॉर्क टाईम्स.
  4. ^ इंग्रजी विकिपीडिया वरील लेख
  5. ^ वेस्ली जॉन्सन (५ नोव्हेंबर २००८) "Change has come, says President-elect Obama", द इंडिपेडंट
  6. ^ "इंग्रजी विकिपीडिया वरील लेख"
  7. ^ http://www.nytimes.com/2009/01/19/us/politics/19mccain.html?scp=2&sq=mccain%20obama&st=cse
  8. ^ Strausberg, Chinta (2002-09-26). "Opposition to war mounts Archived 2011-05-11 at the Wayback Machine." (paid archive), Chicago Defender, p. 1. Retrieved on 3 February 2008.
  9. ^ http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/hardtalk/7281805.stm
  10. ^ http://ca.news.yahoo.com/s/capress/080714/world/obama_afghanistan_2 [मृत दुवा]
  11. ^ http://www.news24.com/News24/World/US_Elections_2008/0,,2-10-2339_2334849,00.html Archived 2009-01-06 at the Wayback Machine.
  12. ^ http://www.chicagotribune.com/news/printedition/chi-0409250111sep25,1,4555304.story?ctrack=1&cset=true
  13. ^ http://www.reuters.com/article/domesticNews/idUSN0132206420070801
  14. ^ http://www.rediff.com/news/2008/sep/05obama.htm
  15. ^ http://www.newsweek.com/id/168294 [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  16. ^ "संग्रहित प्रत". 2008-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-18 रोजी पाहिले.
  17. ^ http://www.politifact.com/truth-o-meter/statements/712/
  18. ^ "संग्रहित प्रत". 2009-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-15 रोजी पाहिले.
  19. ^ http://voices.washingtonpost.com/the-trail/2008/11/03/obamas_grandmother_dies.html
  20. ^ http://www.latimes.com/news/nationworld/nation/la-na-basketball4-2008oct04,0,4130131.story?track=rss
  21. ^ "संग्रहित प्रत". 2008-02-16 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2008-02-16 रोजी पाहिले.
  22. ^ http://www.iht.com/articles/2006/10/24/news/dems.php [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  23. ^ http://redblueamerica.com/truthornot/2008-02-13/barack-obama-secret-muslim-933
  24. ^ http://www.nytimes.com/2008/06/01/us/politics/01obama.html?_r=1&bl&ex=1212552000&en=4f275b18627314ec&ei=5087%0A
  25. ^ http://news.bbc.co.uk/2/hi/americas/us_elections_2008/7735014.stm
  26. ^ "संग्रहित प्रत". 2008-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-12-15 रोजी पाहिले.
  27. ^ http://www.cnn.com/2009/POLITICS/01/20/obama.inauguration/index.html?iref=mpstoryview
  28. ^ http://www.abc.net.au/news/stories/2008/09/09/2360240.htm?section=world
  29. ^ http://edition.cnn.com/2008/WORLD/africa/11/04/intl.reax/index.html
  30. ^ http://www.voanews.com/lao/archive/2008-11/2008-11-05-voa4.cfm?CFID=79908720&CFTOKEN=45678510 [मृत दुवा]
  31. ^ http://www.sfgate.com/cgi-bin/article.cgi?f=/c/a/2008/11/05/MNGJ13UP78.DTL
  32. ^ http://www.usnews.com/usnews/news/articles/070826/3obama.htm [मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  33. ^ http://www.latimes.com/news/nationworld/nation/ny-usobam025598601mar02,1,6933215,full.story Archived 2008-12-27 at the Wayback Machine.
  34. ^ http://articles.latimes.com/2008/apr/06/nation/na-obamalegal6

बाह्यदुवे